तुम्ही नवरात्रीमध्ये उपवास कां करायला हवा?

रंगाची उधळण असलेला, परंपरा, गाणी आणि नृत्याने परिपूर्ण असलेला नवरात्रीचा काळ आपल्याला अंतर्मुखी होऊन स्वतःला नव्या ऊर्जेने भरून घेण्याचा आणि विश्राम करण्याचा देखील असतो. नवरात्री दरम्यान उपवास करण्याने  हा आनंदाकडे आणि सुखाकडे नेणारा प्रवास सहज होतो. उपवास मनाची अस्वस्थता कमी करून सजगता व आनंद आणतात.

उपवासाची प्रेरक शक्ती

आपण ईश्वराला खूष करण्यासाठी नाही तर आपले शरीर शुद्ध करण्यासाठी उपवास करतो.

~ गुरुदेव श्री श्री रवी शंकर

आयुर्वेदानुसार, उपवासामुळे आपला जठराग्नि जागृत होतो. वाढलेला जठराग्नि आपल्या शरीरातील विषारी द्रव्ये जाळून टाकतो. जेव्हा हे विषारी पदार्थ शरीरातून बाहेर टाकले जातात, तेव्हा शरीरातला आळस आणि जडपणा निघून जातो. शरीरातील सर्व पेशींचे पुनर्नवीकरण होते. म्हणूनच शरीर शुद्ध करण्यासाठी उपवास करणे परिणामकारक ठरते. जेव्हा शरीर शुद्ध बनते तेव्हा मन आणि शरीरातील संबंध दृढ बनतात. त्यामुळे मन शांत आणि निश्चल बनते.

उपवासामुळे जागृत झालेला जठराग्नि तणाव कमी करण्यास व प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतो.

आपल्यापैकी बरेचजण बहुतेकवेळा भूक लागण्याची वाट पाहत नाहीत. आपले शरीर अन्न पचविण्यासाठी तयार आहे याचे लक्षण म्हणजे भूक लागते. भूक लागण्यापूर्वीच अन्न घेतल्याने आपली पचन संस्था कमकुवत होते.परिणामी ताण आणि अशक्त प्रतिकारक्षमता तयार होते.उपवासामुळे जठराग्नि जागृत होवून ताण कमी करण्यास व प्रतिकारशक्ती दृढ करण्यास मदत करतो.

नवरात्री उपवासासोबत गहिऱ्या ध्यानात डुबकी मारा.

नवरात्रीचा काळ हा स्वतःसोबत वेळ घालवण्याचा, ध्यान करण्याचा आणि अस्तित्वाच्या मूळ स्त्रोतासोबत स्वतःला जोडण्याचा असतो. उपवासामुळे मनाची बेचैनी कमी होते तेव्हा अंतर्मुखी होऊन ध्यान करणे सोपे जाते. परंतु तुम्ही स्वतःला टवटवीत  ठेवण्यासाठी पर्याप्त प्रमाणात ताजी फळे व सात्विक अन्न खाणे आवश्यक आहे.

सात्विक बहराची फळे मिळवा.

उपवासासोबत ध्यान केल्याने आपले सत्व (स्थिरचित्तता आणि सकारात्मकतेची वैशिष्ट्ये) वाढते. सत्व वाढल्यामुळे आपले मन शांत आणि जागृत राहते. परिणामी आपली उदिद‌ष्टे आणि प्रार्थना जास्त शक्तिशाली बनतात. सत्वाचा बहर आपल्या शरीराला हलके आणि ऊर्जावान बनवतो. आपण जास्त कार्यक्षम बनतो. परिणामतः आपल्या इच्छा पूर्ण होतात आणि आपली कामे सहज पूर्ण होतात.

जगभरातील सर्व धर्मांमध्ये उपवासासोबत प्रार्थना करण्याची प्रथा कां आहे? कारण जेव्हा तुम्ही उपवास करता तेव्हा तुम्ही शुद्ध बनता आणि तुमची प्रार्थना सखोल आणि खरी बनते.

~ गुरुदेव श्री श्री रवी शंकर

सूचना : काही शरीर रचना आणि स्वास्थ्य परिस्थितीमध्ये उपवास करण्याची शिफारस केली जात नाही. त्यामुळे उपवास करण्याआधी तुमच्या आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घेणे योग्य ठरते. तसेच तुम्हांला आरामदायी ठरेल इतकाच उपवास करावा हे ही लक्षात ठेवा.

या नवरात्री 2024, या आणि लाइव्ह नवरात्री उत्सवात सामील व्हा.