असे मानले जाते की, हजारो वर्षांपूर्वी, एका तरुणीला जेव्हा जाणीव झाली की तिचे जीवन अरुप चेतनेतून उत्पन्न झाले आहे आणि ते प्रत्येक स्वरूपात उपस्थित आहे, तेव्हा तिचे जीवन कायमचे बदलून गेले आणि परमानंदात तिने नाचायला सुरुवात केली. त्या चैतन्याची स्तुती करताना या परमानंदाची उत्स्फूर्त अभिव्यक्ती होती जी आज आपण ‘या देवी सर्वभूतेषु’ म्हणून ओळखतो.
संगीतकार ऋषी वाक यांनी मानवी अस्तित्वाचा प्रत्येक भाग टिपला आहे आणि त्याचे श्रेय दैवी मातेला दिले आहे. ऋग्वेदात उगम झालेला हा मंत्र दैनंदिन नवरात्रीच्या प्रार्थना आणि साधनेचा एक भाग बनला आहे. साधे आणि प्रगल्भ.
या देवी सर्व भूतेषुचे महत्त्व
देवीचे मंत्र सखोल पैलू प्रकट करतो जे बर्याचदा चुकतात. गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या मते, मंत्र संपूर्ण विश्वात आणि काळातील देवीची उपस्थिती दर्शवतो.आपल्या आवडीच्या आणि नापसंत गोष्टी, लोक आणि परिस्थितीमध्ये देवीच्या उपस्थितीचा संदेश देऊन, मंत्राचा उद्देश भक्तामध्ये अपरिवर्तनीय समता निर्माण करणे आहे. देवी सर्वत्र आणि प्रत्येक वेळी कशी असते हे समजून घेऊया.
- सर्वव्यापी: देवी प्रत्येकामध्ये चैतन्यस्वरूपात उपस्थित आहे. अशी कोणतीही जागा नाही की जी देवीने व्याप्त नाही.
- सर्व स्वरूपात: निसर्ग आणि त्यातील विकृती ही सर्व देवीची रूपे आहेत. सौंदर्य, शांती ही सर्व देवीची रूपे आहेत. राग आला तरी तो देवीच आहे. जर तुम्ही भांडण केले तर ते पण देवीच आहे.
- प्राचीन आणि नूतन: प्रत्येक क्षण चैतन्याने जिवंत असतो. आपली चेतना ‘नित्य नूतन’ असून ती एकाच वेळी प्राचीन आणि नवीन आहे. वस्तू एकतर जुन्या किंवा नवीन असतात, परंतु निसर्गात तुम्हाला जुने आणि नवीन एकत्र अस्तित्वात असलेले सापडतील. सूर्य जुना आणि नवीनही आहे. एका नदीत प्रत्येक क्षणी ताजे पाणी वाहते, परंतु तरीही ती नदी खूप जुनी असते. त्याचप्रमाणे मानवी जीवन खूप प्राचीन आहे पण त्याच वेळी ते नवीन आहे. तुमचे मनही तसेच आहे.
या देवी सर्वभूतेषु
मंत्राचे बोल आणि अर्थ
या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
सर्व प्राणीमात्रांमध्ये उपस्थित असलेल्या त्या देवीला विष्णुमाया म्हणतात,
तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला नमस्कार, पुनःपुन्हा नमस्कार.
या देवी सर्वभूतेषु चेतनेत्य भिधीयते।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
त्या देवीला जी सर्व प्राणिमात्रांमध्ये चैतन्याच्या रूपात प्रतिबिंबित होते,
तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला नमस्कार, पुनःपुन्हा नमस्कार.
या देवी सर्वभूतेषु बुद्धि-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
त्या देवीला जी सर्व प्राणिमात्रांमध्ये बुद्धीच्या रूपाने विराजमान आहे,
तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला नमस्कार, पुनःपुन्हा नमस्कार.
या देवी सर्वभूतेषु निद्रा-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
त्या देवीला जी सर्व प्राणिमात्रांमध्ये निद्रेच्या रूपात विराजमान आहे,
तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला नमस्कार, पुनःपुन्हा नमस्कार.
या देवी सर्वभूतेषु क्षुधा-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
त्या देवीला जी सर्व प्राणिमात्रांमध्ये क्षुधेचे रूपात विराजमान आहे,
तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला नमस्कार, पुनःपुन्हा नमस्कार.
या देवी सर्वभूतेषु छाया-रुपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
त्या देवीला जी सर्व प्राणिमात्रांमध्ये सावलीच्या रूपात (उच्च आत्मस्वरूपात) वावरत आहे,
तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला नमस्कार, पुनःपुन्हा नमस्कार.
