ज्याला कधीही डोकेदुखीचा त्रास झाला नाही अशा व्यक्तीला शोधणे अशक्य नसेल पण कठीण नक्कीच आहे. काही वेळा साधी आणि सहन होईल इतकी तर कधी कधी डोके फुटेल की काय असे वाटण्याइतकी! डोकेदुखी चार हात दूर राहिलेलीच बरी. तणावामुळे होणारी, सायनस (सर्दीमुळे), क्लस्टर (एक प्रकारची तीव्र डोकेदुखी), मायग्रेन (अर्धशिशी) असे काही वेदनादायक प्रकार आहेत. ही डोकेदुखी टाळता येऊ शकते !
डोकेदुखी का होते
डोकेदुखी प्रामुख्याने तणाव, अती प्रमाणात शारीरिक आणि मानसिक श्रम, अपुरी झोप आणि भूक यामुळे होते. मोशन-सिकनेस, मोठे, कर्कश आवाज आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या अतिवापरामुळे देखील डोकेदुखी होऊ शकते. कधीकधी, फक्त अतिविचार केल्याने सुद्धा डोकेदुखी होऊ शकते!
ध्यान केल्याने डोकेदुखी दूर होऊ शकते
तर, डोकेदुखीपासून आराम कसा मिळेल? सामान्यतः, तुम्ही आपले डोके आपल्या हातांमध्ये धरता आणि आपल्या मुठी आवळता. कधीकधी, तुम्ही आपल्या डोक्याचा दुखणारा भाग दाबता. तुम्ही त्यासाठी वेगवेगळ्या औषधी गोळ्या घेत असाल. कदाचित तुम्ही भिंतीवर डोकं आपटण्याचा विचारही केला असेल!
जो खरेच कामाचा आहे असा फक्त एक सोपा उपाय आपण का शोधत नाही? ज्याचे कसलेही अपायकारक परिणाम नाहीत? डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी ध्यान का करू नये?
डोकेदुखी कमी करण्यासाठी ध्यान कशी मदत करू शकते
- डोकेदुखीचे महत्वाचे कारण म्हणजे तणाव. या तणावापासून ध्यान आराम देते.
- ध्यानाने डोक्याच्या भागात रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होऊ शकते. यामुळे डोकेदुखी दूर होऊ शकते.
- इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या (म्हणजे टीव्ही, मोबाईल,संगणक व तत्सम उपकरणे) अति वापरामुळे वाईट परिणाम झालेल्या रोगप्रतिकारक संस्थेला आणि मज्जासंस्थेला ध्यानामुळे विश्रांती मिळते. हे संपूर्ण शरीराला आराम देते आणि चेहऱ्याचे स्नायू, जबडा आणि मानेवरील तणाव दूर करते.
- हे शरीरातून विषयुक्त पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते, अशा प्रकारे तुमची शरीर प्रणाली स्वच्छ करते.
- ध्यानाने आपला आहार नियंत्रित राहण्यास मदत होते. आहार आणि शारीरिक तसेच मानसिक आरोग्य यांच्यातील संबंधांबद्दल तुम्ही अधिक सजग होता. तुमच्या शरीर प्रणालीत कोणताही असमतोल नाही, हे ध्यानामुळे सुनिश्चित होते. त्यामुळे डोकेदुखी दूर होते.
- ध्यान तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारण्यास देखील मदत करते. रात्रीची अपुरी झोप हे डोकेदुखीसाठी जबाबदार असलेल्या मुख्य घटकांपैकी एक आहे.
- ध्यान तुम्हाला वर्तमान क्षणात ठेवते. हे तुम्हाला भूतकाळातील दुःखापासून आणि भविष्यातील चिंतांपासून दूर ठेवते. तुमच्या मनात विचारांची गर्दी होत नाही आणि तुम्ही डोकेदुखीपासून मुक्त राहता!
- ध्यानाबाबत एक उत्तम गोष्ट म्हणजे त्याचे कसलेही दुष्परिणाम होत नाहीत.
