नवरात्रीच्या काळातील पूजाविधी आणि त्यांचे विज्ञान
आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये दरवर्षी साजरा केला जाणारा नवरात्री हा सर्वात मोठा कार्यक्रम आहे, ज्यामध्ये हजारो लोक सहभागी होतात. प्राचीन वैदिक पूजा नऊ दिवस मुहूर्ताप्रमाणे अगदी वेळेवर काटेकोरपणे केल्या जातात आणि त्यासाठी पडद्यामागे बरेच काही घडत असते.
आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमधील वेद आगम संस्कृती महापाठशाळेचे प्राचार्य म्हणून असलेले ए.एस. सुंदरमूर्ती सिवम, जे या पूजांचे मुख्य पुजारी देखील आहेत, त्यांच्यावर याबाबत बरेच काही अवलंबून असते.
ते पुरोहितांच्या कुटुंबातले आहेत आणि त्यांनी जगभरात १००५ कुंभाभिषेक आणि २१०० हून अधिक चंडी होम केले आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये १९९४ पासून नवरात्री यज्ञ आयोजित केले जात असल्यामुळे, स्वतः मुख्य पुजारी असलेल्या त्यांनी येथे काही गहन प्रश्नांची उत्तरे दिली आहेत:
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या नवरात्री उत्सवाची पार्श्वभूमी काय आहे?
नवरात्रीचे दोन मुख्य प्रकार आहेत. एक चैत्र महिन्यात एप्रिलमध्ये आयोजित केली जाते आणि ती वसंत नवरात्री म्हणून ओळखली जाते आणि ती प्रामुख्याने उत्तर भारतात साजरी केली जाते. आणि दक्षिण भारतात, शरण नवरात्री आश्विन महिन्यात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये साजरी केली जाते.
आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये, गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या आशीर्वादाने पृथ्वीवरील प्रत्येक जीवाचे कल्याण, शांती आणि समृद्धीसाठी शरण नवरात्री साजरी केली जाते. दैवी आशीर्वादाबद्दल आवाहन केले जाते, जेणेकरून प्रत्येकाला ज्ञान आणि खालील तीन शक्ती प्राप्त होतील:
- इच्छा शक्ती – इच्छाशक्ती
- क्रिया शक्ती – योग्य कृती करण्याची शक्ती
- ज्ञान शक्ती – योग्य कृतीचे ज्ञान
पूजा मंडपात सर्व काही अगदी योग्य वेळेवर होताना आपण पाहतो. नवरात्रीत या वेळेचे महत्त्व काय आहे?
नवरात्रीचे पूजा आणि विधी शैवगम आणि शाक्ततंत्र तसेच रुद्रायमलम, शारदातिलकम्, परशुराम, कल्पसूत्रम, श्री विद्या तंत्रमंद मंत्र महर्णवांद देवी महात्म्यम् यांसारख्या पवित्र धर्मग्रंथांमध्ये विहित केलेल्या अचूकतेने केले जातात. हे ग्रंथ विधी आणि पूजा करण्याची अचूक पद्धती आणि अचूक मुहूर्त सांगतात. मार्गदर्शक तत्त्वांचे तपशीलवार पालन केले जाते आणि तज्ञ पुजारी ते तंतोतंत अंमलात आणतात. वरिष्ठ तज्ञ पुरोहितांना मदत करण्यासाठी आमच्या गुरुकुलातील शिष्यांना या शास्त्राचे शिस्तीत काटेकोर प्रशिक्षण दिले जाते, जेणेकरून सर्व विधी वेळेवर पूर्ण व्हावेत.
नवरात्रीच्या पूजेच्या तयारीची माहिती तुम्ही सांगू शकाल का?
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी पासून म्हणजे षष्ठी तिथीपासून शेवटचे पाच दिवस, या पूजा केल्या जातात.
