सुदर्शन क्रिया™ हे श्वास घेण्याचे एक अनोखे तंत्र आहे, जे तणाव, थकवा तसेच राग, वैफल्य आणि नैराश्य यासारख्या नकारात्मक भावनांना दूर करते, ज्यामुळे तुम्हाला शांत असूनही उत्साही वाटते तसेच केंद्रित असलेले निवांत मन लाभते. सुदर्शन क्रियेत™ श्वासाच्या विशिष्ट नैसर्गिक लयींचा समावेश असतो. ज्यायोगे शरीर, मन आणि भावना यांचा आपसात सुसंवाद साधला जातो. सुदर्शन क्रियेच्या™ नियमित सरावामुळे आणि आपल्या जीवनशैलीत काही बदल करत, जगभरातील अनेक लोक आपल्या सर्व नियमित जबाबदाऱ्या पार पाडत तणावमुक्त जीवन जगत आहेत.

आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकर यांना १७ सप्टेंबर १९८१ रोजी शिमोगा येथील भद्रा नदीच्या काठावर दहा दिवसांच्या मौन आणि उपवासानंतर सुदर्शन क्रिया™ प्राप्त झाली. आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकर, सुदर्शन क्रिया™ कशा प्रकारे कार्य करते हे स्पष्ट करतात: “श्वास शरीर आणि मन यांना जोडतो”. प्रत्येक भावनेसाठी, श्वासात एक अनुरूप लय असते. ज्याप्रमाणे भावनांचा आपल्या श्वासोच्छवासाच्या लयीवर परिणाम होतो, त्याचप्रमाणे आपण आपल्या श्वासाच्या लयीत बदल करून आपल्या मानसिक आणि वर्तवणुकीच्या पद्धतींमध्ये बदल घडवून आणू शकतो. यामुळे राग, अस्वस्थता आणि चिंता दूर होतात आणि मन पूर्णपणे निवांत आणि उत्साही होते.

श्वासाची लय

तुमच्या शरीर आणि मनाची विशिष्ट लय असते. उदाहरणार्थ, तुम्हाला वेगवेगळ्या विशिष्ट वेळी भूक लागते आणि झोप घेण्याची गरज वाटते.

श्री श्री रविशंकर स्पष्ट करतात: “निसर्गात एक लय आहे. त्याचप्रमाणे शरीरात आणि भावनांमध्ये (मनाची) लय असते. जर तुम्ही तुमच्या विचारांचे निरीक्षण केले तर तुम्हाला दिसेल की तुमच्या शंका आणि चिंतांनाही एक लय आहे. वर्षभरात एक विशिष्ट वेळ अशी असते जेव्हा तुम्ही तीच विशिष्ट भावना अनुभवत असता. सुदर्शन क्रिया™ शरीर आणि मन यांच्यातील सुसंवाद पुन्हा रुळावर आणते. जेव्हा या लयी सुसंगत असतात, तेव्हा आपल्याला एकरूपता आणि स्वस्थतेची भावना जाणवते. आणि जेव्हा या लयीत सुसंगती नसते, तेव्हा आपण अस्वस्थता आणि असमाधान अनुभवतो.”

आपल्या श्वासात प्रत्येक भावनेसाठी, त्याला अनुरूप अशी लय असते. ज्याप्रमाणे भावनांचा आपल्या श्वासोच्छवासाच्या गती व लयीवर परिणाम होतो, त्याचप्रमाणे आपण आपल्या श्वासाच्या लयीत बदल करून आपल्या मानसिकतेच्या आणि वागणुकीच्या साच्यामध्ये बदल घडवून आणू शकतो.

~ गुरुदेव श्री श्री रवि शंकर

ते पुढे म्हणतात: “सुदर्शन क्रिया™ नंतर बऱ्याच लोकांना इतके शुद्ध आणि स्पष्ट, आणि इतके परिपूर्ण वाटते, कारण ती शुद्ध चेतना जी या परक्या ऐहिक जगतात अडकलेली होती, त्यातून ती मुक्त होते आणि जणू स्वगृही येते. ती शुद्धतेची संवेदना असते, शुद्धतेची भावना असते. आपल्याला स्वतःमध्ये आत शुद्धीकरण प्रक्रिया करणे गरजेचे असते. झोपेत आपण थकवा दूर करतो, परंतु गहिरे ताणतणाव आपल्या शरीरात आणि मनात तसेच दडून असतात. सुदर्शन क्रिया™ आपल्या शरीरप्रणालीला आतून स्वच्छ करते.” सुदर्शन क्रियेद्वारे गहिरे तणावाचे व्रण दूर केल्याने होणारे मन आणि शरीराचे फायदे १०० हून अधिक स्वतंत्र शोधप्रबंधांनी दर्शविले आहेत.

सुदर्शन क्रिया™ केल्याने खालील फायदे होतात:

  1. अस्वस्थता, नैराश्य, अभिघातजन्य तनाव विकार (पोस्ट-ट्रॉमॅटिक-स्ट्रेस डिसऑर्डर) आणि तणावाच्या लक्षणांपासून मुक्ती होते.
  2. आवेग आणि व्यसनाधीन वर्तन कमी होते.
  3. आत्म-सन्मान आणि जीवन समाधान सुधारते.
  4. मानसिक एकाग्रता वाढवते.
  5. चांगली झोप येते.
  6. रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
  7. रक्तदाब कमी होतो.
  8. श्वसन कार्य सुधारते.

सुदर्शन क्रियेवरील संशोधन पहा.

सुदर्शन क्रिया™ कोण शिकू शकतो आणि करू शकतो?

