शिक्षक आणि पालक यांना अभिमान वाटेल इतके चांगले गुण मिळवण्यासाठी काही सूचना:
एकाग्रता व स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ध्यान करणे हे उत्तम साधन आहे.
इतिहासाचा तास चालू आहे, तुम्ही पुस्तक उघडे ठेवून त्याच्या कडे फक्त पाहत बसलेले आहात. शिक्षक तुम्हाला न समजणाऱ्या भाषेत काहीतरी बोलत आहेत, तुम्ही वर्गात आहात पण तुमचे मन कुठे तरी भटकते आहे.
दैनंदिन जीवनात शाळेत दिसणारे हे सर्वसामान्य दृश्य आहे. एखादी रहस्य कथा किंवा कॉमिक्स वाचताना मनाला प्रयत्नपूर्वक एकाग्र करावे लागत नाही ते सहजपणे होते, पण तेच जर एखाद्या आवडत नसलेल्या विषयाचे पुस्तक असेल तर? आपला आवडता टीव्ही प्रोग्राम आपण तासंतास बघू शकतो, पण एखादे तांत्रिक पुस्तक असेल तर ते वाचायला किती कंटाळा येतो?
मुलांमध्ये एकाग्रतेचा अभाव ही शिक्षक व पालक यांची मुख्य तक्रार असते व आपला मुख्य अडसरही. आणि जेव्हा मन एकाग्र होण्याची सगळ्यात जास्त गरज असते तेव्हाच तसं होत नाही, उदारणार्थ रात्री जागून अभ्यास करायचा असेल तेव्हा ह्या सागळ्यांवर रामबाण उपाय म्हणजे ध्यान करणे.
अनेक संशोधनांद्वारे असे सिद्ध झाले आहे की, नियमित ध्यान केल्याने एकाग्रता वाढते, विषय कंटाळवाणा असेल तरीही. उदारणार्थ पेनसिल्वेनिया विद्यापीठाच्या एका सर्वेक्षणानुसार, दररोज अगदी काही मिनिटे ध्यान केले तरी एकाग्रता व कार्यक्षमता वाढते.
अतिशय सतर्कता राखण्याची गरज असते तेव्हा ध्यान करणे कसे उपयोगी ठरु शकते हे खाली नमूद केले आहे:
खाली दिलेल्या काही पद्धती आम्ही सुचवू इच्छितो.
#१ तुम्ही विषयांबद्दल आवड निर्माण करा, चांगले गुण आपणहून मिळतील:
हे एक गुपित आहे, जेव्हा तुम्ही विषयाबद्दल आवड निर्माण करता, तेव्हा आपोआपच लक्ष लागते. समजा रसायनशास्त्र तुम्हाला आवडत नसेल, तर त्या विषयाच्या पुस्तकाला उद्देशून म्हणा "मला तू खूप आवडतोस / माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे." लगेच फरक पहा. क्रिकेट सामना किंवा आवडता चित्रपट पहाताना एकाग्र व्हावं लागते का? ते आपणहून होते नाही का? अगदी असेच पुस्तकांच्या बाबतीतही आहे, त्यांच्या बद्दल आवड निर्माण झाली की आपोआप लक्ष लागेल. निष्कर्ष: चांगले गुण.
#२ रोज योगासने करा, त्याने निरसता दूर होईल:
सूर्यनमस्कार व सर्वांगासन केल्याने मेंदूला व्यवस्थित रक्त पुरवठा होतो. परिणामी सतर्कतेत / सजगतेत वाढ होते व मनाचे भरकटणे कमी होते, चांगली प्रगती होते.
#3 मौज-मजा करण्यासाठी अधिक वेळ हवा आहे का? प्राणायाम करा
फक्त अडीच मिनिटे प्राणायाम केल्याने तीन तास एकाग्रता टिकून राहू शकते ह्या वर विश्वास बसेल का? होय हे खरे आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग शिबिरांत शिकविला जाणारा "एकाग्रता प्राणायाम” (concentration pranayama) केल्याने हे साध्य होते. हा प्राणायाम केल्याने स्मरणशक्ती वाढते, जे काही ग्रहण केलेले आहे ते टिकवून ठेवण्याची शक्ती वाढते. असे झाल्याने तुमचा अभ्यास लवकर संपवून मित्रांबरोबर खेळण्यासाठी जास्त वेळ मिळेल. मस्त नाही का? हे सर्व शिकण्यासाठी YES + कोर्स साठी नाव नोंदवा.
#4 सुदर्शन क्रियेला जर तुम्ही रोजच्या गृहपाठाचा भाग बनवले, तर तुमचा इतर गृहपाठ करायलाही मजा येईल.
