वजन कमी करणे ही अफाट धैर्य, वचनबद्धता आणि इच्छाशक्तीची कृती आहे. जो कोणी या मार्गावर चालतो तो इच्छित परिणाम प्राप्त करू इच्छितो. यात अनेक खोलवर रुजलेल्या सवयी सोडाव्या लागतात. काहीवेळा, खूप मेहनत करूनही, गोष्टी संथ गतीने किंवा अजिबात बदलताना दिसत नाहीत. व्यायाम शाळेत किंवा जिम मध्ये घालवलेला वेळ,जोरदार व्यायाम,कठोर शिस्त,इच्छाशक्ती यांचे फळ मिळताना दिसत नाही .
यामुळे जर तुम्हाला खूप दिवस निराश वाटत असेल आणि वजन कमी करण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी आणखी काही करता येईल का असा विचार येत असेल तर एक सोपा मार्ग आहे …”ध्यान”.यामुळे वजन कमी करण्याचे उद्दिष्ट लवकर साध्य होऊ शकेल .
वजन कमी करण्याची एक पद्धत अशी आहे की ज्यासाठी प्रयत्नांची गरज आहे.दुसरी पद्धत पूर्णतः याच्या विरुद्ध आहे,म्हणजे सहज क्रिया आहे.या दोन्हींमध्ये संबंध कसा जोडता येईल ?. .अगदी सोपे आहे !
वजन कमी करणे ही जेवढी एक शारीरिक प्रक्रिया आहे तितकीच ती एक मानसिक प्रक्रिया पण आहे. जर तुम्ही तुमच्या मनाला सत्वहीन अन्न (जंक फूड) नाकारण्याचे प्रशिक्षण देऊ शकलात तर , तुम्ही अर्धी लढाई जिंकली आहे. त्याचप्रमाणे, काही मार्ग आहेत जेथे ध्यान तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत मोठी भूमिका बजावू शकते, ते कसे ते आपण बघूया.
ध्यान वजन कमी करण्यास कसे मदत करते
१. ध्यान केल्याने तुमचा (बेसल मेटाबॉलिक रेट, BMR), मूलभूत चयापचयाचा दर सहजतेने कमी होतो.
जेव्हा तुम्ही विश्राम करत असता आणि सहजतेने श्वास घेत असता तेव्हा तुम्हाला किती उष्मांकांची आवश्यकता असते ? तो तुमचा बीएमआर किंवा मूलभूत चयापयांचा दर आहे. बी एम आर जितका कमी तितका चांगला. उष्मांकांचे सेवन जेवढे कमी तेवढे वजन कमी. हे ध्यानाने घडते कारण जेव्हा तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत ध्यान समाविष्ट करता , तेव्हा तुमच्या शरीराचा बी एम आर कमी होतो. याचा अर्थ तुम्हाला कमी उष्मांकांची गरज आहे आणि यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते – नैसर्गिकरित्या.
२. ध्यानामुळे अन्नाचे पचन होण्यास व त्यातील घटक पेशींमध्ये मिसळून जाण्यास मदत होते.
समजा तुम्ही जिममध्ये एक तास घालवला आणि मग तुम्ही भुकेने व्याकुळ होता.. जोरदार व्यायाम केल्यानंतर तुम्ही समोर असेल ते सगळे पोटात भरण्याचा प्रयत्न करता. पण कटू सत्य हे आहे की ही तुमची वाढलेली भूक, ज्या दिवशी तुम्ही व्यायाम करत नाही त्या दिवशी पण तशीच रहते. तेव्हा मग अन्नपचनाच्या समस्या निर्माण होतात. वजन कमी करण्यासाठी तुम्ही ते कसे सुधारू शकता?
येथे ध्यान का महत्वाचे आहे हे समजते. ही वजन कमी करण्यासाठीच्या युक्त्यांपैकी एक सर्वोत्तम युक्ती आहे. ध्यान अन्नपचनास मदत करते. हार्मोन्सचे असंतुलन आणि ताणामुळे गरजेपेक्षा अधिक खाण्याची इच्छा होते यामुळे अपचनचा त्रास होतो. नियमित ध्यान केल्याने तुमच्या तणावग्रस्त नसांना आराम मिळतो आणि तुमचे हार्मोन्स संतुलित होतात. वजन कमी करण्याच्या तुमच्या प्रयत्नांवर याचा दीर्घकालीन परिणाम होतो.
३. ध्यान केल्याने फास्ट फूड खाण्याची इच्छा कमी होते.
