सिमॉन बाईल्स तिच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रतिकार करणारे पलटे, कोलांट उड्या आणि व्यायामाचे खेळ, जिमनास्ट (twisties – on the floor, balancing beams & bars, feats) यासाठी प्रसिद्ध आहे. तिला त्यामध्ये चार ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदके मिळाली आहेत. टोकिओ ऑलिंपिक स्पर्धादरम्यान तिचे मानसिक आरोग्य आणि ऑलिंपिक बाबतचे योगदान जास्त नावाजले गेले. कारण त्यामुळे क्रीडा जगतातील अतिशय ज्वलंत असा प्रश्न प्रकाशझोतात आला. मोठे दावे किंवा पणाला लागलेल्या गोष्टी, अत्त्युच्च पातळीच्या स्पर्धेत खेळण्याचा तणाव आणि या सर्वांचा खेळाडूच्या मानसिक आरोग्यावर होणारा एकत्रिक परिणाम! त्यामुळे आपल्या लाडक्या खेळाडूंच्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने उपाय शोधण्याची गरज अधोरेखित केली गेली.
गुरुदेव श्री श्री रवि शंकर यांनी नुकत्याच आघाडीच्या खेळाडूंसोबत साधलेल्या संवादामध्ये खेळाडूंना लढाव्या लागणाया मानसिक लढाईबाबत भाष्य करतानाच जगभरातील तरुण, चिकाटीच्या खेळाडूंना प्रेरणा दिली आहे. यामध्ये एक मूलभूत प्रश्न समोर आला, खेळ आणि अध्यात्म विरोधाभासी आहे कां?
“जेंव्हा आपण व्यायामशाळेत व्यायाम करतो तेंव्हा व्यायाम करण्यासाठी आपल्याला आपले सर्व स्नायू सैल सोडावे लागतात. जर असे केले नाही तर स्नायूंची वाढ होणार नाही आणि आपल्या मज्जातंतूंवर ताण येईल. शरीराला व्यायामाची गरज असते, तर मनाला विश्रामाची असते. शरीर आणि मन दोन्ही गोष्टींना व्यायाम आणि विश्राम यांच्या संयोगाची गरज असते. म्हणजेच खेळ आणि अध्यात्म एकमेकांचे पूरक असतात”.
समजूतदारपणाचा हा सल्ला खेळाडूं आणि क्रीडापटूना बाकीच्या मानसिक संघर्षांत उपयोगी पडतो कां ते पाहूया.
अपयशाला कसे सामोरे जावे
अपयश हा कोणत्याही खेळाचा एक अविभाज्य भाग आहे. अपयश आपल्याला खूप काही शिकवून जाते मात्र खेळाडूने त्याला कसे सामोरे जावे?
“हरणे-जिंकण्याचा खेळ म्हणजे क्रीडा . कधी आपण पुढे असतो, कधी मागे असतो. कसेही असले तरी, आपल्या मनाची शांती ढळू देऊ नका. लक्षात ठेवा जेव्हा आपण जिंकतो तेंव्हा दुसरं कोणीतरी हरलेले असते आणि कोणालाही हरायला आवडत नाही. आयुष्यात देखील हेच अडथळे आहेत. आयुष्य कधीही सारखेच नसते. चढ-उतार नेहमीच असतात. आपल्या झालेल्या नुकसानीकडे आयुष्याचा भाग म्हणून पाहून पुढे चालत राहायला हवे. स्थिर रहा. निराश होऊ नका.”
जागतिक महामारी मधील बंद दारे
खेळाडूंसाठी टाळेबंदी मधील निर्बंध अतिशय मर्यादा घालणारे आणि निराशादायक होते. कारण त्यांचे आयुष्य सरावावर अवलंबून असते. ते (या काळात) काय करू शकतात?
“जोपर्यंत ही सर्व परिस्थती आपल्या आटोक्यात येत नाही , तोवर अजून काही काळ आपल्याला धीराने राहावे लागेल. या वेळेचा उपयोग आपण बाकीची कौशल्ये वाढविण्यासाठी करावी. याआधी ज्या गोष्टी करण्यासाठी आपणास वेळ नव्हता, त्याकडे लक्ष देऊया.हा काळ तात्पुरता आहे. जेंव्हा सर्व काही सुरु होईल तेंव्हा नव्या जोमाने सरावाला लागा.”
मनात येणाऱ्या शंकावर मात करून आपल्या क्षमतेनुसार ध्येय कसे साध्य करावे
स्पर्धेमुळे खेळाडूमधील सर्वात चांगल्या आणि वाईट गोष्टी बाहेर येतात. मोक्याच्या क्षणी आपल्या मनातील शंकांवर मात करून आपल्या क्षमतेला न्याय देत साध्य कसे मिळवावे?
