आपल्याला आपल्या किशोरवयीन मुलांची आक्रमकता हाताळायची असेल, प्रथम आपला स्वतःचा राग समजून घेणे आणि तो शांत होण्यासाठी निकोप मार्ग शोधणे आवश्यक आहे. आपल्याला दुसऱ्यांच्या संवेदना समजून घेण्याचा गुण विकसित करणे आवश्यक आहे. आपल्या बदलणाऱ्या मानसिक स्थिती आपली आपल्या मुलाशी वागणूक दरवेळी वेगळी नसते कां? आपण खुश असलात की आपल्या मुलाशी सहजरित्या गोड वागता, पण आपण तणावग्रस्त असलात तर आपल्या मुलावर किंवा आपल्या जोडीदारावर पुन्हा आपला राग निघतो, ज्यामुळे कौटुंबिक शांतता बिघडत असते. अशी वागणूक आपल्या मुलासाठी कोणत्याही प्रकारे प्रेरणादायी नसते. इथे ज्ञानाचा खरा उपयोग होतो.  हेच ज्ञान आहे जे तणावाला आपल्या चेताप्रणालीमध्ये येण्यापासून रोखते आणि सहानुभूती विकसित करते.

आपल्या मुलाचा राग प्रेमाने कमी करण्यासाठी युक्त्या

  1. हिऱ्यासारखे कणखर व्हा, दुखावले जाऊ नका.

    मुलांच्या संवेदना समजून घेणारा एक पालक म्हणून, आपण केंद्रीत असणे आणि आपल्या मुलाच्या आक्रमकतेवर लगेच व्यक्त न होणे खूप महत्वाचे आहे. मुलं स्वतःच्याच तणावांमुळे असंवेदनशील होतात आणि आपल्या बोलण्याचा काय परिणाम होईल याची पर्वा न करता कठोरपणे बोलू शकतात. समजून घ्या की आपल्या मूलाचे मन सध्या ताळ्यावर नाही आणि त्याला आपल्या आधाराची गरज आहे. हिर्‍याप्रमाणे कणखर रहा आणि निश्चितपणे जाणून घ्या की आपल्या मुलांचा देखील हेतू चांगला असू शकतो. आपल्याबद्धलच्या त्यांच्या प्रेम आणि आदराबद्धल कधीही शंका घेऊ नका.

  2. आपल्या मुलावर प्रभाव असणाऱ्या व्यक्तीला प्रभावित करा.

    पालक म्हणून आपणास एक गोष्ट माहित असणे आवश्यक आहे की आपण आपल्या मुलांमध्ये जे सारे बदल बघू इच्छिता, ते सर्व काही आपण एकट्याने घडवून आणू शकत नाही. सामान्यतः वाढत्या वयात मुलांमधील सर्व प्रभावांत त्यांच्या आजूबाजूच्या मुलांचा प्रभाव अधिक असतो. मुलांच्या अतिशय जवळचे मित्र, ज्यांना नाकारणे आपल्या मुलाला कठीण असेल अशा चार ते पाच मुलांवर आपला पालक म्हणून ज्यादा प्रभाव असणे आवश्यक आहे. चांगले पालक होण्यापूर्वी आपल्या मुलांच्या मित्रांसाठी चांगले काका किंवा काकू व्हा. कुशलतेने आपल्या मुलाच्या मित्रांना सकारात्मक हेतूने प्रभावित करा आणि आपणास आपल्या मुलाच्या आयुष्यातही खूप मोठा बदल झालेला दिसून येईल. हे सर्व आपल्या मुलास वाईट सवयी आणि नकारात्मकतेपासून वाचवेल.

  3. तसे पाहता, राग चांगला आहे.

