ह्या जगात आपण जे काही पाहतो ते सर्व उर्जेने बनलेले आहे. सूर्याच्या किरणांपासून ते वाहत्या नद्यांपर्यंत, मोबाईल फोनच्या गोंगाटापासून ते शांत पेसमेकरपर्यंत- ऊर्जा सर्वत्र व्याप्त आहे. न्यूटनच्या नियमानुसार, ऊर्जा निर्माण किंवा नष्ट केली जाऊ शकत नाही; ती केवळ एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरित केली जाऊ शकते. पण या ऊर्जेचा स्रोत काय आहे? काय आहे जे सर्व, सजीव आणि निर्जीव वस्तूंना प्रत्येक क्षणी ऊर्जा उत्सर्जित करण्याची शक्ती देते?
हिंदू धर्मानुसार, देवी माता किंवा देवी ही सर्व ऊर्जेचा स्रोत आहे. या गुणामुळे तिला शक्ती असेही संबोधले जाते, ज्याचा शब्दशः अर्थ ऊर्जा असा होतो. देवी माता या अस्तित्वातील प्रत्येक गोष्टीला सामर्थ्य देते आणि ती टिकवून ठेवते. आणि नवरात्री हे दुसरे काही नसून आपल्या अस्तित्वासाठी देवीचा सन्मान आणि पूजा करण्याचे एक साधन आहे.
आईच्या गर्भात नऊ महिने वाढणाऱ्या मुलाप्रमाणे, नवरात्रीच्या नऊ रात्री आपल्याला विश्रांती घेण्यासाठी आणि कायाकल्प करण्यासाठी आपल्या स्रोताकडे परत जाण्याची संधी देतात. पण इथे, विश्रांतीचा अर्थ म्हणजे केवळ शारीरिक हालचाल न करणे असा नव्हे तर मानसिक स्तरावर देखील काहीही न करता केवळ विश्राम घेणे असा सूचित होतो. मनातील सततची आरडाओरडा आपल्याला थकवून टाकते आणि आपल्याला खोल विश्रांतीचा अनुभव घेऊ देत नाही.
जग उर्जेने भरलेले आहे- ऊर्जा जी स्वतःला रिचार्ज करण्यासाठी वापरली जाऊ शकते. उर्जेच्या या विशाल साठ्याचा वापर करण्यासाठी, आपल्याला फक्त स्वतःला तयार करण्याची गरज आहे. जेव्हा मन स्थिर असते, तेव्हा ते त्याच्या सभोवतालच्या परिसरातून ऊर्जा घेते आणि विस्तारते. यामुळे सजगता वाढते, मनाची शांत स्थिती आणि चांगली उत्पादकता निर्माण होते. आणि, ध्यान आणि उपवास यासारख्या आध्यात्मिक साधना अशी मनाची स्थिती प्राप्त करण्याचे मार्ग आहेत.
जरी ध्यान आणि उपवास मन शांत करण्यास आणि मानसिक बडबड कमी करण्यास मदत करत असले, तरी खर्या अर्थाने मौनामुळे हा अनुभव अधिकच छान होतो. गुरूदेव श्री श्री रविशंकर म्हणतात की मौन केवळ आपले भाषण शुद्ध करत नाही तर आपले कौशल्य देखील विकसित करते. यासोबत, मौनामध्ये राहिल्याने मन स्थिर होते आणि आपले लक्ष पूर्णपणे अंतर्मुखी होते, अशा प्रकारे तुम्ही आतमध्ये आणखी खोलवर जाऊ शकता.
तथापि, मौन म्हणजे केवळ बोलणे टाळणे नव्हे तर त्याला एक मोठा आयाम आहे. थोडक्यात, मौन तीन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये विभागले जाऊ शकतेः
- जेव्हा आपण कोणाशी बोलत नाही
- जेव्हा मनाला सभोवतालच्या गोष्टींमध्ये स्वारस्य नसते परंतु फक्त अंतर्मुखी असते
- जेव्हा संपूर्ण एकात्मता आणि समाधान असते
पहिल्या प्रकारच्या शांततेत, आपण उघडपणे न बोलून आणि हावभावांचा वापर टाळून आपली ऊर्जा राखून ठेवतो. दुसऱ्या प्रकारात, आपण एक पाऊल पुढे जातो आणि इंद्रिय सुखात गुंतून राहण्यापासून दूर राहतो. प्रत्येक वेळी जेव्हा आपण संवेदनेतून मिळणाऱ्या आनंदात गुंतलेलो असतो, तेव्हा मन सक्रिय असते आणि त्या क्रियाकलापाचे पोषण करते. त्यामुळे मन शांत करण्यासाठी संवेदना सुख टाळले जाते. आणखी एक पायरी म्हणजे तिसऱ्या प्रकारचे मौन, जिथे आपल्याला कशाचीही गरज वाटत नाही आणि आपल्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीत आपण शांत आणि समाधानी असतो. यामुळे मन स्थिर होऊ शकते आणि त्याच्या स्रोताकडे परत येऊ शकते.
तुम्हाला वाटते की उत्सव हा केवळ गोंगाटात असतो आणि शांतता म्हणजे केवळ शोक असतो. जेव्हा लोक उत्सव साजरा करतात, तेव्हा ते खूप आवाज करतात आणि जेव्हा लोक मौन असतात, तेव्हा ते फक्त शोक करतात. कोणी मरण पावले, किंवा कोणी भयंकर स्थितीत आहे, मग ते मौन राहतात. आपल्या येथील उत्सव पूर्णपणे वेगळा आहे, आपले मौन पूर्णपणे उलट आहे. हे आनंदी असणे आणि तरीही मौन राहणे आहे. अशा प्रकारे आनंदाची सखोलता वाढते आणि खऱ्या अर्थाने शांतता आपल्या जीवनात एक प्रबळ शक्ती बनते. त्यामुळे हे मौन म्हणजे दुःखाचे मौन नाही आणि हा उत्सव केवळ अतिशय क्षुल्लक आणि वरवरचा नाही.
उत्सवाला सखोलता येण्यासाठी तुम्हाला मौनाची गरज आहे. शांतता तिच्या संपूर्ण वैभवात प्रकट होण्यासाठी, तुम्हाला उत्सवाची गरज आहे.
~ गुरूदेव श्री श्री रवि शंकर
नवरात्री जसजशी जवळ येते, तसतसे शक्य तितके मौनात राहण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करा आणि स्वतःसाठी फरक पहा. देवी मातेचा सन्मान होत असताना, स्वतःला तिच्या खऱ्या सामर्थ्यात बुडून जाण्याची आणि देवीच्या शाश्वत दैवी उर्जेची झलक पाहण्याची संधी द्या.