पूजेच्या तयारीसाठी खालील चरण आहेत:
- प्रथम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे साहित्याचा संग्रह – द्रव्य संग्रहण आणि आवश्यक साहित्य योग्य त्या प्रमाणात – द्रव्य प्रमाण. हे साहित्य प्रामुख्याने केरळ, हिमाचल प्रदेश आणि जम्मू येथून आणले जाते.
- दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे यज्ञशाळेचे परिक्षेत्र तयार करणे जे यज्ञशाळेच्या लक्षणानुसार केले जाते. या प्रक्रियेला यज्ञशाळा निर्माण आणि मंडल लेपन (वैज्ञानिक आकृत्यांची निर्मिती) असे म्हटले जाते. गणेश मंडल, वास्तु मंडल, नवग्रह मंडल आणि सुदर्शन मंडल ही काही मंडले आहेत.
- पंचभूतांची म्हणजेच पाच तत्त्वांची पूजा केली जाते.
- कलशातील जल तत्व,
- हवनकुंडातील अग्नि तत्व,
- मंत्रांच्या जपातून वायु तत्व,
- मंडलांच्या माध्यमातून पृथ्वी तत्वाची पूजा केली जाते.
- या सर्व पूजा आकाश तत्वाच्या सानिध्यात होतात.
- त्यानंतर चंडी यज्ञाचा मुख्य कलश ठेवण्याचे उच्चासन ‘पंचासन वेदिका’ तयार केली जाते.
- या उच्चासनाच्या तळाशी कूर्मासन (कासव, जो स्थिरता दर्शवतो) असते. कूर्मासनाच्या वर खालील क्रमाने प्रतीकांची मालिका असते:
- त्याच्या वर असते सिंहासन (सिंह, जो वीर्य किंवा शक्ती दर्शवतो).
- योगासन (आठ सिद्धांच्या आकृत्या, जे अष्टांग योगाचे सूचक आहेत – योगाचे आठ अंग)
- पद्मासन (कमळ, जे सर्वज्ञ अवस्थेचे आणि पूर्ण बहरलेल्या चैतन्याचे प्रतिनिधित्व करते)
- कलश स्थापना केली जाते, ज्यात मातृ दैवी शक्तीचे आवाहन केले जाते.
- कलश तयार करण्यासाठी कलशावर पवित्र धागे वेढले जातात आणि त्यात पवित्र नद्यातील आणि काही औषधी वनस्पतींचे पाणी भरले जाते. कलशाच्या मुखावर आंब्याची पाने लावतात आणि पानांच्या वर नारळ ठेवतात आणि कलशाला चंदन, कुमकुम, दर्भ आणि विशिष्ट सुगंधी फुलांनी सजवले जाते.
- यज्ञ सुरू होण्यापूर्वी वास्तुपूजा केली जाते, ज्यात पृथ्वीची पूजा केली जाते आणि यज्ञशाळेत चारही बाजूंनी सर्वत्र नऊ प्रकारच्या अन्नधान्याची रोपे लावत अंकुरार्पण केले जाते. अन्नधान्य आणि शेतकऱ्यांचा आदर करण्यासाठी हे केले जाते. जमिनीची सुपीकता वाढावी यासाठी प्रार्थना केल्या जातात.
- होम कुंडाची तयारी: यज्ञशाळेच्या पूर्व दिशेला होम कुंड बांधले जाते.
- पद्म कुंड हा होम कुंडाचा प्रकार आहे, जो आपल्या आश्रमात चंडी यज्ञ करण्यासाठी बांधला जातो.
- कुंडाचा दुसरा प्रकार म्हणजे योनी कुंड. कुंड कोणत्या प्रकारचा बांधायचा हे यज्ञात आहुतींसाठी अर्पण केल्या जाणाऱ्या द्रव्य सामग्रीच्या प्रमाणावर अवलंबून असते.
- चतुस्तंभ पूजा किंवा चार स्तंभ (धर्म, ज्ञान, वैराग्य आणि ईश्वर्य) आतील भागात उभारले जातात. बाहेरील भागात षोडशस्तंभ पूजा म्हणजे १६ खांब उभारले जातात, जे मानवी जीवनाचे १६ पैलू दर्शवतात.
