प्रत्येकाला तणावापासून मुक्त व्हायचे असते, परंतु सर्वप्रथम, तुम्हाला तणाव म्हणजे काय हे माहित आहे कां ? तणाव म्हणजे खूप जास्त काम आहे पण वेळ किंवा शक्ती खूप कमी आहे. जेव्हा आपल्याकडे पुरेसा वेळ आणि शक्ती नसताना खूप काही करायचे असते, तेव्हा आपल्याला ताण येतो. त्यामुळे एकतर तुम्हाला तुमचं काम कमी करावं लागेल, आणि सध्याच्या काळात त्याची शक्यता नाही , किंवा तुम्हाला तुमचा वेळ वाढवावा लागेल – तेही शक्य नाही. त्यामुळे तुमच्या उर्जेची पातळी वाढवणे ही एकच गोष्ट आपल्याकडे शिल्लक राहते.

ऊर्जा वाढवण्यासाठी येथे चार सोपी तंत्रे आहेत:

  1. योग्य प्रमाणात अन्न – जास्त नाही आणि अति कमीही नाही. पुरेशी कार्बोहायड्रेट आणि प्रथिने असलेला संतुलित आहार.
  2. योग्य प्रमाणात झोप. ६-८ तास झोप, जास्त नाही कमी नाही.
  3. काही खोल श्वासोच्छवासाचे व्यायाम शिकणे – यामुळे तुमची ऊर्जा वाढते.
  4. चिंतनशील मनाचे काही क्षण. खोल विश्रांतीची काही मिनिटे – जाणीवपूर्वक गहिरी विश्रांती, ज्याला मी ध्यान म्हणेन. काही मिनिटांच्या ध्यानामुळे सर्व प्रकारच्या तणावापासून मुक्ती मिळते. जर तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी १५-२० मिनिटे ध्यान केले तर ते पुरेसे आहे. ते तुम्हाला उर्जावान ठेवेल.

तणाव सुरू होण्यापूर्वीच थांबवा

एक म्हण आहे, “तुम्ही रणांगणात गेल्यावर धनुर्विद्या शिकू शकत नाही”. त्या ठिकाणी जाण्याआधीच तुम्हाला धनुर्विद्या शिकावी लागेल. तर, जेव्हा तुम्हाला ताण येईल त्या क्षणी तुम्ही काहीच करू शकत नाही , परंतु त्याआधीच तुम्हाला काहीतरी करावे लागेल जेणेकरुन तुमच्यावर तशी परिस्थिति अजिबात येऊ नये. म्हणजे मग तुम्हाला ताण येणार नाही. व्यासपीठावर गाण्यासाठी बसल्यावर तुम्ही नवीन धून शिकू शकत नाही, माझा यावर विश्वास नसला तरी, ही एक म्हण आहे, प्रत्यक्षात काहीही अशक्य नाही. मी म्हणेन की तुमच्या वागण्याच्या पद्धतीत बदल, खाण्याच्या सवयी आणि जीवनातील गोष्टी समजून घेण्याच्या पद्धतीत बदल, तुमची संवाद क्षमता, टीका सहन करण्याची आणि टीका तुम्ही कशा पद्धतीने घेता याची तुमची क्षमता, अशा सर्व गोष्टी, म्हणजे सामान्यतः तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा आहे, यावर बरेच काही अवलंबून आहे. तुम्ही वैश्विक चैतन्याशी जोडले जाणे, तुम्ही वैश्विक चैतन्याशी किती प्रमाणात जोडलेले आहात, त्याप्रमाणात तुमची कार्य करण्याची क्षमता अधिक होते.

ध्यान

तुम्हाला माहित आहे कां, आजचे शास्त्रज्ञ म्हणतात की, जर आपण आठ आठवडे दररोज दिवसातून दोनदा २० मिनिटे ध्यान केले तर ते दोन महिने, आपल्या मेंदूतील ग्रे मॅटर वाढवते आणि मेंदूची रचना बदलते. आपल्याला माहित असते की ध्यानाचा आपल्यावर प्रभाव पडतो, पण जेव्हा तेच तुम्ही शास्त्रज्ञांकडून ऐकता तेव्हा त्याला जगभरातील अनेक, अनेक, अनेक, अनेक वर्षांच्या, अनेक, अनेक, अनेक लोकांच्या प्राचीन अनुभवाची पुष्टी मिळते . म्हणून, ध्यान महत्वाचे आहे. आज दर दोन सेकंदाला या ग्रहावर तणावामुळे आपण ७ जीव गमावत आहोत. तणावामुळे दर दोन सेकंदाला सात लोकांचा मृत्यू होत आहे, जो टाळता येऊ शकतो. त्यामुळे तणाव दूर करण्याचा मार्ग म्हणजे सखोल ध्यान. सखोल ध्यान केल्याने आपण तणावातून मुक्त होऊ शकतो. आपण लोकांच्या चेहऱ्यावर हास्य परत आणू शकतो.

ताण आणि शिक्षण

तणावामुळे आक्रमकता आणि हिंसाचार निर्माण होतो किंवा त्यातून नैराश्य किंवा आत्महत्येची प्रवृत्ती निर्माण होते. आणि यासर्वांचे कारण हे आहे की आपले मन कसे हाताळायचे हे आपल्याला कोणीही शिकवले नाही.

