Gurudev Sri Sri Ravi Shankar

ऑनलाईन मेडिटेशन अँड ब्रेथ वर्कशॉप

जगातील सर्वात प्रभावशाली श्वसन प्रक्रिया शिका - सुदर्शन क्रिया™ ही जगभरातील ४५ दशलक्ष लोकांना आवडते आणि ते या प्रक्रियेची साधना करतात.

प्रतिकारशक्ती वाढवा • तणाव दूर करा • नातेसंबंध सुधारा • आनंदाने आणि उद्देशपूर्ण जगा

दररोज २ तास याप्रमाणे ४ दिवस
₹ 3,000*

*तुमचे योगदान, तुम्हाला आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सामाजिक योजणांसाठी लाभदायक आहे.

नोंदणी करा!

या शिबिरातून मला काय मिळेल?

icon

रोग प्रतिकारशक्ती आणि आरोग्य वाढवा

आपल्या स्वतःच्या श्वासाच्या सामर्थ्याने

हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती आणि एकूण ऊर्जा पातळी वाढवण्यासाठी प्रभावी तंत्रे शोधा.

icon

आपले मन व्यवस्थापित करण्याची क्षमता

प्राचीन बुद्धीने

कठीण बाह्य परिस्थितींना आणि तुमच्या स्वतःच्या विचारांना आणि भावनांना जागरूकतेने आणि शहाणपणाने सामोरे जा.

icon

तणाव, चिंता आणि नैराश्य दूर करा

संशोधन समर्थित सुदर्शन क्रिया™ सह

तणाव कमी करण्यासाठी, चिंता कमी करण्यासाठी आणि आव्हानांमध्येही आराम करण्याचे शक्तिशाली परंतु सोपे मार्ग जाणून घ्या.

icon

स्टॅमिना वाढला

योग आणि ध्यान सह

थकवा दूर करा आणि दिवसभरासाठी जे काही ठरवले आहे ते करण्यासाठी अधिक ऊर्जा आणि तग धरण्याची क्षमता अनुभवा.

सुदर्शन क्रिये™ बद्दल विज्ञान काय सांगते?

स्वतंत्रपणे संशोधन केलेल्या आणि जागतिक स्तरावर प्रकाशित झालेल्या १०० हून अधिक शोध पत्रकांनुसार फायदे असे आहेत:

३३%

६ आठवड्यांमध्ये वाढ

रोगप्रतिकार शक्ति

५७%

६ आठवड्यात कमी

तणाव निर्माण करणारे संप्रेरक

२१%

१ आठवड्यात वाढ

जीवनात समाधान

संस्थापक

गुरुदेव श्री श्री रवि शंकर

गुरुदेव श्री श्री रविशंकर हे जागतिक मानवतावादी, अध्यात्मिक नेते आणि शांतीदूत आहेत. तणाव मुक्त, हिंसा मुक्त समाजाच्या निर्मितीसाठी अभूतपूर्व अशा जागतिक चळवळीचे नेतृत्व ते करतात.

आणखी जाणून घ्या

मला नोंदणी करायची आहे परंतु...

या प्रक्रियेमुळे माझे आरोग्य सुधारेल का?

होय, नक्कीच! सुदर्शन क्रिया™ ची  नियमित  साधना झोप सुधारण्यासाठी, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि तणाव आणि नैराश्याची पातळी कमी करण्यासाठी नावाजली जाते. कार्यशाळेचा लाभ घेतलेल्या लोकांची ही प्रशंसापत्रे वाचून बघा. तुमचे आजार किंवा व्याधी तुमच्या शिक्षकांना आधीच सांगा जेणेकरून ते तुम्हाला चांगला आणि तुमच्यासाठी  योग्य असा अनुभव देऊ शकतील !

चार दिवसांची ऑनलाइन कार्यशाळा खरोखरच माझे जीवन बदलू शकते का?

