कधी कधी कोणतीही नकारात्मक बाब मग ती एखादी तक्रार असो किंवा काही वाद असो त्याचा आपल्यावर काहीही परिणाम होत नाही. आणि कधी कधी एखादी रचनात्मक टीका देखील प्रमाणाबाहेर परिणाम करते.याबद्दल आपण कधी विचार केला आहे?

नाही. हा आपण नुकत्याच पाहिलेल्या चित्रपटाचा अथवा योग्य प्रकारे न झालेल्या खरेदीचा परिणाम नाही. ते फक्त आपले मन आहे.

आणि आपण जर आयुर्वेदिक मार्गाचा विचार केला तर तो फक्त आपल्यातील ऊर्जेचा खेळ आहे.

आपल्यातील ऊर्जा जास्त आणि सकारात्मक असेल तर आपण शांत आणि आनंदी असतो व ऊर्जा ओसरली तर आपल्याला उदास वाटते.

चांगली बातमी: खेळ हा तात्पुरता असतो व आपण त्याची पातळी निश्चितपणे वाढवू शकतो. येथे ध्यान हा एक महत्त्वाचा घटक आहे. बऱ्याचदा असे विचारले जाऊ शकते की, ”आपणास सकारात्मक ऊर्जेसाठी एखादे ध्यान माहित आहे कां ?” किंवा अगदी आपण नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त कसे होऊ शकू? पण आपल्या ध्यानाचा अभ्यास जितका नियमित करू, तितकी सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळेल.

ध्यान कसे कार्य करते?

ध्यान अनेक स्तरांवर कार्य करते:

  • ध्यानामुळे शरीराला विश्राम मिळतो: शारीरिक आणि भावनिक पातळीवर काही बदल घडतात. ध्यान करताना चयापचय मंदावते, त्यामुळे शरीरातील विविध अवयवांना आवश्यक ती विश्रांती मिळते. यामुळे शरीराला शक्ती मिळते व शरीर पुनर्जीवित होते.
  • मनाला शांत आणि उत्साही बनवते: ध्यान हे मनाला समूळ स्वच्छता करून मानसिक आरोग्य देण्यासारखे आहे. मनातील पूर्वीचे परिणाम पुसून टाकले जातात व नको असलेल्या भावनिक दडपणाच्या ओझ्यातून मुक्तता मिळते.
  • चेतनेत बदल घडवून आणते: ध्यानामुळे उच्च सजगतेची भावना विकसित होते त्यामुळे चेतनेत बदल घडून येतो व आपण अधिक जागरूक व्यक्ती बनतो. आपण सर्व एकच आहोत या सर्वोच्च वास्तवाची जाणीव होते.

निरोगी शरीर आणि आनंदी मन सकारात्मक ऊर्जेची पातळी वाढवते. म्हणूनच दररोज ध्यान करण्याची शिफारस केली जाते. या ऑनलाईन ध्यानांमधून तुम्ही एखादे ध्यान निवडू शकता.

आयुर्वेदिक पद्धती

ध्यानामुळे ऊर्जेची पातळी वाढवून सत्वगुण वाढतो

आयुर्वेदानुसार प्रत्येक व्यक्तीत तीन गुण असतात:

  • रजोगुण: हा गुण शरीर आणि मनाच्या क्रियांना जबाबदार असतो. रजसच्या एका विशिष्ट पातळीशिवाय आपण काम करू शकत नाही.
  • तमोगुण: शरीर आणि मनाच्या विश्रांतीसाठी जबाबदार. तमसच्या एका विशिष्ट स्तराशिवाय व्यक्ती झोप घेऊ शकत नाही. तथापि तमस संतुलित नसेल तर भ्रम, गैरसमज,आळस इत्यादी वाढतो.
  • सत्वगुण: सत्व हा गुण शहाणपण आणि धार्मिक वृत्ती साठी जबाबदार आहे. आपल्या सभोवतालच्या वातावरणात किंवा शरीरात जेव्हा सत्वगुण वाढतो, तेव्हा आपल्याला हलके, आनंदी, उत्साही, जागरूक जाणवते.

ऊर्जेचा हा खेळ आपल्यासाठी महत्त्वाचा कां आहे?

सकारात्मक ऊर्जासकारात्मक ऊर्जेचा अभाव
आनंदी असणे, कृतज्ञ असणे, कौतुक करणे, स्वतःला व इतरांना आनंदी ठेवणे, उत्साही केंद्रित व जागरूक असणे आत्मविश्वास असणे.सतत तक्रार करण्याची प्रवृत्ती, स्वतःला व इतरांना दोष देणे, तीव्र चिंता भीती वाटणे, सहज राग येणे, जीवनाबद्दल निराशाजनक दृष्टिकोन, चालढकल करणे.

आपला सत्वगुण वाढवा

  • योग्य आहार: आपण जे खातो त्याचा आपल्यातील तिन्ही गुणांवर प्रभाव पडतो. उदाहरणार्थ हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे यासारखे सहज पचणारे पदार्थ सात्विक असतात. मिठाई, आंबट आणि मसालेदार पदार्थ जसे लोणचे यामुळे रजोगुण प्रेरित होतो. मांसाहार, तळलेले पदार्थ आणि गोठवलेले पदार्थ तामसिक असतात.
  • चांगला श्वास घ्या: आपल्याला ९०% इतके पोषण प्राणवायूपासून मिळते तर उर्वरित १० टक्के अन्न आणि पाण्यापासून मिळते हे सर्वज्ञात आहे. प्राणायामाने आपल्या फुफ्फुसांची क्षमता वाढते, सत्व पातळी वाढते. आर्ट ऑफ लिव्हिंग च्या हॅपिनेस प्रोग्रॅम मध्ये शिकवल्या जाणारी सुदर्शन क्रिया हि अत्यंत प्रभावी श्वसन प्रक्रिया असून त्यामुळे शरीर, श्वास आणि मन यामध्ये सुसंवाद साधला जातो.
  • ध्यान करा: आपले ध्यान जसजसे खोलवर जाते तसतसे सत्व वाढते. ध्यान हा सर्वात सोपा व प्रभावी मार्ग आहे. आपले ध्यान सखोल कसे करायचे हे येथे जाणून घ्या.

पुढच्या वेळी आपणास जेंव्हा उदास वाटत असेल, तेंव्हा थोडं थांबा आणि छोटसं ध्यान करा. त्यामुळे कोणत्याही कारणाने फायदाच होईल. जेंव्हा आपण नियमित ध्यान करू तेंव्हा ध्यान न करण्याचे कारण लोप पाऊ लागते.
‘सकारात्मक ऊर्जेसाठी’ किंवा ‘नकारात्मकता दूर करण्यासाठी ध्यान’ हेच निव्वळ ध्यान होईल , कारण ते मला आवडते आणि कदाचित ते सर्वांसाठी सर्वोत्तम कारण होईल.

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रशिक्षिका डॉक्टर प्रेमा शेषाद्री यांच्या विवेचनावर आधारित

    Hold On!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

    *
    *
    *
    *