“तणाव सोडून दया. व्यापक दृष्टीकोन ठेवा. आपले ध्येय आणि आव्हाने मोठी करा. दैवी शक्तीवर विश्वास ठेवा.”
“खेळाडूंनी शारिरीक प्रशिक्षणासोबतच मानसिक प्रशिक्षण घेणे देखील महत्वाचे आहे. एखादा खेळाडू खेळामध्ये कसा लक्ष केंद्रीत ठेवू शकतो यावर त्याची परिणामकारकता ठरते. मी सर्व खेळाडूंना आर्ट ऑफ लिव्हिंग ची कार्यशाळा करण्यास प्रोत्साहित करतो. कारण माझ्यामते मानसिक प्रशिक्षण करण्यास ते अतिशय फलदायी ठरते.”
– संदीप सिंह,क्रीडामंत्री, हरियाणा, भारतीय हॉकी संघाचे माजी कप्तान आणि हॉकीतील जागतिक विक्रमाचे मानकरी
गुरुदेव श्री श्री रवि शंकर यांचे खेळाडूंच्या मानसिक आरोग्याविषयी मार्गदर्शन
मानसिक आरोग्य अतिशय महत्वाचे आहे. जर आपण करत असलेल्या कामात तुम्ही आनंदी, उत्साही नसलो तर काय उपयोग आहे? खेळ हे अतिशय आनंदी मनाने खेळले जातात आणि जर खेळाडू खुश नसतील तर त्याचा अर्थ असा होतो की काहीतरी करण्याची गरज आहे. ऑलिंपिकमधील अनेक खेळाडू आणि क्रीडापटू त्यांचे मानसिक आरोग्य मजबूत ठेवण्यासाठी सुदर्शन क्रिया™ करतात. आपणास शारिरीक जोमासोबतच मानसिक चैतन्य असणे देखील आवश्यक आहे , जे आपणास योग आणि प्राणायामामधून मिळते.
योग आपल्या सर्व अंतर्गत शारीरिक प्रणालींना फायदेशीर ठरतो आणि मानसिक समतोल राखण्यास मदत करतो. सर्व खेळांमध्ये केंद्रित लक्ष आणि प्रसंगावधान असण्याची आवश्यकता असते. मनाला एकाग्र बनवण्यामध्ये ध्यान आणि योग एकत्रित भूमिका बजावतात. सरावाला जाण्यापूर्वी सुदर्शन किया करून १० मिनिटे मार्गदर्शित ध्यान करा.
“मी नुकतेच ऑनलाईन ध्यान आणि श्वसन कार्यशाळा केली .आम्ही सुदर्शन क्रिया™, श्वासाचे प्रकार (प्राणायाम) इत्यादींचा सराव केला. माझ्यासोबत शिबिर करत असलेल्या लोकांमधील सकारात्मकता मला लक्षणीय वाटली. झूम कॉल वर असून देखील मला त्यातून खूप छान वाटले. तेथील सकारात्मकता संसर्गजन्य होती. हा मंच तयार करण्यासाठी आणि हा संसर्गजन्य सराव आम्हांला देण्यासाठी मी (आपला) आभारी आहे”.
– सौरव घोषाल, स्क्वॅश खेळाडू, अर्जुन पुरस्काराचा मानकरी
दुखापतींना सामोरे जाताना
प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात दुखापती हा अविभाज्य भाग आहे. सर्वच खेळाडू दुखापतीमुळे आलेल्या उतरत्या काळाला सामोरे गेलेले असतात.शारिरीक परिणाम हे दुर्बल करणारे असतानाच मानसिक चिंता देखील नाउमेद करणारी असते. पण काही लोक हे अडथळे पार करून शिखरावर पोहोचतात. एका खेळाडूच्या वाईट अनुभवाबद्दलची ही प्रेरणादायी कथा वाचा:
“मी खेळाडूंच्या घरातून आलो आहे. मला एका दुचाकीने धडक दिल्यामुळे अर्धांगवायु /पक्षाघात झाला आणि मी दोन वर्ष चाकाच्या खुर्चीत होतो. डॉक्टर म्हणाले की मी पुन्हा खेळू शकणार नाही. तरीही मी पुन्हा खेळू लागलो, संघात सामील झालो आणि संघाचा कप्तान बनलो. मला अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले गेले. मी असं म्हणेन की आपल्या आयुष्यात मोठे ध्येय असायला हवे आणि जेव्हा तुम्ही ते साध्य कराल तेव्हा तुम्ही त्यापेक्षाही मोठे ध्येय ठरवायला हवे. अंमली पदार्थांचा वापर करून यश साजरे करू नका. अनेक खेळाडू ह्या मार्गाने यश साजरे करत चुकीच्या मार्गावर जातात.”
