नवरात्री ही आपल्या सर्वांकरिता एक दीर्घकालीन परंपरा आहे आणि त्यासोबत खूप मोठे धार्मिक मूल्य जोडलेले आहे. आपल्याला हे देखील माहित आहे की नवरात्री हा निर्विवादपणे देशभरात मोठ्या उत्कटतेने आणि उत्साहाने साजरा केला जाणारा सर्वात मोठा हिंदू सण आहे. तरीपण अनेकांना हे माहित नसेल, की नवरात्री वेगवेगळ्या ऋतूंमध्ये, वर्षातून पाच वेळा साजरी केली जाते.  म्हणजे चैत्र नवरात्री, आषाढ नवरात्री, शारदा नवरात्री आणि पौष/माघ नवरात्र. त्यांपैकी वर्षा ऋतूतील शारदीय नवरात्र (शरद ऋतूचा प्रारंभ) आणि वसंत ऋतुमधील चैत्र नवरात्र अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

चैत्र नवरात्री

चैत्र नवरात्रीला वसंत नवरात्री असेही म्हणतात. ही नवरात्र सहसा मार्च किंवा एप्रिल महिन्यात येते आणि हिंदू दिनदर्शिकेचा (पंचांगाचा) पहिला दिवस असतो. हा नऊ दिवसांचा भव्य उत्सव आहे जो उत्तर भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. ही नवरात्री चैत्र मासाच्या (हिंदू दिनदर्शिकेच्या चैत्र महिन्यात) शुक्ल पक्षादरम्यान साजरी केली जाते, जो मार्च ते एप्रिल दरम्यान असतो. महाराष्ट्रीय लोक या नवरात्रीचा पहिला दिवस गुढी पाडवा म्हणून साजरा करतात आणि काश्मीरमध्ये याला नवरेह म्हणतात. ही नवरात्री उत्तर आणि पश्चिम भारतात उत्साहाने साजरी केली जाते आणि वसंत ऋतूच्या रंगीबेरंगी ऋतूला अधिक आकर्षक आणि दिव्य बनवते.

चैत्र” म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात. त्यामुळे प्रार्थना, ध्यान आणि जप करणे अशा प्रकारे नवीन वर्षाची सुरुवात नऊ दिवसांच्या अंतर्मुख होण्याने होते. संपूर्ण सृष्टीतील देवत्व ओळखणे आणि त्या पैलूला जिवंत करणे

गुरुदेव श्री श्री रवि शंकर

नवरात्रीचे महत्त्व

शरद नवरात्री

ही सर्वात लोकप्रिय आणि महत्त्वपूर्ण नवरात्र आहे, ज्याला महा नवरात्री असे देखील म्हणतात. हा सण सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये हिवाळ्याच्या सुरुवातीला अश्विन मासात (हिंदू दिनदर्शिकेच्या अश्विन महिन्यात) साजरा केला जातो. ही नवरात्र संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. शारदीय नवरात्री दैवी मातेच्या शक्तीच्या नऊ रूपांना समर्पित आहे – दुर्गा, भद्रकाली, जगदंबा, अन्नपूर्णा, सर्वमंगला, भैरवी, चंडिका, ललिता, भवानी आणि मूकांबिका.

नवरात्री म्हणजे देवी दुर्गेने महिषासुराचा वध केला तो प्रसंग आणि दहावा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो, ज्या दिवशी श्री रामाने रावणाशी युद्ध जिंकले आणि सीतेला पुनः प्राप्त केले. भारताच्या दक्षिण भागात उत्सवामध्ये देवी लक्ष्मी आणि देवी सरस्वती यांची पूजा यांचा समावेश केल्या जातो.

विशेष होम आयोजित केले जातात, अभिषेक केले जातात आणि पूजा (प्रार्थनेसह पूजा आणि देवतेला पुष्प अर्पण) केली जातात. लोक हे दोन्ही सण उपवास, ध्यान आणि देवीच्या नऊ रूपांची उपासना करून साजरे करतात. काही लोक सर्व नऊ दिवस उपवास करतात, तर काही लोक उत्सवाचा प्रारंभ आणि शेवट साजरा करण्यासाठी पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करतात.