भीतीकडे एक नकारात्मक भावना म्हणून पाहिली जाते. परंतु तिच्यामुळे काहीवेळा सकारात्मक परिणाम होऊ शकतात. ही एक आदिकालीन सहजप्रवृत्ती आहे जी जीवनाचे रक्षण करते. भीती ही अन्नातील मीठासारखी असली पाहिजे. ती उपयुक्त आहे, परंतु जास्त भीतीमुळे आपण आपल्याच कवचामध्ये राहू लागू शकतो..
भीती घालवण्याचा प्रयत्न करू नका. ध्यान करा. आपण कोणीही नाही हे जाणून घ्या. किंवा तुम्ही एखाद्या खास व्यक्तीचे आहात असे लक्षात ठेवा.
भीतीच्या विरुद्ध प्रेम आहे आणि ते एकमेकांना पूरक आहेत. भीती म्हणजे प्रेमाने केलेले शीर्षासन होय. भय म्हणजे प्रेमाचे विकृत रूप होय. प्रेमाने ज्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ लावला जाऊ शकतो, त्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ भीतीने देखील लावला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, एखादे मूल त्याच्या आईला चिकटून राहणे हे प्रेमापायी किंवा भीतीपायी असू शकते.
भीती ही भूतकाळाचे संस्करण आहे जे वर्तमानाच्या भविष्यावर प्रतिबिंबित होत असते. जेव्हा लोक भीती नाकारतात तेव्हा ते अहंकारी बनतात. जेव्हा ते भीती ओळखतात आणि स्वीकारतात तेव्हा ते भीतीच्या पलीकडे जातात आणि त्यापासून मुक्त होतात.
संपूर्ण अराजकता किंवा पराकोटीची शिस्तबद्धता यातच केवळ भीतीचा पूर्णपणे अभाव शक्य आहे. साधू किंवा मूर्खाला भीती नसते. पण या दोघांच्या मध्ये सगळीकडे भीती आहे. जगात सूत्रबद्धता टिकवण्यासाठी भीती आवश्यक आहे.
भीती म्हणजे काय?
प्रत्येक बीजाच्या भोवती एक पटल असते. ते कवच त्या बीजाचे संरक्षण करण्यासाठी असते, परंतु जेव्हा तुम्ही बियाणे पाण्यात भिजवता , तेव्हा एका क्षणी ते पटल तुटते आणि त्यातून अंकुर बाहेर येतो. त्याचप्रमाणे, भीती ही जीवनाचे संरक्षण करण्यासाठी जीवनाच्या सभोवताली असलेली एक यंत्रणा आहे; तसेच त्यातून बाहेर पडण्याचा एक मार्ग आहे. भीती तेव्हा येते जेव्हा मूल स्वतंत्र होते आणि मन किंवा बुद्धी परिपक्व झाल्यावर नाहीशी होते. परिपक्व बुद्धीला भीती वाटत नसते.
भीती कोणत्याही गोष्टीबरोबर जोडलेली असू शकते. ती तुमची प्रतिष्ठा आणि जीवन गमावण्याशी निगडीत असू शकते; किंवा आजारपणाची भीती, जोडीदार, मुले किंवा पालक किंवा पैसे गमावण्याची भीती असू शकते – हे सर्व शक्य आहे.
तुम्ही ती भीती अशा वेगवेगळ्या गोष्टींवर प्रक्षेपित करीत आहात, ज्या भीती टांगण्यासाठी केवळ हुक आहेत. तुम्ही भीतीला कसा प्रतिसाद द्याल? ज्ञानाद्वारे भीतीचे स्वरूप जाणून घेऊन हा प्रतिसाद देता येतो. जेव्हा प्रेम असते तेव्हा तेच प्रेम उलटे होऊन भीती बनते. आणि द्वेष देखील परत प्रेमच आहे. अशाप्रकारे प्रेमाचे स्वरूप विकृत होते आणि इतर सर्व भावनांमध्ये रुपांतरीत होते. समर्पण, विश्वास, ध्यान आणि प्रार्थना हे भीतीचे पुन्हा प्रेमात रूपांतर करण्याचे मार्ग आहेत.
जेव्हा तुम्हाला भीतीचा अनुभव येतो, तेव्हा हे जाणून घ्या की तुमच्यात त्या पातळीपर्यंत प्रेम करण्याची क्षमता आहे. जेव्हा तुम्ही प्रेमात पडता किंवा प्रेमात उंची गाठता तेव्हाच फक्त तुमची भीती नाहीशी होईल. भीती ही प्रेमाची निराळी पद्धत आहे.
भीतीचे उपयोग
मृत्यूच्या भीतीने जीवनाचे जतन होते. चुका होण्याच्या भीती योग्य मार्गावर ठेवते. आजारपणाची भीती स्वच्छता आणते. दुःखाचे भय तुम्हाला सदाचारी ठेवते. लहान बालकाला किंचित भीती वाटते म्हणून ते चालताना काळजीपूर्वक आणि सावध असते. गोष्टी पुढे चालत्या ठेवण्यासाठी कणभर भीती आवश्यक आहे.
