कर्माचा अर्थ काय आहे? (What in Karma Meaning)

कर्माचा शाब्दिक अर्थ क्रिया असा आहे. असे म्हणतात की, कर्माचे मार्ग विचित्र आहेत. जितके तुम्ही ते समजून घ्याल तितके तुम्ही चकित व्हाल. ते लोकांना एकत्र आणते आणि त्यांना वेगळे देखील करते. त्याच्यामुळे काही दुर्बल तर काही बलवान होतात. त्यातून काही श्रीमंत होतात तर काही गरीब. जगातील सर्व संघर्ष, ते कोणतेही असोत, हे कर्माचेच बंधन आहेत.

कर्मानुसार चांगल्या किंवा वाईट गोष्टी घडत असतात. जेव्हा काळ चांगला असतो तेव्हा शत्रूसुद्धा मित्रासारखे वागतात. आणि आपल्या जीवनात वेळेची भूमिका फार मोठी असते. कर्म सर्व तर्क आणि युक्तिवाद यांच्या पलीकडे असते. ही समज तुम्हाला घटना आणि व्यक्तिमत्त्वांमध्ये अडकवणार नाही आणि तुम्हाला तुमच्या आत्म्यापर्यंतच्या प्रवासात मदत करेल. काही कर्मे बदलली जाऊ शकतात तर काही कर्मे बदलली जाऊ शकत नाहीत.

काळाचा प्रभाव बदलून कर्मापासून मुक्त होण्याची क्षमता केवळ मानवांमध्येच असली तरी त्यातून होण्याची इच्छा फक्त काही काही हजार लोकांमध्येच असते. परंतु जर तुम्हाला ध्यानाद्वारे कर्म कसे संपवायचे हे जाणून घ्यायचे असेल तर पहिली पायरी म्हणजे कर्माचे विविध प्रकार जाणून घेणे.

कर्माचे तीन भिन्न प्रकार

  1. प्रारब्ध कर्म

    प्रारब्ध’ म्हणजे ‘सुरुवात झालेला’ – जी क्रिया आधीच प्रकट होत आहे. प्रारब्ध हे असे कर्म आहे जे सध्या त्याचा परिणाम देत आहे. आपण ते टाळू किंवा बदलू शकत नाही कारण ते आधीच घडून गेलेले आहे.

  2. संचित कर्म

    याचा अर्थ ‘एकत्र केलेले’ किंवा ‘संचयित केलेले’ कर्म — जे आपण आपल्यासोबत आणले आहे. ‘संचित’ म्हणजे संकलित कर्म जे ध्यानासारख्या अध्यात्मिक पद्धतींनी संपूर्णपणे पुसून टाकता येते.

    प्रार्थनेद्वारे, सेवेद्वारे आणि निसर्गातील आपल्या सभोवतालच्या लोकांना आपल्या प्रेमात आणि आनंदात सामायिक केल्याने आपण आपले संचित कर्म, जे आपल्याकडे प्रवृत्ती रुपात संग्रहित आहे, ते देखील दूर करू शकतो. सत्संग (सत्याचा सहवास – मूलत: ज्ञानी आणि दयाळू लोकांचा सहवास, ज्यांच्या उपस्थितीत आपल्याला उन्नत आणि आनंदी वाटते) सर्व नकारात्मक कर्माचे बीज जाळून टाकतो.

  3. आगामी कर्म

    ‘आगामी’ चा शब्दशः अर्थ ‘आला नाही’ असा होतो. आगामी कर्म हे असे कर्म आहे जे अद्याप आलेले नाही: असे की जे भविष्यात प्रभावी होईल. जर तुम्ही गुन्हा केलात तर आज तुम्ही पकडले जाणार नाही पण एक दिवस पकडले जाण्याची शक्यता या विचाराने तुम्ही आयुष्य कंठीत कराल. ही कृती म्हणजे भविष्यातील कर्म आहे. काही मजबूत ठसे राहतात आणि ते भविष्यातील कर्म तयार करतात.

    दुसरी पायरी म्हणजे चांगले आणि वाईट कर्म जाणून घेणे. कोणतीही गोष्ट, जी तुम्ही एखाद्याला करता, ती तुमच्याकडे परत येते. हे कर्म तत्व आहे. म्हणून, आपल्या कृतीवर चांगले किंवा वाईट कर्म अवलंबून असू शकते.

चांगले कर्म

त्या सर्व चांगल्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही इतरांसाठी करता आणि मग तुम्ही स्तुती किंवा त्यातून काही परिणामाची अपेक्षा करून त्यांच्यात अडकता. “मी एवढी सेवा केली आहे किंवा मी दहा वर्षे ध्यान केले आहे, त्यामुळे मला काही भौतिक लाभ मिळायला हवेत किंवा आध्यात्मिकरित्या पुढे जायला पाहिजे.”

काहीवेळा लोक चांगले कृत्य केल्यावर दुःखी होतात , कारण त्यांना त्या बदल्यात स्तुतीची अपेक्षा असते. मग ते कर्म होते. लोकांसाठी चांगले करा कारण तो तुमचा स्वभाव आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या कर्माच्या परिणामाशी संलग्न होत नाही, तेव्हा तुम्ही त्या कर्मापासून मुक्त होता. म्हणूनच भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात: तुमच्या कर्माचे फळ मला समर्पित करा. जेव्हा तुम्ही इतरांचे भले करू इच्छिता तेव्हा चांगल्या गोष्टी तुमच्याकडे परत येतात. हा निसर्गाचा नियम आहे.

