देवी किंवा दैवी आई ही एक शक्ती आहे जिणे संपूर्ण ब्रह्मांडाला जन्म दिला आहे. ज्यामध्ये दूरवर दिसणाऱ्या लाखो ताऱ्यांपासून सूक्ष्म मन आणि त्याच्या भावनांचा समावेश आहे. त्याला शक्ती म्हणजेच ऊर्जा म्हणतात, आणि निर्माण केलेले हे सर्व दैवी आई स्वतः चालवते सुद्धा.
नवरात्री मध्ये आपण ही शक्ती अनुभवू शकतो. त्यासाठी दैवी आई ची सर्व नावे आणि रूपे यांची पूजा करणे हा एक मार्ग आहे.
दैवी शक्ती ही सर्वत्र आहे पण ती सुप्त आहे. पूजा केल्याने ती जागृत होते.
– गुरुदेव श्री श्री रविशंकर
दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती
दैवी आईची किंवा शक्तीची तीन रूपे आहेत : दुर्गा, संरक्षण करणारी देवी, लक्ष्मी, संपत्ती देणारी देवी, सरस्वती, ज्ञान देणारी देवी. नवरात्रीच्या नऊ रात्रींमध्ये या तीन रूपांना आवाहन केले जाते.
दुर्गा
नवरात्रीतले पहिले तीन दिवस देवीच्या या रूपासाठी साजरे केले जातात. दुर्गेच्या सहवासात नकारात्मकता पळून जाते. दुर्गा ही नकारात्मकतेला सकारात्मकतेत बदलवते.
दुर्गेला ” जय दुर्गा ” असेही म्हणतात किंवा अशी देवी जी विजय आणते. खालील काही गोष्टी दुर्गेशी संबंधित आहेत.
- लाल रंग
दुर्गा लाल रंगाशी संबंधित आहे. तिने लाल रंगाची साडी परिधान केलेली आहे. लाल हा गतिमानशीलतेचा रंग आहे – गतिशील ऊर्जा. तुम्ही कितीही शिकलेले किंवा कुशल असलात तरी जर तुम्ही एखादी एखादी वस्तू किंवा व्यक्ती बदलवू शकला नाहीत , एकसंघपणे प्रयत्न करू शकला नाहीत तर कामास विलंब होईल तुम्ही प्रभावी ठरणार नाहीत. जेव्हा आपण दुर्गेची आराधना करतो तेव्हा ती आपल्याला गतिमान बनवते आणि कामे होतात.
- नव दुर्गा
नव दुर्गा म्हणजे दुर्गा देवीचे नऊ पैलू जे नकारात्मकते पासून आपले संरक्षण करते. देवीच्या या गुणांचे स्मरण केल्याने मनातील अडथळे निघून जातात. या नावांचे पठण केल्याने चेतना उंचावते आणि आपण केंद्रित, धैर्यवान आणि स्थिर रहातो. खासकरून ज्यांना चिंता, भीती, कमी आत्मविश्वास आहे त्यांना याचा खूप फायदा होतो.
- दुर्गेचे महिषासुर मर्दीनी रूप
महिषासुर मर्दीनीच्या रूपात देवी दुर्गेने महिषासुराचा वध केला. महिषा म्हणजे म्हैस , जी आळशीपणा, मरगळ आणि स्थूलपणाचे प्रतीक आहे. हे गुण अध्यात्मिक आणि भैातिक प्रगतीसाठी हानिकारक आहेत. देवी सकारात्मक्तेचे स्रोत आहे आणि तिच्या सहवासात आळस अथवा जडत्व नष्ट होते.
लक्ष्मी
नवरात्रीच्या पुढील तीन दिवसात देवीच्या लक्ष्मी या रूपाचे पूजन होते. लक्ष्मी ही संपत्ती आणि सुबत्तेची देवी आहे. आपल्याला जीवनात प्रगती करण्यासाठी आणि स्थिरता प्राप्त करण्यासाठी संपत्ती आवश्यक आहे. संपत्ती म्हणजे फक्त पैसा नव्हे. त्यात ज्ञान, कुशालता, प्रतिभा या गोष्टी सुध्दा येतात. लक्ष्मी ही एक शक्ती आहे जी आपल्या आयुष्यात संपूर्ण अध्यात्मिक आणि भौतिक सुबत्ता आणते.
