नैसर्गिक शेतीच्या तंत्राद्वारे शेतकऱ्यांचे सशक्तीकरण

 मातीची गुणवत्ता जतन करणे, जैवविविधतेचे संरक्षण करणे आणि भारतातील शेतकऱ्यांचे उत्थान करणे.

icon

रणनीती

शेतकऱ्यांना हाताशी धरुन नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण देणे

icon

प्रभाव

कमी खर्चात जास्त उत्पादन

icon

उपलब्धी

२२ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती तंत्राचे प्रशिक्षण दिले

आढावा

कर्ज, पीक वाया जाणे आणि सामाजिक दबाव या कारणांनी भारतातील शेतकरी - अन्नदाता त्रस्त आहे. शेतकरी महागडी रासायनिक खते, कीटकनाशके आणि बियाणे खरेदी करण्यासाठी बँका आणि सावकारांकडून कर्ज घेतो. जर पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांचे पीक वाया जाते आणि कर्जाची परतफेड करण्याचा कोणताही मार्ग त्यांच्याकडे राहत नाही.

आर्ट ऑफ लिव्हिंगने सुरू केलेला श्री श्री नैसर्गिक शेती प्रकल्प भारतभर नैसर्गिक शेतीच्या तंत्राला चालना देत आहे. यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात वाढीव उत्पादन आणि नफा मिळेल याची ग्वाही दिली जाते.

रासायनिक खते, कीटकनाशके आणि संकरित बियाणांचा सध्या व्यापक वापर असल्याने शेतकऱ्यांना हे सारे खरेदी करण्यासाठी मोठी कर्जे काढणे भाग पडते. पण त्यामुळे पाणीही प्रदूषित होते आणि तसेच मातीतील पोषक तत्वे कमी होतात, जे इको सिस्टमला नुकसानकारक ठरते. आर्ट ऑफ लिव्हिंग द्वारे प्रमोट केलेले नैसर्गिक शेतीचे तंत्र कमी गुंतवणूक खर्चाचे असूनही पर्यावरणास अनुकूल आणि टिकणारे आहे.

सुरुवातीच्या काळात जेव्हा भारताची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषीप्रधान होती, तेव्हा ही तंत्रे वापरली जात होती. पण ६० च्या दशकातील हरित क्रांतीने सर्रास खत आणि संकरित बियाण्यांच्या वापरावर भर दिला, ज्यामुळे भारतीय शेतकरी मोठ्या कर्जाखाली पिचले गेले आणि त्याचा इकोसिस्टमवर नकारात्मक परिणाम झाला. सध्याचा काळ आणखी एका कृषी क्रांतीची हाक देणारा आहे जो शेतकर्‍यांना मदत करेल, मातीची गुणवत्ता जतन करेल आणि पर्यावरणाचे रक्षण करेल.

श्री श्री नैसर्गिक शेती प्रकल्पाने या क्रांतीची सुरुवात केली आहे.

रणनीती

आर्ट ऑफ लिव्हिंगचे युवाचार्य , कृषी प्रशिक्षक आणि अनेक सरकारी अधिकारी या सर्वांचे बहुआयामी प्रयत्न देशभरातील शेतकऱ्यांना मदतीचे ठरत आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंग सगळ्या राज्यात नैसर्गिक शेतीवर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करते.

देशी गायी, देशी बियाणे, नैसर्गिक खते आणि कीटकनाशके यांच्या वरील पुस्तकी माहिती सोबतच प्रशिक्षक प्रात्यक्षिक प्रयोग देखील आयोजित करतात.

हा कार्यक्रम शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे प्रशिक्षित करतो:

  • विविध सेंद्रिय खते तयार करण्याच्या पद्धती
  • शेतात खतांचा योग्य वापर करण्याची पद्धत
  • सेंद्रिय पद्धतीने शेताची देखभाल करण्याचे मार्ग
  • कापणीनंतरचे शेतीचे उत्पादन नैसर्गिकरित्या जतन करण्यासाठी/ हाताळण्यासाठी प्रक्रिया

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, आर्ट ऑफ लिव्हिंगची टीम शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळण्यासाठी पूर्णपणे सहाय्य करते.

आर्ट ऑफ लिव्हिंगने पुढे किसान मंच हे एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, ज्याच्या माध्यमातून सामूहिक प्रयत्नांतून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविल्या जातील. 

शेतकर्‍यांना त्यांच्या पिकाला सर्वोत्तम दर मिळावा यासाठी आम्ही त्यांना थेट बाजारपेठ देखील उपलब्ध करून देतो.

तीन दिवसीय प्रशिक्षण

नैसर्गिक शेतीची मूलभूत माहिती

icon

मार्गदर्शन

प्रदेश आणि हंगामावर आधारित वैयक्तित स्तरावर इनपुट देत केलेले

icon

सक्षम करतील.

हाताशी असलेले युवाचार्य, शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती टिकवून ठेवण्यास सक्षम करतील.

icon

किसान मंच

आपसात भेटून आपल्या समस्या आणि कल्पनांवर चर्चा करतील.

icon

थेट बाजारपेठ

मध्यस्थाला दूर करत, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची सर्वोत्तम दरात विक्रीची हमी देईल.

शेती हा मानवी अस्तित्वाचा कणा आहे. कुठलीही संस्कृती समृद्ध व्हायची असेल तर तिथली शेती निरोगी आणि शाश्वत असावी लागते. प्राथमिक उद्योग असलेल्या शेतीवर आपण परत आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे.

- गुरुदेव श्री श्री रवि शंकर

क्रांतीमध्ये सहभागी व्हा

आपल्या पाठबळावर आम्ही खूप काही साध्य करू शकतो. पर्यावरण पूरक पध्दतीने कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करा.

देणगी द्या

प्रभाव

श्री श्री नॅचरल फार्मिंगने प्रामुख्याने लहान आणि किरकोळ शेतकऱ्यांना प्रशिक्षित केले आहे, ज्यांच्याकडे पाच एकर पेक्षा कमी जमीनीची मालकी आहे. त्यांचा प्रति एकर शेतीचा खर्च रासायनिक शेतीच्या खर्चाच्या एक पंचमांश एवढा कमी झाला आहे. आणि त्यांना पूर्वी लागवडीसाठी आवश्यक असलेल्या पाण्याच्या एक पंचमांश पेक्षा कमी पाणी लागते.

icon

कमी गुंतवणूक खर्च

icon

कमी पाण्यात जास्त जमीनीवर लागवड शक्य

icon

जमिनीला नवसंजीवनी

icon

वाढीव उत्पन्न

icon

जैवविविधता आणि पर्यावरण संरक्षित

icon

खतांवरील अनुदानात बचत