- यज्ञशाळांच्या बाहेरील भागात आठ पताका सहित अष्टध्वज स्थापित केले जातात, ज्यावर हत्ती चित्रित केलेले असतात.
- यज्ञशाळेच्या आतील भागात अष्टमंगला किंवा आठ उपकरणे बसवली जातात. ही आहेत दर्पणम (आरसा), पूर्णकुंभ, वृषभ (बैलाची आकृती), दोन चामर, श्रीवत्सम आणि स्वस्तिकम या आकृती, शंख आणि दीप.
- आतील भागात सजावटीसाठी रांगोळ्या काढल्या जातात आणि यज्ञशाळेला आंब्याची पाने, केळीचे खांब, ऊस आणि दिवे लावले जातात.
- यज्ञशाळेच्या सीमा देखील पेरलेल्या अन्नधान्याच्या बियांनी सजलेल्या असतात, जे लवकर अंकुरीत होतात. अंकुरांमध्ये औषधी मंत्र ग्रहण करण्याची क्षमता असते. धान्याचे बीज चांगले अंकुरावे आणि चंडी यज्ञ सुरळीत पार पडावा यासाठी प्रार्थना केली जाते.
आध्यात्मिक साधकासाठी नवरात्रीचे महत्त्व काय आहे?
नवरात्र म्हणजे शक्तीच्या तत्त्वाचा उत्सव. हा उत्सव शरद ऋतुमध्ये साजरा केला जातो आणि आगमानुसार इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती या तीन वेगवेगळ्या स्वरूपात शक्तीची पूजा केली जाते. कल्पांनुसार (पुराणाप्रमाणे) शक्तीची पूजा महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती म्हणून केली जाते. सर्व नऊ दिवस देवी महात्म्य आणि श्रीमद देवी भागवतम् चे पठण केले जाते.
हा एक अनोखा सण आहे जिथे एकीकडे उत्सव साजरा होतो आणि दुसरीकडे आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी गहिरी साधना केली जाऊ शकते.
तसेच, मनाचे सहा अवगुण किंवा दुर्गुण आहेत:
- काम,
- क्रोध,
- लोभ,
- मोह,
- मद, आणि
- मत्सर्या (मत्सर)
हे अवगुण कोणत्याही मनुष्याच्या नियंत्रणाबाहेर जाऊ शकतात आणि आध्यात्मिक मार्गात अडथळा बनू शकतात. ते नवरात्रीच्या या नऊ दिवसांत शक्तीच्या कृपेने विसर्जित केले जाऊ शकतात.
या नऊ दिवसांत ध्यानाबरोबरच तपस्या किंवा उपासना केली जाते. पूज्य गुरुदेवांच्या आशीर्वादाने, आपल्याकडे एक तयार आणि सोपा अध्यात्मिक मार्ग आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण अणिमा, महिमा आणि लगीमाद्वारे सिद्धी किंवा परिपूर्णता प्राप्त करू शकतो.
नवरात्रीच्या काळात संकल्पाचे महत्त्व काय?
कोणत्याही पूजेसाठी वचनबद्धता आवश्यक असते. आपले ध्येय साध्य करण्यात यश लाभण्यासाठी आपण पूजेच्या सुरुवातीलाच ईश्वराची प्रार्थना करतो आणि यालाच संकल्प म्हणतात. जेव्हा आश्रमात एवढा विशाल यज्ञ चालतो, तेव्हा संकल्प घेतल्याने आपल्यावर आणि सर्व जगावर परोपकाराचा वर्षाव होतो, मन शुद्ध होते आणि आपल्याला स्पष्टता प्राप्त होते.
जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या/तिच्या कुटुंबासाठी संकल्प घेते तेव्हा त्याला आत्मर्थ संकल्प म्हणतात. त्याच वेळी, जेव्हा संकल्प संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी घेतला जातो तेव्हा त्याला परार्थ संकल्प म्हणतात.