कदाचित, वजन कमी करण्यातला सर्वात मोठा अडथळा म्हणजे जंक फूडची लालसा आहे, विशेषत: जर तुम्ही गोड खाणारे असाल किंवा तुम्ही खाण्याचे शौकीन असाल. तुमचे वजन कमी करण्याच्या उद्दिष्टाचा गांभीर्याने पाठपुरावा करताना अशा तृष्णेकडे दुर्लक्ष करण्यासाठी जागरुकता वाढवणे आवश्यक आहे. ध्यान केल्याने तुमची स्वतःविषयीची जागरुकता वाढण्यास मदत होते. जेव्हा तुम्ही जागरुक असता तेव्हा अशा तीव्र प्रलोभनांना नाकारणे सोपे जाते. तुम्ही काय खात आहात याविषयी तुम्ही अधिक जागरुक राहाल. कालांतराने तुमची खाण्याची हाव कमी होईल.
४. ध्यान = कमी ताण
जेव्हा तुम्ही चिप्स किंवा चॉकलेट घेण्यासाठी जाता, तेव्हा तुम्ही कधी स्वतःच्या मनाकडे लक्ष् दिले आहे कां ? त्यावेळेस तुम्ही तणावात असता का? किंवा काही ‘निरुपद्रवी’ पण उत्साहवर्धक करण्याच्या शोधात असता का ? तुम्हाला हे नेहमी जाणवेलच असं नाही, कारण काही वेळेस तणाव हा खोलवर आणि सूक्ष्मरूपात रुजलेला असतो. यामुळे आपण काही वेळेस अति सेवन करतो. त्यामुळे रोजच्या तणावावर मात करायची असेल तर ध्यान करणे आवश्यक आहे. हे वजन कमी करण्यास मदत करते. जेव्हा तुमचे मन शांत असते, तेव्हा तुम्हाला सारखे स्वयंपाकघरात जाऊन काहीतरी खावेसे वाटणार नाही.
५. ध्यान केल्याने वचनबद्धता वाढते
तुमच्या वजन कमी करण्याच्या कार्यक्रमाचा पहिला दिवस आणि 10 वा दिवस कदाचित सर्वात कठीण असतो. आवश्यक आहे त्या गोष्टी करणे परंतु ठरवलेल्या दिनचर्येचे सतत पालन करणे सोपे नाही. हे नियमितपणे पालन करण्यासाठी तुम्हाला वचनबद्धता आणावी लागेल. तुमचं हेतू चांगला असूनही, यात अनेक अडथळे आहेत. उदाहरणार्थ, गरजेपेक्षा अधिक किंवा गरजेपेक्षा कमी झोपणे आणि फास्ट फूड खाणे. हे तुमचा संकल्प कमकुवत करून तुमच्या वजन कमी करण्याच्या कार्यक्रमात अडथळा आणू शकतात. यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुमचा स्वतःवरील विश्वास आणि पुढे चालू ठेवण्याची वचनबद्धता. जेव्हा तुम्ही नियमितपणे ध्यान करता, तेव्हा तुमची इच्छाशक्ती मजबूत होंण्यास मदत होते आणि तुमचा निग्रह दृढ करते. हे तुम्हाला तुमच्या वचनबद्धतेच्या मूल्याबद्दल अधिक जागरूक करते. अशाप्रकारे, वजन कमी करण्याच्या आपल्या दैनंदिन कार्यक्रमात ध्यान जोडणे महत्त्वाचे आहे.
६. वजन कमी करण्याच्या उपक्रमासाठी वेळ मिळण्यास ध्यानाची मदत होते.
तुमच्याकडे व्यायामासाठी वेळ नाही – असे तुम्ही स्वतःला कधी म्हटले आहे कां ? यामुळे वजन कमी करण्याच्या सर्व उत्तम युक्त्या तुमच्या साठी निरुपयोगी झाल्या आहेत का ?
ध्यान तुम्हाला अधिक कार्यक्षम बनवते आणि तुम्हाला उपलब्ध असलेल्या वेळेत भर टाकते. यामुळे तुम्हाला व्यायामासाठी वेळ काढण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही सहज समाधी ध्याना बद्दल अधिक माहिती घेऊ शकता. वजन कमी करण्यासाठी ध्यानाचा सराव करण्यापूर्वी तुम्ही काही योगासने करू शकता. आहार हा प्रत्येक वजन कमी करण्याच्या कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि वजन कमी करण्यासाठीचा आयुर्वेदिक सल्ला आश्चर्यकारक काम करु शकतो.
दिवसाच्या शेवटी, आपण जसे आहात तसे स्वीकारण्यास आणि स्वतःवर प्रेम करण्यास शिका.
नियमितपणे ध्यानाचा सराव केल्याने तुम्हाला तणाव-संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळते, मनाला खोलवर आराम मिळतो आणि शरीरातील अंतर्गत प्रणालींना चैतन्य मिळते. आर्ट ऑफ लिव्हिंगचा सहज समाधी ध्यान हा एक खास तयार केलेला कार्यक्रम आहे जो तुम्हाला तुमच्या अमर्याद क्षमतेचा उपयोग करून घेण्यास मदत करतो.
तुमच्या जवळच्या आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्रात सहज समाधी ध्यान कार्यक्रम शोधू शकता.