दिवसभर शिंका येतायत ? नाक लाल झालंय ? सारे काही ठीक असेल, अशी प्रार्थना करत दिवसातून दर दोन तासांनी अंग तापले आहे का, हे तपासावे लागते काय? ही जरी सामान्य सर्दीची लक्षणे दिसत असली तरी आपल्या आत बरेच काही घडत असते.
World Meditation Day
● Livewith Gurudev Sri Sri Ravi Shankar
जागतिक ध्यान दिवस
● थेट प्रक्षेपण २१ डिसेंबर, रात्री ८
जर आपणास दुखणारा घसा, चोंदलेले नाक, गळणारे नाक, शिंका आणि ताप अशी लक्षणे असतील तर बहुतेक आपण सामान्य सर्दीने ग्रस्त आहात, जिला शास्त्रज्ञ प्रेमाने नॅसोफॅरिनजॉयटीस म्हणतात.
आणि जर आपण हवामानातील बदलाशी सहजासहजी जुळवून घेवू शकत नसाल, परागकण श्वसनात आल्याक्षणी शिंका सुरु होत असतील, किंवा सतत आजारी पडत असाल तर आपण जास्तीची काळजी घेणे आवश्यक आहे.
सर्दी झाल्यावर आपण काय करता? मग दुकानात सहज मिळणाऱ्या औषधांचा मारा करू पाहता का? अशाने किती वेळा सर्दी कमी झालीय? डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार दरवेळी एकच औषध घेण्याने सर्दीच्या विषाणूना तुमची आणि तुमच्या औषधांची सवय होऊ लागते.
उपचारात बदल करण्याची हीच वेळ आहे. काही नैसर्गिक उपचार पद्धती जाणून घेऊया ज्या खात्रीने परिणामकारक आहेत, मात्र साईड इफेक्ट काहीही नाही.
#१ प्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी ध्यान करा
विश्रामाची एक प्राचीन प्रक्रिया ध्यान आहे, ज्यामुळे सर्दी ठीक करण्यासाठी मदत होऊ शकते, हे आपण जाणता का? आपणास हे नक्की माहीत असणे गरजेचे आहे की प्रतिकार शक्ती आणि आरोग्य यांचा प्रत्यक्ष संबंध आहे. जितकी प्रतिकार शक्ती मजबूत, तितके आपण निरोगी असतो. निरोगी राहण्यासाठी ध्यान कसे काय मदत करू शकते, याचे नवल वाटते ना?
जरा समजून घ्या. अँटीजेन नांवाच्या संभाव्य शत्रूपासून आपला बचाव करणारे सैन्य म्हणजे प्रतिकार शक्ती. ध्यान म्हणजे आपल्या जखमी प्रतिकारी सैन्याचा प्राथमिक उपचार (जेंव्हा आपण आजारी असतो तेंव्हा), आणि ध्यानच आपल्या सैन्याचे सामर्थ्यही वाढवते (म्हणजे वाढलेली प्रतिकार शक्ती).
ज्या ज्या वेळी आपण आजारी असतो, तेव्हा आपली प्रतिकार शक्ती वाढवणे, तसेच आपल्या शरीरावर आणि मनावर उपचार करण्यात आणि समतोल राखण्यास ध्यान मदत करते. जेव्हा आपण निरोगी असतो तेव्हा ध्यान आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि आपल्या शरीरात प्रवेशणाऱ्या आजारपणाला प्रतिबंध करण्यासाठी उत्कृष्ट जय्यत सैन्याचा पुरवठा करते.
आणखी एका मार्गाने ध्यान आपल्यावर आजारपणामध्ये उपचार करते.
आपण आजारी असताना आपणास कसे वाटते? आपली ऊर्जा कमी जाणवते, कारण आपली ऊर्जा आजारपणाने खर्चलेली असते. उलट आपले निरोगी शरीर हे उर्जेच्या उच्च स्तराशी संलग्न आहे. म्हणून अश्या वेळी ध्यान केल्याने आपली जीवन शक्ती ऊर्जा (म्हणजे प्राण शक्ती) वाढण्यास मदत होते, परिणामतः प्रतिकार शक्ती वाढण्यास उत्तेजन मिळते. पूर्वीपेक्षा मजबूत प्रतिकार शक्ती आपणास सर्दी सारख्या सामान्य आजाराशी लढा देण्यास मदत करते.