पूजेदरम्यान चंडी होमाचे १००८ भाग असतात हे खरे आहे का?
चंडी होम दोन प्रकारचा आहे – लघु चंडी होम (छोटी आवृत्ती) आणि महा चंडी होम (दीर्घ आवृत्ती).
लघु चंडी होमामध्ये, देवीचे आवाहन केले जाते आणि त्यानंतर नवाक्षरी मंत्र जप केला जातो. होमानंतर देवी पूजन केले जाते आणि ते एकदाच, फक्त काही तासांसाठी केले जाते.
महाचंडी होम नऊ वेळा करता येतो आणि त्याला नवचंडी होम म्हणून ओळखले जाते. जेव्हा १०० वेळा केले जाते तेव्हा त्याला शत चंडी होम असे म्हणतात; जेव्हा १००० वेळा केले जाते, तेव्हा ते सहस्र चंडी होम म्हणून ओळखले जाते; आणि, जेव्हा १०,००० वेळा केले जाते तेव्हा ते आयुता चंडी होम म्हणून ओळखले जाते.
१. यज्ञ सुरू होण्यापूर्वी कोणते विधी पाळले जातात?
पूजेला सुरुवात होते ती याप्रमाणे
- गुरु अनुग्रह: हे गुरूंचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळविण्यासाठी असते.
- देवता अनुग्रह: येथे देवाची परवानगी मागितली जाते.
- विघ्नेश्वर पूजा: सर्व बाधा दूर करण्यासाठी भगवान श्री गणेशाला केली जाणारी ही प्रार्थना आहे, जी पूर्वांग पूजेनंतर केली जाते.
- आचार्य अनुग्ना: संपूर्ण यज्ञाचे प्रमुख असलेल्या ज्येष्ठ पुरोहिताचे आशीर्वाद मागितले जातात; सर्वात ज्येष्ठ पुरोहित ब्रह्मा म्हणून ओळखले जातात.
- महासंकल्प: जिथे पूजा केली जात आहे ते स्थळ, तो दिवस आणि वेळ याचे उच्चारण संकल्प घेताना केले जाते. होमाचे नाव आणि त्याचा हेतू हे देखील नमूद केले जाते; आणि त्यानंतर पूजा सुरू केली जाते.
- ग्रह प्रीती: नऊ ग्रहांना प्रार्थना केली जाते, जेणेकरून होम कोणत्याही अडथळ्यांशिवाय सुरळीतपणे पार पाडता येईल. या प्रार्थनेत नऊ ग्रहांच्या आशीर्वादासाठी आवाहन केले जाते, जेणेकरून ज्या नक्षत्र, राशी आणि लग्नात पूजा केली जाते, तिथे काही दोष असल्यास ते दूर होतील.
- नंदी शोभनम: ऋषीजन आणि वडिलधाऱ्यांकडून आशीर्वाद घेण्यासाठी प्रार्थना केली जाते.
- मधुपर्क पूजा: दूध, मध आणि तूप मिसळून विशिष्ट मंत्राचा जप केला जातो. होम करणारे पुजारी त्याचे सेवन करतात, जेणेकरून पूजा करताना त्यांच्या मनाची स्थिती मधुर असावी.
- गौदान: यामध्ये गौ पूजेनंतर गोदान केले जाते.
- पुण्यावचन: हे पूजा जेथे होत आहे ते ठिकाण शुद्ध करते.
- पंचगव्यम्: ही पाच तत्वे (पदार्थ)आहेत ज्याद्वारे शरीर शुद्ध होते.
- वास्तुशांती: ही भूमी देवतांना केली जाणारी प्रार्थना आहे.
- मृद संग्रहण: मृद वाळू किंवा लाकडापासून घेतले जाते.
- अंकुरार्पण: यामध्ये दुधात आणि पाण्यात भिजलेले नऊ प्रकारचे धान्य कुंडीत पेरले जाते.