    कधीकधी आपल्या मुलांवर राग दाखवणे आवश्यक आहे. आपला राग त्यांना मजबूत आणि लवचिक बनवतो. जर आपण नेहमीच गुडी-गुडी/ अगदी गोड असलात आणि आपल्या मुलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ दिला नाही, तर मग नक्की जाणून घ्या की आपण त्यांना अधिक नाजूक बनवत आहात. पुढे ते मोठे होऊन अपयश, नकार, टीका, बदलती परिस्थिती यांसारख्या जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी खूप संवेदनशील बनतात. दैनंदिन जीवनातील क्षुल्लक बाबी देखील त्यांना संतप्त आणि आक्रमक बनवतील. त्यामुळे, तुमच्या मुलाला योग्य मार्गावर आणण्यासाठी रागाचा एक साधन म्हणून वापर केलात तर त्यासाठी आपणास अपराधी वाटण्याचे कोणतेही कारण नाही.

  4. देण्यातला आनंद आपल्या मुलाला शिकवा.

    देणे हा मुलांचा मूळ स्वभाव असल्याने शेअर करणे ही मुलांसाठी आनंदाची गोष्ट आहे. पण एक पालक म्हणून, जर आपण त्यांना शेअरिंग देणे आणि काळजी घेणे या सकारात्मक बाबींचा अनुभव घेण्यास मदत केली नाही तर त्यांची मानसिकता संकुचित होऊ लागते. मुले कधीकधी त्‍यांच्‍या वस्तूंविषयी मत्सर आणि राग व्यक्त करतात, पण हे ठसे त्यांच्या मनात केवळ बीज रूपात असतात. पालक म्हणून आपल्या मुलांचे भविष्य घडविण्यासाठी आपण त्यांना कसे काय संस्कार देता हे महत्वाचे आहे. भुकेल्यांना खाऊ घालणे किंवा समाजाची सेवा करणे अशा साध्या सेवेच्या कृती, आपल्या मुलाला निखळ आनंदाचा अनुभव घेणे, वाढवणे आणि तो इतरांपर्यंत पोहोचवणे यासाठी मदतीच्या ठरतील आणि त्यांच्या स्वभावातील आक्रमकता गळून पडेल.

    मेधा योग – स्तर १ हा असाच एक कार्यक्रम आहे जिथे किशोरवयीन मुले विज्ञानावर-आधारित श्वसन प्रक्रियेद्वारे आपल्या तणावातून मुक्त होत सेवेचा आनंद घेतात.

  5. तुम्ही तुमच्या मुलाचे मित्र आहात कां?

    आपण आपल्या मुलांशी मैत्रीची भावना ठेवावी कां, हा आजही एक मोठा वादाचा विषय आहे! सर्वोत्तम पालकत्वाची शैली अशी असावी जी आपल्या मुलाच्या वाढत्या वयानुसार बदलत राहील. प्राचीन शास्त्रे असे सुचवितात की जेव्हा मूल सोळा वर्षांचे होते, तेव्हा पालकांनी त्यांच्यासोबत मित्रासारखे वागले पाहिजे. आपल्या मुलाशी मित्रत्वाने संवाद साधा आणि त्याच्याशी आदराने वागा. आणि आपल्या मुलाला आपण एक जबाबदार प्रौढ व्यक्ती म्हणून कसे असावे आणि आपल्या विश्वासाला कसे पात्र ठरावे हे नैसर्गिकरित्या समजू लागेल.

     || प्राप्ते षोडशे वर्षे पुत्रं मित्रवदाचरेत्‌ || 

  6. विनोदबुध्दी जागृत ठेवा.

    आपल्या सर्वांना विनोदाचे भान असते. आपले मन शांत असेल तर आपण परिस्थितीला सहजपणे आणि विनोदाने हाताळू शकतो. आपल्या विनोदबुद्धीमध्ये घरातील संपूर्ण वातावरणात परिवर्तन घडवून आणण्याची ताकद आहे, ज्याद्वारे आपल्या मुलासोबत आपली जवळीक वाढेल. कदाचित ज्यामुळे आपले मूल संतापत असेल, तो आपला कडकपणा सोडण्यास आपल्या विनोदाची एखादी झुळूक आपल्या मदतीची ठरेल. आपल्या मुलासोबत पालक म्हणून अधिक सकारात्मक क्षण घालवा आणि विनोदाचे सहाय्य घेत कसेही करून वाद टाळा.

World Meditation Day

● Live with Gurudev Sri Sri Ravi Shankar

● Live at 8:00 pm IST on 21st December

Sign up for free!