– संदीप सिंह
खेळामधील नकारात्मक बाजू
तरुण, विशेषत: खेळाडू हे उर्जेने परिपूर्ण असतात ते व्यसनी पदार्थांकडे आकर्षिले जातात. ह्या धोकादायक खाचखळग्यांना बाजूला कसे सारता येईल?
“तरुणांना अंमली पदार्थांपेक्षाही जास्त आकर्षित करेल अशा गोष्टी द्या.सुदर्शन क्रिया™ ही व्यसनाधीन आहे. लाखो लोक त्यामुळे अंमली पदार्थ आणि दारुच्या व्यसनातून बाहेर आले आहेत. जेंव्हा ते प्राणायाम आणि सुदर्शन क्रिया करतात , त्यांच्या या सवयी सुटून जातात. खेळाडूंनी योग, प्राणायाम आणि सुदर्शन क्रिया™ करायला हवी. अंमली पदार्थांविरुद्ध युद्ध छेडायला हवे.”
विचारांना सामोरे जाताना
जेंव्हा आपणास आतून थोडीशी शांती आणि विश्राम हवा असतो , तेंव्हा आपल्या मनात विचलित करणारे, निरुत्साही आणि निराशादायक विचार येतात. मनाचा हा गलबलाट थांबवून लक्ष केंद्रित कसे करावे?
“ज्यावेळी आपण नाचतो किंवा धावतो, आपल्या डोक्यात विचार असतात का? नाही नां? तसेच जेंव्हा आपण भास्त्रिका सारखे प्राणायाम करतो, तेंव्हा तुम्ही त्या क्षणात असतो. जेंव्हा आपल्या मनात अनेक विचार येतात, तेंव्हा ते सर्व विचार लिहून काढा. आपल्या लक्षात येईल की फक्त महत्वाचे विचार शिल्लक राहतात. जेंव्हा आपण सुदर्शन क्रिया करतो, तेंव्हा सुद्धा आपल्या मनात असंगत विचार येऊ शकतात. ठीक आहे. (मनाच्या) स्वच्छतेचा तो एक प्रकार आहे.”
म्हणूनच फक्त आपल्या विचारांना मनात आत येऊ दया आणि बाहेर जाऊ दया. श्वास घ्या आणि श्वास सोडा. हा सुदर्शन क्रिया मार्ग आहे!
“मला सुदर्शन क्रिया केल्यामुळे खूप छान वाटले. मला नवीन प्रेरणास्त्रोत मिळाला आहे असे वाटले, मी नक्कीच दूसऱ्यांना करण्यासाठी प्रोत्साहित करेल.”
– संजीव राजपूत, नेमबाज, अर्जुन पुरस्काराचे मानकरी
खेळामध्ये निर्दयी असणे योग्य आहे का
आपण स्पर्धेमध्ये सहानुभूतीने कसे वागू शकतो ? आपण हरणार नाही कां ? आणि जर आपण आक्रमक असलात तर ते अध्यात्माच्या तत्वांच्या विरोधात जाणार नाही का?
“जेंव्हा आपण खेळत असताना, तेंव्हा आपले १०० % दया. निर्दयी बना. पण खेळ संपल्यानंतर दुसरे टोक गाठा. संवेदनशील आणि सहानुभूतीपूर्ण बना. ज्याला धावता येते , त्याच्यात स्थिर उभे राहण्याची क्षमता देखील असायला हवी.”
प्रचलित मतांच्या विरुद्ध खरे तर सहानुभूती आणि संवेदनशीलता खेळाडूमधील ऑलिंपिक मूल्ये जास्त बाहेर आणतात आणि क्रीडापटूना ऑलिंपिक घोषवाक्य साध्य करण्यास मदत करतात- सिटियस, अल्टीयस, फॉर्टियस (Citius, Altius, Fortius) – जलद्, उच्च, ताकदवान ! म्हणूनच आपला खेळ सुधारण्यासाठी जगभरातील उत्कृष्ट ऑलिंपिक खेळाडूंना उपयोगी पडलेले श्वसन प्रक्रिया – सुदर्शन क्रियेची मदत घ्या. आत्ताच ऑनलाईन ध्यान आणि श्वास कार्यशाळेत सहभागी व्हा!
(गुरुदेव श्री श्री रवि शंकर यांनी विविध खेळाडूंसोबत केलेल्या चर्चेवर आधारित.)