मुलांबरोबर पालक म्हणून वावरताना आपण देखील कधीतरी लहान मूल होतो , हे मी कायम लक्षात ठेवतो. माझ्या पालकांना मला वाढवताना पालकत्वासंबंधी चांगली समज होती ती समज बरोबर ठरली. ठरले. माझ्या आजी-आजोबांनी माझ्या आई – वडिलांना वाढविताना वापरलेल्या पालकत्वाच्या तत्वांबद्दल मी ऋणी आहे. कारण त्यामुळेच माझे आई-वडील चांगले माणूस बनले. तुम्ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली मूल्ये पाहिली आहेत ? तीच पालकत्वाची मूलभुत तत्वे आहेत.
चांगल्या पालकत्वाची मूलभुत तत्वे कोणती ?
मुलांबरोबर खेळा !
तुमच्या मुलांशी खेळा. त्यांच्याबरोबर गाणी गा, उत्सव साजरे करा. सतत एखादया शिक्षकासारखे वागू नका. तुमच्या मुलांकडून शिका. त्यांचा आदर करा. मुलांशी जास्त गंभीरपणे वागू नका. गुरुदेवांनी एकदा सांगितले होते की “त्यांचे वडील कामावरून घरी आले की त्यांना टाळी द्यायचे, गुदगुदल्या करायचे, पकडापकडी खेळायचे आणि त्यांना सर्वांना हसवायचे.”
संयम ठेवा
पालकत्वाच्या सर्व तत्वांच्या मुळाशी संयम आहे. क्षुल्लक गोष्टींमध्ये अडकू नका. पालकत्वामध्ये खूप जास्त संयम असावा लागतो.मुलांना हाताळताना तुमच्याकडे संयम आणि चिकाटी असायला हवी. त्यांच्या इच्छेनुसार त्यांना अपेक्षित मार्गावर घेऊन जावे लागते.
मानवी स्पर्शाचा अनुभव द्या.
तुमच्या पाल्यासाठी काही वेळ राखून ठेवा. अर्धा ते एक तास पुरेसा आहे. तसेच त्यांच्याबरोबर 5-6 तास बसून त्यांना कोंडलेपणा वाटेल असे करु नका. त्यांच्याबरोबर वेळ घालवण्याची, गोष्टी ऐकण्याची त्यांना आतुरता वाटायला हवी. पाल्यामध्ये नैतिक मूल्ये जोपासली जातील अशा आणि त्त्यांना स्वारस्य वाटेल अशा कथा तुम्ही सांगू शकता. तुम्ही त्यांना छान गोष्टी सांगितल्या तर ते सदासर्वकाळ दूरदर्शन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांना चिकटून बसणार नाहीत . मानवी स्पर्श गरजेचा आहे. तुमच्या मुलांना पडद्यासमोर (स्क्रीनसमोर) बसून बिन- सहभागी साक्षीदार बनू देऊ नका.
जन्मजात असलेल्या विश्वासाच्या भावनेचे पोषण करा.
स्वभावत: मुलांचा कल विश्वास ठेवण्याकडे असतो. पण जसजसे ते मोठे होऊ लागतात, त्यांचा विश्वास कुठेतरी हलतो. त्यांचा स्वतःवर, लोकांच्या चांगुलपणावर आणि दैवी शक्तीवर विश्वास आहे का हे तपासून पाहा.विश्वास मुलांना प्रतिभावान बनवतो. मुलांचा विश्वास आतून हलला असेल तर त्यांची प्रतिमा आणि संवादकौशल्य संकुचित व्हायला लागतात. बरेच व्यावसायिक अयशस्वी होतात, याचे एक कारण म्हणजे विश्वासाचा अभाव!
नैतिक मूल्ये मनावर बिंबवा.
सध्याच्या तरुणांमधील अतिक्रियाशीलता आणि आक्रमकतेवर उपाय म्हणून आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये आध्यात्मिक मूल्ये, नैतिक मूल्ये, सहानुभूती, मैत्री, प्रेम हयाचा अंतर्भाव असायला हवा. शांती आणि सुसंवादाचा मार्ग तरुणांमध्ये ही मूल्ये रुजवण्यातूनच जातो हे ओळखायला हवे.
