परीक्षेच्या वेळी चांगल्या शांत पालकांनाही ताण येतो. प्रिय बाबा आणि आईं, “मुलांबरोबरच आपणही तणावमुक्त झाले पाहिजे, पुन्हा चैतन्य निर्माण केले पाहिजे व कृती केली पाहिजे.”

पालकांना वेळ कमी असतो आणि अनेक जबाबदाऱ्या असतात आणि परीक्षेच्या वेळेस तर त्या फारच वाढलेल्या असतात. अशावेळी धोक्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते, कोठे थांबायचे हे समजत नाही? त्यापासून वाचवण्यासाठी येथे काही गोष्टी दिल्या आहेत.

मदतीची आवश्यकता केंव्हा असते ?

  • तणाव जाणवणे
  • विनाकारण काळजी करणे
  • निद्रानाश
  • डोकेदुखी आणि पोटदुखी
  • भूक कमी लागणे
  • चिडचिड होणे
  • निराश वाटणे
  • छंद जोपासण्यातही रस न वाटणे
  • निरुत्साही व उदास वाटणे
  • नकारात्मक भावना

ही लक्षणे शांत करण्यासाठी व परीक्षेच्या तणावावर मात करण्यासाठी येथे सोप्या नऊ क्लुप्त्या दिल्या आहेत.

टीप १: सुरवातीपासूनच चांगली तयारी करा

काही विद्यार्थी लक्ष्य गाठण्याचा अभिमान बाळगतात. काही जणांकडे कौशल्य असते परंतु ऐनवेळी बढाई मारण्यासारखे काहीही नसते. काहीजण कौशल्य दाखवू शकतात किंवा प्रत्यक्षात कौशल्य मिळवू शकतात, परंतु ११ व्या ऐनवेळच्या तयारीबद्दल बढाई मारण्यासारखे काहीही नाही!
योग्य नियोजन करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. आपल्या मुलांच्या हितासाठी कठोर पालक बनणे आवश्यक असते.

टीप २: वेळापत्रक तयार करणे केंव्हाही योग्यच आहे.

वेळापत्रकात एक नित्यक्रम समाविष्ट करा ,ज्यामुळे अभ्यासक्रम आरामात पूर्ण होईल तसेच सरावासाठी आणि इतर गोष्टींसाठी सुद्धा वेळ मिळेल. यामुळे स्पष्टता येईल, लक्ष केंद्रित होईल आणि दिशा मिळेल , ज्यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल आणि ते सर्वोत्तम तयारी करतील.
मुलांच्या पूर्ण सहभागाने वेळापत्रक तयार केले तर ते योग्य होईल. वेळापत्रक हे वास्तववादी आणि मुलांच्या क्षमतेवर आधारित असणे महत्त्वाचे आहे.

टीप ३: सक्षम कुटुंब हे सकारात्मक वातावरण तयार करते.

असे कुटुंब मुलांच्या पाठीशी असते. परीक्षेच्या वेळा ह्या अतिशय महत्त्वाची असते. असे कुटुंब त्यांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आपल्या मुलांवर लादत नाहीत.

ते पालकत्वाची अशी शैली वापरतात , ज्यामध्ये प्रेमाची उब, वास्तववादी अपेक्षा व लोकशाही असते. ते अनावश्यक तुलना टाळतात आणि मुलांना त्याला जाणून घेण्याची व त्यांची स्वतःची ओळख विकसित करण्याची संधी देतात.

ते जे बोलतात, ते स्वतःही आचरणात आणतात.

टीप ४: ताण कमी करणाऱ्या व्यायामाचा सराव

तणाव कमी करणारे व्यायाम , उदाहरणार्थ धावणे, जिममधील वर्कआउट, पोहणे, एखादा आवडीचा खेळ खेळणे यामुळे ऊर्जा वाढते, तणाव कमी होतो आणि मन स्वच्छ होते. परीक्षेच्या वेळी पालकांनी व मुलांनी त्यांच्या व्यायामाचा नित्यक्रम सुरू ठेवावा.

प्राणायाम (श्वसनाचे सोपे प्रकार), योगासने विशेषतः सूर्यनमस्कार आणि ध्यान यांचा सराव करावा.

टीप ५: परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी योग्य आहार

संतुलित शाकाहारी आहार आणि त्यासोबत फळांचा रस, सुकामेवा, सोया दूध आणि भरपूर पाणी घेतल्यास शरीर तसेच मन जोमात राहते. जंक फूड, एनर्जी ड्रिंक, कोला, मिठाई आणि चॉकलेट टाळावेत.

