चिंता सोडून द्या
धावते जग, बदललेली जीवनशैली, अवेळी खाण्याची सवय, चिंता, दुर्बलता, नैराश्य, जुनाट आजार या सर्वांचा आपल्या सर्वांगीण जीवनावर खूप परिणाम होतो. जे चार सर्वात महत्वाचे घटक आहेत, जे आपल्याला रोजच्या जीवनात ऊर्जा प्रदान करतात ते म्हणजे अन्न, झोप, श्वास आणि आनंदी, मन हे आहेत.
औषधांवरील अनेक वर्षांच्या संशोधनाने किंवा प्रगतीनंतरही औषधांनी जेवढे बरे वाटते त्याही पेक्षा शांत झोपेमुळे अधिक बरे वाटते हे आता सिद्ध झाले आहे. आणि झोप ही आपल्या आयुष्याचा एक तृतीयांश भाग आहे. त्यामुळेच चांगल्या झोपेचे किंवा विश्रांतीचे खूप महत्व आहे हे स्पष्ट होते. आयुर्वेद म्हणते की झोपेचे मुख्य कार्य हे ओज किंवा ऊर्जा निर्माण करणे आहे , जी ऊर्जा आपल्या मनाचा आणि शरीराचा समन्वय साधते आणि जीवन आरोग्यदायी बनवते.
माणसाचे मन इतके ताकदवान आहे की त्यामध्ये आपल्या स्मृती आणि संस्कार साठवले जातात. आपले मन वारंवार ताजे तवाने करणे फार गरजेचे आहे ज्यामुळे आपण वर्तमान क्षणात राहू शकतो. लक्ष केंद्रित केल्यावर मन तीक्ष्ण होते तर ढिले सोडल्याने मन विस्तारते. ध्यान ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला निरव शांतीचा अनुभव देते आणि मनावरील भूतकाळातील छापा पासून मुक्त करते.
ध्यान व झोप हे दोन्ही आपल्याला ताजेतवाने करतात , पण ध्यान केल्याने आपण भूतकाळातील छापापासून मुक्त देखील होतो.
– गुरुदेव श्री श्री रवि शंकर
आपल्याला दिवसातून किती वेळ झोपणे गरजेचे आहे?
या प्रश्नाचे एक ठराविक असे उत्तर नाही देता येणार.
असे म्हणतात की सर्वसामान्य व्यक्तीला दिवसाला ७ ते ८ तास झोप गरजेची आहे. त्यामुळे ती व्यक्ती दुसऱ्या दिवशी ताजीतवानी राहील. प्रत्येकाच्या शारीरिक प्रकृती नुसार झोपेची गुणवत्ता आणि कालावधी वेगवेगळा असतो. जेव्हा शरीरात ‘तमस’ ची मात्रा अधिक असते तेव्हा शरीर विश्रांती कडे झुकते, जेव्हा ‘रजस’ ची मात्रा जास्त होते तेव्हा शरीरात चंचलता वाढते व झोप लागत नाही त्यामुळे माणूस दमून जातो, पण जेव्हा शरीरात ‘सत्व’ ची मात्रा अधिक असते तेव्हा थकवा हा जवळजवळ शून्य होतो, शरीर संपूर्ण दिवस जागृत आणि ताजेतवाने राहते.
झोपेची वेळ ही आपल्या वयानुसार आणि आरोग्याच्या स्थितीनुसार बदलत राहते.
उदाहरणार्थ – नुकतेच जन्म झालेले बाळ दिवसातून १७ ते १८ तास झोपते. त्यातील ९ तास ही रेम (REM) झोप असते(झोपेत डोळ्यांच्या बुब्बुळाची जोरात होणारी हालचाल). तर सामान्य माणसाच्या झोपेत रेम(REM) झोपेचा हा कालावधी २ तासांपेक्षा कमी असतो. रेम (REM) झोपेच्या या वेळेत आपल्या मेंदूची क्रिया ही जोरात चालू असते. जेवढी शांत झोप तेवढे मन शांत राहते.