वेळेचे उत्तम नियोजन, उत्तम गुण, एकाग्रता, भविष्यासाठी योग्य निर्णय घेण्याची क्षमता, इतरांबरोबरचे / आपापसातले संबंध, बरोबरीच्या व्यक्तींकडून येणारा दबाव, रागावर नियंत्रण आणि अशा अनेक सकारात्मक गोष्टी सुदर्शन क्रिया केल्याने होतात. श्री श्री रविशंकर यांनी विकसित केलेली ही एक अद्वितीय / अदभुत श्वसन क्रिया आहे ज्याने मनातील विचार / चंचलता कमी होते व जेव्हा सगळ्यात जास्त गरज असते तेव्हा मन केंद्रित ठेवण्यात मदत होते.
#५ मनाची चंचलता टाळण्यासाठी स्वास्थ्यकारक / स्वास्थ्यवर्धक अन्न घ्या:
मन एकाग्र / केंद्रित ठेवण्यामध्ये पौष्टिक आहार महत्वाची भूमिका बजावतो. मिठाई, आईस्क्रीम व चॉकलेट्स सारखे पदार्थ खाल्ल्याने मन अस्थिर / चंचल राहते. मग सहाजिकच मन अभ्यासात कसे लागणार, नाही का? म्हणूनच तुम्ही काय खाता त्याबद्दल जागरूक रहा. खूप तेलकट, मसालेदार व जास्त प्रमाणात गोड पदार्थ टाळा. अशा पदार्थांचे सेवन जास्त प्रमाणात केल्याने सुस्ती येते, खासकरून दुपारच्या वेळेस जेव्हा गृहपाठ करण्याची वेळ असते.
कृपया नोंद घ्या: एकाग्रता वाढवण्यासाठी आयुर्वेदिक औषधांचा उपयोग होऊ शकतो. उदाहरणार्थ: देववटी व ब्राह्मी. आयुर्वेदिक व पूरक आहारबद्दल अधिक माहितीसाठी श्री श्री आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
#6 पूर्ण झोप घ्या, मग इतिहासाचा तास चालू असताना डुलक्या लागणार नाहीत.
पूर्ण विश्रांती झालेली नसेल तर चिडचिडेपणा वाढतो व विषयात मन लागत नाही. आठ तास मस्त झोप घ्या आणि रोज सकाळी किंवा दुपारच्या जेवणाआधी कमीतकमी २० मिनिटे ध्यान करा. ह्यामुळे शरीर व मनाला गहन विश्रांती मिळते. मग जेवणानंतरच्या तासात डुलक्या लागणार नाहीत आणि एकाग्रता देखील वाढेल.
तुम्ही कुठेही ध्यान करू शकता. शाळेत, कॉलेजच्या आवारात, घरी किंवा मित्रांसोबत बागेतसुद्धा. खरं तर मित्रांसोबत ध्यान केलेत तर आपापसांतले संबंध आपोआप सुधारतील. परीक्षेला जाण्याआधी भीती वाटत असेल तर काही वेळ ध्यान करा, त्याने मन केंद्रित होईल व स्पष्टपणे विचार करता येईल.
काही युवक जे रोज ध्यान करतात त्यांचे म्हणणे ऐका:
ध्यान आपसुकच होऊ लागते. मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करू नये.
ध्यान होण्यासाठी प्रयत्नपूर्वक मन एकाग्र करावे असा एक गैरसमज आहे. उलट ध्यान म्हणजे मनाला स्वातंत्र्य देणे. एकाग्रता हा नियमित ध्यान केल्याचे फळ असू शकते. दररोज काही मिनिटे जरी ध्यान केले तर तुमचे चंचल मन जे सतत भटकत असते (खासकरून तुमच्या नावडत्या विषयाचा तास चालू असेल तेव्हा) ते शांत होऊ लागेल. हाती घेतलेल्या कामवर टिकून मन राहील.
भानू नरसिम्ह्न, सहज समाधी प्रशिक्षक म्हणतात, "ध्यान केल्याने wandering mind (”भारकटणारं मन”) wondering mind “अचंबित मन ” मध्ये परिवर्तीत होते."
श्री रविशंकर प्रेरित / यांच्या प्रेरणेने.
प्रीतीका नायर.
भारती हरीश ह्या सहज समाधी प्रशिक्षक व श्रेया चुघ राष्ट्रीय निदेशक (आर्ट ऑफ लिव्हिंगच्या युथ एमपॉवरमेंट प्रोग्रॅमच्या राष्ट्रीय निदेशक) यांनी दिलेल्या माहितीवर आधारित.
निरुत्साही किंवा अस्वस्थ वाटते आहे का? वैयक्तिक आणि व्यावसायिक भावना जीवनावर हावी झाल्या आहेत का? ध्यान केल्याने दैनंदिन जीवनावर सकारात्मक बदल कसा घडू शकतो हे जाणून घेण्यासाठी खालील फॉर्म भरा.