शिक्षण म्हणजे केवळ माहिती गोळा करणे नव्हे, तर तुम्ही कोण आहात आणि तुमची क्षमता काय आहे हे जाणून घेणे म्हणजे शिक्षण. तुमच्या अस्तित्वाचे ७ वेगवेगळे स्तर, म्हणजे शरीर, श्वास, मन, बुद्धी, स्मृती, अहंकार आणि आत्मा यांच्या विषयी जाणून घेणे म्हणजे शिक्षण आहे. अस्तित्वाच्या या स्तरांबद्दल आपण पूर्णपणे अनभिज्ञ असतो, त्यामुळे आपल्या मनात राग अथवा द्वेष येतो , तेव्हा त्याला कसे हाताळायचे हे आपल्याला कळत नाही. मी म्हटल्याप्रमाणे, घरी किंवा शाळेत कोणीही आपल्याला आपले मन आणि भावना कशा हाताळायच्या हे शिकवत नाही. मग त्या भावना नैराश्यात किंवा आक्रमकतेत व्यक्त होतात.

अभ्यासातून असे दिसून आले आहे की , शाळेतील बरेच टक्के शिक्षक नैराश्याने ग्रस्त आहेत. जेव्हा शिक्षक उदासीन असतात, तेव्हा ते विद्यार्थ्यांशी काय संवाद साधतील? ते फक्त उदासीनता पसरवतात. आनंदी व्यक्ती इतरांमध्ये आनंदच पसरवेल, उदास व्यक्ती फक्त निराशाच पसरवते. म्हणून आपण आपल्या मुलांना आक्रमकता नव्हे तर अहिंसक संवाद कसा साधावा आणि त्यांची दृष्टी कशी विस्तृत करावी आणि संयम कसा ठेवावा हे शिकवले पाहिजे.

माझ्यामध्ये शांती तर पृथ्वीवर शांती

आजच्या जगात काय घडत आहे, जेव्हा लोक तणावग्रस्त असतात तेव्हा एकतर ते स्वतःला दुखवतात किंवा ते इतरांना दुखवतात. फक्त स्वतःची वागणूक आठवा, जेव्हा तुम्ही खूप तणावात असता तेव्हा तुम्ही लोकांवर वैतागत असता आणि त्यामुळे इतरांना त्रास होतो. हा आपलाही अनुभव नाहिये कां ? जेव्हा आपण नेहमीसारखे साधारण नसतो, भानावर नसतो , तेव्हा आपण अशा गोष्टी करतो ज्याने आपल्या प्रिय आणि जवळच्या व्यक्तींना त्रास होतो. म्हणून, तणावात एकतर आपण स्वतःला दुखावतो आणि इतरांनाही दुखावतो. आणि जगभर हेच घडत आहे. त्यामुळे समाजात अधिकाधिक आनंद निर्माण करण्याची नैतिक जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. असं तुम्हाला वाटत नाही कां ? जीवनाचा उद्देश काय आहे? जर आपणच आपल्या आजूबाजूला दु:ख निर्माण करत असू तर आपण का जगतोय? बरोबर? आपल्या जीवनाचा उद्देश आनंद पसरवणे हा आहे. आनंदाच्या लाटा निर्माण करा.

आनंदाचे रहस्य

जेव्हा लोकांचा एकमेकांवर विश्वास असतो तेव्हा संवाद घडतो , जेव्हा विश्वास तुटतो तेव्हा संवाद आणखी तुटतो आणि संकटे ओढवून घेतली जातात. त्यामुळे कुटुंबात, नातेसंबंधात, व्यवसायात किंवा राष्ट्रांमध्ये या तीन गोष्टींची गरज असते, संवाद, संवाद आणि संवाद. संवाद हा हृदयापासून ते हृदयापर्यंतचा, आत्म्यापासून ते आत्म्यापर्यंतचा आणि डोक्यापासून ते डोक्यापर्यंतचा संवाद आहे. असे संवादाचे तीन स्तर आहेत. ध्यान म्हणजे आत्म्यापासून ते आत्म्यापर्यंतचा संवाद.

तुमचा दृष्टीकोन बदला, तुमचे जीवन बदला

जागे होऊन ही लक्षात घेण्याची वेळ आली आहे की आपण इथे कायमचे राहणार नाही आहोत. आपण आणखी १० – २० – ३० – ४० वर्षे, कदाचित १० वर्षे, २० वर्षे राहणार आहोत. जोपर्यंत आपण जगतो तोपर्यंत आपण अधिक हसून इतरांना अधिक हसवू शकत नाही का? हेच आर्ट ऑफ लिव्हिंग आहे. जीवन जगण्याची कला म्हणजे आपल्यामध्ये असलेल्या ऊर्जेची विश्वातील उच्च उर्जेशी जोडले जाणे. आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे सर्वांच्या चेहऱ्यावर स्मित आणणे. आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे आपल्यामध्ये आणि आपल्या सभोवतालच्या सर्वांमध्ये सुरक्षिततेची भावना असणे.

सुदर्शन क्रिया शिकून तुम्ही तणावातून बाहेर पडण्याचा तुमचा प्रवास सुरू करू शकता. प्रारंभ करण्यासाठी येथे क्लिक करा.

    Hold On!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

    *
    *
    *
    *