जीवन क्षणार्धात बदलू शकते. एखाद्या प्रिय व्यक्तीसोबतचा एक क्षण किंवा गाडी चालवताना सजगता हरवलेला  एक क्षण, दोन्ही आयुष्य बदलून टाकू शकतात. एक "युरेका" क्षण केवळ तुमच्यासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी जीवन बदलणारा असू शकतो. तथापि, केवळ तुमचे जीवन बदलते असे नाही तर, ही कार्यशाळा तुम्हाला तुमचे जीवन स्वतः बदलण्यासाठी साधनांसह सुसज्ज करते. या चार दिवसांमध्ये तुम्ही सुदर्शन क्रिया शिकाल, जी जगभरातील लाखो लोकांकडून नियमित सराव केली जाणारी आणि व्यापक संशोधन केलेली प्रक्रिया किंवा तंत्र आहे. ज्यांनी याचा सराव केला आहे त्यांनी त्यांचे जीवन परिवर्तन करणारे अनुभव सांगितले आहेत.

तुम्हाला साप्ताहिक फॉलो-अप (सामूहिक सराव) सत्रांसाठी आजीवन मोफत प्रवेश मिळेल आणि मार्गदर्शनासाठी जगभरात प्रशिक्षक देखील उपलब्ध असतील. तुम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगच्या पुढील उच्चस्तरीय कार्यक्रमांसाठी देखील नावनोंदणी करू शकाल. तुमचा प्रवास नुकताच सुरू झाला आहे.

या प्रक्रियेचे काही दुष्परिणाम आहेत का?

एक निरंतर हास्य हा एकमेव पारिणाम आहे ! 🙂 जागतिक स्तरावर लाखो लोक सुदर्शन क्रिया™ चा नियमित सराव करतात, ज्याचे आरोग्यासाठीचे लाभ नमूद केलेले आहेत.

आमच्या प्रक्रियांचा सराव करणे पूर्णपणे सुरक्षित आहे. तुम्हाला दमा, उच्च रक्तदाब, हृदयविकार अथवा पाठदुखी इत्यादि त्रास असल्यास, आम्ही सत्रादरम्यान तुम्हाला वेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करू.

मला कोणताही तणाव नाही. मग मी या कार्यशाळेत का सामील व्हावे?

तुम्ही तणावग्रस्त नसलात तर उत्तमच ! तुम्ही उत्तम जीवन जगत आहात. पण जरा याचा विचार करा: जेव्हा तुमचे पैसे संपायला लागतात तेव्हा तुम्ही पैसे वाचवायला सुरुवात करता का? तुमची तब्येत बिघडल्यावरच व्यायाम सुरू करायचा? नाही ना? जेव्हा गरज पडेल अशा वेळी वापरण्यासाठी मानसिक बळ व सामर्थ्याचे आंतरिक साठे तयार करावे असे तुम्हाला वाटते का?  हा तुमचा निर्णय आहे. तुम्ही तणावग्रस्त होण्याची वाट बघू शकता आणि ही कार्यशाळा तुम्हाला मदत करण्यासाठी तेव्हाही तत्पर असेल.

तुम्ही ३००० रुपये का घेता?

ज्यांनी ही कार्यशाळा पूर्ण केली आहे त्यांनी तर आम्हाला अधिक शुल्क आकारण्याची शिफारस केली आहे. कारण तुम्हाला जीवनावश्यक कौशल्ये शिकवण्याव्यतिरिक्त, तुमच्या देणगीमुळे भारतातील अनेक सेवा प्रकल्पांना निधी मिळतो. उदाहरणार्थ, ७०,००० आदिवासी मुलांना शाळेत पाठवणे, ४३ नद्यांचे पुनरुज्जीवन करणे, २,०४,८०२  ग्रामीण तरुणांना उपजीविकेच्या कौशल्याने सक्षम करणे आणि ७२० गावांमध्ये सौर दिवे लावणे, हे सर्व अशा निधीतून शक्य झाले आहे. तुम्हाला ही आकारणी न्याय्य वाटत नसेल व अधिक देणगी द्यायची इच्छा असल्यास आम्ही आक्षेप घेणार नाही. 😉