- रक्षा बंधन: उजव्या हाताला पवित्र पिवळा धागा बांधून पूजेसाठी केला जाणारा हा आचार्यांचा संकल्प आहे.
यज्ञ सुरू करण्यापूर्वीचे हे विधी (पूर्वांग पूजा) आहेत.
२.यज्ञ सुरू होताना कोणत्या चरणांचे पालन करणे आवश्यक आहे?
यज्ञ सुरू झाला की खालील विविध चरणांचे पालन करावे लागते:
- दीपपूजा : मुख्य कलशाच्या दोन्ही बाजूला दोन प्रकारचे दिवे लावले जातात. डाव्या बाजूला तीळाच्या तेलाचा दुर्गा दिवा आणि उजव्या बाजूला तुपाचा लक्ष्मी दिवा लावला जातो.
- षोडश मातृका पूजा: १६ मातृका देवींना आवाहन केले जाते.
- आचार्य आणि ऋत्विक वारण: येथे, वेद, शास्त्र आणि आगमाच्या विविध शाखांमध्ये विशेष आचार्य किंवा पुरोहितांची नियुक्ती केली जाते. चार वेद – ऋग्, यजुर, साम आणि अथर्व आणि इतिहास पुराण आणि शैवगम यांचा जाप केला जातो.
- आचार्य अनुग्ना: संपूर्ण यज्ञाचे प्रमुख असलेल्या ज्येष्ठ पुरोहिताचे आशीर्वाद मागितले जातात; सर्वात ज्येष्ठ पुरोहित ब्रह्मा म्हणून ओळखले जातात.
- महासंकल्प: जिथे पूजा केली जात आहे ते स्थळ, तो दिवस आणि वेळ याचे उच्चारण संकल्प घेताना केले जाते. होमाचे नाव आणि त्याचा हेतू हे देखील नमूद केले जाते; आणि त्यानंतर पूजा सुरू केली जाते.
- चंडी महायज्ञ मंटप पूजा: यात ५३ प्रकारच्या मुख्य पूजा केल्या जातात आणि सर्व दहा दिशांच्या देवतांची पूजा केली जाते.
- द्वार, थोरण, ध्वजा, पताका स्थापना: ही विशिष्ट पाने विशिष्ट दिशेला मंडपाला बांधली जातात.
- आचार्य आसन पूजा: यज्ञ करण्यासाठी नियुक्त केलेले मुख्य पुरोहित आता देवीपूजनाला सुरुवात करतात आणि नवाक्षरी मंत्राचा जप करतात.
- गोदान: येथे गौ पूजेनंतर म्हणजेच गायीची पूजा केल्यानंतर गाय दान केली जाते.
- पाद्यादि पात्र परी कल्पना: प्रसाद तयार केला जातो.
- कुंभ स्थापना: ज्यामध्ये नद्यांचे पवित्र पाणी भरले आहे असे मुख्य कलशम स्थापन केले जाते.
- देवी आवाहन: यात देवीचे आवाहन केले जाते.
- अग्नीकार्य: अरुणी लाकडाच्या काड्या घर्षण करून आग पेटवली जाते ज्याला अग्नी मंथन म्हटले जाते. देवीला अग्नीमध्ये आमंत्रित केले जाते आणि नंतर अग्नीला नैवेद्य किंवा आहुती दिली जाते. – १०००, १००००, १००००० आहुती इ. जितक्या आहुतींचा यज्ञ आहे त्याप्रमाणे त्या विशिष्ट होमानुसार आहुती दिल्या जातात. सप्तशती १३ भागांमध्ये विभागली गेली आहे आणि प्रत्येक भागासाठी देवीचे विशिष्ट रूप आहे. सर्व १३ देवींना त्यांच्याशी संबंधित विशिष्ट मंत्रांचा जप करून आवाहन केले जाते आणि त्यांना त्यांच्या विशिष्ट आहुती देखील दिल्या जातात. यामुळे त्या विशिष्ट देवीच्या आशीर्वादाने विशिष्ट प्रभाव प्राप्त होतो.
