ललिता ही चेतनेची आनंदी, चैतन्यदाई आणि तेजस्वी अभिव्यक्ती आहे. तृष्णा(लोभ) आणि तिरस्कार नसलेली, ‘स्व’मध्ये सुस्थापित असलेली, स्वभावतः आनंदी आणि चेतनादाई अशी मुक्त चेतना आहे. हेच ललिताचे स्थान आहे.

ललिता सहस्रनाम काय आहे?

ललिता सहस्रनाम मध्ये आपण देवी मातेच्या हजार नावांचा जप करतो. नावांना विशेष महत्त्व आहे. जर आपण चंदनाच्या झाडाचा विचार केला तर त्याच्या सुगंधाची आपल्याला आठवण होते. त्याचप्रमाणे सहस्रनामातील देवीचे प्रत्येक नाव देवीच्या गुण विशेषांचे संदर्भ देते.

नामांचा जप केल्याने कशाप्रकारे मदत होते?

बाल्यावस्थेपासून तारुण्यापर्यंत वगैरे – आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या गरजा आणि इच्छा बदलतात. त्यासोबतच, आपल्या चेतनेच्या गुणवत्तेतही जमीन आसमानाचा बदल होतो. जेंव्हा आपण प्रत्येक नावाचा जप करतो तेंव्हा ते गुण आपल्या चेतनेमध्ये प्रकट होतात आणि काळानुरूप ते आपल्यामध्ये प्रकट होतात.

आपल्यातील गुणांना चैतन्यदाई करण्याबरोबरच, देवीच्या हजारो नामांचा जप केल्याने आपल्याला आपल्या सभोवतालच्या जगात त्यांची ओळख आणि प्रशंसा करण्याची क्षमता मिळते. हे आपणास आणखी परिपूर्ण आणि आणखी समृद्ध अस्तित्वाकडे घेऊन जाते.

सर्व वैविध्यपूर्ण गुणांसह देवत्वाची उपासना करून परिपूर्ण जीवन जगण्याचा मार्ग दाखवल्याबद्दल आम्ही आमच्या प्राचीन सिद्धपुरुषांचे आभारी आहोत.

सहस्रनाम मंत्रघोष हा स्वतः एक विधी आहे. हे मन शुद्ध करते आणि चेतना उन्नत करते. हा मंत्र आपल्या भटकणाऱ्या मनाला स्थिर करतो. जरी तो केवळ अर्ध्या तासापुरताच असला तरी, मन केंद्रित आणि एका देवत्वावर आणि त्याच्या गुणधर्मांवर केंद्रित होते; ते भटकणे थांबवते. हा विश्रांतीचा नैसर्गिक प्रकार आहे.

ललिता सहस्रनामाच्या भाषेबद्दल उल्लेखनीय असे काय आहे?

सहस्त्रनामामध्ये भाषा सौन्दर्य आहे. वाणी सुंदर आहे आणि तिला सखोल अर्थ आणि लौकीक (लिप्यंतरण) दोन्ही अर्थ आहे. उदाहरणार्थ, कमळ-नयन एक सुंदर आणि शुद्ध दृष्टी दर्शवतात. चिखलात कमळ उगवते. तरीही ते सुंदर आणि शुद्ध असते. कमळा प्रमाणे नयन असलेली व्यक्ती या जगात जगू शकते आणि सर्व आव्हाने असूनही सौंदर्य आणि पावित्र्य पाहू शकते.

सहस्रनाममध्ये वर्णन केलेल्या विविध गुणवैशिष्ट्यांची माहिती आणि अर्थ या दोन्ही स्तरांची झलकाची अनुभूती मिळावी हाच ललिताचा उद्देश आहे. एका विशिष्ट गुणवत्तेचे विविध संदर्भ एकत्रितपणे ओवलेले आहेत. हे प्रत्येक गुणवत्तेचे अनेक पैलू सातत्यपूर्णपणे सादर करण्यात मदत करते.

आपण या ग्रहावर एका सुंदर आणि उद्दात्त उद्देशाने आलेलो आहोत हे माहिती असू द्या. जागरूकता आणि श्रद्धा यासह वाचताना, ललिता आपल्या चेतनेमध्ये शुद्धता आणि सुसंस्कृतपणा आणेल आणि आपल्याला सकारात्मकता, चैतन्याचे आणि आनंदाचे भांडार बनवेल. तर, आपण आनंद घेऊया आणि जगासाठी उल्हास बनूया.

श्री ललिता सहस्रनाम व्हिडिओ

~ भानुमती नरसिंहन, गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या भगिनी, ध्यान शिक्षिका; आर्ट ऑफ लिव्हिंगच्या महिला कल्याण आणि बाल संगोपन कार्यक्रमांच्या संचालिका; लेखिका

हा लेख ललिता सहस्रनामवर लिहिलेल्या पुस्तकामधील उतारा आहे.