आजच्या वेगवान आणि अशांत जगात, आंतरिक शांती आणि स्वाथ्य शोधणे हे बऱ्याच व्यक्तींसाठी प्राधान्य बनले आहे. ध्यान म्हणजे गतिमानतेपासून निरवतेकडे, आवाजापासून शांततेकडे जाण्याचा प्रवास आहे. ध्यान करण्याची गरज प्रत्येक माणसामध्ये असते कारण असा आनंद जो कमी होत नाही, प्रेम जे विकृत होत नाही किंवा नकारात्मक भावनांमध्ये रूपांतरित होत नाही ते शोधण्याची मानवी जीवनाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. ध्यान तुमच्यासाठी अनोळखी आहे का? अजिबात नाही. याचे कारण असे की तुम्ही तुमच्या जन्मापूर्वी काही महिने ध्यानात होतात. तुम्ही तुमच्या आईच्या उदरात काहीच करत नव्हतात. तुम्हाला तुमचे अन्न चावण्याचीही गरज नव्हती – ते थेट तुमच्या पोटात भरल्या जात होते, आणि तुम्ही तेथे मजेत पाण्यात पोहत होतात, गोल फिरत होतात आणि लाथ मारत होतात, कधी इकडे कधी तिकडे, परंतु बहुतेक वेळा आनंदाने तिथे तरंगत होतात. ते म्हणजे ध्यान किंवा पूर्ण विश्राम.
ध्यान हा आवाजाकडून शांततेकडे केला जाणारा प्रवास आहे
~गुरुदेव श्री श्री रवि शंकर
आत्म्याचे अन्न
जर आपण ध्यानामुळे आपल्या जीवनात होणारे फायदे बघितले, तर आपल्याला असे जाणवते की ते सर्व अधिक सुसंबद्ध आणि आवश्यक आहे. प्राचीन काळी ध्यानाचा उपयोग आत्मज्ञानासाठी केल्या जात असे, ‘स्वयं’ला शोधण्यासाठी केल्या जात असे. ध्यान हा दुःख दूर करण्याचा आणि समस्यांवर मात करण्याचा एक मार्ग होता. स्वतःच्या क्षमता सुधारण्याचा देखील हा एक मार्ग होता. पूर्वी या तीन गोष्टींसाठी ध्यानाचा वापर केला गेला आहे. आजच्या जगात आत्मज्ञान बाजूला ठेवून जर आजच्या सामाजिक समस्या, दबाव आणि ताणतणाव पाहिल्यास, ध्यान करणे अत्यावश्यक आहे. तुमच्या जीवनात तुमच्यावर जितकी जबाबदारी असेल तितकी तुम्हाला ध्यानाची गरज आहे. जर तुम्हाला काही करायचे नसेल, तर तुम्हाला ध्यानाची इतकी गरज भासणार नाही. परंतु तुम्ही जेवढे अधिक व्यस्त आहात, तुमच्याकडे जितका वेळ कमी असेल, तुमच्याकडे जास्त काम असेल आणि मग तुमच्या इच्छा आणि महत्त्वाकांक्षा असतील, त्यामुळे तुम्हाला ध्यान करण्याची जास्त गरज आहे. ध्यान केल्याने तुम्हाला तणावापासून मुक्ती आणि शक्ती तर प्राप्त होतेच, परंतु ध्यानामुळे आव्हानांना तोंड देण्याची तुमची क्षमता देखील वाढवते. ध्यान केल्याने आपले आरोग्य सुधारते. संगीत हे भावनांचे अन्न आहे; ज्ञान हे बुद्धीचे अन्न आहे; मनोरंजन हे मनाचे अन्न आहे; ध्यान हे आपल्या आत्म्याचे किंवा अंतरात्म्याचे अन्न आहे. ध्यान हे मनाला ऊर्जा प्रदान करणारे आहे.
नैसर्गिक सकारात्मकता
कधी कधी तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटता आणि विनाकारण तुम्हाला त्यांच्याशी बोलूच नये असे वाटते. असे झालेले तुमच्या लक्षात आले आहे का? इतर असे काही लोक ज्यांना तुम्ही वरचेवर भेटत नाही, तरीही तुम्हाला त्यांच्याशी जवळीक वाटते आणि त्यांच्यासोबत प्रशस्त वाटते. असे सकारात्मक उर्जेमुळे घडून येते. ध्यान केल्याने आपल्या आजूबाजूला सकारात्मक आणि सुसंवादी ऊर्जा निर्माण होते.
सर्वात कमी वेळेत गहन विश्रांती
उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयाच्या समस्या, त्वचेच्या समस्या, मज्जासंस्थेच्या समस्या आणि इतर अनेक समस्यांवर ध्यान कसे मदत करते यावर आता बरेच संशोधन झाले आहे. अनेक मानसिक आजार आणि शारिरीक आजारांपासून बचाव करण्यासाठी त्याची मोठी मदत होते. बौद्धिकपातळीवर ध्यान तीक्ष्णता, एकाग्रतेमध्ये कुशाग्रता, जागरूकता आणि निरीक्षण आणते. भावनिकदृष्ट्या तुम्हाला अधिक हलके, अधिक मृदू आणि अधिक शुद्ध वाटते. आपण गतकाळातील सर्व केरकचरा सोडून देऊ शकता. ध्यानामुळे तुमच्या सभोवताली सकारात्मक स्पंदने निर्माण होतात, तुमच्या इतरांसोबतच्या वर्तनावर आणि तुमच्यासोबत असलेल्या इतरांच्या वागणुकीवर परिणाम करते. ध्यान केल्याने कमीत कमी वेळेत गहन विश्रांती मिळते.
