गर्भावस्था हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक रोमांचक काळ असतो. तीव्र अपेक्षांचा काळ. व्यक्त करण्याची, जगात नवीन जीवनाचे स्वागत करण्याची वेळ. शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या – प्रचंड वेगाने होत असलेल्या जबरदस्त बदलांचा देखील हा काळ आहे. बाळाचे एका लहान पेशीतून पूर्ण विकसित लहान व्यक्तीमध्ये रूपांतर होते, तर आईला गंभीर घडामोडींचा अनुभव येतो – काही मनोरंजक, काही हाताळण्यास कठीण.
एक आई म्हणून, आपणास सतत जुळवून घ्यावे लागेल आणि आपण ज्या सर्व संक्रमणांमधून जात आहात त्याचा सामना करावा लागेल. हे आपल्या नियंत्रणाबाहेर आहेत आणि त्यामुळे अस्वस्थता निर्माण होऊ शकते. गर्भावस्थेदरम्यान उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही अडचणींचा सामना करताना ध्यान महत्त्वाची भूमिका बजावते. यामुळे आराम मिळू शकतो आणि आपल्या गर्भावस्थेच्या विविध टप्प्यांचा स्वीकार करण्यास आपणास मदत होऊ शकते. आपणास आपल्या आयुष्यातील हे सुंदर टप्पे लीलया पार करण्यास सक्षम करते. आपल्या आंतमध्ये एक नवीन जीवन फुलत आहे या वास्तवाचा आनंद घेण्यास आपणास मदत करते.
आपल्या गरोदरपणाच्या प्रत्येक त्रैमासिकातील घडामोडींवर एक नजर टाकूया.
त्रैमासिक १
पहिल्या तिमाहीत आपल्या शरीरात हार्मोनल बदल होत असतात. आपणास सकाळी आजारपण किंवा छातीत जळजळ होऊ शकते. काही वेळा चक्करही येऊ शकते. आपण निरोगी, पौष्टिक आहार घेणे आणि आपला “प्राण” किंवा उर्जा पातळी उच्च ठेवणे हे खूप महत्वाचे आहे. यावेळी गर्भाची वाढ हळूहळू होत असते. विकसित होण्याच्या पहिल्या गोष्टींपैकी एक म्हणजे मज्जासंस्था. याचा अर्थ या अवस्थेत आपल्या बाळाचा मेंदू, पाठीचा कणा आणि नसा तयार होतात. केस, नखे, डोळे, स्वर तंतू आणि स्नायू देखील आकार घेऊ लागतात.
बाळाचे कान पहिल्या त्रैमासिकात विकसित होतात आणि मंत्र किंवा मऊ सुखदायक संगीत, जसे की वीणा ऐकणे ही चांगली कल्पना आहे. याचा बाळाच्या मज्जासंस्थेवर सकारात्मक परिणाम होतो.
त्रैमासिक २
त्रैमासिक २ मध्ये बाळ गर्भाशयात फिरू लागते. अगदी उचकी आणि जांभई येऊ शकते. आपल्याला आंतमध्ये फुलपाखराच्या संवेदना जाणवू शकतात. बऱ्याच वेळी आपल्या भावनिक स्थितीत अचानक बदल होणं, मनःस्थिती बदलणं भावनिक उलथापालथ जाणवू शकतात, प्रामुख्याने शरीरातील हार्मोनल बदलांमुळे. अश्या क्षणी आपणास आपल्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तींच्या समर्थनाची गरज भासू शकते.
त्रैमासिक ३
त्रैमासिक तिसरा हा आपल्या गरोदरपणातील सर्वात आव्हानात्मक टप्पा आहे. या काळात वजन वाढल्याने आपणास अस्वस्थ वाटू शकते. बाळ प्रसूतीच्या तयारीसाठी स्थितीत जात असताना, आपणास ओटीपोटाच्या भागात आणि जांघेच्या हाडावर ताण जाणवू लागतो. आपल्या पाठीला दुखापत होऊ शकते आणि फिरणे थोडे कठीण होत आहे असे आपणास वाटू शकते.
गर्भावस्थेमध्ये ध्यान कसे मदत करते
- ध्यान ही उपचार प्रक्रिया सुरू करते आणि बाळाच्या सर्वांगीण विकासास मदत करते.
- ध्यान म्हणजे शरीरातील प्राणशक्ती किंवा प्राण वाढवणे. ज्या काळात बाळाच्या वाढीसाठी भरपूर ऊर्जेची गरज असते, तेव्हा ध्यानाचा सराव करणे आई आणि मूल दोघांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
- ध्यानाचा आपल्या आहारावर थेट परिणाम होतो. शरीर जंक फूडची लालसा थांबवते. निर्माण करते उगवते आणि आपण निरोगी अन्न निवडी करण्यास सक्षम आहात. बाळाच्या योग्य पोषणासाठी हे आवश्यक आहे.
- गर्भावस्थेदरम्यान मूड बदलणे आणि भावनिक उलथापालथ होणे सामान्य आहे. जसजसे बाळाच्या संवेदना विकसित होतात, तसतसे ते आपण अनुभवत असलेल्या सर्व भावना जाणू शकते. आपण आनंदी, निवांत आणि शांत राहणे फार महत्वाचे आहे. सहज समाधी ध्यान योग विशेषत: यावेळी तुमच्यासाठी आणि बाळासाठी चांगला आहे. खरं तर, आपण गर्भावास्थेमध्ये सहज मंत्राने दिवसातून तीन ते चार वेळा ध्यान करू शकता.
