सेजल शहा द्वारा┃प्रकाशित: मे १७, २०१९

सोप्या भाषेत सांगायचे तर ध्यान म्हणजे मानसिक स्वच्छता! मनातील दररोजचा कचरा साफ करणे, ज्यायोगे तुम्ही तुमच्या आत्म्याशी संपर्क साधू शकाल आणि तुमची प्रतिभा आणि कौशल्य संतुलित करून तुमचे मानसिक आरोग्य सुधारू शकाल. आजच्या वेगवान आधुनिक युगात जेव्हा आपल्याकडे वेळच नाही त्यावेळी ध्यान का करावे व त्याचा काय फायदा होईल असा प्रश्न तुम्हाला पडेल. परंतु तुम्हाला या पंचवीस चिन्हांपैकी एखादे चिन्ह दिसत असेल तर तुमच्या ध्यानाचा सराव सुरू करण्याची, पुन्हा सुरु करण्याची किंवा ते वाढवण्याची हीच वेळ आहे.

मन शांत करणे किंवा मनात कोणताही विचार येणार नाही अशी स्थिती निर्माण करणे हे अनेक साधकांना अशक्य ध्येय वाटेल. बऱ्याच वेळा मला असे वाटत असे की ताण कमी होण्याऐवजी या प्रक्रियेमुळे माझ्यावर अधिक ताण आला आहे. गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी सांगितलेली काही योगासने आणि ध्यान करणे हे या सरावाला कलाटणी देणारे ठरले. माझा ध्यानाचा सराव सोपा आणि मजेदार परंतु दीर्घ आणि गहन कसा झाला हे सांगू इच्छितो.

१. आपण सर्व जन्मजात योगी आहोत!

तुम्ही कधी लहान मुलांना पाहिले आहे? ती अतिशय लवचिक असतात आणि योगासनाच्या सर्व अवस्था अगदी नैसर्गिकरित्या आणि सहजपणे करतात. ती नेहमी हसतमुख उत्साही आणि आनंदी असतात. ती नेहमी वर्तमान क्षणात असतात. ती क्षणभर रडतात व लगेच हसायलाही लागतात. त्यांचे मन मोकळे असते व ती नेहमीच 100% जगतात. आपणही लहान असताना असेच होतो. आपण सर्वजण योग्याचे शरीर, मन आणि आत्मा घेऊन जन्मलो आहोत. मोठे होण्याच्या प्रक्रियेत आपल्यावर ताणतणावांचा परिणाम होतो व आपले खरे स्वरूप झाकले जाते. आपल्या नैसर्गिक स्वभावाकडे परतणे हाच आपल्या सरावाचा उद्देश आहे.

२. मला हवे आहे वरून ‘माझ्याकडे आहे’ मध्ये गिअर बदलणे!

आपण ध्यान करतो कारण आपल्याला मन:शांती हवी असते. पण आपल्याकडे ती आधीच असेल तर? ज्याप्रमाणे आपले शरीर विविध हाडे, स्नायू, अवयव, रक्तवाहिन्या व मज्जातंतूंनी बनलेले आहे तसेच आपला आत्मा प्रेम, आनंद, शांती यांनी बनलेला आहे. सच्चिदानंद सत्, (सत्य), चित् (चैतन्य), आनंद (शुद्ध आनंद) हे आपल्या चेतनेचे खरे स्वरूप आहे. जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा आपण बाहेरून शांती आणि आनंद आपल्यात आणत नाही. आपल्याला आपले सच्चे स्वरूप कळते तेव्हा आपण त्याचा शोध घेणे आणि त्यांची अपेक्षा ठेवणे थांबवतो. आपल्या सरावाचा प्रारंभ ‘हवे आहे’ पासून, ‘आधीच आहे’ असा बदलतो व आपण शोधणे थांबवून अनुभव घेणे सुरू करतो.

३. ध्यान करणे खूप सोपे आणि नैसर्गिक आहे!

अनेकांना असे वाटते की ध्यान करणे खूप कठीण व आव्हानात्मक आहे. खरंतर ते आपल्यासाठी खूप सोपं आणि नैसर्गिक आहे. ज्याप्रमाणे आपण आपली बोटे सहजपणे वाकवतो आणि सरळ करतो त्याचप्रमाणे आपले मनही ध्यानस्थ अवस्थेत जाते. फक्त डोळे मिटून बसणे आणि काही मिनिटे आपले लक्ष अंतर्मुख करणे आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाकडे घेऊन जाईल. नवख्या साधकांसाठी ध्यान हा एक प्रकारचा सराव किंवा नित्यक्रम (वैज्ञानिक दृष्ट्या अनेक फायदे देत असल्याचे सिद्ध झालेला) असल्याचे वाटते. परंतु कालांतराने आपण त्यात खोलवर जातो तेव्हा ध्यान हे आपण जगतच असलेली गोष्ट बनते. ध्यान हा फक्त सराव नाही, तो आपला मूळ स्वभाव आहे हे आपल्या लक्षात येते. उत्तम संवाद, सृजनशीलता, मनाची स्पष्टता, ताजेतवाने करणारी गाढ झोप, शांती आणि आनंदाचे संकेत हे काही फायदे तुम्ही अनुभवायला लागाल.

४. आपले मन आकाशासारखे आहे आणि आपले विचार ढगांसारखे आहेत; ते फिरत असतात!

