असे काही लोक असतात की ते खूप कष्ट करतात पण यशस्वी होऊ शकत नाहीत. तुमच्या आजुबाजूला तुम्ही असे लोक पाहिले असतील. याचे कारण म्हणजे त्यांच्यात काहीतरी कमतरता असते.कमी ऊर्जा असलेली कंपने किंवा नकारात्मक कंपने. नकारात्मक कंपने नाहीशी करण्यासाठी ध्यान करणे आवश्यक आहे.

उत्कट इच्छा

ध्यानामुळे शरीरातील जीवनऊर्जा वाढते. बुद्धी तल्लख होते व आपले इतरांशी होणारे व्यवहार अतिशय आनंदात होतात. आपण इतरांशी कसं बोलावं यावर नियंत्रण ठेवता येतं.मनाची संकल्प शक्ती मजबूत होते. ध्यानामुळे तुमचे प्रारब्ध बदलते.

आपला दृष्टिकोन बदलण्यासाठी ध्यानाचा खूप उपयोग होतो आणि त्यामुळे व्यक्तिमत्वही बदलते. तुम्ही शांत होता. खूप विश्रांती मिळते.अधिक मजबूत होता, तरीही प्रेमळ व दयाशील असता. गोष्टी आकलन होण्यासाठी तुम्हाला योग्य मार्ग सापडतो. ध्यान मनामध्ये सुस्पष्टता आणते. सभोवतालच्या लोकांमध्ये परस्पर क्रिया चांगल्या होतात. जसे वेगवेगळ्या परिस्थितीत काय कृती करावी किंवा कोणता प्रतिसाद द्यावा ते समजते.

आपण जर रोज काही मिनिटे ध्यान केले तर आपणावर दैवी प्रेमाचा वर्षाव होत असल्याचा आपण अनुभव घेऊ शकतो. ज्ञान , अनुभव आणि प्रेम या तीन गोष्टी आयुष्यात आवश्यक आहेत. कुणालाही उदासीन आणि कंटाळवाणे आयुष्य नको असते. प्रत्येकाला जीवन रसपूर्ण हवे असते आणि तो रस म्हणजेच प्रेम.

ध्यानामुळे तुमच्या सभोवतालच्या लोकांबरोबरच्या परस्पर क्रिया सुधारतात.वेगवेगळ्या परिस्थितीत तुम्हाला काय म्हणायचे आहे, काय कृती करायची आहे, कोणता प्रतिसाद द्यायचा आहे हे समजून येते.

– गुरुदेव श्री श्री रवि शंकर

World Meditation Day

● Livewith Gurudev Sri Sri Ravi Shankar

गुरुदेवांसोबत जागतिक ध्यान

● थेट प्रक्षेपण २१ डिसेंबर, रात्री ८

यशस्वी होण्यासाठी कळीचा मुद्दा

आपल्यात जोपर्यंत नकारात्मक स्पंदने असतात किंवा जोवर सकारात्मक कंपने निर्माण होत नाहीत, तोपर्यंत आपण प्रेमाचा त्याच्या मूळ स्वरुपातील अनुभव घेऊ शकत नाही. अशावेळी आपण प्रेमाचा त्याच्या विरुद्ध  म्हणजे विकृत स्वरुपातील अनुभव घेतो. उदाहरणार्थ – राग, द्वेष ,अस्वस्थता यासारख्या विकृत स्वरूपातील प्रेमाचा अनुभव तोपर्यंत जाणवत असतो. मनातील या विरोधी प्रवृत्ती निघून जाण्यासाठी आपण विशिष्ट पद्धती शिकली पाहिजे.एकदा का या अशा विकृत प्रवृत्ती निघून गेल्या की जीवनातील प्रत्येक गोष्ट योग्य प्रकारे होऊ लागते आणि हे आपल्या  वैयक्तिक पातळीवर घडत असते.
झोपून उठल्यावर सकाळी कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी दहा मिनिटे स्वस्थ बसा.संध्याकाळी कामाहून आल्यावर आपण जेवतो, पण त्यापूर्वी काही वेळ स्वस्थ बसा, खोलवर जा व स्वतःमध्येच रहा, आणि पहा नंतर सर्व गोष्टी बदलायला लागतील.