बरे होण्याची हीच वेळ आहे! गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या ऑन लाईन मार्गदर्शक ध्यानाचा लाभ घ्या.
#२ प्राणायाम, योग आणि ध्वनी उपचार
लहान मुले कशी खेळतात आणि झोपतात, हे पाहिले आहे का? थोडं आठवा बरं, आपण आणि लहान मुले फोटोसाठी कशी पोझ देत होतो! त्याची शारीरिक ठेवण पहा आणि झोपेत ती आपल्या बोटांची विशिष्ट रचना करुन झोपतात, ते पहा. योग आणि प्राणायाम म्हणजे नवे काही नाही, जे करण्यासाठी आपल्याला वेगळे प्रशिक्षण देण्याची गरज पडावी. मुलांच्यात पाहायल मिळते तसेच ते आपल्यात देखील नैसर्गिक रुजलेले आहे.
अग्नी आणि वायू मुद्रेत प्राणायाम केल्याने शरीराचे तापमान वाढते, ज्यामुळे पित्त न वाढता कफ पातळ होण्यास मदत होते.
अग्नी मुद्रा कशी करावी?
अनामिका अंगठ्याच्या मुळाशी धरून तळहातावर दाबून, अंगठ्याने अनामिका दाबावी आणि इतर तिन्ही बोटे सरळ, ताठ ठेऊन अग्नी मुद्रा करतात.
वायू मुद्रा कशी करावी?
आपली तर्जनी अंगठ्याच्या मुळाशी टेकवून, तिच्यावर अंगठ्याने दाब देऊन इतर तिन्ही बोटे सरळ ताठ ठेऊन वायू मुद्रा करतात. दिवसातून ३ ते ४ वेळा हा प्राणायाम प्रत्येकी तीन मिनिटे करावा.
खरे तर साध्या श्वसनामध्ये निरोगी जीवनाचे रहस्य सामावले आहे, हे आपण जाणता का? सुदर्शन क्रिया आणि भस्त्रिका सारख्या प्रक्रियांद्वारे जर आपण आपले श्वसन नियंत्रित केले, तर शारीरिक आणि भावनिक स्तरांबरोबर इतर सर्व स्तरांवर समतोल साधण्यास आपणास मदत होते. श्वास हा आपला मुख्य प्राणशक्तीचा स्त्रोत (मुख्य जीवन शक्ती ऊर्जा) आहे. जेंव्हा आपण सुदर्शन क्रिया (एक सुलभ तालबध्द श्वसन प्रक्रिया) करतो तेंव्हा आपले श्वसन देखील तालबध्द बनते ज्यामुळे आपल्या रोगांना उत्तेजन देणारे विषाणू नष्ट होतात.
गोमुखासन आणि भुजंगासन सारखी आसनेसुद्धा आपली प्रतिकार शक्ती बळकट करण्यास मदत करतात. निरोगी झाल्यावर देखील तसेच राहण्यासाठी हा सराव आपण सुरु ठेऊ शकता.
#३ ध्वनी देखील आजार बरे करतो.
ध्वनी उपचाराबद्दल ऐकले आहे का? संस्कृत उच्चारांद्वारे ध्वनी निर्माण केल्याने सकारात्मक तरंग निर्माण होतात. सकारात्मक ध्वनी मुळे आपले ऊर्जा स्तर वाढतात. सर्दीशी सामना करत असता जप ऐकण्याने आपणास सर्दीशी सामना करण्याचे सामर्थ्य मिळते.
हे मंत्रजप डोळे बंद करून केल्यास आपणास गाढ विश्रांती मिळते, हे आपणास जाणवले असेलच. ही ध्यानाची स्थिती आहे. या मंत्रोच्चारांमुळे आपसूकच उपचाराची प्रक्रिया सुरु होते. आपण मंत्रोच्चार ऐकत पडूनसुद्धा राहू शकता.- झोप लागली तरी काळजी करू नका, हे चांगलेच आहे, कारण आपली वाढलेली ऊर्जा आपल्यावर उपचार करण्याकडे वळत आहे.
#४ तुमच्या अस्तित्वात काहीही चुकीचे घडले नाही, याची खात्री बाळगा
जेव्हा आपणास कळते की आपणास सर्दी होत आहे, तेव्हा आपली बचावाची पहिली फळी काय असते? आपण सगळंकाही बाजूला ठेऊन अंथरुणात झोपून जाल, की उठून पुढे जाल?
