कैद्यांचे जीवन परिवर्तन

मानसिक धक्क्यातून बाहेर काढून कौशल्य प्रशिक्षणाद्वारे कैद्यांचे पुनर्वसन

icon

आव्हान

कैदी हिंसेच्या चक्रामध्ये अडकून राहतात.

icon

योजना

क्रोध, ताणतणाव आणि हिंसा कमी करण्यासाठी यशस्वी प्रक्रियांद्वारे कैद्यामध्ये परिवर्तन घडवणे.

icon

परिणाम

जगभरातील ६५ देशांमधील ८ लाखांपेक्षा जास्त कैदी आणि काराग्रह कर्मचारी यांच्यात वैश्विक स्तरावर परिवर्तन

आढावा

ज्या व्यक्तीने गुन्ह्याचा आश्रय घेतला असेल त्या प्रत्येक व्यक्तीला बदलण्याची आणि अर्थपूर्ण जीवन जगण्याची संधी मिळाली पाहिजे, असे आम्हाला वाटते. आर्ट ऑफ लिव्हिंगचा प्रिझन प्रोग्रॅम हा, जे तुरुंगवासामध्ये आहेत आणि जे फौजदारी न्याय व्यवस्थेमध्ये कार्यरत आहेत, या दोघांसाठी बनवला आहे.

यामध्ये शिकवलेले ताण तणाव कमी करण्याची कौशल्ये, मानसिक आघातांवर उपचार आणि नकारात्मक भावनांना हाताळण्याची वास्तविक पद्धती इत्यादींमुळे जीवनात परिवर्तन झाले.

हा प्रोग्रॅम हिंसेचा इतिहास असणारे कैदी आणि लोकांना गुन्हा करण्याच्या वृत्तीमधून बाहेर पडण्यास मदत करतो.

विविध कारागृह अधिकारी आणि सशस्त्र सैन्य दल यांच्या सहाय्याने आजपर्यंत जगभरात ८ लाखापेक्षा जास्त कैद्यांचे हे शिबिर घेतले आहे. या शिबिरामुळे ज्यांच्या जीवनात बदल घडला आहे असे कित्येक कैदी आत्ता आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक बनले असून आमच्या खांद्याला खांदा लाऊन समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी कार्यरत आहेत.

प्रत्येक गुन्हेगारामध्ये एक पिडीत असतो, जो मदतीसाठी आक्रोश करत असतो. त्या पिडीताला सहाय्य केल्याने त्याच्यातील गुन्हेगार नाहीसा होतो.

- गुरुदेव श्री. श्री. रवि शंकर

आव्हाने

वर्षानुवर्षाच्या कारावासामुळे स्वतःला कमी लेखणे, क्रोधाची भावना निर्माण होणे, चिता आणि नैराश्य निर्माण होणे या गोष्टी होतात. बहुतांशी कैद्यामध्ये, “मी कधीही या गुन्ह्याच्या दुष्ट चक्रातून बाहेर पडणारच नाही” असा विश्वास निर्माण झालेला असतो.

कैदेतून सुटका झाल्यावर समाज त्यांना परत समाजाच्या मुख्य प्रवाहात स्वीकारत नाही. यामुळे कित्येक कैदी परत गुन्हेगारीकडे वळून दुष्टचक्रात अडकतात.

स्वतःच नकारात्मक परिस्थितीमध्ये, सतत आणि अति काम करत असताना निर्माण होणाऱ्या तणावामुळे कारागृहाचे कर्मचाऱ्यांना कैद्यांमधील ही मानसिकता बदलणे कठीण होऊन जाते.

हिंसाचाराचे चक्र

योजना

आमच्या प्रीजन शिबिरामध्ये :

कैद्यांना भावनिक स्तरावर उपचार: अमच्या प्रीजन शिबिरामध्ये कैद्यांना नकारात्मक भावनेतून, उदा. मानसिक धक्का, आत्मग्लानी आणि क्रोध इत्यादीच्या चक्रातून बाहेर पडण्यास मदत करणाऱ्या विशेष श्वसन प्रक्रिया शिकवतो. अशा भावनांमधून त्यांना बाहेर पडण्यास मदत व्हावी म्हणून अशी शिबिरे सतत घेतली जातात. एकदा कैदी क्रोध आणि ताण तणाव यामधून बाहेर पडले की , सुटकेनंतर ते परत गुन्हेगारीकडे न वळता समाजसेवा करण्यास प्रवृत्त होतात.

जीवन जगण्याची संधी : आपण कैद्यांसाठी व्यावसाईक प्रशिक्षण देत असतो, जेणेकरून सुटकेनंतर अर्थार्जनामुळे ते सन्मानपूर्वक जीवन जगू शकतील.

कर्मचाऱ्यांना तणावमुक्त करणे : कारागृह आणि कायदा राबवणारे कर्मचारी तणावमुक्त होऊन आणखी कार्यक्षम बनतील असे विशेष तयार केलेली शिबिरे आपण घेत असतो.

आपला तीन कलमी कार्यक्रम :

भावनिक स्तरावर

श्वसन प्रक्रियेद्वारे कैद्यांना उपचार देणे

व्यावसाईक प्रशिक्षण

कैद्यांना सन्माननीय जीवनाची संधी देणे

कारागृह कर्मचाऱ्यांसाठी तणावमुक्त

विशेष बनवलेल्या शिबिरांद्वारे त्यांना तणावमुक्त करणे

परिणाम

८ लाख+

जास्त लोकांमध्ये

परिवर्तन

७,०००+

सशस्त्र सेवकांच्यात

 सेवकांच्यात बदल

३.५ लाख

कैद्यांचे परिवर्तन

भारतातील १०० कारागृहातील

१७

कौशल्य विकास केंद्रे

भारतभरातील कारागृहामध्ये

६०,०००

कैद्यांना लाभ

तिहार जेलमधील

६५

देशांमध्ये

प्रीजन प्रोग्रॅम सुरु