मनाद्वारे चांगली शरीर प्रकृती

सध्याच्या परिस्थितीत व आत्ताच्या जीवनशैलीमध्ये ध्यान खूपच उपयोगी आहे. ध्यान व विश्वास या गोष्टी आपल्याला तृप्ती देतात, समाधान देतात व आपल्या कार्यासाठी उपयोगी पडतात. या चार सूत्रांकडे तुम्ही लक्ष दिलेत तर तुम्ही सखोल ध्यानाची, समाधीची अनुभूती घेऊ शकाल.– या चार गोष्टी अशा — दैवी शक्ती सर्वत्र आहे, सतत आहे, प्रत्येकाकडे आहे आणि ती प्रबळ आहे !! ही दैवी शक्ती आपल्यासाठीच आहे.

जर आपण सकाळी व संध्याकाळी काही मिनिटे स्वस्थ बसून ध्यान करण्याची सवय केली की चमत्कार घडायला सुरुवात होईल. दैवी शक्ती माझ्यात आहे असे मनात ठेवून ध्यान करा, हाच विश्वास आहे जो दिसत नाही पण असतो.

आज आपल्याला तृप्ती, समाधान देणारी गोष्ट कोणती असेल, आपल्या कार्यात मदतीला येणारी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे ध्यान आणि विश्वास !!

– गुरुदेव श्री श्री रवि शंकर

जर आपण वीस मिनिटांचे ध्यान, दिवसातून दोन वेळा, असे आठ आठवडे केलं तर मेंदूतील करडा भाग वाढतो, मेंदूतील संरचना बदलते- हे संशोधनातून सिद्ध झालं आहे. या जगात सध्या दर दोन सेकंदाला सात जणांचा ताण-तणावामुळे मृत्यू होतोय! हे आपणास टाळता येण्यासारखं आहे आणि ताण नाहीसा करण्यासाठी ध्यान करणे हा उत्तम मार्ग आहे.

मनापासूनच्या संवादासाठी ध्यान

जेव्हा लोकांमध्ये एकमेकांबद्दल विश्वास असतो तेव्हाच त्यांच्यात संवाद होऊ शकतो. जेव्हा हा विश्वास ढळतो किंवा नाहीसा होतो तेव्हा अनर्थ ओढवतो. कुटुंबात असो,नातेसंबंधात असो, व्यवसायात असो वा देशा देशात असो …तीन गोष्टी कळीच्या आहेत,महत्वाच्या आहेत.. त्या म्हणजे- एकमेकातील संवाद, संवाद आणि संवाद !!!

हा संवाद तीन पातळीत असतो. बुद्धीच्या पातळीवर,हृदयाच्या पातळीवर व आत्म्याच्या पातळीवर. ध्यान म्हणजे आत्म्याचा आत्म्याशी संवाद !!

आपण शांती कशी निर्माण करु शकतो ?

आपल्या आत,अंतरंगात, शांती नसेल तर बाहेर सुद्धा शांती असणार नाही. ध्यानामुळे आतून निश्चित शांती मिळते. ज्यावेळी आत्म्याला आतून शांती मिळालेली असते त्यावेळी बाहेरून सुद्धा शांती मिळते. जर तुम्ही आतून गोंधळलेले असाल, नाउमेद झाला असाल तर तुम्ही बाहेर सुद्धा शांती अनुभवू शकत नाही.
शांती हा केवळ शब्द नाहीये. ती एक प्रकारची कंपने आहेत. जर तुम्ही आतून खोलवर शांत व पवित्र असाल तेवढ्या अनेक पटीने तुमची ताकद वाढते. जेव्हा तुम्ही बलिष्ठ असाल तेव्हा तुम्ही कोठेही जाऊन शांतते विषयी बोलू शकता.
ध्यानामुळे व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल होत असतात व तिच्या वर्तनातही सकारात्मक बदल होतात. ज्ञानाने, ध्यानाने शांततेची स्पंदने सभोवताली पसरतात. तुम्ही ध्यानाचा सराव करणारे असाल तर तुम्ही तुमच्या भोवताली सकारात्मक कंपने व शांति पसरवता आणि या कंपनांचा व  शांततेचा इतरांच्या मनावर चांगला प्रभाव पडतो.