निसर्गाने सर्व प्राणिमात्रांमध्ये अंगभूत भीतीची रचना केली आहे. या भीतीमुळे जीवन स्वतःचे रक्षण करते, स्वतःचे संरक्षण करते. अन्नातील मीठाप्रमाणेच लोक सदाचरणी होण्यासाठी थोडी भीतीही आवश्यक आहे. एखाद्याला दुखावण्याची भीती तुम्हाला अधिक जाणीवपूर्वक बनवते. अपयशाची भीती तुम्हाला अधिक कुशाग्र आणि सर्जनशील बनवते. भीती तुम्हाला निष्काळजीपणाकडून काळजी घेण्याकडे प्रवृत्त करते. भीती तुम्हाला असंवेदनशील होण्यापासून संवेदनशील होण्याकडे प्रेरित करते. भीती तुम्हाला निस्तेजतेकडून सतर्कतेकडे प्रवृत्त करते.
निसर्गाने सर्व प्राणिमात्रांमध्ये अंगभूत भीतीची रचना केलेली आहे. या भीतीमुळे जीवन स्वतःचा बचाव करते, स्वतःची जपणूक करते.
-गुरुदेव श्री श्री रवि शंकर
भीतीचा संपूर्ण अभाव विनाशकारी प्रवृत्तींना कारणीभूत ठरू शकतो – विकृत अहंकाराला भीती माहित नसते. विस्तारित चैतन्याला देखील ती माहित नसते! अहंकार भीतीला डच्चू देऊन विघटनकारी मार्गाने वावरतो, उलटपक्षी ज्ञानी माणूस भय मान्य करतो आणि परमात्म्याचा आश्रय घेतो.
जेव्हा तुम्ही प्रेमात असता, जेव्हा तुम्ही शरण जाता तेव्हा कोणतीही भीती नसते. अहंकारालाही भीती नसते. परंतु या दोन प्रकारच्या निर्भय अवस्थांमध्ये स्वर्ग आणि पृथ्वीसारखा फरक आहे. भीती तुम्हाला सन्मार्गी बनवते; भीती तुम्हाला समर्पणाच्या जवळ आणते; भीती तुम्हाला मार्गावर ठेवते; ते तुम्हाला विध्वंसक होण्यापासून वाचवते. भीतीमुळे पृथ्वीवर शांतता आणि कायदा राखला जातो. नवजात बालकाला भीती माहित नसते – ते बालक पूर्णपणे त्याच्या आईवर अवलंबून असते. जेव्हा लहान बालक, मांजरीचे पिल्लू किंवा पक्षी स्वतंत्र होऊ लागतात तेव्हा त्यांना भीतीचा अनुभव येऊ लागतो, ज्यामुळे ते त्यांच्या आईकडे परत धावून जातात. हे जीवन टिकवण्यासाठी निसर्गाने आपल्यात अंगभूत रचना केलेली आहे. अशा रीतीने, भीतीचा उद्देश तुम्हाला परत स्त्रोताकडे आणणे हा आहे!
दहा प्रकारच्या भीती ज्या आपला नाश करतात
- अस्वीकाराची भीती
- दायित्वाची भीती
- जबाबदारीची भीती
- अनामिकाची भीती
- अपयशाची भीती
- लोकांनी सोडून जाण्याची भीती
- वास्तवाला सामोरे जाण्याची भीती
- विभक्त होण्याची भीती
- इतरांची मते आणि अपमान होण्याची भीती
- पुरेसे उपलब्ध नसण्याची भीती
सेवा आणि एकत्वाचा उतारा
भीतीवरचा इलाज म्हणजे प्रेम आणि सेवा. काही सेवेत स्वतःला व्यस्त ठेवले तर कशाचाही विचार करायला वेळ उरतो कुठे आहे? तीच ऊर्जा आहे जी भीती, द्वेष किंवा प्रेम म्हणून प्रकट होते. जर तुमची उर्जा प्रेमाकडे मार्गीकृत केली तर ती भीती किंवा द्वेष म्हणून प्रकट होणार नाही. म्हणून, व्यस्त राहिल्याने, काही निस्वार्थ सेवा करण्यात सक्रिय राहिल्याने मदत होऊ शकते.
वियोगामुळे भीती निर्माण होते. तादात्म्यता असेल तर भीती उरत नाही.
– गुरुदेव श्री श्री रवी शंकर
जेव्हा आपण अनंताशी जोडलेलो आहोत हे माहित नसते तेव्हा भीती निर्माण होते. ‘मी अनंताचा अंश आहे’ हे विसरल्यावर भीती निर्माण होते
तुमचे अस्तित्व चिरंतन आहे कारण तुम्ही समुद्राशी जोडलेले आहात. थेंब घाबरतो कारण त्याला वाटते की तो एकटा आहे, तो समुद्राशी जोडलेला नाही. पण जेव्हा थेंब सागरात मिळालेला असतो तेव्हा थेंबाला भीती नसते. तो कधीच विझणार नाही कारण तो महासागरात आहे
वियोगामुळे भीती निर्माण होते. तादात्म्यता असेल तर भीती उरत नाही. मग भीती कशी दूर करायची? तर अद्वैताचे स्मरण करून.