समुद्राच्या काठावर आदळणाऱ्या लाटा पाहण्यात नेहमीच आनंद वाटतो. खरंच, निसर्गाच्या अगदी खोलवरून निर्माण होणारा हा ध्वनी आपल्या आत्म्याला किती सुखावणारा आणि ध्यानस्थ करणारा!

तणावमुक्तीसाठी ध्यान

जीवन एक सुंदर प्रवास आहे. पण तणावाच्या कचाट्यात असल्यासारखे वाटते. तणाव म्हणजे जीवनात येणाऱ्या निरनिराळ्या परिस्थितींना तोंड देण्याची असमर्थता. मग त्याचे निमित्त आपल्या आतले असो किंवा भोवतालच्या परिस्थितीचे असो आणि त्याचे कारण कोणतेही किंवा कितीही असो.

ताणतणावचे कारण हे अगदी कमी वेळात कपडे धुण्यापासून ते कामांच्या यादी पर्यंत अतिशय साधे असू शकते; किंवा आजार सहन करण्याची सहनशक्ति कमी असल्यामुळे किंवा आपल्या नियंत्रणाबाहेरील वेदनादायक अनुभवांमुळे असू शकते. सर्व प्रकारचे लोक त्यातून जात असलेले पहायला मिळते. आपल्या आजूबाजुच्या वातावरणामुळे असलेले  विचार किंवा भीती देखील तणावाच्या कारणांपैकी एक असू शकते.

तणावामुळे शारीरिक आणि मानसिक अशा विविध स्तरांवर होत असलेल्या परिणामा बद्दल वैद्यकीय क्षेत्रात बोलले जाते. शारीरिक तणावाचा परिणाम  पचन, रक्ताभिसरण आणि श्वसन संस्थांवर होऊ शकतो आणि त्यामुळे शरीराच्या रोगप्रतिकारक कार्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, तर  प्रत्येकाला असलेल्या तणावाच्या पातळीनुसार भावनिक ताणतणाव मुळे गोंधळ, चिंता आणि नैराश्य निर्माण होऊ शकते..

काहीही असो, हे ताणतणाव जितक्या लवकर दूर केले जातील तितके चांगले. जर तणाव दीर्घकाळ त्रासदायक ठरला तर आपल्या सिम्पेथेटिक मज्जासंस्थेद्वारे होणारा लढा देणे किंवा पळ काढण्याचा लढा वा पळा हा प्रतिसाद आपल्या अमिग्डाला हायजॅक आरोग्यावर परिणाम करू शकतो म्हणून,  जिथे ‘भावनिक मेंदू’ ‘विचार करणाऱ्या मेंदू’पासून वेगळा होतो अशा अमिग्डाला हायजॅक  होण्याआधी आपण त्यावर लक्ष देणे महत्वाचे आहे.

*अमिग्डाला हा मेंदूचा एक भाग आहे जो भावनिक प्रतिसादाला उत्तेजित करतो, तर मेंदूचा पुढचा भाग संज्ञानात्मक विचार करण्यास सक्षम करतो. ताणतणावांमुळे  अमिग्डालाची लढा देणे  किंवा पळ काढण्याची लढा वा पळा हि प्रतिक्रिया अचानकपणे उद्भवू शकते. परंतु, जेंव्हा व्यक्ति जास्त भावनिक असतो तेंव्हा ती अगदी नियंत्रणात असते आणि आपण परिस्थितीला प्रतिक्रिया देण्याऐवजी परिस्थितीला प्रतिसाद देतो.

जेंव्हा आपण आपल्या बऱ्याच आधीच्या पिढ्यांच्या जीवनशैलीबद्दल वाचतो की ते अधिक शांत होते आणि  त्यांच्यात अधिक सुसंवाद होता, तेंव्हा त्याचे आश्चर्य वाटते. आध्यात्मिक साधना आणि ध्यान पद्धती हा अंतर्ज्ञानी मनासोबत निरोगी जीवनशैलीचा मार्ग दाखवणारा दुवा असल्याचे सिद्ध झाले आहे.

अनुकूलता, लवचिकता, मनाला लावून न घेणे आणि आपण जसे आहोत त्यात सहज वाटणे, जे प्राण (शरीरातील जीवन शक्ती) संतुलित करण्यास मदत करते आणि शांततेची सूक्ष्म भावना आणते.

आपल्या पूर्वीच्या ऋषीमुनींनी आपल्याला आध्यात्मिक पद्धतींद्वारे आत्मसात करण्यासाठी इतके गहन ज्ञान दिले आहे यात आश्चर्य नाही. आपली चेतना वायु आणि पाण्यापेक्षा सूक्ष्म आहे; ती आजूबाजूला पसरू शकते आणि सर्व दिशांमधे वाहू शकते. गुरुत्वाकर्षणामुळे झाडाची मुळे जमिनीत खोलवर  रुजलेली असतानाही झाडे वरच्या दिशेने जशी  वाढतात, त्याचप्रमाणे काही मिनिटांचे ध्यान आपल्या शरीरातील प्राणाचा स्तर वाढविण्यास मदत करते. आपला श्वास मग लयबद्ध होतो आणि मन शांत होते, दैनंदिन क्रियाकलापांच्या दैनंदिन गोंधळात असतानाही आपल्याला सूक्ष्म अंतर्ज्ञानी परिमंडळाकडे नेते.

