जेंव्हा मुलांचा विषय येतो तेंव्हा पालकत्व ही एक पवित्र जबाबदारी ठरते. आपली जबाबदारी फक्त मुलांना केवळ अन्न, निवारा आणि शिक्षण देणे एवढीच नाही. तर त्यांचा मानसिक दृष्टीकोन, त्यांच्या भावना, बुद्धी, विचार प्रक्रिया आणि वागणूक योग्य मार्गावर आहे, ही आपली जबाबदारी आहे. जर आपण अतिशय व्यवस्थित असाल तर मुलं आपलं आयुष्य अव्यवस्थित करुन टाकतील. आपल्या सीमा तोडण्यात मुलं सर्वोत्तम असतात. आपली मुलं आपल्याला खूप काही शिकवतात, जे इतरांना जमणार नाही.

एक उत्तम पालक कसं बनावं

एक उत्तम पालक बनण्याकरिता, आपल्याला करता येण्यासारख्या काही सुरवातीच्या युक्त्या:

  1. आपल्या मुलाच्या वृत्ती आणि कल यांच्याकडे लक्ष असू द्या

    आपल्या मुलाला स्वतःच्या दृष्टिकोनातून योग्य ठरवण्याचा प्रयत्न करू नका. ही एक मोठी चुक बरेच पालक करतात. आपण आपला दृष्टिकोण आपल्या मुलांना सांगा आणि त्यांच्या दृष्टीकोण चुकीचा असल्यास त्यांना परावृत्त करा. प्रत्येक मुल या ग्रहावर काही विशिष्ट वृत्ती घेऊन आलेला असतो, ज्या बदलता येत नाहीत, आणि काही मिळवलेल्या कौशल्यावर नियंत्रण ठेवता येते. मिळवलेल्या कौशल्यात किंवा मुलांच्या व्यक्तिमत्वात बदल घडवून आपण बरेच काही करू शकता, पण आपलं मुल जे बीज सोबत घेऊन जन्माला आलं आहे, त्याबद्दल आपण काहीच करु शकत नाही. ते नेहमीच व्यक्त होईल. आपणास या दोन्ही पैलूंमध्ये फरक करायला शिकावे लागेल – त्यातच शहाणपणा आहे. आणि जर आपण हे करु शकलात, तर आपले अर्धे काम तेथेच पूर्ण होतं. बाकी उरलेलं काम या सृष्टीवर सोडून द्यावं. आपले त्याच्यावर काहीच नियंत्रण नाही.

  2. संवेदनशील व्हा

    मुलाचे पालनपोषण करताना, आपण खूप संवेदनशील असणे आवश्यक आहे. ही एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवायला हवी. जर मुलांना सांगितल की खोटं बोलू नका, आणि त्यांना फोन कॉल वर उत्तर देताना म्हणालात,”आपण घरी नाही आहात”, तर हे अजिबात चालणार नाही.