व्यक्तिमत्व संतुलित ठेवा.
तुमचे पाल्य विविध वयोगटाच्या (जेष्ठ, लहान आणि समवयस्क) व्यक्तींसोबत कसे संवाद साधतात ह्याचे निरीक्षण करा.हया निरीक्षणातून पाल्यांच्या मनात काही गंड निर्माण होत आहेत का हे समजण्यास मदत होईल. तुमच्या मुलांचे व्यक्तिमत्व केंद्रित, प्रतिभाशाली आणि लवचिक बनवण्यास त्यांना मदत करा. त्यांना विभिन्न वयोगटाबद्दलची जबाबदारी देऊन सर्व वयोगटांसोबत संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून द्या.
सकारात्मकता आणि वास्तव हयांत समतोल ठेवा.
जेव्हा तुमचे पाल्य तुमच्याकडे तक्रार घेऊन येतात तेव्हा तुम्ही काय करता ? तुम्ही त्यांच्या नकारात्मक दृष्टीकोनाला उत्तेजन देता की त्याला सकारात्मकतेकडे वळवता ? जेव्हा तुमचे पाल्य एखादया फारश्या कौतुकास्पद नसलेल्या व्यक्तीचे / वस्तूचे कौतुक करतात, तेव्हा तुम्ही त्यांना त्यांची चूक दाखवून देता की त्यांच्या गैरसमजाला उत्तेजन देता ? वरील दोन्ही परिस्थितीमध्ये तुम्हांला समतोलपणे त्यांना मध्यम मार्गावर आणायला हवे.
मित्रत्वाला प्रोत्साहन दया.
किशोरवयीन मुलांना खूष किंवा नाखूष करण्याचा प्रयत्न करू नका. त्यांच्याशी अधिकारयुक्त वाणीने न बोलता त्यांचे मित्र बना. त्यांना तुमच्याबददल आपलेपणा वाटू दया. आध्यात्मिकदृष्या त्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न करा आणि संयम बाळगा.
स्पष्ट मर्यादा ठरवा.
तुमच्या पाल्याच्या विकासासाठी त्यांचे संगोपन आणि त्यांना आधार देणे आवश्यक आहे. तरीही त्यांच्या वागणुकीबद्दल काही नियम आणि अपेक्षा असणे महत्वाचे आहे. प्रेमाने पण कणखरपणे ह्या मर्यादा अमलात आणणे आणि सकारात्मक सुधारणांसाठी चांगल्या वागणूकीला प्रोत्साहन देण्यावर गुरुदेव श्री श्री रवी शंकर भर देतात.
आवडीच्या गोष्टी करताना समतोल ठेवा.
डाव्या आणि उजव्या मेंदूच्या क्रियांमध्ये म्हणजेच विज्ञान आणि कलांची गुंफण करणे आवश्यक आहे. विद्येची देवता सरस्वतीच्या चित्रात आपण हे संतुलन पाहू शकतो.देवीच्या एका हातात डाव्या मेंदूसाठी पुस्तक आणि दुसऱ्या हातात उजव्या मेंदूसाठी आणि ध्यानासाठी संगीतवाद्य (वीणा) दाखविलेले आहे. संगीत शिकणे, योगाभ्यास करणे , ध्यान करणे तसेच वैज्ञानिक दृष्टीकोनाचा विकास सुनिश्चित करणे पाल्यासाठी महत्वाचे आहे. जर एका गोष्टीकडे त्यांचा कल जास्त असेल तर त्यांना बाकीच्या गोष्टींचा शोध घेण्यास उत्तेजन दया. उदाहरणार्थ, तुमच्या मुलाला विज्ञानाची आवड असेल तर त्याला कलेविषयी अन्वेषण करण्यासाठी एखादया संग्रहालयात घेऊन जा किंवा घरीच सृजनात्मक प्रकल्प बनविण्याचा प्रयत्न करा.
सामाजिक कार्यासाठी प्रोत्साहन द्या.
