ध्यान कि झोप?
नव्याने ध्यान करणाऱ्यांना नेहमी असं वाटतं की त्यांना ध्यानाच्या वेळी झोप लागली आहे ! वास्तविक पाहता त्यावेळी त्यांनी ध्यानमग्न स्थितीत प्रवेश केलेला असतो. झोपेमुळे पूर्ण विश्रांती मिळते असं त्यांचं मत झालेलं असतं. ध्यानाच्या वेळी झोप लागली आहे,असं वाटणं साहजिक आहे ,कारण त्यांना अद्याप ध्यान म्हणजे नेमकं काय ते समजलेलं नसतं. म्हणून खोलवर विश्रांती म्हणजे झोप असं ते समजतात.
ताणतणाव आणि शारीरिक व मानसिक थकव्यातून सुटका
बऱ्याच वेळा ध्यान करत असताना आपल्याला गाढ झोप लागते , काही हरकत नाही ! ध्यानात झोप येऊ नये यासाठी मुद्दामहून दक्ष रहाण्याची गरज नाही. उलटपक्षी आपला तणाव व थकवा नाहीसा होत आहे अशा दृष्टीने या सुस्तपणाकडे व झोपेकडे पाहिले पाहिजे. काही जणांना ध्यान करत असताना व काही वेळा ध्यान झाल्यावर सुद्धा झोपेची गुंगी किंवा सुस्तपणा जाणवतो. असं वाटणे हे लाभदायक निर्मळ होण्याची, मोकळे होण्याची प्रक्रिया आहे, हे ध्यानात असू द्या.
जर आपणास ध्यान करताना आडवं व्हायची आणि झोपायची तीव्र इच्छा होत असेल तर तसं करा. पण अत्यंत निकडीचं गरजेचं असल्याशिवाय आडवे होऊ नका. जेंव्हा आपण जागे व्हाल त्यावेळी उठून बसा आणि पाच मिनिटं किंवा थोडा जास्त वेळ ध्यान करा. जागे झाल्यावर केलेल्या अशा छोट्याश्या ध्यानाने आपला राहिलेला थकवा आणि सुस्ती पूर्ण निघून जाईल.
जागृतावस्था आणि निद्रावस्था ह्या सूर्योदय आणि अंधार यासारख्या आहेत , आणि स्वप्न म्हणजे यामधला संधिप्रकाशाचा काळ! ध्यान म्हणजे जणूकाही बाह्य अवकाशात केलेले उड्डाण आहे! जेथे सूर्यास्त नाही,सूर्योदय नाही -काहीच नाही!
– गुरुदेव श्री श्री रवि शंकर
झोप आणि ध्यान यातील फरक
काही दिवस नियमित ध्यान केल्यानंतर , झोप आणि ध्यान या पूर्णपणे वेगळ्या अवस्था आहेत याची आपल्याला जाणीव होते. झोपेतून उठल्यावर आपल्याला थोडी सुस्ती जाणवत असते. ध्यानातून – खोलवर अशा ‘ “न- मन”(मन नसण्याच्या) स्थितीतून बाहेर येताना कोणताही संदेह नसतो, स्पष्टता असते आणि शांत, उल्हासित व आनंदी वाटते.
गाढ झोपेत असताना होणारा व ध्यानाचे वेळी होणारा श्वासोच्छ्वास सुद्धा पूर्णपणे वेगळ्या प्रकारचा असतो. ध्यानाच्या अत्यंत गहन स्थितीमध्ये श्वास अतिशय मंद किंवा तात्पुरता थांबलेला असू शकतो. झोपेत सुद्धा श्वसनाची गती कमी होते,पण ती थोडीशीच कमी होते.
आपल्या ध्यानाच्या वेळी आपण ‘ झोपलेलो आहोत की सखोल ध्यानात आहोत ?’ याचा वेळोवेळी शोध घेत बसू नका ! असे कराल तर तो ध्यानाच्या निखळ प्रक्रियेमध्ये अडथळा ठरेल ! ” जे काही होतंय, ते छान आहे ” असाच दृष्टिकोन ठेवा, तेच उत्तम आहे.
