लहान मुलांचे पालकत्व करणे हे खूप आव्हानात्मक काम आहे. कोणतीही सुट्टी नाही किंवा रजा नाही. हे ७ दिवस २४ तास करण्याचे आव्हानात्मक, पण तेवढेच यश देणारे काम आहे. तान्हया बाळाचे, शिशुचे पालकत्व करणे हे मोठया मुलांच्या पालकत्वा पेक्षा अवघड असते. लहान मुले पूर्णपणे आपल्या पालकांवर अवलंबून असतात. पहिल्यांदा पालकत्व आलेल्या पालकांना सगळेच नव्याने शिकावे लागते. लहान मुलांच्या जेवणाच्या आणि झोपण्याच्या विचित्र वेळा सांभाळणे, हा दैनंदिन जीवनाचा भाग बनून जातो. एवढे सगळे सांभाळत असताना आपण स्वतःची काळजी कशी घ्याल? याच उत्तर आहे ध्यान करणे. कसे काय ते पाहूया!
एक आनंदी मनस्थितिः कशी साध्य करता येईल
जीवनातील प्रत्येक क्षण आनंदी, सजगतेनेआणि करुणामय जगणे म्हणजेज मुक्ती.
– गुरुदेव श्री श्री रवि शंकर
आपले मन आनंदी बनवण्यास आपणास ध्यान मदत करते. ध्यान आनंदाचे पाच मूलभूत आधारस्तंभ मजबूत करते:
- दया
- सहानुभूती
- खिलाडू वृत्ती
- आंतरिक स्थिरता
- समाधान
ध्यानाचा रोज सराव केल्याने आपण मनातील विचारांच्या कोलाहलांपासून दूर राहतो आणि मनाच्या आनंदी स्थितीकडे जोडले जातो. आनंदी पालक हे आपल्या पाल्याचे पालकत्व करायला आणि आव्हान स्वीकारायला चांगल्या प्रकारे तयार असतात. जेंव्हा आपण आनंदी असतो तेंव्हा आपण जास्त उत्साही राहतो.
ध्यान हे पालकांना त्यांच्या व्यावसायिक जीवनात आणि वैयक्तिक जीवनात संतुलन ठेवण्यास मदत करते. मग जबाबदारी आपल्याला ओझे वाटत नाही.
मनावरील ताण तणाव घालवणे:
तणावाचे कारण म्हणजे गोष्टी एका विशिष्ट मार्गाने असाव्यात या संकल्पना मनात असणे.
– गुरुदेव श्री श्री रवि शंकर
एखाद्या तणावपूर्व परिस्थितीशी आपण खरेतर समोरून सामना करतो किंवा पळ काढतो. याला ‘लढा किंवा पळा’ प्रतिसाद असे म्हणतात. जेंव्हा आपण खूप वेळ त्रासलेल्या स्थितीत राहतो तेंव्हा आपल्या शरीराचे अनेक मार्गांनी नुकसान होते. सततच्या मानसिक ताण तणावामुळे शरीरावर होणारे परिणाम खालील प्रमाणे आहेत.
- हृदय रोग
- वजन वाढणे
- केस गळणे
- डोकेदुखी
- बिघडलेले लैंगिक जीवन
तणावाचा शरीरावर होणारा परिणाम आणि ध्यानाचा शरीरावर होणारा परिणाम हे परस्पर विरुद्ध आहेत. ध्यान केल्याने मनाला आणि शरीराला विश्राम मिळतो. तणावामुळे झालेले नुकसान भरून काढण्यास विश्राम गरजेचा आहे.
लहान मुलांवर सतत लक्ष ठेवणे आणि एकीकडे त्यांच्या गरजा पुरवण्यात दिवस कसा जातो कळत नाही. त्यामुळे ताणतणाव निर्माण होणे साहजिक आहे. अशावेळी ध्यान करणे हे नेहमीच हुकमी एक्क्यासारखे काम करते. कोणताही निवांत क्षण हा ध्यानात बदलू शकतो.
चिंताग्रस्त मनाला शांत करणे:
प्राणायाम, ज्ञान, आणि ध्यान केल्याने चिंता दूर होते. कोणीतरी आहे जे तुमची सतत काळजी घेतंय हे मनात पक्के करा.
– गुरुदेव श्री श्री रवि शंकर
चिंता केल्याने मनात अस्वस्थ विचार निर्माण होतात. त्यामुळे प्रश्न दूर करणारे विचार आणि चिंता वाढवणारे विचार यातील फरक ओळखणारी शक्ती नष्ट होते. पालकांना आपल्या पाल्याविषयीं चिंता वाढवणाऱ्या विषयांची अजिबात कमी नसते. नुसता थोडासा खोकला किंवा सर्दी अनेक प्रश्न निर्माण करतात.
ध्यान आपल्याला काळजी, चिडचिड, अनियंत्रित चिंता, कमी झोप यांपासून दूर आणि शांत ठेवते.
ध्यान केल्याने मेंदूतील काही पेशी सक्रिय होतात ज्या चिंता दूर करायला मदत करतात. असे ‘ वेक फॉरेस्ट बाप्तीस्त मेडिकल सेंटर ‘ या संस्थेने २०१३ मध्ये केलेल्या संशोधनातून सिद्ध झाले आहे.
जेवढा मानसिक ताण कमी, तेवढी चिंता कमी. ध्यान केल्याने आपली ताणतणावा विरुद्ध लढण्याची शक्ती अधिक प्रबळ होते. तसेच स्वतःबद्दलचे विचार सकारात्मक होतात. नवीनच पालक झालेल्या व्यक्ती आपल्या नवीन जबाबदाऱ्या अधिक आत्मविश्वासाने पेलू शकतात, जेंव्हा ते दररोज न चुकता ध्यान करतात.