तुमच्या पाल्याला सामाजिक उपक्रमात सहभागी करा. रविवारी तुमच्या पाल्याला गरीब मुलांना चॉकलेट वाटायला सांगा. वर्षातून किमान एक-दोन वेळेस मुलांना सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दया. नकळतपणे ह्या उपक्रमांमुळे त्यांचे व्यक्तिमत्व चांगले होण्यास मदत होईल.
संवेदनशील रहा, जसे बोलता तसे वागा
तुमची शिकवण तुमच्या वागणुकीत दिसू द्या. तुमच्या पाल्यांसाठी उदाहरण बना. मुलांना खोटे बोलू नका असे शिकवताना पाहुण्यांसमोर तुम्ही घरात नाही असे बोलायला लावून त्यांना प्रामाणिकपणा शिकवता येणार नाही. हयामुळे मुले संभ्रमात पडतात किंवा लबाडीने वागण्याकडे वळू शकतात
निष्कर्ष
वरील सकारात्मक पालकत्वाच्या तत्वांसोबतच गुरुदेव श्री श्री रवी शंकर हयांच्या “ पेंरेंटिंग द अँजेल्स “ (‘प्रेषितांचे पालकत्व’) ह्या विडिओ मध्ये मौल्यवान माहिती आणि सकारात्मक पालकत्वाची सूत्रे सांगितली आहेत. चांगले पालक बनण्यासाठी तुम्हांला त्याची मदत होऊ शकते. तसेच यामध्ये गुरुदेवांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याचे फायदे, ध्यानाचा सराव आणि तुमच्यात व तुमच्या पाल्यात कृतज्ञतेची भावना जोपासण्याबाबत चर्चा केली आहे.
गुरुदेवांनी लिहिलेले “नो युवर चाइल्ड : द आर्ट ऑफ रेसिंग चिल्ड्रेन” (‘तुमच्या मुलांना जाणून घ्या : मुलांना वाढविण्याची कला’) हे पुस्तक मुलांच्या संगोपनाविषयी सर्वांगीण माहितीसाठी तुम्ही वाचू शकता.
पालक आणि पाल्य यांची विशिष्ट अशी बलस्थाने आणि कमतरता असतात. त्यामुळे पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप ( पालक – पाल्य नात्यात ) आदर्श असे नियम नसतात. सारखेच नियम वेगवेगळे परिणाम देऊ शकतात . परंतु त्या नियमांमागील प्रेरणा किंवा तत्वे सारखीच असतात.
तुमच्या पाल्यांना अधिक चांगले समजून घेण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या “नो युवर टीन वर्कशॉप “ कार्यशाळेत सहभागी व्हा , आपल्या पाल्याला अधिक समजून घेण्यासाठी मौल्यवान व उपयुक्त माहिती मिळवा याचा खूप पालकांना फायदा झाला आहे.
– आकांक्षा
“नो युवर टीन वर्कशॉप” या कार्यशाळेमुळे मला एक नवीन दृष्टी मिळाली. माझ्या सर्व प्रश्नांची मला उत्तरे मिळाली. मी माझ्या पतींची देखील ह्या कार्यशाळेसाठी नोंदणी केली आहे. खरेतर दोन्ही पालकांनी ही कार्यशाळा एकत्र करायला हवी, म्हणजे ते समदृष्टीने याबाबत विचार करु शकतात.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
“धीरे धीरे रे मना, धीरे सब कुछ होय ।
माली सींचे सौ घड़ा ऋत आये फल होय|”
म्हणजेच
मनात संयम असल्याने सर्व काही होते.जर एखादा माळी झाडाला रोज शंभर घडे पाणी देऊ लागला तरीही त्याला फळ मात्र ऋतू आल्यावरच येणार आहे.
तसेच मुलांना लवकर मोठे होण्याची सक्ती आपण करू शकत नाही. ते त्यांच्या वेगानेच वाढतात. त्यामुळे मुलांच्या संगोपनामध्ये संयम मोठी भूमिका बजावतो.
१) एक आरामदायी आणि आदरपूर्ण आयुष्य जगण्यासाठी आवश्यक त्या मूलभूत सुविधा पाल्याला पुरविणे.