जुने आजार, चिंता, झोपेची समस्या जसे निद्रानाश (मेंदूची आतिउत्तेजना) यांचा शरीराच्या चयापचय क्रिया, सर्वांगीण आरोग्यावर, खूप मोठा परिणाम होतो त्यामुळे वरील समस्यांकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे.
व्यवस्थित झोप न लागण्याने शरीरावर होणारे परिणाम
-
मानसिक स्थिती खराब होणे.
झोप न लागल्याने माणूस भावनाप्रधान होऊ शकतो आणि त्याने मानसिक अस्थिरता आणि नैराश्य येऊ शकते.
-
कमकुवत रोग प्रतिकार शक्ती
खुप कमी झोपल्याने शरीराची किटाणू विरुद्ध लढण्याची रोगप्रतिकारक शक्ति कमी होते त्यामुळे सर्दी, खोकला होऊ शकतो.
-
कमी झोप आपल्या विचारांवर आणि एकाग्रतेवर परिणाम करते.
कमी झोपेमुळे मेंदूच्या पेशी थकतात व आपली एकाग्रता, स्मरणशक्ती, सृजनात्मकता, समस्या सोडवण्याची क्षमता यांवर वाईट परिणाम होऊ शकतो.
-
मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होण्याचा धोका.
कमी झोपेमुळे शरीरातील इन्सुलिन च्या प्रमाणावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे मधुमेह या रोगाची शक्यता वाढते. कमी झोपेमुळे रक्त दाब वाढू शकतो तसेच हृदयाचे विकार होण्याची शक्यता असते.
-
कमी झोपेने वजन वाढते
कमी झोपेने जी रसायने आपल्या मेंदूला संवेदना पुरवतात, त्यांच्यावर विपरीत परिणाम होतो आणि त्यामुळे आपले वजन वाढते.
वरील सर्व परिणाम हे आपल्या पुरातन योग पद्धतीने घालवता येतात.
चरक संहिता या आयुर्वेदावर आधारित संस्कृत पुस्तकात झोपेचे महत्व सांगितले आहे.
चेतना आणि झोप
आपल्या चेतनेचा अनुभव निद्रावस्थेत स्वप्नात होत असल्याचे एका अभ्यासात आढळून आहे.
थोडासा सराव केला तर आपण आपली चेतना आपल्या गरजेनुसार वेगवेगळ्या अवस्थेत घेऊन जाऊ शकतो. जसे जागृती(जागृत अवस्था), स्वप्न(स्वप्न अवस्था), सुशूप्ती(सखोल विश्रांती, विचार न येणे). ध्यान आपल्याला या अवस्थेत घेऊन जाते आणि जीवनामध्ये अमुलाग्र बदल घडतात, आपली प्रयोगशीलता वाढते, उच्च कामगिरी करू शकतो.
प्रकृती आपल्याला नकळतपणे शांत करते आणि मौनात घेऊन जाते. यालाच ‘झोप’ असे म्हणतात. झोपेतून आपल्याला ऊर्जा मिळते. जेव्हा आपण स्वतःहून शांत होतो किंवा मौनात जातो तेव्हा त्याला ‘ध्यान ‘ म्हणतात. ध्यान केल्याने आपल्याला अधिक ऊर्जा मिळते आणि ध्यान आपल्याला सूक्ष्म जगात घेऊन जाते.
– गुरुदेव श्री श्री रवि शंकर
शांत झोपेसाठी ध्यान: काही चित्तवेधक पद्धती
वर्तमान क्षणात राहणे हा ध्यानाचा सुवर्ण नियम आहे. आणि या वर्तमान क्षणात आपण स्वत:ला सांगा की “मला काही नकोय, पुढची काही मिनिटे मला काहीच करायचे नाहीये, मी कोणीही नाहीये”. हे आपल्याला गहिऱ्या शांततेत घेऊन जाते आणि हेच विश्राम मिळण्यासाठी खूप उपयुक्त आहे.