लक्ष्मी ची आठ रूपे आपल्यावर कृपा करोत :
- आदी लक्ष्मी
म्हणजे आपल्या मुळाचे स्मरण होणे. जेव्हा आपण हे विसरतो की आपण या संपूर्ण रचनेचा भाग आहोत तेव्हा आपण स्वतःला लहान आणि असुरक्षित वाटतो. आदी लक्ष्मी ही एक अशी ऊर्जा आहे जी आपल्याला आपल्या मुळाशी जोडते व आपल्याला मनाने सशक्त व शांत बनवते.
- धन लक्ष्मी
हे रूप भौतिक संपत्तीशी जोडले गेले आहे.
- विद्या लक्ष्मी
हे रूप ज्ञान, कुशलता, प्रतिभा यांच्याशी जोडले गेले आहे.
- धान्य लक्ष्मी
देवीचे हे रूप अन्नधान्य संपत्ती देते.
- संतान लक्ष्मी
देवीचे हे रूप संतती आणि सृजनात्मकता देते. जे लोक खूप सृजनशील, कुशल आणि प्रतिभावान असतात त्यांना या लक्ष्मीचा वर असतो.
- धैर्य लक्ष्मी
ही लक्ष्मी आपल्याला धैर्य देते.
- विजया लक्ष्मी
ही लक्ष्मी कोणत्याही कामात यश मिळण्यासाठी वर देते.
- भाग्य लक्ष्मी
देवीचे हे रूप चांगले भाग्य आणि सुबत्ता देते.
प्रत्येकाच्या आयुष्यात लक्ष्मी देवी वेगवेगळ्या रूपाने आशीर्वाद देत राहो. नवरात्रीच्या या तीन दिवसांत आपण देवी लक्ष्मीला प्रार्थना करतो की ती आपल्यावर वरील सगळ्या रूपांत प्रसन्न राहो.
सरस्वती
नवरात्रीचे शेवटचे तीन दिवस हे सरस्वती देवीशी जोडले गेले आहेत.
सरस्वती ही विद्येची देवी आहे – जी आपल्याला आपल्या स्व चे सार सांगते. अनेक गोष्टी सरस्वती देवी शी जोडल्या गेल्या आहेत ज्या आपल्याला तिच्याबद्दल अधिक माहिती देतात.
खडक : सरस्वती नेहमी दगडावर बसलेली दिसते. ज्ञान हे दगडासारखेच आपल्याला आधार देते आणि आपल्याबरोबर नेहमी रहाते.
वीणा : सरस्वती देवीच्या हातात भारतीय पुरातन वाद्य वीणा आढळते, जिचा आवाज मन संतुलित आणि शांत करतो तसेच अध्यात्मिक ज्ञान आपल्याला आराम देते आणि जीवन उत्सव बनवते.
हंस : हे सरस्वती चे वाहन आहे. असे म्हणतात जर आपण दूध आणि पाणी एकत्र केले तर हंस त्यातील केवळ दूध पितो . यातून सदसद्विवेक बुद्धी दिसून येते, जी वापरून आपण आयुष्यात सकारात्मक गोष्टी घेऊ शकतो आणि नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करू शकतो.
मोर : मोर हा नेहमी सरस्वती बरोबर असतो. मोर फक्त पाऊस पडण्यापूर्वीच नृत्य करतो आणि आपल्या सगळ्या रंगछटा दाखवतो. दैवी ऊर्जा आपल्याला योग्य वेळी योग्य वातावरणात योग्य ज्ञान देण्यासाठी पात्र बनवते.
सरस्वती देवी म्हणजे एक चेतना जी वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण आपल्याला देते. ती अध्यात्मिक ज्ञानाचा स्रोत आहे, आपल्याला अज्ञानाच्या अंधक्कारातून बाहेर काढते आणि ती विद्येचा स्रोत आहे.
जेव्हा आपण नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीचे स्तोत्र म्हणतो, नाव घेतो, तिच्या गुणांचे गोडवे गातो, तेव्हा देवीचे गुण आपल्यात देखील येतात आणि वेळ आल्यावर ते प्रकट होतात.
~ भानुमती नरसीम्हन, गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या भगिनी