२) मित्रत्वाने तुमच्या मुलांच्या गरजांचे परीक्षण करा.
३) तुमच्या पाल्यातील अभिमानाची भावना, कल्पकता आणि अद्वितीय गुणांना उत्तेजन दया.
४) संयम ठेवा. क्षुल्लक गोष्टीत अडकू नका.
५) मानवी मूल्ये आणि शिस्त हयांची मुलांना शिकवण दया.
६) तुमच्या पाल्यासोबत गुणवत्तापूर्ण / चांगला वेळ व्यतित करा.
७) तुमच्या मुलांना चांगले माणूस बनण्याची शिकवणूक दया.
८) गोष्टींमधून किंवा त्यांच्यासाठी संधी तयार करून त्यांना निर्णय घेण्यात सुज्ञ बनवा.
९) संघर्ष सोडविण्याची वृत्ती त्यांच्यात विकसित करण्यासाठी त्यांना भावंड किंवा मित्रांसोबत भांडू दया.
१०)तुमच्या पाल्याला जबाबदारीने आणि स्वतंत्रपणे कार्य करण्यास शिकवा.
१) तुमच्या चुकांबद्दल माफी मागा.
२) तुमच्या पाल्याकडे वैयक्तिक मालमत्ता म्हणून न पाहता एक व्यक्ती म्हणून पाहा.
३) तुमच्या पाल्यासोबत क्षुद्रपणे, लबाडीने किंवा कडकपणे वागू नका.
४) क्षुल्लक गोष्टींसाठी त्यांना तुमच्यावर अवलंबून ठेवू नका.
५) भूतकाळातील चुकांबद्दल शिक्षा करण्यापेक्षा चांगल्या भविष्याकडे लक्ष दया.
१) ६-१४ वर्षे वयांच्या सर्व बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळण्याचा अधिकार.
२) वयाच्या १४ व्या वर्षापर्यंत धोकादायक नोकरीपासून / रोजगारापासून संरक्षण मिळण्याचा हक्क.
३) आर्थिक गरजेमुळे वय आणि ताकदीला अनुरूप नसलेल्या व्यवसायात जाण्यासाठी शोषण आणि जबरदस्ती पासून संरक्षणाचा हक्क.
४) स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठेने पोषक वातावरणात विकास होण्यासाठी समान संधी आणि सुविधा मिळण्याचा हक्क. तसेच शोषण आणि नैतिक व भौतिक त्यागापासून बाल्य आणि तारुण्याचे रक्षण करण्याची हमी.
५) शिशुअवस्थेत काळजी आणि मानवी मूल्ये आणि शिस्त हयांची मुलांना शिकवण दया.
६) समानतेचा हक्क.
७) भेदभावाविरुद्धचा हक्क.
८) वैयक्तिक स्वातंत्र्य आणि कायदयाच्या योग्य प्रक्रियेचा अधिकार.
९) तस्करी आणि सक्तमजुरी पासून संरक्षण मिळण्याचा हक्क
१०) अल्पसंख्यांकांना आपले हित जपण्याचा अधिकार
११) समाजातील सर्व वंचित वर्गांना सामाजिक अन्याय आणि सर्व प्रकारच्या शोषणापासून संरक्षणाचा हक्क.
१२) पोषण, आदर्श जीवनपद्धती आणि सुधारित सार्वजनिक आरोग्याचा हक्क.
१) शांत राहा. योगाभ्यास, प्राणायाम आणि ध्यान करा.
२) मुलांना समजावण्यासाठी भेटवस्तू किंवा बक्षिसे देऊ नका.
३) त्यांच्या दैनंदिन क्रियांमध्ये सामील व्हा.
४) तुमच्या मुलांना निर्णय घेण्याची संधी दया.
५) भावनिक उद्रेक कौशल्याने हाताळा.नकारात्मक शब्दांपेक्षा काय करणे आवश्यक आहे ते त्यांना समजावा.
तणाव व्यवस्थापन कौशल्ये
जीवन कौशल्ये
नातेसंबंधाविषयी कौशल्ये
शिक्षणाविषयी कौशल्ये