जीवनाबाबत फार गंभीर असण्याचे कारण नाही. जीवन हे खेळण्यासाठी तुमच्या हातातील एक चेंडू आहे. तो चेंडू धरून ठेवू नका.

गुरुदेव श्री श्री रवि शंकर

मुलांच्या खेळकर खोड्या किती वेळा आपल्याला स्पर्श करून जातात ! लहान मुलाच्या प्रत्येक कृतीतून आपल्याला आनंदाची अनुभूती मिळत असते. ह्याचे काय रहस्य असू शकते? निरागसता ! मुलं निरागसतेची मूर्ती असतात. त्यांना अहंकार, द्वेष, चिंता इत्यादी भावनांच्या दुष्ट चक्राचा स्पर्श झालेला नसतो. जसजसे ते मोठे होतात, तसतसे ते ज्या प्रौढांचा त्यांच्यावर प्रभाव असतो त्यांचं ते अनुसरण करतात . गंमत म्हणजे, प्रौढ म्हणून आपल्याला आपल्या मुलांकडून खूप काही शिकण्यासारखे असते. मुलं आपल्याला जीवनातील अनेक महत्त्वाचे धडे शिकवू शकतात. त्यांच्या निरागसतेप्रमाणे उत्स्फूर्तपणे प्रकट होणारा त्यांचा विवेक पण अकृत्रिम असतो . जेव्हा आपण त्यांचे बारकाईने निरीक्षण करतो तेव्हा आपण अलीकडे दुर्लक्ष केलेल्या जीवनातील साध्या गोष्टी पुन्हा शिकू शकतो आणि त्यांचा आनंद घेऊ शकतो. आपल्या सभोवतालच्या सर्व गोष्टी समजून घेण्याच्या प्रयत्नात व्यस्त असताना, आपण आपला निरागसपणा गमावला आहे आणि आपण खूप गंभीर झालो आहोत.

जेव्हा आपण मुलांना जीवनाबद्दल सर्व काही शिकवायला जातो, मुलं आपल्याला जीवन काय आहे ते शिकवतात !!

– अँजेला श्विंड

आपण मुलांकडून कोणते धडे शिकू शकतो?

मुलांकडून शिकण्यासारखे जीवनाचे 9 धडे

वर्तमानात जगणे.

भूतकाळाबद्दल विचार करण्यापेक्षा किंवा भविष्याबद्दल काळजी करण्यापेक्षा मुलांना त्या वर्तमान क्षणात राहण्यात आनंद होतो. वर्तमानात राहल्याने ते स्वतःशी अधिक जोडले जातात. हाच धडा तुमच्या जीवनात लागू करा आणि तुम्हाला तुमचं जीवन उलगडेल . तुमच्या मनात सुरु असलेली आतंरिक बडबड/ विचारांचा किलकिलाट काढण्यास / शांत करण्यास मदत होईल आणि तुम्हांला वर्तमान क्षणाचा आनंद घेता येईल आणि जीवनाचा विचार करण्याऐवजी तुम्हांला जीवन जगण्यास मदत होईल.

आपला मूळ स्वभाव जपा.

लोक त्यांच्याबद्दल काय विचार करतात याबद्दल तुम्ही किती वेळा मुलांना अस्वस्थ झालेले पाहिले आहे? किंबहुना ती भावना त्यांना क्वचितच कळते. मोठे झाल्यावर, समाजाविषयी अधिक जागरूक झाल्यामुळे ही भावना वाढू शकते. मुलांप्रमाणे, इतरांना आपल्याबद्दल काय वाटेल याबद्दल आपण जास्त काळजी न करता सहज असावे . सामाजिक दबावाला बळी पडून, जे तुम्ही नाही ते होण्याचा प्रयत्न करू नका. उलट तुम्ही जसे आहात तसेच रहा आणि ताठ मानेने जगा.

आनंदी राहण्याचा पर्याय निवडा.

आपल्या संपूर्ण प्रौढ जीवनात, आपण आपल्या इच्छांमध्ये आनंद शोधत राहतो आणि आपण हे विसरतो की सगळा आनंद आपल्यामधेच आहे. आपण आपलं हास्य काही संधींसाठी आणि सुट्टीसाठी राखून ठेवतो, कारण आपण आपल्या दिवसांना आणि क्षणांना गृहीत धरतो. परंतु जोपर्यंत आपण त्यांना वेगळ्या पद्धतीने विचार करायला शिकवत नाही, मुलांची स्थिती आणि परिस्थिती कशीही असली तरी ती आनंदीच राहतात . अगदी साध्या गोष्टीतूनही त्यांना आनंद मिळू शकतो. दिवसाच्या कोणत्याही क्षणी आपल्या मनाचा कल बदलण्याचा हा स्वभाव आपण आपल्या मुलांकडून शिकू शकतो. आनंद हा व्यक्तीच्या स्वभावात असतो आणि तो आपल्याला आपल्यातच शोधायचा असतो.

आनंद हा आपला स्वभाव आहे. “मला हे हवे आहे” किंवा “मला ते हवे आहे” ह्यामुळे आनंद झाकला जातो.

– गुरुदेव श्री श्री रवि शंकर

आकस धरु नका

मुलांना क्वचितच झालेली भांडणे आठवतात आणि ते पुढे जातात. हे जीवनच्या धड्यांपैकी एक आहे ज्याने आपल्याला सरल आणि तणावमुक्त जीवन जगण्यास मदत होऊ शकते. जेव्हा आपण कोणाबद्दल आकस बाळगतो, तेव्हा त्या व्यक्ती ऐवजी तो रागच आपल्याला त्रास देतो. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला बघाल, तेव्हा हा जीवनाचा धडा लक्षात ठेवा क्षमा करा आणि विसरून जा. मतभेद विसरून जा.

