नवरात्रीचा भव्य उत्सव हा रंगांनी छाप पाडण्यासाठी आणि आनंदासाठी प्रसिद्ध आहे. त्यामध्ये मौन व्रत धरले जाते, स्तोत्र पठण, उपास, प्रार्थना केली जाते. खूप लोक या उत्सवास ध्यानस्थ होण्यासाठी योग्य वेळ असे समजतात.

अस्तित्वाचे तीन स्तर आहेत – बाह्य जगत, सूक्ष्म जगत ज्यात वेगवेगळ्या ऊर्जा आहेत आणि दैव जगत.  सर्व यज्ञ हे अध्यात्मिक आणि भौतिक प्रगतीसाठी केले जातात. जेव्हा आपण सखोल ध्यानात आपल्या अंतरंगात जातो, जिथून सर्व काही निर्माण झाले आहे, तेव्हा आपल्याला चिरशांतीचा अनुभव मिळतो. आपण जेव्हा सखोल ध्यानात जातो तेव्हाच आपल्यावर मंत्राचा परिणाम होतो. हे परिणाम खूपच सुंदर, शक्तिशाली आणि अलौकिक असतात. आपण खूप भाग्यशाली आहोत की आपण याचा एक भाग बनण्यास सक्षम आहोत.

– गुरुदेव श्री श्री रवि शंकर

ध्यान आपल्याला संपूर्ण आराम देते आणि शरीर व मनाला पुनरुत्तेजित करते.ध्यानाचे क्षण हे आपल्या आत्म्याला विश्रांतीचे क्षण असतात. याच क्षणी आपल्याला मनापासून सुटका मिळून आपण चिरशांती अनुभवतो. 

योगी लोकांनी वर्षानुवर्षे ध्यानाचा सराव चालू ठेवला. आजच्या शास्त्रज्ञानी ध्यान करण्याचे फायदे शास्त्रीय दृष्टया सिद्ध केले आहेत. आपण नवरात्री मध्ये ध्यान कां  करावे याची खालील चार कारणे आहेत.

१. आपल्या शरीर व मनाचा निसर्गाबरोबर ताळमेळ रहातो.

आपल्याला संतुलित ठेवण्यात निसर्गाचा खूप मोठा हातभार आहे. निसर्ग हा ऊर्जेचा अमर्यादित स्रोत आहे आणि ध्यान केल्याने आपला निसर्गाशी त्वरित संबंध जुळतो आणि आपण सखोल शांती अनुभव करतो. असे म्हणतात उन्हाळ्याच्या सुरवातीला जेव्हा सूर्य विषुवृत्त्ताच्या सर्वात उत्तरेला असतो आणि थंडीच्या दिवसांत सूर्य विषुवृत्त्ताच्या  सर्वात दक्षिणेत लांब असतो, पण नवरात्री च्या दिवसांत सूर्य बरोबर मध्यभागी असतो, त्यामुळे दिवस व रात्र समान असतात, हा ध्यान करण्यासाठी योग्य काळ असतो.

२. स्वतःबद्दलच्या जबाबदाऱ्यांची पुनरनिर्मिती होते.

ध्यान आपल्याला स्वतःला जाणण्याची आणि स्वतःबरोबर वेळ घालवण्याची संधी देते. कधीकधी आपल्याला वाटते की रोजच्या धावपळीच्या जीवनामुळे आपले ध्यान नियमित दररोज होत नाहिये पण घाबरू नका.

नवरात्री ही अशी वेळ आहे जेव्हा आपण परत नव्याने ध्यानाला सुरवात  करू शकतो. विशेषतः  दसरा हा दिवस नवीन काही सुरु करण्यासाठी खूप चांगला मुहूर्त आहे. त्यामुळे जरी तुम्ही ध्यान कसे करायचे हे विसरला असाल तरी नवरात्री मध्ये पुन्हा नव्याने चालू करू शकता.

३. नवरात्री मध्ये सामूहिक ध्यान करुन अनेक फायदे मिळतात.

असे मानतात की सामूहिक ध्यान केल्याने तो एक यज्ञ होतो आणि त्याचे अनेक फायदे मिळतात आणि खूप लवकर मिळतात. जेव्हा नवरात्रीत सर्व जण मिळून एकत्र ध्यान करतात, सामूहिक चेतनेच्या ऊर्जेने आपली अध्यात्मिक प्रगती अधिक वेगाने होते.

४. नवरात्रीचे महत्व

जेव्हा आपण आंघोळ करतो तेव्हा ओले होण्यासाठी आपल्याला काहीतरी करावे लागते पण जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आपण आपोआप ओले होतो. तसेच वर्षभर ध्यान करताना आपल्याला थोडे कष्ट घ्यावे लागतात पण नवरात्री च्या दिवसांत ध्यान करणे नैसर्गिकपणे सोपे आणि सहज होते. जर आपण नवरात्रीच्या नऊ दिवसांत ध्यान केले तर त्याचा परिणाम खूप वेळ रहातो. हे एक लस घेण्यासारखे आहे, एकदा घेतली की त्याचा परिणाम खूप काळ टिकतो. नवरात्री यज्ञातील मंत्राचा आपल्याला सहजपणे ध्यानस्थ होण्यासाठी खूप मदत होते. त्याने आपण पुनःरुत्तेजित होतो आणि ही ऊर्जा आपल्याला पुढील काही महिन्यांसाठी उपयुक्त ठरते.

त्वरित टीप
या दिवसांत कोणत्या पद्धतीचे ध्यान करण्यास सुचविले जाते?
तुम्ही देवी कवचम आणि लक्ष्मी अष्टत्तर या स्तोत्रा वर दिवसातून एकदा नवरात्रीच्या सगळया नऊ दिवसांमध्ये ध्यान करू शकता.

सीमा ठाणेदार, वरिष्ठ प्रशिक्षक, आर्ट ऑफ लिव्हिंग यांनी  संकलित केलेल्या माहितीच्या आधारावर