  3. आपल्या मुलाच्या विश्वासाचे रक्षण करा 

    स्वभावत: मुलांची प्रवृत्ती असते विश्वास ठेवायची. कश्यामुळे तरी त्यांचा विश्वास मोडतो. आपल्याला त्यात लक्ष द्यायला हवं. त्यांचा स्वतःवर विश्वास आहे कां? त्यांच्यात पुरेसा आत्मविश्वास आहे कां? एका निरोगी मुलामध्ये तीन प्रकारचा विश्वास असतात – पहिला स्वतःवरचा विश्वास. दुसरा आसपास आणि समाजात वावरणाऱ्या लोकांच्या चांगुलपणावरचा विश्वास. आणि तिसरा देव किंवा उच्च शक्तिवरचा विश्वास. हे तीन विश्वासाचे प्रकार मुलांना चांगल्या माणसांमध्ये उमलणेसाठी पूर्वतयारी आहे. प्रत्येकजण चोर आहे किंवा प्रत्येकजण वाईट आहे असा विचार निरोगी बालक करणार नाही. ते अशा प्रकारच्या विद्रूपतेत अडकत नाहीत. निरोगी मुलाला माहित आहे की लोक चांगले आहेत. प्रत्येकजण फसवणूक करणारा आहे असे तुम्ही तुमच्या मुलाला सांगत राहिल्यास, मुलाचा आजूबाजूच्या लोकांवर आणि सर्वसाधारणपणे समाजावरील विश्वास उडतो. त्यांचे व्यक्तिमत्व, कलागुण आणि संवाद कौशल्ये कमी होतील. लोकांशी त्यांच्या संवादाला मोठा फटका बसेल. ते अयशस्वी व्यावसायिक आणि अयशस्वी कलाकार बनतात. जर आपण विश्वासाचे वातावरण निर्माण केले आणि त्या वातावरणात मुले वाढली तर ते तल्लख बनतात. परंतु, जर आपण नकारात्मकता, अविश्वास किंवा निराशेचे वातावरण तयार केले तर ते आपल्यावर तीच गोष्ट प्रतिबिंबित करतील आणि उचलतील.

  4. जेवताना त्यांचा मूड चांगला ठेवा

    जेंव्हा आपण कामावरून परत येता आणि आपल्या मुलांना भेटता, तेव्हा आपण सर्वप्रथम त्यांच्यासोबत टाळ्या वाजवल्या पाहिजेत किंवा खेळा किंवा हसा. एक किंवा दोन दिवस ते थोडेसे कृत्रिम दिसू शकते. पण नंतर, ते आपल्यासाठी आणि आपल्या मुलांसाठी प्रगतीकारक होईल. आठवड्यातून किमान तीन ते चार वेळा किंवा शक्य तितक्या वेळा कुटुंबासोबत बसा आणि जेवण करा. आणि जेवताना, त्यांना दोष देऊ नका किंवा त्यांच्या चुका दाखवू नका. जेवण देताना, त्यांचा मूड खराब करू नका. ते चुकले हे सांगायची एक वेळ असते आणि ती जेवणाच्या टेबलावर कधीच नसते. आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. जेव्हा आपल्या स्वतःच्या मूडवर नियंत्रण नसते, आपल्या फक्त मुलांसाठी मूड बनवणे किंवा वातावरण तयार करणे कठीण असते. परंतु आपण प्रयत्न करणे आवश्यक आहे.

  5. आपल्या मुलांसोबत गुणवत्तापूर्ण वेळ घालवा

    आपल्या मुलांसोबचे नेहमी शिक्षक बनण्याचा प्रयत्न करू नका. त्यांच्याकडून शिका, त्यांचा आदर करा आणि त्यांच्याशी खेळा. मुलांबाबत जास्त गंभीर होऊ नका. फक्त त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण साजरे करा, त्यांच्यासोबत खेळा, त्यांच्यासोबत गा. जर आपण नेहमी काठी घेऊन म्हणाल की हे करू नका, तसे करू नका, ते चांगले नाही. त्याऐवजी, त्यांच्याबरोबर अधिक खेळा आणि नंतर त्यांना काही वेळा गोष्टी सांगू शकता. मुलांचे संस्कार अशा प्रकारे करणे चांगले आहे. जर त्यांना छान, रंजक कथा सांगितल्या तर ते फक्त टेलिव्हिजनला चिकटून तिथेच बसणार नाहीत. आपण आपल्या मुलांसोबत घालवलेला एक किंवा अर्धा तास हा दर्जेदार वेळ पुरेसा आहे. त्यांच्यासोबत चार-पाच तास बसून त्यांची दमछाक करू नका. त्यांचा दूरदर्शनचा वेळ एका तासापर्यंत मर्यादित ठेवा.