ध्यानाच्या वेळी आपण सजग (जागरुक) असतो व झोपेमध्ये सजग नसतो. हाच ध्यान आणि झोप यामधला मुख्य फरक आहे. पण ध्यानातील सजगता ही जागृतावस्थेतील सजगतेपेक्षा गुणात्मक दृष्ट्या वेगळी आहे. हा फरक कळण्यासाठी आणि ध्यान आणि झोप हे वेगळे कसे आहेत हे समजण्यासाठी जाणीवेच्या चार स्तरांवर — मन, बुद्धी, स्मृति. अहंकार — कसा परिणाम होतो, हे पहावे लागेल. हा परिणाम जागृत अवस्था, स्वप्नावस्था, निद्रावस्था (सुषुप्ती ) व चौथी अवस्था,जी ध्यानात अनुभवता येते, पारंपारिक भाषेत जिला ‘तुर्यावस्था ‘ म्हणतात, अशा चार अवस्थांमध्ये पहावा लागेल.
जागृतावस्थेमध्ये मन, बुद्धी, चित्त (स्मृति ) व अहंकार हे चारही स्तर काही प्रमाणात कार्यरत असतात. स्वप्नावस्थेमध्ये फक्त चित्त (स्मृति) कार्यरत असते. गाढ निद्रेत हे चारही स्तर कार्य करत नसतात. कोणतीही जाणीव नसते, चेतना विश्रांती घेत असते.
ध्यानस्थितीत मनाला इंद्रियांकडून विविध संदेश मिळत असतात. मात्र ध्यानमग्न स्थितीत हे मन पूर्णपणे बंद होतं. अहंकाराच्या स्तरावर काहीच होत नसतं. मात्र बुद्धी व चित्त (स्मृति) सूक्ष्मरित्या कार्यरत असतात. ध्यान हे झोपेसारखंच आहे,पण ध्यानात बुद्धी सूक्ष्म प्रमाणात कार्य करत असते. आणि तुर्यावस्थेमध्ये आपल्या खऱ्या, वास्तविक, मूळ स्वभावाची स्वयंप्रेरणेने जाणीव होते.
आतून खोल मोकळं होण्यासाठी ध्यानाच्या वेळी “सोडून द्या” -(जाऊ द्या)
![](https://www.artofliving.org/in-en/app/uploads/2023/06/Meditation.jpg)
गुरुदेव श्री श्री रविशंकर म्हणतात, “सोडून देणं ” दोन प्रकारचं असतं. एक म्हणजे सर्व गोष्टी टाकून तुम्ही सुप्तावस्थेत जाता – म्हणजे झोप – तामसिक अवस्था – ज्यात काही ज्ञान मिळण्याची शक्यता नाही !. दुसऱ्या प्रकारचं “सोडून देणं” आपल्याला पूर्ण विश्रांती देतं – पण त्याचवेळी सूक्ष्म प्रमाणात ते चालू रहातं – हेच ध्यान !
ध्यानात आणि झोपेत चयापचय क्रिया संथ होते, श्वसन क्रिया आणि इतर शारीरिक क्रिया मंद होतात. दोन्हीमध्ये तणाव कमी होतो, पण ध्यानामुळे मिळणारी विश्रांती ही झोपेमुळे मिळणाऱ्या विश्रांतीपेक्षा सखोल असते, गाढ असते.म्हणून मनात खोलवर रुजलेल्या संकल्पना आणि संस्कार नाहीसे होतात.
तरीही ध्यान हे पूर्णपणे झोपेच्या पलीकडचं आहे. आपल्याला त्या चेतनेची त्यातूनच जाणीव होत असते. हीच जाणीव आपल्यात जागृत,स्वप्न व निद्रावस्थेमध्ये असते आणि याचसाठी साक्षीदार असते.
झोपेत चेतना तिच्या कोणत्याही रुपामध्ये कार्यरत नसते, पण हीच चेतना आपण झोपलो आहोत याची साक्षीदार असते. आणि म्हणूनच “छान झोप लागली” हे आपल्याला समजतं.
लेखक – ख्रिस डेल (Chris Dale) ॲडव्हान्स मेडीटेशन कोर्स प्रशिक्षक