वाईट कर्म

इतरांना हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने केलेली कोणतीही गोष्ट, ती एखादी कृती किंवा विचार असू शकतो, हे वाईट कर्म आहे. वाईट कर्म का टाळावे हे सांगताना गुरुदेव श्री श्री रविशंकर म्हणतात:

“तुम्ही काही चुकीचे का करू नये? हे आधी समजून घेऊ. जर तुम्ही काही चुकीचे केले तर ते तुमची झोप, तुमची मनःशांती हिरावून घेईल आणि तुमच्या आरोग्याचा नाश करेल. काहीतरी मनाला टोचत राहील. जेव्हा एखादी गोष्ट मनाला टोचत राहते, तेव्हा तुम्ही काहीही सर्जनशील करू शकत नाही आणि तुम्ही दुःखी होता. तुम्ही इतरांची फसवणूक का करू नये? कारण तुमची कोणी फसवणूक करू नये असे तुम्हाला वाटते, नाही का? कोणतीही गोष्ट, जी तुम्ही एखाद्याला करता, ती तुमच्याकडे परत येते. हे कर्म तत्व आहे. हे अगदी सोपे आहे.”

तुम्हाला माहीत आहे का?

जेव्हा तुम्ही एखाद्याची स्तुती करता तेव्हा तुम्ही त्यांच्या चांगल्या कर्माचा स्वीकार करता आणि एखाद्याला दोष देता तेव्हा तुम्ही त्यांच्या वाईट कर्माचा स्वीकार करता.

कर्म आणि ध्यान यांचा संबंध

ध्यानामुळे समता आणि केंद्रितपणा येतो. हे अपेक्षा, तुमची अपराधी भावना, लाज आणि दोष देण्याची प्रवृत्ती कमी करण्यास मदत करते. ते वैराग्य आणि अलिप्ततेची भावना आणते. म्हणून, भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने म्हटल्याप्रमाणे, जरी तुम्ही कृती करत असलात तरी ते कर्मात रुपांतरीत होत नाही.

वैराग्यपूर्ण प्रेम, अपेक्षांपासून मुक्त, पुनर्जन्म नाही आणि कर्माचे चक्र नाही. त्याचप्रमाणे, जेव्हा तुम्ही इतरांना किंवा स्वतःला दोष देणे थांबवता आणि अपराधीपणाची भावना, दु: ख किंवा लाज तुमच्या सद्द्विवेकबुद्धीला झाकोळू देत नाही, तेव्हा तुम्ही मुक्त व्हाल. हे स्वातंत्र्य तेव्हाच प्राप्त होते जेव्हा तुम्ही तुमच्या उच्च स्वत्वाची, गुरूची, ध्यानाद्वारे जाणीव करता.

ध्यानाद्वारे कर्मापासून मुक्ती कशी मिळवायची?

ध्यानाद्वारे कर्मातून मुक्त होणे खरोखर शक्य आहे का? गुरुदेव म्हणतात काही कर्मे बदलली जाऊ शकतात आणि काही कर्मे बदलली जाऊ शकत नाहीत.

तुम्ही मिष्टान्न तयार करता तेव्हा, जर साखर किंवा तूप शिजवण्याच्या आधीच्या टप्प्यावर खूप कमी असेल तर तुम्ही आणखी घालू शकता. जर काही इतर घटक खूप जास्त असतील तर ते सर्व समायोजित आणि दुरुस्त केले जाऊ शकतात. पण एकदा शिजल्यावर ही प्रक्रिया उलट करता येत नाही.

दुधापासून गोड दही किंवा आंबट दही बनू शकते आणि आंबट दही गोड करता येते. पण दह्याचे परत दूध होऊ शकत नाही. प्रारब्ध कर्मे बदलता येत नाही. अध्यात्मिक पद्धतींद्वारे संचित कर्मे बदलता येते.

कर्मापासून मुक्त होणे म्हणजे संस्करणापासून मुक्त होणे. संचित कर्म हे मनातील प्रवृत्ती किंवा ठसा म्हणून प्रकट होते. एक मानव म्हणून आपल्यात ध्यानाद्वारे छाप आणि भीती मिटवण्याची क्षमता आहे. ध्यान आहे ते वेदनादायक कर्मे सुधारण्यासाठी, किमान त्यांचा परिणाम किंवा प्रभाव कमी करण्यासाठी आहे.

(ध्यानाचा) अंतर्बाह्य प्रवास आपले नकारात्मक कर्म नष्ट करतो. जेव्हा तुम्ही ध्यान करता तेव्हा तुम्ही केवळ सर्वकाही धुवून टाकत असता. मग उरते ती फक्त शून्यता. तुम्ही इतके पोकळ आणि रिकामे होता की जे काही भय आहे ते विरघळते आणि नाहीसे होऊन जाते.

ध्यानाद्वारे, वाईट कर्मे आत्ताच, येथे धुतली जाऊ शकतात. देह सोडण्यापूर्वी कर्मापासून मुक्त व्हा आणि तुमच्या अवतीभवती असलेला अज्ञानाचा पडदा कायमचा फेकून द्या.

गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या ज्ञानाच्या चर्चेचा आधार घेत, रविशा कथुरिया यांनी संकलित केलेले आहे.

नियमितपणे ध्यानाचा सराव केल्याने तुम्हाला तणावा संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळते, मनाला खोलवर आराम मिळतो आणि प्रणालीला चैतन्य मिळते. आर्ट ऑफ लिव्हिंगचा सहज समाधी ध्यान हा एक खास तयार केलेला कार्यक्रम आहे जो तुम्हाला तुमच्या अमर्याद क्षमतेचा उपयोग करून स्वतः मध्ये खोलवर जाण्यास मदत करतो.

तुमच्या जवळच्या आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्रात सहज समाधी ध्यान कार्यक्रम शोधा.

    Hold On!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

    *
    *
    *
    *