जे चालले आहे ते सर्व आपल्या मनात आहे, हे तुम्हाला माहित आहे काय? आपली विचार करण्याची प्रक्रिया बदलल्याने आपले जीवन बदलून जाते. आपले मन खूप सामर्थ्यशाली आहे, ते आपल्यावर उपचार करु शकते. असे म्हणले जाते की औषधांचा योग्य परिणाम होण्यासाठी देखील आपला औषध आणि डॉक्टर यांच्यावर विश्वास असणे गरजेचे असते. आपण ठीक होण्यासाठी विश्वास हा खूप सहयोगी असतो. सुरवातीस यावर विश्वास ठेवणे कठीण असले तरी, तो जमेपर्यंत त्याची खोटी खोटी नक्कल करु शकता.
मात्र, आपणास खूप सर्दी झाल्यामुळे थकून गेला असाल तर ‘आपण यातून बरे होणार’ आहोत, यावर विश्वास ठेऊन जमेल तेवढी विश्रांती घ्या.
#५ तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटलात का
आयुर्वेद, ज्याचा शाब्दिक अर्थ जीवनाचे विज्ञान आहे, हा उपचार करण्याचा एक प्राचीन मार्ग आहे. हे तुम्हाला माहीत आहे का? आयुर्वेद म्हणतो, “जर तुमचे शरीर आजारी असेल, तर निश्चित काही असमतोल असेल”, आणि आयुर्वेदीक उपायांचा उद्देश संतुलन पुनर्संचयित करणे हा आहे.
एक गुणवत्ता असलेला आयुर्वेदिक डॉक्टर, ज्याला नाडी परीक्षक देखील म्हणतात, तुमच्या प्रणालीतील असंतुलनाचे निदान करण्यास तुम्हाला सर्वोत्तम मदत करु शकतो. तो मनगटावर तुमची नाडी तपासतो आणि म्हणून त्याला नाडी परीक्षक असे नाव पडले.
#६ पचायला सोपे असलेले अन्न खा
तुम्ही लहान मुले आजारी पडल्यावर चिडचिडी होतात, जेवत नाहीत हे पाहिले आहे का? विशेष म्हणजे हा शरीराचा आजाराला नैसर्गिक प्रतिसाद आहे. “सामान्य सर्दी झाल्यास, अन्नापासून दूर राहणे ही उपचारांची पहिली पायरी आहे”, डॉ. शिक्षा ठाकूर, आयुर्वेदिक डॉक्टर म्हणतात.
पण तुम्ही जेवण बंद केले नाही पाहिजे. हलका आहार घेणे चांगले. जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हाच तुम्ही जेवावे आणि मिठाई, तळलेले पदार्थ, मैद्याचे पदार्थ, भेंडी, थंड पाणी आणि शीतपेये टाळा (कोणत्या प्रकारचे अन्न खावे याबद्दल अधिक जाणून घ्या). हलक्या पोटामुळे जठराग्नी व्यवस्थित रहातो. योग्य जठराग्नी मजबूत रोगप्रतिकार प्रणालीशी संबंधित आहे आणि यामुळे प्रणालीतील संतुलन पुनर्संचयित करण्यात मदत होते.
अशा वेळी काय खावे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे अन्न याची यादी खाली दिली आहे:
१ – सुकामेवा (बदाम, काजू, पिस्ता, अक्रोड, हेझलनट, खजूर, जर्दाळू, प्रून आणि मनुका मर्यादित प्रमाणात), कारण ते शरीराला उबदार ठेवण्यासाठी आवश्यक जीवनसत्त्वे, नैसर्गिक तेले आणि पोषक तत्त्वे देतात.
२ – मसाले (काळी मिरी, लसूण, कांदा, जिरे, धणे, आले, हिंग आणि मोहरी), कारण ते पचनास मदत करतात आणि ओटीपोटातील वायू काढून टाकण्यास मदत करतात.
३ – भाजीपाला (शेवग्याच्या शेंगा, तोंडली, पालक, राजगिरा, तिखट, हिरवी केळी, मेथीची पाने आणि पुदिन्याची पाने), कारण त्यात आवश्यक तंतुमय असतात आणि पोषण देतात आणि सहज पचतात.
