क्रोध नियंत्रणात ठेवण्याबाबत सुचना (How to control anger in Marathi)

‘रागावणे चांगले नाही’, अशी आठवण स्वत:ला कितीही वेळा करू दिली, तरी, जेंव्हा ‘राग’ येतो तेंव्हा आपण त्याच्यावर नियंत्रण ठेऊ शकत नाही, हे तुमच्या लक्षात आले आहे नां?  लहानपणापासून आपण ऐकत आलो आहोत की, ‘राग करू नये’ परंतु प्रश्न हा आहे की, हे कसे शक्य आहे? रागवायचे कसे नाही?’ क्रोधरुपी भावनेचा झंझावात जेंव्हा येतो, तेंव्हा तुम्ही काय करता ?

ठीक आहे, आपण रागाचे मुळ कारण आणि त्याच्यावर नियंत्रण कसे ठेऊ शकतो, हेच जाणून घेऊ या.

क्रोधाला जाणून घेऊ या.

जेंव्हा तुमच्या आजूबाजूला काही दोष, उणीवा पहाता, तुम्ही त्या स्वीकारू शकत नाही, हे तुमच्या ध्यानात आले आहे नां? उदा. जेंव्हा कोणीतरी काहीतरी चुकीचे करते, एखाद्या लाटेप्रमाणे तुमच्यामध्ये रागाची भरती येते आणि निघून जाते आणि अनेकदा ती लाट खेद व पश्चात्ताप मागे ठेऊन जाते, होय नां?

जेंव्हा तुम्हाला राग येतो, तेंव्हा तुम्ही सजग नसता. रागामुळे ते दोष, त्या उणीवा दूर हूऊ शकत नाही, हे प्रथम जाणून घ्या. ती परिस्थिती सजगतेने आहे तशी स्वीकारल्याने आपण ते दोष, त्या उणीवा दूर करू शकतो. तुमच्या मनात सहाजिकच आले कां की, ‘सांगणे खूप सोपे आहे, परंतु हे कृतीत कसे आणायचे?’  हे प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी आवश्यक असलेली मनाची स्थिती कशी प्राप्त होईल? आपल्या मनाला, भावनांना प्रत्यक्षपणे हाताळणे सोपे नाही. म्हणून आपल्याला काही साधनांची मदत घेणे गरजेचे आहे.

क्रोध नियंत्रणाचे तीन पैलू आहेत :

  • शरीर आणि मनातील अस्वस्थता हाताळणे
  • पूर्वीच्या क्रोधाचा मनावरील भक्कम पगडा
  • सजगतेचा अभाव आणि दोष, उणीवा आणि चुका यांचा अस्वीकार.

एकेक पैलू जाणून घेऊ या.

शरीर आणि मनातील अस्वस्थता हाताळणे

 
तुम्ही जे खाता ते तुम्ही बनता
 

तुमच्या हे लक्षात येते कां बघा, काही काही दिवस खूप अस्वस्थ वाटत असते, कारण तुमचा आहार तुमच्या मनावर आणि भावनांवर मोठा परिणाम करतो. ठराविक प्रकारचा आहार तुमच्या मनामध्ये आणि शरीरामध्ये अस्वस्थता निर्माण करतो. अश्या प्रकारचा आहार टाळल्याने तुम्हाला रागावर नियंत्रण प्राप्त करण्यास मदत होईल. उदा. मांसाहार, मसालेदार आणि तेलकट आहार.

 

 
 ‘विश्रांती’चे सामर्थ्य जाणा !

आदल्या रात्री तुमचे जागरण झाले असेल तर तुम्हाला कसे वाटत असते ? त्यावेळी तुमची जास्तच चिडचिड होते नां ? शरीरातील थकवा आणि अस्वस्थता मनामध्ये चिडचिड आणि क्षोभ निर्माण करतात. दररोज ६ ते ८ तासांची झोप घेणे गरजेची आहे. यामुळे शरीर आणि मनाला व्यवस्थित विश्रांती मिळते ज्यामुळे क्षोभ निर्माण होणे कमी होते.

 

 
‘योगासन’ करणे उत्तम

दहा ते पंधरा मिनिटे योगासने केल्याने शरीरातील अस्वस्थता निघून जाण्यास मदत होते. सूर्य नमस्काराच्या काही फेऱ्यानी सुरवात करणे चांगले. इतर व्यायाम प्रकारांपेक्षा योगासनांमुळे शरीर आणि श्वासामध्ये समन्वय प्राप्त होतो. योगासनांमुळे शरीराला दिलेल्या ताण-दाब-पिळामुळे ऊर्जेची पातळी वाढते.

प्रियम खन्ना म्हणतात, “ज्या दिवसामध्ये मी तणावग्रस्त असते तेंव्हा मला शरीरामध्ये खूप ताठरता जाणवते, ज्यांच्यामुळे मी खूपच अस्वस्थ आणि क्षुब्ध राहून राग येण्याचे प्रमाण वाढते. योगामुळे हि ताठरता निघून जाते आणि परिणामतः शांत, निवांत मन प्राप्त होते.

 
मनाला ‘खास मित्र’ बनवा

भस्त्रिका आणि नाडी शोधन सारख्या प्राणायामांमुळे मनातील अस्वस्थता कमी होण्यास मदत होते. जेंव्हा मन शांत – स्थिर असते तेंव्हा क्षुब्ध होण्याचे, राग येण्याचे प्रमाण कमी होते.

 

क्रोधावर कायमचा ‘उतारा’

रागापासून मुक्तीसाठी काही दीर्घ श्वासन केल्याने त्वरित मदत होईल. ज्या क्षणी तुम्ही रागवाल, डोळे बंद करून काही दीर्घ श्वास घेऊन मानसिक स्थिती मधील बदल अनुभवा. दीर्घ श्वासामुळे तणाव निघून जाईल आणि मन पूर्व स्थितीत शांत होण्यास मदत मिळेल.

वीस मिनिटांचा ‘स्व’ मधील प्रवास

सातत्याने योगसाधना, प्राणायाम आणि आहाराबाबातीत दक्षता अस्वस्थता दूर करण्यास सहाय्य करेल, परंतु शांत आणि समतोल मनस्थिती कशी टिकवावी ? सातत्याने ‘ध्यान करणे’ हे गुपित आहे. निव्वळ वीस मिनिटांचे ध्यान पूर्ण दिवसभरासाठी पुरेसे आहे.

 
 

हम्म’ प्रक्रिया जाणता नां ?

सुरभी शर्मा म्हणतात, “ ध्यान मला शांत ठेवते आणि क्रोधापासून दूर ठेवते.”

एक दोन मिनिटांसाठी ‘हम्म’ प्रक्रिया करून मन त्वरित आणखी शांत करणे, हा आणखी एक त्वरित उतारा आहे क्रोधावर. हम्म प्रक्रिया कशी करावी, व्हिडीओ पहा.

 

श्री श्री रविशंकरजी यांच्या ज्ञान चर्चेने प्रेरित.

सहज समाधी ध्यान प्रशिक्षक भारती हरीश यांच्या मार्गदर्शनाने,  लेखिका दिव्या सचदेव