  6. मुलांसमोर वादविवाद करणे टाळा

    काहीही झाले तरी मुलांसमोर वादविवाद करणे टाळा. आपला वाद होत असताना ते जवळपास कुठेही नाहीत याची खात्री करा. त्यांच्या संवेदनशील स्वभावामुळे, त्यांना समजू शकते की प्रौढांमध्ये मतभेद आहेत, त्यामुळे मुलं त्यांच्या खोलीत किंवा घरी परत येण्याआधी मतभेद सोडविण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करा.

  7. त्यांना एक स्वप्न द्या आणि त्या दिशेने चालण्यास मदत करा

    पालकत्वाची पूर्ण प्रक्रिया तुम्हाला खूप संयम आणि चिकाटी शिकवते. आपल्या मुलांना जिथे जायचे आहे त्या दिशेने त्यांना नेण्यात आपण मदत करायला हवी. त्यांना एक स्वप्नं देणं आणि त्यांना त्या स्वप्नाकडे वाटचाल करण्यास प्रवृत्त करणे हे आज पालकांसमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे. त्यामुळे, त्यांना विविध उपक्रमांची ओळख करून देणे उत्तम ठरेल. हे , मूल १० वर्षांचे होण्यापूर्वी करणे गरजेचे आहे. तुम्ही आपल्या मुलांना विज्ञान आणि कला प्रदर्शनात घेऊन जायला हवे आणि त्यांना सर्व शाखा दाखवल्या पाहिजेत. 

    तुमच्या मुलांना समाज सेवेत गुंतवा

    एखाद्या रविवारी, त्यांना काही चॉकलेट द्या आणि त्यांना जे सर्वात गरीब लोक भेटतील, त्यांना ते वाटायला सांगा. वर्षातून एकदा किंवा दोनदा, त्यांना एखाद्या झोपडपट्टी क्षेत्रात घेऊन जा आणि त्यांना समाज सेवेत गुंतवा. यामुळे सुक्ष्म मार्गाने त्यांचे व्यक्तिमत्त्व विकसीत होईल आणि त्यांच्याकडे जे आहे त्याबद्दल त्यांना अधिक कृतज्ञ वाटेल.

    आपल्या मुलाला सर्वांगीण शिक्षण द्या 

    आपल्या मुलांना विज्ञान शाखेबरोबरच कला क्षेत्राबद्दल सुद्धा माहिती करुन द्यायला हवी – मेंदूच्या दोन्ही बाजूंचे पोषण करणे आवश्यक आहे. श्री सरस्वती माता (विद्येची देवी) हिची संकल्पना किती विस्मयकारक आहे. माता सरस्वतीची मूर्ती पाहिलीत तर, तिच्या हातात वीणा (संगीताचं वाद्य), एक पुस्तक आणि एक जपाची माळ आहे. पुस्तक, डाव्या बाजूच्या मेंदूच्या पोषणाचे प्रतीक आहे आणि जपाची माळ, ध्यानात्मक पैलूचे प्रतीक आहे. त्यामुळे, ज्ञान, संगीत आणि ध्यान – शिक्षण संपूर्ण करण्यासाठी तिन्ही गोष्टी आवश्यक आहेत. जेंव्हा या तीनही गोष्टी विकसित होतील, तेंव्हा एखाद्या व्यक्तीला सुशिक्षित आणि सभ्य म्हणू शकता. त्यामुळे, आपली मुलं संगीत आणि योगा शिकतील ,आणि त्याच बरोबर वैज्ञानिक प्रवृत्तीही असेल यांची काळजी घ्या. 