४ – अंकुरित धान्ये यांच्यात तंतुमय आणि प्रथिने जास्त असल्याने; ते पुरेशी ऊर्जा देतात आणि पोट जड न करता भरतात.
५ – एक ग्लास ताज्या कोमट दुधात चिमूटभर हळद आणि काळी मिरी मिसळल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
६ – फळे (पपई आणि सफरचंद); आंबट फळे टाळा.
७ – रक्ताभिसरण वाढविण्यासाठी आणि एंजाइमची क्रिया वाढविण्यासाठी ताजे तयार केलेले गरम अन्न. गोठलेले, डबाबंद किंवा पॅक केलेले अन्न टाळा.
८ – तुळशीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. मध आणि आल्याच्या पानांचे आसव खोकला आणि सर्दीसाठी प्रभावी उपाय आहे. पाने चहाबरोबर उकळल्यावर, सर्दीपासून प्रतिबंधक म्हणून कार्य करतात. ताप आल्यास अर्धा लिटर पाण्यात तुळशीची पाने आणि वेलची पावडर एकत्र उकळवा आणि त्यात गूळ आणि दूध मिसळा जेणेकरून तापमान कमी होईल.
#७ पाण्याला आरोग्यासाधक बनवा!
पाण्याइतकी सहज उपलब्ध असलेली जीवनदायी अशी एखादी गोष्ट तुम्हाला माहीत आहे का? सर्दीने ग्रस्त असताना, ते तुमचे जादूचे पेय असू शकते किंवा कदाचित तुमची जादूची वाफ असू शकते!
सर्दी बरे करण्यासाठी सर्वात प्रभावी नैसर्गिक उपायांपैकी एक म्हणजे कोमट पाण्यात एक चिमूटभर जिरे टाकणे. हे एक औषधी पेय आहे जे खोकला आणि श्लेष्मा असणाऱ्या आपल्या श्वसनमार्गातील अडथळे दूर करते. एक किंवा दोन दिवस, जास्त पाणी आणि कमी अन्न यावर भर द्या आणि स्वतःच फरक बघा!
पाण्याची वाफ म्हणजे जादूची वाफ. डब्यात पाणी घ्या (तुमच्याकडे वाफ घेण्याचे मशीन नसेल तर) आणि त्यात चिमूटभर कापूर किंवा निलगिरी तेलाचे दोन किंवा तीन थेंब घाला. याला उकळी आणा आणि एक किंवा दोन मिनिटे वाफेमध्ये दीर्घ श्वास घ्या आणि दोन मिनिटांनंतर पुन्हा करा. तुम्ही दिवसातून दोनदा पाच ते दहा मिनिटे करू शकता. आपण आपले डोके टॉवेलने झाकून ठेवू शकता; श्वास घेताना ते तुम्हाला उबदार ठेवेल. आणि जादू होऊ द्या!
दररोज किमान २ ते ३ लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. हा आजार दूर ठेवण्याचा सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे.
इतर दिवशी, तुम्ही पुरुष असाल तर किमान ३ लिटर आणि महिला असल्यास २.२ लिटर पाणी प्यावे. आरोग्य समस्या दूर ठेवण्याचा हा एक सुरक्षित आणि सोपा मार्ग आहे.
#८ सामान्य सर्दीवर मात करण्यासाठी वनौषधी
जसे आपल्याकडे सर्दीसाठी विशेष खाद्य प्रकार आहेत, तसेच काही औषधी वनस्पती देखील आहेत. फरक एवढाच आहे की त्या आयुर्वेदिक औषधांच्या रूपात पॅक केलेल्या आहेत जे पॅराबेन-मुक्त आहेत आणि त्यांचे कोणतेही नकारात्मक दुष्परिणाम नाहीत. हरिद्रा खंड, अमृत आणि यष्टी मधु या ही औषधे त्यावरील सूचनांनुसार किंवा तुमच्या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेऊ शकता शकतात.
दररोज एका ग्लास पाण्यात शक्ती ड्रॉप्सचे चार ते पाच थेंब घेणे तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पुरेसे आहे.
अधिक टिप्ससाठी लवकरच येणाऱ्या या लेखाचा पुढचा भाग वाचा
लेखन: रविशा कथुरिया
भारती हरीश, सजह समाधी ध्यान शिक्षक आणि आयुर्वेद तज्ञ डॉ. शिक्षा ठाकूर यांनी दिलेल्या आयुर्वेदिक माहितीवर आधारित.