- योगिनी आणि भैरव पूजा: ही पूजा ६४ योगिनी आणि ६४ भैरवांचे पूजन करण्यासाठी केली जाते.
- कादंबरी पूजा
- वदुका भैरव पूजा
- गौ पूजा (गाईची पूजा)
- गजपूजा (हत्तीची पूजा)
- अश्व पूजा (घोड्याची पूजा)
- कन्यका पूजा (लहान मुलींची पूजा)
- सुवासिनी पूजा (विवाहित महिलांची पूजा)
- दंपत्ती पूजा (जोडप्यांची पूजा)
या सर्वांना मंगलआरतीसह अनेक नैवेद्य दिले जातात.
- सौभाग्य द्रव्य समर्पण: १०८ प्रकारच्या औषधी वनस्पती आणि फळे मुख्य होम कुंडात, श्रीसूक्त मंत्राच्या जपासह अर्पण केली जातात.
- वसोधरा: आता चमक मंत्रांचा जप केला जातो.
- महापूर्णाहुती: लाल साडी, तूप आणि सुक्या नारळात मध, तसेच नवरत्नसोर म्हणजे नऊ मौल्यवान रत्ने आणि पंचलोह म्हणजे पाच प्रकारच्या धातूंची आहुती सर्वात अखेर दिली जाते.
- संयोजन: पूजेचे परिणाम आणि त्याची स्पंदने मुख्य कलशम मध्ये हस्तांतरित केली जातात.
- रक्षाधारणा – होम कुंडातून रक्षा घेतली जाते आणि मुख्य कलशमला लावली जाते, त्यानंतर पूजा केली जाते.
- कलशाभिषेकम – मुख्य कलशमचे पवित्र जल आता देवीच्या मूर्तीला अर्पण केले जाते.
- विशेष प्रार्थना केल्या जातात आणि संपूर्ण पृथ्वीवासियांना आशीर्वाद दिले जातात. तेथे जमलेल्या सर्वांवर पूज्य गुरुदेवांच्या हस्ते पवित्र पाणी शिंपडले जाते.
- त्यानंतर गुरुदेव प्रसाद देतात आणि सर्वांना आशीर्वाद देतात.
हे सगळे घड्याळाच्या काट्यानुसार अचूकतेने करण्यासाठी वेदपठण करणाऱ्या मुलांना प्रशिक्षण कसे दिले जाते?
- वेद आगम संस्कृती महापाठशाळेचे विद्यार्थी दररोज योग, सुदर्शन क्रिया आणि ध्यानाचा सराव करतात, ज्यामुळे ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सजग राहतात.
- तसेच, ते गुरुकुलाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या सर्व निती नियमांचे पालन करतात.
- त्यांना चंडी होम करण्यास सक्षम करण्यासाठी मंत्र दीक्षा देखील दिली जाते. ते होमाच्या प्रत्येक टप्प्यावर चांगले प्रशिक्षित केले जातात आणि यामुळे चंडी होमाच्या दिवशी वेळेची अचूकता साधण्यात मदत होते. महाचंडी होमाच्या एक आठवडा आधी, आगमा पाठशाळेत विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक चंडी होमाचे प्रशिक्षण दिले जाते.
- देवी महात्म्यम् जपाचा सुमारे १२ आठवडे सरावही केला जातो.
कोणते सहा यज्ञ तिथे केले जातात आणि त्यांचा माणसांच्या जीवनावर काय परिणाम होतो?
(अ) गणपती होम – कोणतेही कार्य पूर्ण करण्यासाठी सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेचा सहभाग असतोच. या ऊर्जा नेहमी बाह्य असण्याची गरज नाही; त्या आपल्या शरीरातल्या आणि मनातल्या देखील असू शकतात. म्हणून, आपण सारी विघ्ने दूर करणाऱ्या श्रीगणेशाची प्रार्थना करतो. कोणताही यज्ञ सुरू करण्यापूर्वी गणेश होम आणि गणेश पूजा करण्याची परंपरा आहे.