चरबीयुक्त पदार्थ, साखर आणि कॅफिन असलेले पदार्थ आपल्याला अतिक्रियाशील, चिडखोर आणि भावनात्मक बनवतात.

आपले मन पूर्णपणे सतर्क राहण्यासाठी पोट हलके ठेवावे.

टीप ६: शांत झोपेमुळे तणाव कमी होतो

शांत झोपेने ताण कमी होतो, विचार सुधारतात आणि लक्ष केंद्रित राहते. लहान मुले आणि मध्यमवयीन व्यक्तींनी ७ ते ८ तास चांगली शांत झोप घेतली पाहिजे.

चांगल्या झोपेसाठी झोपेच्या वेळी तणाव दूर ठेवावा. पालकांनी झोपेचे वेळी मंद प्रकाश आणि आवाज नसलेले वातावरण ठेवले पाहिजे.

ध्यान आणि दीर्घ श्वसनामुळे ताण कमी होऊन चांगली झोप लागण्यास मदत होते. एखाद्या पाळीव प्राण्याशी असलेला बंध ताण कमी करण्यास आश्चर्यकारक मदत करतो.

शेवटच्या क्षणापर्यंत घाईघाईत केलेला अभ्यास हा नुकसानकारकच ठरतो हे लक्षात ठेवावे आणि मुलांना चांगली झोप घेण्यास प्रोत्साहित करावे.

टीप ७: अति प्रभावी अभ्यासाच्या सवयी

चांगला अभ्यास करण्यासाठी इथे काही प्रभावी धोरणे दिली आहेत. जी सोपी आहेत , अवघड नाही.

  • तुमच्या मुलाला लेखी किंवा आवाजात टिपण्या बनवण्यास मदत करा.
  • लहान माहिती असलेल्या कार्डचा वापर करता येईल. प्रश्नमंजुषा ॲप्स देखील प्रभावी ठरतात.
  • काही मुलांना त्यांच्या कुटुंबियांसह अभ्यास करायला आवडते.
  • स्मरणशक्ती वाढवणारी पध्दत अवलंबा.
  • प्रभावी वाचन कौशल्याचीही (जसे हायलाईट करणे/ अधोरेखित करणे) मदत होते.

टीप ८: परीक्षा तंत्राची चर्चा करा.

परीक्षेच्या वेळी थोडासा ताण असणे चांगले आहे. तो एक जीवनाचा भाग आहे. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक पालकत्वाचा भाग आहे. पालकांनी मुलांशी परीक्षेच्या तंत्रावर चर्चा करावी. आजीबाईच्या शहाणपणाच्या गोष्टीही मुलांना सांगाव्यात.

तुम्हाला माहित आहे कां?

संप्रेरके आणि ताण प्रतिसाद यांच्यात परस्पर संबंध असल्याचे संशोधनात आढळून आले आहे. कॉर्टीसोल हे तणावाच्या प्रतिसादासाठी असलेले प्राथमिक संप्रेरक आहे. कॉर्टीसोलच्या जास्त पातळीमुळे स्मरणशक्ती कमी होते, सतर्कता वाढते आणि चिंतेची भावना निर्माण होते. अत्यावश्यक शिकण्याची कौशल्ये जसे तर्कशक्ती, विश्लेषण करण्याची क्षमता तसेच स्वयं-नियंत्रणाची क्षमता देखील क्षीण होते.

टीप ९: एखादे बक्षीस देणे

एखादे छोटेसे यश छोटे बक्षीस देऊन साजरे केल्यास ते खूप आनंद देऊन जातात. असे आनंदाचे क्षण परीक्षांना सामोरे जाण्यास मदत करतात.

मुलांचा सराव पूर्ण झाल्यावर त्यांना त्यांचे आवडते जेवण किंवा दूरदर्शन वरील आवडता कार्यक्रम पाहू देण्याचे बक्षीस देखील देता येईल. परीक्षा संपल्यानंतर देखील असे क्षण साजरे करता येतील.

टीप १०: नियमित योग व ध्यान

योग आणि ध्यानाचा नियमित सराव मुलांना अधिक आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाण्यास मदत करेल. असा आत्मविश्वास असलेले विद्यार्थी पालकांचाही ताण कमी करतील आणि याउलट आत्मविश्वास नसलेले विद्यार्थी पालकांचा ताण वाढवतील.

    Wait!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity


    *
    *
    *
    *
    *