संकल्प: आपल्या इच्छांना प्रबळ संकल्पामध्ये रूपांतरीत करा

“मनात वीस इच्छा निर्माण झाल्या तर त्यातली एकही पूर्ण होत नाही.” – गुरुदेव श्री श्री रविशंकर

इच्छांचा आपल्यावर घोळक्याने भडिमार होत असतो. त्याबद्दलचा ज्वर नेहमी त्यांच्या सोबतीला असतोच. इच्छांचा हा घोळका आपल्या मनाला गोंधळात टाकतो आणि कमकुवत करतो. तो ज्वर मनाची शांती हिरावून घेतो. अशक्त आणि कमकुवत मनामुळे त्या इच्छा प्रत्यक्षात साकार करणे जवळजवळ अशक्य होते. तथापि, इच्छेला‌ अधिक प्रबळ करण्यासाठी कलाटणी देता येणे शक्य आहे. त्याचे रूपांतर संकल्पात करता येऊ शकते!

संकल्प म्हणजे काय?

संकल्प ही एक इच्छा आहे जी शांत आणि दृढ मनातून निर्माण होत असते. संकल्प हा सृष्टीच्या चरणी अर्पण केला जातो. त्यात नेहमीसारखा इच्छेचा ज्वर नसतो, कारण ‘आपली’ इच्छा ही संपूर्ण सृष्टीची इच्छा बनते!

आपण संकल्प कसा घेऊ शकता?

नवरात्रीच्या पूजा आणि होमहवन हे आपल्या इच्छांना संकल्पात बदलण्याची एक उत्तम संधी आहे. पूजा आणि होमामुळे मन शांत आणि सजग होते. शांत मनातून, फक्त प्रबळ असेच संकल्प निर्माण होतात. होम आणि पूजेदरम्यान निर्माण झालेल्या प्रचंड उर्जेचा उपयोग करून आपला संकल्प अधिक शक्तिशाली बनवणारा एक प्राचीन विधी देखील आहे. पूजा आणि होम करणारे अनुभवी पंडित या विधीसाठी मदत करतात.

ते कसे कार्य करते?

जेव्हा आपण नवरात्रीच्या पूजा आणि होमामध्ये संकल्प घेतो तेव्हा आपण विश्वाला आपला संकल्प ऐकण्यासाठी आमंत्रित करत असतो. म्हणून, संकल्प घेण्याचे एक आवश्यक पाऊल म्हणजे प्रार्थना करणे आणि तो संकल्प ईश्वराला समर्पित करणे. मग आपण त्याबद्दल विचार करत बसत नाही. आपण त्यासाठी काम करतो, चिंता सोडून देतो आणि आपल्यासाठी सर्वोत्तम तेच होईल या श्रद्धेने निवांत होतो.

कोणीही संकल्प घेऊ शकतात का?

होय. संकल्प घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही विधीची किंवा श्रद्धा स्थळाचे पालन करण्याची आवश्यकता नाही.

आपण ऑनलाइन संकल्प घेऊ शकतो का?

होय..

प्रत्येक नवरात्री पूजा आणि होमाच्या वेळी आपण संकल्प घेऊ शकतो का?

होय. आपण कोणत्याही आणि सगळया नवरात्री पूजा आणि होमाच्या वेळी संकल्प घेऊ शकता.

ऑनलाइन संकल्प कसा घ्यावा?

  1. ऑनलाइन संकल्प घेण्यासाठी येथे नोंदणी करा.
  2. संकल्प घेण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल याची आपणास सूचना दिली जाईल.
  3. त्या दिवशी आपल्या नियोजना प्रमाणे नियमित कामे करा. संकल्पाच्या वेळेपूर्वी सगळे आटोपून घ्या.
  4. सक्ती नसली तरी त्या दिवशी उपवास करणे योग्य राहील. उपवासाच्या टिपांसाठी, या पेजला भेट द्या.
  5. शक्य असेल तर, संकल्पाला बसण्यापूर्वी स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला.
  6. वेबकास्ट दरम्यान, पंडितजी सर्वांना काही प्रार्थना करण्यासाठी सांगतील. आणि संकल्प कसा घ्यायचा ते सांगतील. त्या सूचनांचे पालन करा. याला सुमारे १०-१५ मिनिटे लागतील.
  7. त्यानंतर होम/पूजेदरम्यान ध्यान करा.
  8. आपल्या पत्त्यावर प्रसाद पोहोचवण्याचा पर्याय नाही.
  9. जर आपण नियुक्त केलेल्या वेळी वेबकास्टमध्ये सामील होऊ शकत नसाल आणि संकल्प विधींचे पालन करू शकत नसाल तरी काळजी करू नका. त्याच दिवशी संध्याकाळी वेबकास्टवर लॉग इन करा, प्रार्थना करा आणि ध्यान करा.

या नऊ दिवसांत, दैवी मातेच्या उर्जेमध्ये स्वतःला वाहून घ्या.