जाणकार सांगतात की, जेव्हा जेव्हा दानवांनी या पृथ्वीवर हाहाकार माजवला होता, तेव्हा तेव्हा देवीने या दानवांशी युद्ध करुन त्यांना पराभूत केले. त्यावेळी जेव्हा सर्व देवांनी शक्तीला पृथ्वीवर येण्याची प्रार्थना केली तेव्हा देवी दुर्गा प्रकटली आणि सृष्टीच्या कल्याणासाठी लढली.

जशी ती लढली, तिच्या गोष्टींनी भक्तांमध्ये एक स्फूरण आणि दरारा निर्माण झाला आणि त्यांची देवीवरील भक्ती अधिक सखोल झाली.

या गोष्टींना उत्तर भारतात दुर्गा सप्तशती, दक्षिण भारतात देवी महात्म्य आणि बंगाल मध्ये चंडी अशी नावे पडली. वेद व्यास (ज्यांनी महाभारत लिहिले) यांनी मार्कंडेय पुराणातून संकलन करून दुर्गा सप्तशती लिहिली आहे. त्यामध्ये 13 अध्याय आहेत आणि 700 श्लोक आहेत जे देवीची गौरवशाली कथा सांगतात.

देवीने राक्षसांचा वध करण्यासाठी अनेक अवतार घेतले. काही राक्षसांना देवी विष्णू माया या तामसिक अवतार घेऊन मारले, तर काही राक्षसांना देवी लक्ष्मी या राजसिक अवतार घेऊन, तर काहींना देवी सरस्वती या सात्त्विक अवतार घेऊन मारले.

दुर्गा सप्तशती पठण करण्याची प्रक्रिया

दुर्गा सप्तशती पारंपारिकपणे दोन प्रकारे पाठ केली जाते.

1. त्र्यंगम

त्र्यंगम पद्धतीमध्ये पहिले देवी कवचम, अरगला स्तोत्र, देवी किलकम, नवाक्षरी स्तोत्र आणि त्यानंतर दुर्गा सप्तशतीचे 13 अध्याय म्हटले जातात.

2. नवंगम

नवंगम पद्धतीमध्ये मूळ स्तोत्र म्हणायच्या आधी नऊ प्रार्थना म्हणाल्या जातात.

  • देवी नस्य
  • देवी आवाहन
  • देवी नमामी
  • अरगली स्तोत्र
  • किलक स्तोत्र
  • देवी हृदय
  • धाला
  • देवी ध्यान
  • देवी कवच

वरील प्रार्थना म्हणल्यावर दुर्गा सप्तशतीचे अध्याय वाचले जातात.

नवरात्री मध्ये दुर्गा सप्तशतीचे अध्याय नऊ दिवसात विभागून म्हणले जातात.

पहिला दिवस – अध्याय १ – मधू कैठब संहार
दुसरा दिवस – अध्याय २,३,४ – महिशासूर संहार
तिसरा दिवस – अध्याय ५,६ – धूम्रलोचन वध
चौथा दिवस – अध्याय ७ – चंद मुंद वध
पाचवा दिवस – अध्याय ८ – रक्तबीज संहार
सहावा दिवस – अध्याय ९, १० – शुम्भ निशूम्भ वध
सातवा दिवस – अध्याय ११ – नारायणी स्तुती
आठवा दिवस – अध्याय १२ – फल श्रुती ( पठणाचे फायदे )
नववा दिवस – राजा सुरथ आणि वैश्य ( वाणी ) यांना देवीचा आशीर्वाद

देवी अपराध क्षमा स्तोत्र हे दहाव्या दिवशी म्हणजेच विजयादशमी / दसरा या दिवशी म्हणले जाते.

हे सर्व दुर्गा सप्तशतीचे अध्याय आणि देवीचा वैभवशाली इतिहास चंडी होमच्या वेळी म्हणजेच आठव्या दिवशी अष्टमीला म्हणले जाते.

दुर्गा सप्तशती पठणाचे फायदे

दुर्गा सप्तशती चा १२ वा अध्याय आहे फलश्रुती ज्यात देवी स्वतः सर्व देवतांना या पवित्र श्लोकांचे पठण करण्याचे फायदे सांगते.

  1. जिथे दुर्गा सप्तशती चे पठण होते तिथे देवी स्वतः वास्तव्य करते.
  2. सर्व विघ्न दूर होतात.
  3. पुढे येणाऱ्या दुर्घटनान्ना प्रतिबंध मिळतो.
  4. दारिद्र्य नष्ट होते
  5. शत्रू, आग आणि पुरापासून संरक्षण मिळते.
  6. ग्रहांच्या वाईट फळापासून रक्षण होते.
  7. दुष्ट आत्म्यांपासून संरक्षण मिळते.
  8. संपत्ती, अन्न धान्य, पुत्र पौत्र यांत समृद्धी येते.

देवीच्या गोष्टी ह्या “वाईट गोष्टींवर चांगल्या गोष्टींचा विजय होत असतो” याचा पुरावा देते. या अंतिम सत्याचे स्मरण रहावे यासाठी लोक नवरात्रीच्या दिवसांत दुर्गा सप्तशतीचा पाठ आपल्या घरी करतात. देवीच्या वैभवशाली गोष्टी ऐकल्यावर भक्तांना तिच्या सर्व शक्तिमान असण्याची प्रचिती येते.