तणावमुक्तीसाठी ध्यान कसे कार्य करते

ध्यानाचे वैज्ञानिक विश्लेषण असे सांगते की जेंव्हा ध्यान करणारा आणि केलेले ध्यान एकमेकाला छेद देतात तेंव्हा फक्त स्पंदन, उर्जेचे शुद्ध स्वरूप उरते, लहरीचे असे कार्य जे शुद्ध हेतू आणि एकाग्रतेने व्यक्त होण्यास होण्यास मदत करते; जिथे तणावाची सर्व कारणे दूर होतात आणि उरते फक्त आपल्यातील शुद्ध अस्तित्व, जिथून सर्व मार्ग तयार होतात.

आर्किमिडीजचे युरेका किंवा न्यूटनचे उत्थान याच स्थितीत घडले.

अल्बर्ट आइन्स्टाईन, ज्यांना सर्व शास्त्रज्ञांमध्ये महान म्हणून ओळखले जाते, ते म्हणाले, ‘मी ९९ वेळा विचार करतो आणि मला काहीही सापडत नाही; मी विचार करणे थांबवतो, मौनात तरंगतो/ मौनात डुंबतो आणि मग सत्य माझ्याकडे येते!’

ध्यान ही अशी स्तब्धता आहे जी आपल्याला सर्व तणावांपासून मुक्त करते आणि आपल्याला सखोल शांतीचा आणि आंतरिक आनंदाचा अनूभव येतो.

ध्यानाचे फायदे

आपल्या मूळ गाभ्यापर्यंत घेऊन जाणारा २०  मिनिटांचा प्रवास आपल्याला अगणित फायदे  मिळवून देतो ते असे आहेत

  • तणाव मुक्ती
  • रक्तदाबाचे नियमन
  • अगदी चांगली हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आणि रोगप्रतिकारक आरोग्य क्षमता
  • मासिक पाळी आणि रजोनिवृत्तीच्या समस्या कमी होतात
  • डोकेदुखी आणि मायग्रेनपासून आराम
  • सुधारलेला रक्त प्रवाह
  • हृदय गती कमी होणे
  • संतुलित हार्मोन्स
  • वार्धक्याची प्रक्रिया मंदावणे
  • सुधारित लक्ष आणि एकाग्रता
  • बुद्धिमत्ता, अंतर्ज्ञान आणि शोधक वृत्तीत  वाढ
  • स्मरणशक्तीची वाढ
  • वर्धित सृजनशीलता
  • उत्तम निर्णय घेण्याचे कौशल्य
  • सुधारित आत्म-सन्मान आणि आत्म-स्वीकृती
  • कार्यक्षमतेत वाढ
  • वर्धित आशावाद
  • चांगला दृष्टीकोन
  • प्रबळ इच्छाशक्ती
  • सुधारित भावनिक स्थिरता
  • परस्पर नाते संबंधांमधे समतोल
  • शरीर, मन आणि आत्म्यामध्ये सुसंवाद.
  • आनंदी आणि सुखी मनःस्थितीत ठेवते

ध्यानाचे लाभ विस्तृत मध्ये येथे जाणून घ्या.

सुरुवात करण्यासाठी काही सोप्या गोष्टी

  • एक शांत जागा शोधा.
  • तुमचा सेल फोन बंद करा; सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे दूर ठेवा.
  • स्नायूनां शिथिल आणि आराम देणारे काही व्यायाम करा. असे व्यायाम शारीरिक स्तरावर तणावापासून मुक्त होण्यास मदत करतात.
  • दीर्घ श्वसन किंवा प्राणायामच्या काही फेऱ्या, त्यानंतर सुदर्शन क्रिया तुम्हाला शरीर आणि मन या दोन्ही स्तरांवर अधिक खोलवर विश्रांती मध्ये घेऊन जाते.
  • त्यानंतर सुखासनामध्ये पाठीचा कणा ताठ ठेवून आरामात बसा. गरज असेल तर पाठीला आधार घेवून बसा.
  • आणि आता डोळे बंद करा. दीर्घ खोल श्वास घ्याआणि बस, सगळे सोडून द्या.

नवशिक्यांसाठी ध्यान प्रारंभ करण्यासाठी या सोप्या ध्यान टिपांचे अनुसरण करा.

गुरुदेवांच्या सुखदायक वाणीला तुम्हाला ध्यानाच्या शांत अवस्थेत घेऊन जाऊ द्या.

मनाच्या दोन क्षमता आहेत – एक लक्ष केंद्रित करणे आणि दुसरी विस्तारणे आणि आराम करणे. मनाच्या त्या शून्य अवस्थेत विस्तारणे म्हणजे ध्यान – एक अशी अवस्था जिथे आपण इतके मजबूत, स्थिर, कणखर आणि तरीही इतके मृदु होतो की काहीही आपल्याला कधीही हलवू शकत नाही. जेंव्हा भूतकाळाची खंत नसते, भविष्याची इच्छा नसते तेंव्हा तो क्षण संपूर्ण, परिपूर्ण आणि तणावमुक्त असतो.

ध्यान म्हणजे प्रत्येक क्षण पूर्णपणे सखोलीने जगणे होय.

– गुरुदेव श्री श्री रवि शंकर

सहजतेने ध्यान कसे करायचे हे आर्ट ऑफ लिव्हींगच्या सहज समाधी ध्यान या कार्यक्रमात शिका.

    Hold On!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

    *
    *
    *
    *