  8. आपल्या मुलांना सर्व वयोगटांतील लोकांशी संवाद साधण्यास प्रोत्साहित करा

    आपल्या मुलाच्या संवादाचे निरीक्षण करा. पहा की ते त्यांच्या पेक्षा लहान मुलांशी कसे संवाद साधतात आणि त्यांच्या पेक्षा वयस्कर लोकांशी कसा संवाद साधतात ? नंतर हे सुद्धा निरीक्षण करा की ते त्यांच्या वयोगटांतील मुलांशी कसा संवाद साधतात ? हे निरीक्षण बर्‍याच गोष्टी स्पष्ट करतील. आपणास कळेल की तुमच्या मुलांमध्ये श्रेष्ठत्व किंवा न्यूनगंडाची भावना विकसित होत आहे, किंवा ते अंतर्मुख अथवा बहिर्मुख बनत आहेत. आणि या नकारात्मक गुणांना प्रकट होण्यापासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही येथे खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकता. त्यांच्या सोबत काही खेळ खेळा, आणि त्यांना सगळ्या वयोगटांतील मुलांसोबत सुसंवाद साधण्यास प्रोत्साहित करा.
    ज्या मुलांना न्यूनगंड असेल तर त्यांना आपल्या पेक्षा लहान मुलांसोबत जास्तं संवाद साधायला आवडेल आणि ते मोठ्या मुलांपासून लांब पळण्याचा प्रयत्न करतील, आणि अगदी त्यांच्या बरोबरच्या वयातील मुलांना टाळण्याचा प्रयत्न करतील. ज्या मुलांना श्रेष्ठतेची भावना असेल ते आपल्यापेक्षा लहान मुलांना दूर करतील आणि फक्तं मोठया मुलांशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतील. दोन्ही परिस्थितीत ते चांगले संवादक ठरत नाहीत. पालक म्हणून, आपण त्यांना संवादाची कला अगदी लहान वयात शिकवू शकता. संवाद कसा साधावा हे शिकणं त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

  9. आपल्या मुलांच्या मित्रांना प्रभावित करा

    आपल्या मुलांचे मित्र त्यांच्यावर जास्त प्रभाव टाकत असतात. आपल्या शेजार पाजारी असलेल्या मुलांचा विचार करा. जर आपण त्यांच्यावर प्रभाव टाकू शकता, तर आपण आपल्या मुलांवरही प्रभाव टाकू शकतो. समजा, आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या मित्रांना काही चुकीच्या सवयी असतील तर त्यांना बदलण्यासाठी प्रभावित करू शकता. ते त्यांच्या स्वतःच्या पालकांपेक्षा तुमचे जास्त ऐकतील.

    त्यांना शेअर करण्यासाठी प्रोत्साहित करा 

    बर्‍याच वेळा, आपण मुलांना वस्तू इतरांना न देता आपल्याकडेच ठेवायला प्रोत्साहन देतो. जेव्हा हे एका विशिष्ट मर्यादेपलीकडे जाते तेव्हा मुलांना घुसमटल्या सारखं वाटतं. कालांतराने, त्यांच्यात त्यांच्या भावना सुद्धा रोखून ठेवण्याची प्रवृत्ती निर्माण होऊ शकते, आणि हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अडथळा ठरू शकते. आपण मुलांमध्ये इतरांना देण्याची वृत्ती प्रोत्साहित केली पाहिजे , जेणेकरून ही त्यांना निरोगी व्यक्तिमत्व विकसित करण्यास मदत करते.

  10. चांगले पालकत्व हे घोड्यावर स्वार होण्यासारखे आहे

    जेंव्हा आपण घोड्यावर बसतो तेंव्हा आपण त्याच्यासोबत फिरले पाहिजे. आपणास घोड्याच्या गतीने हलते करावे लागेल अन्यथा आपल्या पाठीला दुखापत होईल. कधी लगाम घट्ट करतो, कधी सैल करतो. मुलांचेही तसेच आहे. पालकांना मुलांसोबत कधी त्यांच्या गतीने चालावे आणि कधी शिस्तीची लगाम घट्ट करावी लागते, त्यांना जाणून घ्यावे लागते आणि त्यांना हळूवारपणे मार्गदर्शन करावे लागते. काहीवेळा त्यांना नाही म्हणा, परंतु त्यांना स्वातंत्र्य देखील द्या.

    Hold On!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

    *
    *
    *
    *