चैत्र नवरात्री उत्सव २०२५

३० मार्च ते ७ एप्रिल

ध्यान कार्यक्रम संकल्प

चैत्र नवरात्री उत्सव २०२५ मध्ये आपले स्वागत आहे.

आर्ट ऑफ लिव्हिंग बेंगलोर आंतरराष्ट्रीय केंद्र येथे चैत्र नवरात्री उत्सवात योगासन, यज्ञ, ध्यान, प्रार्थना,संकल्प, सेवा, सत्संग, सांस्कृतिक कार्यक्रम याद्वारे आपले भौतिक अस्तित्व, सूक्ष्म अस्तिव व चेतना पुनःरुत्तेजित होते. जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक आणि भक्त येथे येतात व आपल्यातील उच्च मानवी गुण वाढवण्यासाठी येथे भाग घेतात. या दिवसांत आश्रमात शांती, प्रेम, आनंद आणि उत्साह याचे दिव्य स्वरूप बघायला मिळते. गुरुदेव श्री श्री रवि शंकर यांच्या समवेत होणाऱ्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी आम्ही आपले स्वागत करतो.

नवरात्रीचे महत्व

"रात्री” या शब्दाचा अर्थ आहे सखोल विश्राम किंवा तीन तप, तीन प्रकारच्या अग्नी किंवा चिंता - शारीरिक, सूक्ष्म आणि चेतनावरच्या यांपासून सुटका.

“हा वेळ प्रार्थनेचा आणि पुनःरुत्तेजित होण्याचा आहे. लहान बाळ जन्माला येण्याच्या अगोदर नऊ महिने आईच्या पोटात असते. तसेच हे नऊ दिवस आईच्या पोटातून परत बाहेर आल्यासारखे आणि परत जन्म घेतल्यासारखे असतात."
 

गुरुदेव श्री श्री रविशंकर

कार्यक्रम सारणी

 

दिनांक

कार्यक्रम

शुक्रवार, ४ एप्रिल

सकाळी ७ वाजता - महा गणपति होमा, नवग्रह होमा और महा लक्ष्मी होमा

संध्याकाळी ४ वाजता - श्री लक्ष्मी अष्टोत्तर शतनाम अर्चना

संध्याकाळी ५ वाजता - ललिता सहस्रनाम परायण

संध्याकाळी ६.३० वाजता - दुर्गा सप्तशती पारायण

शनिवारी, ५ एप्रिल

सकाळी ६.३० वाजता - नव चंडी होम

संध्याकाळी ४ वाजता - श्री लक्ष्मी अष्टोत्तर शतनाम अर्चना

संध्याकाळी ५ वाजता - ललिता सहस्रनाम परायण

रविवार, ६ एप्रिल

सकाळी ८ वाजता - राम तारक होम

संध्याकाळी ४ वाजता - विष्णु अष्टोत्तर शतनाम अर्चना

संध्याकाळी ५ वाजता - विष्णु सहस्रनाम परायण

टिप: कार्यक्रम पत्रिका वेळेच्या गरजेनुसार बदलू शकते.

बेंगलोर आश्रमात घेतल्या जाणाऱ्या ध्यानाच्या विविध कार्यशाळा

मला नवरात्री उत्सवात सहभागी व्हायचे आहे पण ...