नवरात्रीत उपवास का करायला हवा?
उपवास: विश्रांती आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचा उपाय
नवरात्रीत उपवास करीत सखोल ध्यानात डुंबून जा
नवरात्रीत उपवास का करावा? | Navratri Upvas Kaa Karava?
नवरात्री मध्ये रंग, परंपरा, संगीत आणि नृत्य ह्यांची रेलचेल असतेच, सोबतच ही वेळ आपली विश्रांतीची, आपल्या अंतरंगात वळण्याची आणि आपल्या आत नवी उर्जा भरून घेण्याची आहे. नवरात्रीच्या काळात उपवास केल्यास आपल्या आतील परमानंद आणि प्रसन्नतेकडे नेणारा प्रवास सुकर होतो. ह्यामुळे मनाची अस्वस्थता दूर होऊन सजगता आणि आनंद वाढू लागतो.
नवरात्रीतील उपवासात काय खावे, ह्या उपवासाचे नियम काय आहेत आणि इतर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
उपवासाची प्रक्रिया
“आपण देवाला प्रसन्न करायला उपवास करीत नाही तर आपले शरीर शुद्ध करण्यासाठी उपवास करतो.”- गुरुदेव श्री श्री रविशंकर
आयुर्वेदानुसार उपवासामुळे आपला जठराग्नी पुन्हा प्रज्वलित होतो. ह्या जठराग्नीतील वाढ आपल्या शरीरातील टाकाऊ विषकण नष्ट करते. हे टाकाऊ विषकण शरीराच्या बाहेर घालविले जातात, त्यामुळे सुस्ती आणि मंदपणा कमी होतो. शरीरातील पेशीपेशीत नवचैतन्य जागृत होते. त्यामुळेच, उपवास हा शरीरशुद्धीसाठी प्रभावी उपचार ठरलेला आहे. जेव्हा शरीर शुद्ध होते, तेव्हा मन सुद्धा अधिक शांत आणि स्थिर होते, कारण शरीर आणि मनाचा गहिरा संबंध आहे.
उपवास: विश्रांती आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचा उपाय
बहुदा, आपल्यापैकी बरेच लोक भूक लागण्याची वाटच बघत नाही. भूक लागणे म्हणजे आपले शरीर अन्न पचविण्यासाठी आता सज्ज आहे हे दर्शविण्याचा त्याचा मार्ग आहे. भूक लागण्यापूर्वीच खाल्ल्यामुळे आपली पाचनप्रणाली अजून दुबळी होते, परिणामी ताण वाढतो आणि रोगप्रतिकारक शक्ती मंदावते. उपवासाने आपला जठराग्नी अजून प्रदीप्त होत असल्यामुळे, तणाव कमी होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
नवरात्रीत उपवास करीत सखोल ध्यानात डुंबून जा | Experience deeper meditation with fast
नवरात्रीचा काळ हा स्वतःसोबत घालविण्याचा, ध्यानाचा आणि आपल्या अस्तित्वाच्या स्त्रोतासोबत जोडून घेण्याचा काळ आहे. उपवासामुळे मनाची अस्वस्थता कमी होते आणि आपल्या अंतरंगाकडे वळत गहिऱ्या ध्यानात उतरणे सोपे जाते. तथापि, स्वतःला पुरेशी उर्जा मिळत राहावी म्हणून पुरेसा फलाहार आणि सात्विक अन्नाचे सेवन करणे गरजेचे आहे.
सात्विक उर्जेचा लाभ घ्या
उपवास आणि ध्यान केल्याने आपल्यातील सत्व वाढते. सत्व म्हणजे आपल्यातील शांती आणि प्रसन्नतेची गुणवत्ता. ह्या सात्विक उर्जेत वाढ झाल्याने आपले मन अधिक शांत आणि सजग होते. परिणामी, आपले संकल्प आणि प्रार्थना अधिक प्रबळ होतात. सत्वाच्या तजेल्याने शरीर अधिक हलकेफुलके आणि उर्जावान बनते. आपण अधिक कार्यक्षम होतो. त्याचे फळ म्हणजे, आपल्या इच्छा साकार होऊ लागतात आणि आपली सर्व कार्ये सहजपणे सिद्धीस जातात.
“सर्व जगभरात आणि सर्व धर्मात प्रार्थनेसोबत उपवासाची जोड दिलेली आहे कारण, जेव्हा तुम्ही उपवास करता, तेव्हा तुम्ही अंतर्बाह्य शुद्ध होता आणि तुमच्या प्रार्थना अंतःकरणातून प्रामाणिक आणि अधिक गहिऱ्या होतात.” - गुरुदेव श्री श्री रवीशंकर
सूचना- काही विशेष शरीर प्रकृतीसाठी आणि आरोग्याच्या स्थितीसाठी उपवास योग्य ठरत नाही. म्हणून, उपवास करण्यापूर्वी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच, तुम्हाला जेवढा शक्य आहे तेवढाच उपवास करावा.
नवरात्री संबंधित अन्य लेख
- चंडी होम | Chandi Homa
- नवरात्रीच्या पूजांची तयारी कशी केली जाते ? | Preperations for Homa during Navratri
- नवरात्रीत होणारे ७ होम कोणते ? | Benefits of Homa performed in Navratri
- नवरात्रीतील मौन | Silence during Navratri in marathi
- नवरात्र उत्सवाची भारतभरातील विविधता | Different Ways Of Celebrating Navratri Across India
- आपल्या दैंनदिन जीवनात मंत्र स्नानाचे महत्व | 5 reasons to include mantras in your daily playlist
- नवरात्रीतील उपवासाचे महत्व | Importance of fasting during Navratri
- २०२० च्या नवरात्रीचे ९ रंग | Colors of Navratri in Marathi
- ललिता सहस्त्रनाम : तेजस्वी, चैतन्यदाई आणि आनंददाई | Lalitha – The Vibrant One
- देवी तत्व जाणून घेऊया | Understanding Devi
- आयुध पूजेचे महत्त्व | शस्त्र पूजनाचे महत्व | Significance of Ayudha Pooja in Marathi