ध्यानाच्या साह्याने डोकेदुखी कशी दूर करावी
शांत आणि अंधाऱ्या खोलीत डोळे मिटून बसा. बाहेरचे जग सोडून आपल्या आतल्या जगात प्रवेश करा. पूर्णपणे आराम करा. येथे, आपण विचलित न होता विश्रांती घेऊ शकता आणि विश्वाला शरण जाऊ शकता. केवळ २० मिनिटांचे ध्यान किती प्रभावी ठरू शकते हे अनुभवून तुम्हाला आश्चर्य वाटेल. जर तुम्ही दररोज ध्यान केले तर तुम्हाला डोकेदुखीपासून आराम मिळेल!
गुरुदेव श्री श्री रवि शंकर यांनी काही मार्गदर्शित ध्याने संचालित केलेली आहेत. त्यामुळे, डोकेदुखीपासून आराम मिळू शकतो. ही ध्याने अवश्य करा.
डोकेदुखी बरी करण्यासाठी योगासने आणि प्राणायाम
हलासन
- मान आणि खांदे मजबूत करते.
- डोक्याच्या भागात ताणतणाव निर्माण होत नाही.
- तणाव आणि थकवा कमी करते.
सर्वांगासन
- मेंदूला रक्तपुरवठा वाढवते.
- पाठीचा कणा आणि खांदे मजबूत करते.
- डोक्याच्या भागातील तणाव कमी करते.
नाडी शोधन प्राणायाम
- नाडीशोधन तणावमुक्त होण्यास मदत करते.
- मनाला केंद्रित करते.
- मनाला वर्तमानात ठेवते.
भ्रामरी प्राणायाम
- मायग्रेनचा (अर्धशिशी) त्रास कमी होतो.
- ताणतणाव, चिंता आणि बेचैनी दूर करते.
तुमच्या साधनेच्या सत्रात २० मिनिटांचे ध्यान अवश्य करा
डोकेदुखीपासून मुक्त होण्याचे इतर मार्ग
या टिप्स विचारात घ्या:
- भरपूर पाणी प्या. कधीकधी योग आणि ध्यानाचा सराव केल्यानंतरही तुम्हाला डोकेदुखी होऊ शकते! याचे कारण असे की ध्यान शरीरातून विषयुक्त पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. यानंतर, सिस्टम पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी आपल्याला भरपूर पाणी पिणे आवश्यक असते. डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी पाणी हा एक उत्तम प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक उपाय आहे.
- आरोग्यपूर्ण आहाराची योजना करा जी आपल्या चवीचे लाड देखील पूर्ण करेल. हाच एकमेव मार्ग आहे जो तुम्ही दीर्घकाळासाठी सुरू ठेवू शकता.
- आयुर्वेदातील काही औषधी वनस्पती डोकेदुखीपासून आराम देण्यासाठी प्रभावी ठरतात. यामध्ये विड्याची पाने, लवंगा, लसूण, आले आणि मेंदी यांचा समावेश होतो.
- तुम्हाला मायग्रेनचा(अर्धशिशी) झटका येत असेल तर तुम्ही मायग्रेनसाठीचे ध्यान आणि काही विशेष योगासने करून बघू शकता.
- गुरुदेव श्री श्री रवि शंकर यांची सुदर्शन क्रिया देखील डोकेदुखीपासून आराम देऊ शकते.
ध्यान केल्याने अनेक समस्या दूर होतात. आणि तुमचे शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक आरोग्य सुधारते. ध्यान तुम्हाला अधिक आत्मविश्वासाने आव्हाने स्वीकारण्यास आणि त्यांचा सामना करण्यास सक्षम करते. जीवनाकडे पहाण्याचा एक सकारात्मक दृष्टीकोन देखील विकसित होतो, ज्यामुळे तुमची चिंता आणि तणावापासून मुक्ती होते. आपण सगळे जाणतोच की आपण बाहेरचे जग बदलू शकत नाही. पण, आपल्या दृष्टीकोनातील बदल आपल्या खांद्यावरील आणि डोक्यावरील ओझे कमी करण्यास मदत करू शकतो!
गुरुदेवांनी मार्गदर्शित केलेली ध्याने ऑनलाइन उपलब्ध आहेत. एक सहज समाधी ध्यान कार्यक्रम देखील आहे जो तुमचे जीवन बदलू शकतो. तुमच्या जवळच्या आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटरमधून श्री श्री योग शिबिराची माहिती घ्या.