(ब) सुब्रह्मण्या होम – भगवान सुब्रह्मण्या हे विजयाचे देवता आहेत. कोणत्याही कार्यात यशस्वी होण्यासाठी ज्ञानशक्ती किंवा ज्ञानाची उर्जा आवश्यक असते. म्हणून, ब्राम्हण्य मंत्रांचा जप केला जातो आणि भगवान सुब्रह्मण्यांचे आवाहन केले जाते.
(क) नवग्रह होम – नवग्रह किंवा नऊ ग्रह महत्त्वाचे आहेत आणि त्यांच्या हालचाली किंवा ग्रहगती संपूर्ण पृथ्वीवर आणि त्यावर राहणाऱ्या प्रत्येक जीवावर प्रभाव टाकतात. म्हणून, नऊ ग्रहांना नऊ वेगवेगळ्या प्रकारच्या आहुती अर्पण करून त्यांचे पूजन केले जाते. सोबत प्रत्येक ग्रहासाठी त्यांच्या विशिष्ट असलेल्या मंत्रांचा जप केला जातो. विशिष्ट ग्रह आपल्या शरीराच्या विशिष्ट भागांवर प्रभाव टाकतात आणि ते विशिष्ट धान्य आणि रत्नांवर देखील प्रभाव पाडतात.
पृथ्वीवरील प्रत्येक घडामोडीवर ग्रहांचा प्रभाव असतो. नऊ ग्रहांचा आपल्यावरील नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी किंवा त्यापासून बचाव करण्यासाठी आणि ते आधीच आपल्यावर टाकत असलेला सकारात्मक प्रभाव अधिक वाढवण्यासाठी आपण त्यांना प्रार्थना करतो.
(ड) रुद्र होम – रुद्र होमामुळे आपल्याला शांती लाभते आणि आपल्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात. या होमामध्ये नमक आणि चमक मंत्रांसह रुद्र मंत्रांचा जप केला जातो. रुद्र मंत्रांप्रती आदर व्यक्त केल्याने आपल्याला ध्यानात खोलवर जाण्यास मदत होते आणि सत्त्व, रजस आणि तमस यांचा समतोल साधला जातो. रुद्र मंत्र त्रिगुणांचा विलय करतात आणि गहन ध्यानात शून्य अवस्थेत प्रवेश करण्यास मदत करतात. आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये, ११ पुरोहित रुद्र मंत्रांचा अकरा वेळा जप करून रुद्र होम करतात; आणि याला एकादश रुद्र होम म्हणून ओळखले जाते.
(ई) सुदर्शन होम – सुदर्शन होम वाईट नजर आणि नकारात्मक प्रभावांपासून बचाव करतो आणि आपल्याला प्रसन्नतेकडे घेऊन जातो. या होमात सुदर्शन मंत्र आणि विष्णु सहस्रनामाचा जप केला जातो. तसेच लक्ष्मी मंत्र आणि श्री सुक्त मंत्रांचा जप केला जातो.
(फ) ऋषी होम – हा होम नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी केला जातो. ऋषी हे दृष्टाराह आहेत म्हणजे ज्यांनी गहन समाधीत प्रवेश करत अवकाशातून वेदांचे मंत्र उपलब्ध करुन दिले आहेत. ज्या ऋषींनी मानवजातीच्या उत्थानासाठी हे पवित्र ज्ञान दिले त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण ऋषी होम करत असतो. सप्तऋषी आणि इतर महत्त्वाच्या ऋषींसाठी प्रार्थना केल्या जातात आणि याची सुरुवात गुरुपूजेपासून होते.
माझ्या माहितीनुसार, पूज्य गुरुदेवांच्या कृपेने आणि त्यांच्या नियोजनानुसार, हे फक्त आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्येच घडते