1. श्वसनाबद्दल जागरूकता
आपल्या श्वसनाकडे लक्ष देणे हा एक खूप चांगला आणि सोपा मार्ग आहे. आपले मन जे एखाद्या मधमाशीप्रमाणे दिवसभर सतत फिरत राहते ते प्राणायामाने आणि जाणीवपूर्वक लयबद्ध श्वसनाने स्थिर होते. आपला वेळ घेत, श्वास घेताना आणि सोडताना हळुवारपणे श्वासाचे निरीक्षण करा. श्वासाचे आपल्या मनावर आणि भावनांवर होणाऱ्या परिणामांचे निरीक्षण करा. आपल्या श्वासाच्या आधारे नकारात्मक वृत्ती सोडून द्यायला शिका.
या प्रक्रियेचा आपल्या शारीरिक क्रियांवर खूप प्रबळ प्रभाव होतो. यामुळे मन शांत होते, ताण तणाव निघून जातो, सतत येणाऱ्या विचारांचा वेग कमी होतो. वरील सर्व बदल जलद गतीने आणि सुसूत्रीतपणे होतात.
‘भ्रामरी प्राणायाम आणि नाडी शोधन प्राणायाम’ या प्राणायामाच्या काही उपयुक्त पद्धती आहेत. तसेच सुदर्शन क्रिया™ केल्यावर आपल्याला शांत वाटते आणि शरीरातील सर्व पेशींचे पुनःरुथान होते. ही सुदर्शन क्रियेची ठळक वैशिष्ट्ये आहेत.
2.झोपेसाठी मार्गदर्शित केलेले ध्यान
हा ध्यान करण्याचा एक सोपा मार्ग आहे. यात वेगवेगळे विषय उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही विषय घेऊन त्यावर ध्यान करू शकतात. हे ध्यान आपली चेतना फैलावते. हे ध्यान आपल्याला आपल्या खऱ्या अस्तित्वाशी जोडते. जे खूप सखोल आणि चिरशांत आहे.
गुरुदेवां सोबतचे ध्यान
3. योगनिद्रा – शरिरावर लक्ष केंद्रित करून करायचे ध्यान
योग निद्रा म्हणजेच योगिक झोप ही आपल्या मनाची जागृत स्थिती आणि झोप यातील रिक्त जागा भरून काढते. ही एक खूप सोपी पद्धत आहे , ज्यामध्ये आपण हळुवारपणे आपले लक्ष शरीरातील वेगवेगळ्या अवयवांवर श्वासाच्या सहाय्याने अगदी पद्धतशीरपणे घेऊन जातो. या पद्धतीने आपल्याला खूप शांत वाटते. ही प्रक्रिया आपण रात्री झोपायच्या आधी करू शकतो.
चांगल्या झोपेसाठी ध्याना बद्दल अधिक जाणून घ्या.
झोपण्यासाठीची सर्वोत्तम दिशा ठरवून घ्या.
4. मंत्राच्या आधारे ध्यान करणे
मंत्राच्या आधारे ध्यान करणे हा शांत झोप लागण्यासाठी महत्वाचा उपाय आहे. आपल्या शरीरात ७२ टक्के पाणी आहे.त्या पाण्याचे तरंग आपल्या मनावर आणि आरोग्यावर परिणाम करतात. सकारात्मक मनस्थितीत सकारात्मक बोलून सकारात्मक तरंग निर्माण करणे महत्वाचे आहे. वैदिक मंत्र आणि नामस्मरण खूप चांगले आणि शक्तिशाली तरंग निर्माण होतात जे आपली मनाची स्थिती बदलू शकतात. शांतपणे मंत्र ऊच्चारण केल्याने आपल्या शरीरातील सर्व यंत्रणा शांत होतात आणि अगदी सहज ध्यान होते.
झोपेच्या तक्रारी थांबवण्याचा सगळ्यात चांगला उपाय म्हणजे आपल्या प्रकृतीनुसार पुरेशी झोप मिळणे, आरोग्यासाठी चांगली अशी जीवनशैली आत्मसात करणे, मोबाईल वरचा वेळ कमी करणे आणि वरील सांगितलेले उपाय रोजच्या जीवनात चालू करणे हे होय.आर्ट ऑफ लिविंग मध्ये तुम्हाला अधिक शिकता येईल.