एकाग्रता आणि स्पष्टता
ध्यान आपल्याला वर्तमान क्षणात राहण्यास मदत करते. मन भूतकाळ आणि भविष्यकाळ यांच्यामध्ये दोलायमान होत असते. आपण एकतर भूतकाळाबद्दल संतप्त असतो किंवा भविष्याबद्दल सदैव चिंतेत असतो. म्हणूनच ध्यानामुळे मनाला भूतकाळ आणि भविष्यकाळ यांच्यात झोके घेण्याचे थांबावून वर्तमानात अधिक राहण्यास मदत होते. आरोग्यविषयक फायद्यांव्यतिरिक्त, ध्यान एकाग्रता सुधारते. ते तुमच्या गोष्टी समजून घेण्याच्या पद्धतीत सुधारणा करते. त्यातून मनात स्पष्टता येते.
माझ्यात शांतता, पृथ्वीवर शांतता
ध्यान हे आपल्या सभोवतालच्या लोकांबरोबरच्या संवादात सुधारणा करते.. तुम्ही काय बोलता आणि वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये तुम्ही कसे वागता आणि कशी प्रतिक्रिया देता याविषयी तुम्ही जागरूक होता. तणावमुक्त समाजापासून व्यक्तींमध्ये शांतता आणि निरोगी आरोग्यापर्यंत आणि हिंसामुक्त समाजापासून दुःखमुक्त आत्म्यापर्यंत – हे सर्व ध्यानाचे परिणाम आहेत.
ध्यान हे निवारक असते. जेव्हा मन शांत, सावध आणि पूर्ण समाधानी असते, तेव्हा ते लेझर किरणासारखे असते – ते खूप शक्तिशाली असते आणि निवारक असू शकते.
– गुरुदेव श्री श्री रवि शंकर
आज एकीकडे जगाची चेतना सुधारत आहे; तर दुसरीकडे तुम्हाला सर्वत्र नकारात्मकता आणि अशांतता दिसते. आणि त्याचवेळी पूर्वीपेक्षा जास्त लोक जगाबद्दल चिंतित आहेत. अधिकाधिक लोकांना जगासाठी काहीतरी करावयची इच्छा आहे. जर पृथ्वीच्या एका भागात प्रलंबित उन्हाळा असेल तर दुसऱ्या भागात जास्त हिवाळा असतो. संपूर्ण जगामध्ये दिवसा मिळणारा प्रकाश आणि रात्रीचे प्रमाण जवळपास संतुलित आहे. म्हणून जेव्हा आपण मोठे चित्र पाहतो तेव्हा आपल्याला हा आत्मविश्वास असला पाहिजे की एक मोठी शक्ती या पृथ्वी ग्रहाची काळजी घेत आहे आणि हजारो वर्षांपासून ती आपले कार्य करत आहे. पण आपण काही न करण्याची हे कारण सबब होऊ शकत नाही!
कृती आणि ध्यान यांचा समतोल साधला की जीवन स्वाभाविकपणे बहरते
~ गुरुदेव श्री श्री रवि शंकर
आंतरिक शांततेशिवाय बाह्य शांतता असू शकत नाही. ध्यान आंतरिक शांततेची शाश्वती देते. जेव्हा आंतरिक शांतता असते तेव्हा तुम्ही बाह्य शांतता देखील मिळवू शकता. जर तुम्ही क्षोभित असाल, हताश असाल, तर तुम्ही बाहेर शांतता निर्माण करू शकत नाही. जसे ते म्हणतात, “दानाची सुरुवात घरातूनच होते”. दान रिकाम्या वाडग्याने होऊ शकत नाही. त्यात आधीपासूनच काहीतरी असले पाहिजे. त्याचप्रमाणे, शांती देण्यासाठी ती आधी तुमच्यामध्ये असणे आवश्यक आहे. तसेच केवळ शांतता व्यक्त करणाऱ्या शब्दांनी शांती प्रस्थापित होत नाही. शांतता एक स्पंदन आहे. म्हणून जेव्हा तुम्ही आतून शांत आणि अविचलित असता तेव्हा तुमची ताकद अनेक पटींनी वाढते. जेव्हा तुम्ही अशा तऱ्हेने बलवान असता तेव्हा तुम्ही कोणत्याही ठिकाणी जाऊ शकता आणि शांततेबद्दल बोलू शकता. अशा पद्धतीने ध्यानामुळे तुम्हाला आंतरिक शक्ती मिळते. आणि ते तुमच्या सभोवती शांततेची कंपने प्रसारित करते. आणि म्हणूनच शांततेसाठी ध्यान आवश्यक आहे.
ध्यान शिकण्यासाठी आणि वैयक्तिक शांततेपासून अधिक शांततापूर्ण समाजाचा लाभ घेण्यासाठी, आजच हॅपीनेस प्रोग्रॅमसाठी साइन अप करा.