- ध्यान केल्याने आपले मन मोकळे होते आणि आपणास भावनिक पातळीवर प्रभावीपणे सामना करण्यास मदत होते. आपल्या शरीराला आराम देण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. हे पाठीचा कण्या वरील दाब कमी होण्यास मदत करू शकते, जेणेकरुन आपणास गर्भावस्थेच्या शेवटच्या टप्प्यात अधिक आरामदायक वाटेल.
- व्यस्त जीवनशैलीमुळे गर्भावस्थेदरम्यान उच्च रक्तदाब आणि मधुमेह ही सामान्य घटना बनली आहे. ध्यान या समस्यांना तोंड देण्यास मदत करू शकते ,जेणेकरून आईला गुंतागुंत न होता नैसर्गिक प्रसूतीची दाट शक्यता निर्माण होते.
निरोगी गर्भधारणा टिपा
- गर्भवतीने स्वतःला अध्यात्मिक कार्यात व्यस्त ठेवावे असा सल्ला आहे.
- नामस्मरण, आणि मधुर संगीत आणि ज्ञान चर्चा ऐकणे खूप फायदेशीर ठरेल. गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या ज्ञानचर्चा ज्ञानवर्धक आणि सुखदायक दोन्ही आहे.
- आक्रमक आणि हिंसक परिस्थिती टाळा. आपणास चित्रपट पहायला आवडत असल्यास, त्रासदायक चित्रपटांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.
~ डॉ. प्रेमा भट यांचे माहितीद्वारे
आनंदी गर्भावस्थेसाठी, आपल्या प्रियजनांसोबत एकत्र ध्यान करणे ही चांगली कल्पना आहे; सामुहिक ध्यानाचा नेहमीच जास्त परिणाम होतो. ध्यान प्रत्येकाला आरामशीर आणि आनंदी ठेवण्यास मदत करू शकते. त्याच वेळी, ते आपल्या आयुष्यातील या नाजूक आणि निर्णायक काळात तुम्हाला सतर्क आणि सावध ठेवू शकते.
तुम्ही आपल्या गरोदरपणाच्या पहिल्या दोन त्रैमासिकांमध्ये काही योगासने देखील करून पाहू शकता. ते आपणास गरोदरपणाच्या लक्षणांचा सामना करण्यास मदत करू शकतात आणि सुरळीत प्रसूतीस सहाय्य देखील करू शकतात. मार्जरासान , त्रिकोणासन आणि पवनमुक्तासन ही काही आसने आहेत. गर्भधारणेदरम्यान आपण या योगासनांचा सराव करू शकता. तथापि, यापैकी कोणत्याही आसनांचा स्वतः सराव करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन खात्री करा.
गर्भावस्थेदरम्यान आहार सूचना
पहिला महिना:
थंड दूध प्या आणि सहज पचणारे अन्न खा. आंबट आणि तिखट पदार्थ टाळा. बद्धकोष्ठता असल्यास, आयुर्वेदिक औषधे घेऊ शकता जसे की मृदू अनुलोमन किंवा मात्रबस्ती.
तथापि, कोणतेही औषध सुरू करण्यापूर्वी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले.
दुसरा महिना: पौष्टिक अन्नाचे लहान भाग दिवसभरात थोड्या थोड्या अंतराने घ्या. फळांचा रस टाळा , कारण त्यामुळे उलट्या होऊ शकतात. दूध, तांदूळ, नारळ पाणी, तांदळाची पेज, तांदळाची गोड खीर आणि साजूक तूप यांचे सेवन चांगले आहे.
तिसरा महिना: दुधाची साय, मध आणि तूप घेणे योग्य आहे.
गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी एक पौष्टिक कृती
साहित्य:
अंजीर – २५० ग्रॅम, जर्दाळू – २५० ग्रॅम, काळा खजूर – २५० ग्रॅम, बदाम – १०० ग्रॅम, पिस्ता (मीठ न लावलेले) – १०० ग्रॅम, काकडीच्या बिया – १०० ग्रॅम, सूर्यफूल बिया – १०० ग्रॅम, भोपळ्याच्या बिया – १०० ग्रॅम, खरबूज बिया – १०० ग्रॅम, अक्रोड – १०० ग्रॅम, चिरोंजी (चारोळी) – ५० ग्रॅम, जायफळ – ३ , वेलची – २५ ग्रॅम, केसर (केशर) – २ चिमूटभर
कसे तयार करावे:
- अंजीर, काळ्या खजूर आणि जर्दाळू बारीक चिरून घ्या.
- बदाम, पिस्ता, काकडी, सूर्यफूल, भोपळा आणि खरबूज, अक्रोड, चारोळ्या, वेलची आणि जायफळ बारीक करून घ्या.
- सर्वकाही मिसळा, पीठ मळून घ्या आणि ताटलीत थापून घ्या.
- चौकोनी तुकडे करा.
रोज सकाळी एक ग्लास कोमट दुधासोबत एक वडी खा.