सावध रहा, शाप देण्याची सुद्धा एक शक्ती असते.

नियमित ध्यानधारणा करणाऱ्याने कायम काळजी घेतली पाहिजे की त्यांनी कोणालाही कधीही शाप देऊ नये. आपल्या बोलण्यात नकारात्मक शब्द येणारच नाहीत याची शक्य तेवढी काळजी घेतली पाहिजे.

तुम्ही ध्यानधारणा करणारे असता तेव्हा तुमच्यात आशीर्वाद आणि शाप सुद्धा देण्याची क्षमता येते. पहिल्यांदा शाप देण्याची क्षमता येते व नंतर आशीर्वाद देण्याची. फक्त काही वाईट शब्द उच्चारल्यावर ध्यानामुळे येणाऱ्या चांगल्या ऊर्जेपैकी बरीचशी ऊर्जा खर्च होते. म्हणूनच वाईट शब्द उच्चारणे हे  शहाणपणाचे लक्षण नव्हे! ध्यानामुळे तुमच्यात जास्त शक्ती निर्माण होते. सुरुवातीला ती व्यक्तीच्या मनात निर्माण होते. जेव्हा एखाद्याच्या मनात क्षोभ असतो तोच क्षोभ हिंसेच्या किंवा कुरापतीच्या रूपात उफाळून येतो. हा क्षोभ, ही आक्रमक प्रवृत्ती काही हवेतून निर्माण होत नाही. याचा उगम माणसाच्या हृदयात आणि मनात होत असतो. याची सुरुवात व्यक्ती पासून होते, नंतर कुटुंबात, नंतर समाजात, आणि नंतर सगळीकडे वणव्यासारखी पसरते.

या समस्येच्या मुळाशी जाऊन आपण विचार केला पाहिजे. जेव्हा देशात एखाद्या रोगाचा प्रसार होतो तो लोकांशिवाय होत नाही.सुरुवातीला जनतेमध्ये तो निर्माण होतो. युद्धाचेही असेच आहे. लढाई सुरुवातीला लोकांच्या मनात सुरू होते. जमावाचे एक मानसशास्त्र असते. म्हणजे समजा एका माणसाचा राग, एका माणसाला राग येतो, एकाकडून दुसऱ्याला, अशा तऱ्हेने अनेकांना, अशा तऱ्हेने जमाव हिंसक बनतो. जर अशा तऱ्हेने जमावत हिंसा पसरत असेल तर तशी शांतता सुद्धा पसरायला काय हरकत आहे? जसे एका माणसामुळे दुसरा हिंसक बनतो व हे पसरत जाऊन संपूर्ण जमाव हिंसक बनतो. हीच गोष्ट शांततेच्या बाबतीत सुद्धा घडते.

सध्या जगासमोर दोन आव्हाने आहेत-एक आक्रमकता आणि दुसरे नैराश्य, एकतर एखादा आक्रमक असतो आणि समाजात हिंसा निर्माण करतो. एखादा नैराश्यग्रस्त असतो आणि स्वतःबाबत हिंसक बनून आत्महत्ये कडे प्रवृत्त होतो. या आव्हानांचा सामना करण्यासाठी ध्यान हाच मार्ग आहे !!

World Meditation Day

● Live with Gurudev Sri Sri Ravi Shankar

● Live at 8:00 pm IST on 21st December

Sign up for free!