दालचीनी चे फायदे | 5 Health Benefits of Cinnamon in Marathi

दालचीनी चे फायदे | 5 Health Benefits of Cinnamon in Marathi

१.पचन विकार | Digestive disorders

२.सर्दीसाठी | Cough and cold

३. स्त्रीरोग | Gynaecological benefits

४. स्वयंपाकाची लज्जत वाढवण्यासाठी | Adding flavor to food

५. इतर उपयोग | Other health benefits

दालचीनी चे​ घटक पदार्थ | Ingredients in Cinnamon in Marathi

खबरदारी |Precautions to take while using Dalchini

Introduction

दालचिनीचे झाड सदाहरित आणि छोट्या झुडूपासारखे असते.पूर्ण वाढलेले झाड ६ ते १५ मी.उंचीचे असते.त्याच्या खोडाची साल निवडून घेऊन वाळवतात.त्यांचा आकार कौलासारखा गोल,जाड,मऊ आणि तांबूस रंगाचा असतो.

दालचिनीची पैदास कोणत्याही प्रकारच्या जमिनीत होऊ शकत असल्याने अत्यंत सुपीक जमिनीपासून मुरुमाड, रेताड जमिनीत दालचिनी पिकते.

दालचिनी हे बागायती पिक असले तरीदेखील समुद्र सपाटी पासून १००० मी.उंचीवर हे पिक कोठेही घेतले जाते. दालचीनिला सुगंध असतो.यांचा वापर सर्वत्र मसाल्याचा पदार्थ आणि औषधी म्हणून करतात.याचे तेल ही काढले जाते.दालचिनीची पाने देखील ‘तेजपत्र‘ म्हणून मसाल्यात वापरतात.

दालचीनी चे फायदे | 5 Health Benefits of Cinnamon in Marathi

दालचिनी चवीला तिखट-गोड असते. दालचिनी उष्ण, दीपन, पाचक, मुत्रल, कफनाशक, स्तंभक गुणधर्माची आहे.मनाची अस्वस्थता कमी करते.यकृताचे (Liver)कार्य सुधारणा करते.स्मरणशक्ती (Memory) वाढवते. दालचिनीचे उष्मांक मूल्य ३५५ आहे.

 


पचन विकार | Digestive Disorders

पचन सुधारण्यासाठी आणि पोटाचा गॅस कमी करण्यासाठी दालचिनीचे 3 विविध प्रयोग

  • अपचन (Indigestion), पोटदुखी आणि अजीर्ण कमी होण्यासाठी दालचिनी, सुंठ, जिरे आणि वेलदोडे सम प्रमाणात घेऊन बारीक करून गरम पाण्यासोबत घ्यावे.
  • दालचिनी, मिरीपूड आणि मध हे मिश्रण जेवणानंतर घेतल्यास पोट फुगत नाही.
  • दालचिनीमुळे मळमळ, उलटी आणि जुलाब थांबतात.

सर्दीसाठी | Cough and cold

चिमुटभर दालचिनी पूड पाण्यात उकळून त्यात चिमुटभर मिरीपूड आणि मध टाकून घेतले असता जुनाट सर्दी, सुजलेला घसा आणि मलेरिया कमी होतो.


स्त्रीरोग | Gynaecological benefits

3 different ways in which Dalchini can help in overcoming gynaecological problems

  • अंगावरून जाणे, गर्भाशयाचे विकार आणि गनोरिया यावर दालचिनी उपयुक्त आहे.
  • प्रसुतीनंतर महिनाभर दालचिनीचा तुकडा चघळल्याने लवकर गर्भ धारणा होत नाही.
  • दालचिनीमुळे स्तनातील दुध वाढते.गर्भाशय संकोच होतो

स्वयंपाकाची लज्जत वाढवण्यासाठी | Adding flavor to food

जेवणाची लज्जत वाढविण्यासाठी दालचिनीचे २ प्रयोग

  • दालचिनीची पाने आणि अंतर्साल केक (Cake),मिठाई ( Sweets ) आणि स्वयंपाकाची लज्जत वाढवण्यासाठी वापरतात.
  • दालचिनीचे तेल सुगंधी द्रव्यात,मिठाईत आणि पेयात वापरतात.

इतर उपयोग | Other health benefits

  • थंडीमुळे डोके दुखत असेल तर दालचिनी पाण्यात वाटून लेप लावावा.
  • मुख दुर्गंधी आणि दातासाठीच्या औषधांमध्ये दालचिनी वापरतात.
  • मुरुमे(Pimples) जाण्यासाठी दालचिनीचे चूर्ण लिंबाच्या रसात मिसळून लावावे.
  • गोवरप्रतिबंधक म्हणून दालचिनी वापरली जाते.
  • दालचिनी,मिरीपूड आणि मध हे मिश्रण जेवणानंतर घेतल्यास पोट फुगत नाही.

दालचीनी चे​ घटक पदार्थ | Ingredients in Cinnamon in Marathi

शास्त्रीय नांव : Cinnamomum verum

संस्कृत : त्वाक

इंग्रजी : Cinnamon

प्रोटीन | Protienथायामीन |Thayamin
कार्बोहायड्रेट |Carbohydrateरिबोफ्लेविन |Reboflewin
फॉस्फरस |Phosphorusनिआसीन | Niasin
सोडियम |Sodiumजीवनसत्व ‘अ’ & ‘क’ | Vitamin A & C
पोटॅशियम | Potassiumनमी & एश

दालचिनीमध्ये आर्द्रता, प्रथिने (Protien), स्निग्ध पदार्थ,कर्बोदके (Carbo Hydrade), भस्म आढळतात. दालचिनीमध्ये फॉस्फरस (Phosphorus), सोडियम (Sodium), पोटॅशियम (Potassium), थायामीन (Thayamin), रिबोफ्लेविन (Reboflewin), निआसीन (Niasin), ‘अ’ आणि ‘क’ हि जीवनसत्वे ( Vitamin A & C ) आहेत.


खबरदारी |Precautions to take while using Dalchini

  1. दालचिनी उष्ण असलेने उन्हाळ्यात वापर कमी करावा.
  2. दालचिनीमुळे पित्त वाढू शकते.
  3. उष्ण प्रकृतीच्या व्यक्तींनी वैद्यकीय सल्ला घ्यावा.