इतरांची काळजी घेणे

मुले निरागस तर असतातच पण ते स्वतःबद्दल आणि त्यांच्या सभोवतालच्या लोकांबद्दल देखील खूप संवेदनशील असतात. जर त्यांना तुम्ही अस्वस्थ किंवा चिंताग्रस्त दिसलात तर ते तुमच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत , पण प्रौढ व्यक्ती त्याकडे सहज डोळेझाक करू शकते. कल्पना करा की आपण मुलांप्रमाणे इतरांची काळजी घेतली तर आपली नाती किती चांगली होतील ? संवेदनशील राहून आणि इतरांची काळजी घेऊन नातेसंबंधांमधील गैरसमज दूर करणे हा महत्वाचा धडा मुलांकडून नक्कीच घेण्यासारखा आहे.

आत्म-विश्वास आणि कल्पनाशक्ती

प्रौढ म्हणून, आपण आपल्या व्यस्त जीवनात इतके गुंतून जातो की आपण आपली स्वप्ने, आकांक्षा आणि कल्पनाशक्ती विसरतो. परंतु मुले त्यांच्या मनाला कल्पना रंगवण्यापासून थांबवत नाहीत किंवा मोठ्या स्वप्नांवरचा त्यांचा विश्वास ही सोडत नाहीत आणि ह्यानेच स्वप्न पूर्ण करण्यास मदत होते. कल्पना करा, जर आपण आपले जीवन खूप सकारात्मकतेने आणि विश्वासाने जगलो तर असे काहीही नाही जे आपल्याला जीवनात उंच भरारी घेण्यापासून थांबवू शकेल .

स्वीकार करणे

मुलांकडून मिळालेला एक महत्त्वाचा जीवनातील धडा म्हणजे मन मोकळेपणा आणि स्वीकार करणे. मुलांची कोणाशीही वागणूक सहज असते आणि सगळ्यांप्रति ते क्षमाशील असतात आणि जेव्हा आपण त्यांच्यासमोर चुका करतो तेव्हा ते आपल्याला सहजपणे संधी देतात. मोठे म्हणून आपणही , लोकांनी आपल्याप्रमाणे असावं ही अपेक्षा सोडून, ते जसे आहेत त्यांना तसेच स्वीकारण्याचा प्रयत्न करू शकतो. हो, पण, आपल्या शब्द आणि अपेक्षांपेक्षा आपल्या कृतींमुळे फरक घडायला हवा.

मैत्री

अगदी अंतर्मुखी मुले सुद्धा नेहमीच नवीन मित्र बनवण्यास उत्सुक असतात. आपल्यापैकी बरेच प्रौढ लोक केवळ आपल्या सांसारिक क्रियाकलापांमधेच व्यस्त होतात आणि इतरांसाठी वेळ उपलब्ध नसल्याची सबब पुढे करतात. दुसरीकडे, मुलांचे व्यक्तिमत्त्व भिन्न असू शकते, परंतु ते नेहमीच नवीन संबंध जोडण्याचा प्रयत्न करतात. आपण हा जीवनाचा धडा शिकून आज अधिक लोकांपर्यंत पोहोचून आणि संवाद साधून बदल घडवून आणू शकतो का?

भावनांबद्दल प्रामाणिकपणा

इतरांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करू नका. जेव्हा तुम्ही स्वत्वाकडून येता तेव्हा तुमची अभिव्यक्ती परिपूर्ण असते आणि तुमचा प्रभाव युगानुयुगे टिकतो.

– गुरुदेव श्री श्री रवि शंकर

मुलांकडून शिकण्यासारखा जीवनातील एक महत्त्वाचा धडा म्हणजे प्रामाणिकपणा. मुले कोणत्याही परिस्थितीत त्यांना कसे वाटते याबद्दल प्रामाणिक असतात. जेव्हा ते दु:खी, अस्वस्थ किंवा चिंताग्रस्त असतात तेंव्हा ते स्वतःला व्यक्त करतात. आणि त्याचप्रमाणे, जेव्हा ते आनंदी असतात तेव्हा पण ते आपल्याला सांगतात. मोठ्या लोकांचं आयुष्याबद्दल वेगळं मत असते. आपल्यापैकी बहुतेक जण आपल्या भावना लपवतात , कारण इतरांकडून चेष्टा केली जाण्याची आपल्याला भीती वाटते. आपल्याला जसे वाटते तसे वाटणे योग्य आहे आणि अशा भावनांबद्दल प्रामाणिक राहणे आपल्याला तणावापासून मुक्त करते, जीवनात अधिक परिपूर्णता आणते.

निष्पाप आणि लहान मुलासारखे असणे” ही आयुष्यात मिळालेली उत्तम देणगी आहे.शिवाय इतका ताण घेऊन शरीराचे हाल करण्यात काय अर्थ आहे? तर, मुलांकडून मिळालेल्या जीवनातील कोणत्या धड्याने तुम्हाला खरोखर प्रेरणा दिली आहे?

जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाचे मित्र बनता , तेव्हा पालकत्व सोपे होते. निरोगी पालकत्वाबद्दल अधिक जाणून घ्या आणि तुमच्या मुलांना त्यांचंच सुंदर प्रतिरूप होण्यास मदत करा.

    Hold On!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

    *
    *
    *
    *