या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
त्या देवीला जी सर्व प्राणिमात्रांमध्ये शक्तीच्या रूपात विराजमान आहे,
तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला नमस्कार, पुनःपुन्हा नमस्कार.
या देवी सर्वभूतेषु तृष्णा-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
त्या देवीला जी सर्व प्राणिमात्रांमध्ये तृष्णेच्या रूपात विराजमान आहे,
तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला नमस्कार, पुनःपुन्हा नमस्कार.
या देवी सर्वभूतेषू क्षान्ति रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
त्या देवीला जी सर्व प्राणिमात्रांमध्ये सहनशीलतेच्या रूपात विराजमान आहे,
तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला नमस्कार, पुनःपुन्हा नमस्कार.
या देवी सर्वभूतेषू जाति रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
त्या देवीला जी सर्व प्राणिमात्रांमध्ये वंशाच्या (सर्वांचे मूळ कारण) रूपात राहते,
तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला नमस्कार, पुनःपुन्हा नमस्कार.
या देवी सर्वभूतेषू लज्जा-रुपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
त्या देवीला जी सर्व प्राणिमात्रांमध्ये विनयशीलतेच्या रूपात वावरत आहे,
तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला नमस्कार, पुनःपुन्हा नमस्कार.
या देवी सर्वभूतेषु शांति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
त्या देवीला जी सर्व प्राणिमात्रांमध्ये शांततेच्या रूपात विराजमान आहे,
तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला नमस्कार, पुनःपुन्हा नमस्कार.
या देवी सर्वभूतेषु श्रद्धा-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
त्या देवीला जी सर्व प्राणिमात्रांमध्ये श्रद्धेच्या रूपात विराजमान आहे,
तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला नमस्कार, पुनःपुन्हा नमस्कार.
या देवी सर्वभूतेषू कान्ति रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
त्या देवीला जी सर्व प्राणिमात्रांमध्ये प्रेम आणि सौंदर्याच्या रूपात विराजमान आहे,
तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला नमस्कार, पुनःपुन्हा नमस्कार.
या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
त्या देवीला जी सर्व प्राणिमात्रांमध्ये सौभाग्यस्वरूपात विराजमान आहे,
तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला नमस्कार, पुनःपुन्हा नमस्कार.
या देवी सर्वभूतेषु व्रती-रुपेणना संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
त्या देवीला जी सर्व प्राणिमात्रांमध्ये क्रियाशीलतेच्या रूपात विराजमान आहे,
तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला नमस्कार, पुनःपुन्हा नमस्कार.
या देवी सर्वभूतेषु स्मृती-रुपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
त्या देवीला जी सर्व प्राणिमात्रांमध्ये स्मृतीच्या रूपात विराजमान आहे,
तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला नमस्कार, पुनःपुन्हा नमस्कार.
या देवी सर्वभूतेषु दया-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
त्या देवीला जी सर्व प्राणिमात्रांमध्ये दयेच्या रूपाने विराजमान आहे,
तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला नमस्कार, पुनःपुन्हा नमस्कार.
या देवी सर्वभूतेषु तुष्टि-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
त्या देवीला जी सर्व प्राणिमात्रांमध्ये समाधानाच्या रूपात विराजमान आहे,
तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला नमस्कार, पुनःपुन्हा नमस्कार.
या देवी सर्वभूतेषु मातृ-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
त्या देवीला जी सर्व प्राण्यांमध्ये मातेच्या रूपात विराजमान आहे,
तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला नमस्कार, पुनःपुन्हा नमस्कार.
या देवी सर्वभूतेषु भ्राँति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
जी देवी सर्व प्राणिमात्रांमध्ये भ्रांतीच्या रूपात वावरत आहे,
तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला नमस्कार, पुनःपुन्हा नमस्कार.
इन्द्रियाणा मधिष्ठात्री भूतानां चाखिलेषु या।
भूतेषु सततं तस्यै व्याप्तिदेव्यै नमो नमः॥
(नमस्कार) त्या देवीला जी सर्व जगतातील प्राणिमात्रांच्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवते,
सर्व प्राणिमात्रांमध्ये सदैव व्याप्त असणाऱ्या देवीला वंदन.
चितिरुपेण या कृत्स्नम एतत व्याप्य स्थितः जगत।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
(तिला वंदन) जी चैतन्याच्या रूपाने या विश्वात व्यापते आणि त्यात वास करते,
तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला नमस्कार, पुनःपुन्हा नमस्कार.