ज्यांना आपले जीवनमान उंचवायचे आहे आणि तणावमुक्त जीवन जगायचे आहे ते सुदर्शन क्रिया™ करू शकतात. सर्व स्तरातील आणि सर्व वयोगटातील लोक सुदर्शन क्रियेचे™ फायदे अनुभवत आहेत. विद्यार्थी आणि कार्यरत व्यावसायिकांनी एकाग्रता आणि उत्पादकता अनुभवली आहे. उद्योजक आणि गृहिणींनी उत्तम ऊर्जा स्तर आणि आरोग्य अनुभवले आहे. पूर्वीचे अतिरेकी आणि तुरुंगातील कैद्यांनी हिंसक प्रवृत्ती सोडून समाजाच्या मुख्य धारेत आपले पुनर्वसन करून घेतले आहे. युद्धातील शरणार्थी आणि हिंसाचाराचे बळी त्यांचे भूतकाळातील आघात सोडण्यात आणि आपले नियमित जीवन जगण्यास सक्षम आहेत.

सुदर्शन क्रिया™ केल्याने होणाऱ्या तत्काळ फायद्यांचा खाली सारांश आहे.

6 ways to make your relationships stronger

गहिरे शुद्धीकरण आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवते

श्वासोच्छवासाद्वारे शरीरातील 90% विषाक्त पदार्थ बाहेर टाकले जाऊ शकतात. सुदर्शन क्रियेचा™ लयबद्ध श्वास शरीराला अगदी पेशीय स्तरावर सुद्धा शुद्ध (डिटॉक्सिफाय) करतो. शोधातून असे दिसून आले आहे की सुदर्शन क्रिया™ शरीरातील नैसर्गिक किलर पेशींची संख्या वाढवते, ज्यामुळे सूक्ष्मजीव संक्रमण आणि ट्यूमरचा प्रसार मर्यादित होतो. त्यामुळे याच्या सरावाने रोगप्रतिकारशक्ती वाढते.

social anxiety women depression

तणाव, चिंता आणि नैराश्यापासून मुक्तता

आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे आजच्या स्पर्धेच्या जगात खूप महत्वाचे आहे. कारण तुम्ही तसे न केल्यास, तुम्हाला काही कळण्यापूर्वीच तुमची पुरती दमछाक झालेली असेल. सुदर्शन क्रियेचा™ दररोज २० मिनिटांचा सराव कोर्टिसोल या तणाव संप्रेरकाची पातळी लक्षणीयरीत्या कमी करण्यास मदत करतो. नैराश्य आणि अस्वस्थतेच्या लक्षणांपासून मुक्त होण्यासाठी सुदर्शन क्रिया™ किती प्रभावी आहे हे अनेक अभ्यासांनी दाखविले आहे.

Quick Tips For a Better Sleep

चांगली झोप

शरीरातील ऊती आणि अवयवांच्या पुनरुज्जीवनासाठी दर्जेदार झोप आवश्यक आहे. गाढ झोप नसेल तर त्याचा तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही परिणाम होतो. दैनंदिन सुदर्शन क्रियेचा™ सराव गाढ झोपेसाठी सोपा मार्ग आहे. श्वासोच्छवासाचे हे तंत्र झोपेची गुणवत्ता तीन पटीने सुधारण्यास मदत करते.

Meditation - Open hands with rising sun

मजबूत हृदय

जगभरातील हृदयविकाराच्या आजारापैकी अंदाजे ६०% भारताचा वाटा आहे. आपली जीवनशैली आपल्याला दररोज आपल्या हृदयाची काळजी घेण्यास भाग पडते. सुदर्शन क्रियेचा™ सराव हा तुमचे हृदय मजबूत करण्यासाठीचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. अभ्यासात असे दिसून आले आहे की याच्या सरावाने हृदय गती आणि रक्तदाब कमी होतो. यामुळे कोलेस्टेरॉल प्रोफाइल आणि श्वसन कार्य देखील सुधारते.

दररोज २० मिनिटे सुदर्शन क्रियेचा™ सराव कॉर्टिसॉल या तणाव संप्रेरकाची पातळी लक्षणीयरीत्या कमी करण्यास मदत करतो.

~ गुरुदेव श्री श्री रवि शंकर

सुदर्शन क्रिया™ कशी गवसली

गुरुदेव श्री श्री रविशंकर ज्यांना १९८१ मध्ये सुदर्शन क्रिया ™ गवसली. ते सांगतात की त्यांना १० दिवस मौनात राहण्याची प्रेरणा कशी मिळाली: “मी आधीच जगभर प्रवास केलेला होता. मी योग आणि ध्यान शिकवले होते. पण तरीही, लोकांना आनंदाने जगण्यासाठी कशी मदत करावी याबद्दल मी विचार करत होतो. मला काहीतरी उणीव जाणवत होती. लोक आपली आध्यात्मिक साधना करत असले तरी त्यांचे जीवन कप्प्यात विभागलेले असते. जेव्हा ते प्रत्यक्ष आयुष्य जगत असतात तेव्हा ते खूप वेगळे लोक असतात. त्यामुळे, आंतरिक शांतता आणि जीवनाची बाह्य अभिव्यक्ती यातील अंतर आपण कसे भरून काढू शकतो याचा विचार करत होतो. मौनादरम्यान, सुदर्शन क्रिया™ एक प्रेरणा म्हणून आली. काय द्यायचे आणि कधी द्यायचे हे निसर्गाला माहीत असते. मी मौनातून बाहेर आल्यानंतर मला जे माहीत होते ते शिकवायला सुरुवात केली आणि लोकांना खूप छान अनुभव आले. त्यांना आतून स्पष्ट वाटू लागले.”

अखेरीस सुदर्शन क्रिया™ त्याच वर्षी गुरुदेवांनी स्थापन केलेल्या आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेच्या सर्व कार्यक्रमांचा आधारस्तंभ बनली.

    Hold On!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

    *
    *
    *
    *