आपल्या मनात एका दिवसात अनेक विचार येतात पण त्यातील आपल्याला किती आठवतात? बऱ्याचदा आपण ५-१० मिनिटांपूर्वी काय विचार करत होतो हे देखील आपल्याला आठवत नाही. विचार हे क्षणिक, तात्पुरते असतात आणि आकाशातील ढगांप्रमाणे ते सतत फिरत असतात. त्यांना जाऊ द्या. ध्यान म्हणजे मनावर नियंत्रण ठेवणे, एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे, आपले विचार,भावना अथवा संवेदनांचा प्रतिकार करणे नव्हे. हे त्याच्या नेमके उलटे आहे. लक्ष अकेंद्रित करणे किंवा दुर्लक्ष करणे, वर्तमान क्षण जसा आहे तसा स्वीकारणे आणि आपल्या अस्तित्वात विश्राम करणे, म्हणजे ध्यान. जेव्हा आपण विचार सोडतो आणि चंचल आणि बडबड करणाऱ्या मनाच्या पलीकडे विश्राम करतो तेव्हा आपण अखंड शांततेचा अनुभव घेऊ शकतो. वारा थांबल्यानंतर ज्याप्रमाणे खवळलेला समुद्र शांत होतो त्याचप्रमाणे आपले मनही शांत होते आणि त्याला अंगभूत स्थिरता मिळते.

५. तुम्हाला ध्यान करावे लागत नाही, ध्यान होते!

ध्यान ही काहीही न करण्याची नाजूक कला आहे. जेव्हा मी ध्यानाला बसतो तेव्हा ‘मी काहीच नाही, मी काही करत नाही, मला काहीही नको’ ही सूत्रे मनात घेऊन बसतो. मी फक्त डोळे मिटून बसतो, माझी ओळख, मी करीत असलेले काम हे सर्व मी सोडून देतो. मी माझे सर्व शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक क्रियाकलाप थांबवतो आणि काहीही करीत नाही; फक्त माझ्या अस्तित्वात विश्राम करतो. कशाचीही अपेक्षा करीत नाही, अगदी मन :शांतीची सुद्धा नाही. मी माझ्या सर्व इच्छा सोडून देतो, कशाचाही प्रतिकार अथवा कशाचेही नियंत्रण करीत नाही आणि कोणत्याही प्रकारच्या अनुभवासाठी मोकळेपणाने, ‘जो अनुभव मला मिळेल तो त्या क्षणी माझ्यासाठी योग्य आहे,’ असा विश्वास ठेवून बसतो. जेव्हा आपण शून्य आणि मोकळेपणाच्या अवस्थेत येतो तेव्हा नैसर्गिकरित्या ध्यान होऊ लागते.

६. आपल्या चांगल्या तसेच वाईट काळात श्वास हा आपला सर्वात चांगला मित्र आहे.

श्वासात आपल्यासाठी महत्त्वाचे धडे आहेत. मनातील प्रत्येक भावनेसाठी श्वासात एक लय असते व त्या उलट श्वासाची लय बदलल्यास आपण आपल्या भावनांवर प्रभाव टाकू शकतो. आपले मन हाताळणे कठीण असते परंतु श्वासाने आपण ते सहजपणे हाताळू शकतो. तुम्ही एखाद्या चिडलेल्या, नाराज किंवा चिंताग्रस्त मित्राला शांत होण्यासाठी दोन-तीन खोल श्वास घेण्यास किती वेळा सांगितले आहे? हळुवारपणे श्वास घेणे किंवा नाडीशोधन करणे (ज्यामध्ये डाव्या नाकपुडीतून श्वास घेऊन उजवीकडून सोडणे व उजवीकडून घेऊन डावीकडून सोडणे ही क्रिया केली जाते) यामुळे मन शांत होते. श्वासातील लय आपल्याला आपल्या स्वतःशी,आत्म्याच्या आणि चेतनेच्या खोलीशी संपर्क साधण्यास मदत करते.

७. दात घासणे ही दातांची स्वच्छता आहे, तसेच ध्यान ही मानसिक स्वच्छता आहे!

दररोज सकाळी दात घासणे ही ऐहिक क्रिया असली तरी महत्त्वाची आहे. आपण ती एक दिवसही सोडत नाही. त्याचप्रमाणे ध्यानामुळे मनातील सर्व घाण त्यांची व स्मृतिचिन्हे नष्ट होतात व मानसिक स्वच्छता होते. ज्याप्रमाणे दात घासल्यानंतर निघणाऱ्या घाणीचे आपण विश्लेषण करत नाही तसेच ते ध्यानाच्या अनुभवाचेही विश्लेषण करत नाही. घाण-स्मृति अनेक प्रकारे निघू शकतात. त्यावर फार विचार न करता सोडून देणे हेच बरे. ज्या नित्यक्रमाप्रमाणे आपण दात घासतो त्याचप्रमाणे ध्यान करणे हे महत्त्वाचे आहे.

८. तुमचा सराव उच्च उद्देशांशी जोडा.

जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा आपल्या भोवतालच्या लोकांनाही त्याचा फायदा होतो. तुम्ही तुमच्या वातावरणात सकारात्मक आणि शांततापूर्ण संकेत पाठवता. तुम्ही शांत राहून जगालाही अधिक शांततापूर्ण बनवता. आंतरिक शांती आणि बाह्यशांती यांचा नजिकचा संबंध आहे. मी नियमितपणे मोठ्या गटात ध्यान करतो. जेव्हा तुम्ही एका सामान्य हेतूने मोठ्या गटात ध्यान करता तेव्हा तुम्ही तो हेतू पूर्ण करण्यास मदत करता. २०१६ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या जागतिक सांस्कृतिक महोत्सवात मी १५५ देशांमधील सुमारे ३५ लक्ष लोकांसोबत जागतिक शांततेसाठी ध्यान केले, तो आयुष्यभराचा विलक्षण अनुभव होता.

    Wait!

    Don’t miss this Once-In-A-lifetime opportunity to join the Global Happiness Program with Gurudev!

    Have questions? Let us call you back

     
    *
    *
    *
    *
    *