दैनंदिन जीवनात अगदी सहजतेने विविध भूमिका पार पाडत महिला समाजाच्या आधारस्तंभ बनल्या आहेत. कधी प्रेमळ कन्या, तर कधी वात्सल्यपूर्ण माता, तर कधी सक्षम सहचारिणी अशी विविध नाती अत्यंत कुशलतेने आणि कोमलतेने त्या निभावत आहेत.
असे असले तरी जगाच्या पाठीवर बऱ्याच ठिकाणी समाजाकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. तसेच महिला मोठ्या प्रमाणात सामाजिक असमानता, अत्याचार, आर्थिक परावलंबित्व आणि अन्य सामाजिक अत्याचारांना बळी पडतात. अनादी काळापासून महिलांवरील ही बंधने त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासाच्या आड येत आहेत.
महिलांचे आर्थिक आणि सामाजिक सबलीकरण |Empowering Women Socially and Economically
महिलांना समाजात सन्मान प्राप्त करून देण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगने समाजातील विविध स्तरावरील महिलांना आत्म सन्मान, अंतर्गत मजबुती आणि रचनात्मक विकासास कारणीभूत होतील असे महिला सक्षमीकरण कार्यक्रम सुरु केले आहेत. या कार्यक्रमांमुळे महिला आत्ता सर्व समस्यांवर मात करत आपले कौशल्य, आत्मविश्वास आणि उपयोगितेबाबतीत अग्रेसर होताना दिसतात. आपल्या कुटुंबामध्ये, इतर महिलासाठी आणि समाजामध्ये शांतीचे आणि सकारात्मक सामाजिक परिवर्तनाचे प्रतिनिधित्व करताना दिसतात.
आर्ट ऑफ लिव्हिंग केलेले सहा महिला सबलीकरण / सशक्तीकरण (सक्षमीकरण) कार्यक्रम | 6 Women Empowerment programs taken up by The Art of Living
- आर्थिक स्वातंत्र्य
- मुलींचे शिक्षण
- एचआयव्ही / एड्स
- जल कार्यक्रम
- नेतृत्व विकास
- सामाजिक सक्षमीकरण
महिला सबलीकरण / सशक्तीकरण (Mahila Sashaktikaran) प्रेरणादाई अनुभव
तीन तरुण मुली आपल्या वेदनादाई आणि क्लेशदाई अनुभवांसह श्री श्री सेवा मंदिर, गुंटूर येथे आल्या होत्या. श्रीमती मॉं यांचे संरक्षण आणि प्रेमळ मार्गदर्शनामुळे आज ज्योती, तत्वमसी आणि श्रावणी चैतन्यदायी आणि अविनाशी उत्साहाने हसत आहेत. या तिघींची जीवनकहानी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
शिक्षणाद्वारे महिला सबलीकरण / सशक्तीकरण | Women Empowerment through education
जीवनात प्रगती करण्याचे शिक्षण हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. महिलांची प्रगती आणि सक्षमीकरणासाठी (Mahila Sashaktikaran)शिक्षणापेक्षा जास्त परिणामकारक काय असू शकते? आर्ट ऑफ लिविंगने शिक्षणाद्वारे देशातील काना कोपऱ्यातील ग्रामीण मुली आणि महिलांना समान दर्जाने सक्षम बनवले आहे. या ज्ञानोदयाबाबतीत आणखी जाणून घेऊया!
भारतातील महिला सबलीकरण / सशक्तीकरण कार्यक्रम | Women Empowerment Programs in India
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या महिला सक्षमीकरण कार्यक्रमामुळे देश विदेशातील महिलांना आर्थिक स्वतंत्र बनवले आहे, ज्यामुळे त्या सामाजिक अन्यायाविरुद्ध उभ्या ठाकल्या आहेत. या महिला सकारात्मक परिवर्तनाचे प्रतिनिधी बनून इतर महिलांना शिक्षित आणि सक्षम बनवण्यासाठी, त्यांना स्वतःची ओळख प्राप्त करून देण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या महिला सबलीकरण/सशक्तीकरण/सक्षमीकरण कार्यक्रमामुळे त्यांना एक व्यासपीठ प्राप्त झाले आहे जेथून प्रेरणा घेऊन त्या पिढ्यान पिढ्याची बंधने झुगारून, सर्व क्षेत्रातील असमानता झुगारून समानता प्राप्त करू शकतील.
भारत भरातील महिला सक्षमीकरण कार्यक्रमाच्या काही यशोगाथा
- दुष्काळग्रस्त देऊळगांवाला मिळाले पाणी. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ५० स्वयंसेवकांनी गांवातील ४०० कुटुंबांच्या जलपूर्ती साठी ५० दिवशीय कार्यक्रम सुरु केला.
- ‘प्रोजेक्ट उडान’ मुळे होतेय ११००० वेश्यांचे जीवन परिवर्तन.
महिला सबलीकरण / सशक्तीकरण / सक्षमीकरणाची पहिली पायरी | First step to women empowerment
श्री श्री रवि शंकर जी म्हणतात - “ सामाजिक असमानता, कौटुंबिक हिंसा, अत्याचार आणि आर्थिक परावलंबित्व यातून स्त्रियांची सुटका व्हायची असेल तर गरज आहे महिला सक्षमीकरणाची (सबलीकरण / सशक्तीकरण). प्रथम ‘आपण सक्षम आहोत’ याची खात्री स्त्रियांनी बाळगणे गरजेचे आहे. आपण स्त्री आहोत या आत्मग्लानीमध्ये कधीही राहू नका. जेंव्हा तुम्ही आत्मग्लानीमध्ये येता तेंव्हा ऊर्जा, उत्साह आणि सामर्थ्य गमावता.
अध्यात्मिक मार्ग एकमेव मार्ग आहे जेथे तुम्ही आत्मग्लानी आणि अपराधीपणावर मात करू शकता. आत्मग्लानी आणि अपराधी भावना, दोन्ही मध्ये तुम्ही आपल्या मनाचा छोटेपणा अनुभवता - ज्यामुळे तुम्ही आपल्या आत्म्यापासून दूर जाता. स्वतःला दोष देणे बंद करून आपली स्तुती - कौतुक करणे सुरू करा. ‘स्तुती करणे दैवी गुण आहे, होय नां? मी स्त्री आहे, अबला आहे, असा विचार सुद्धा करू नका. या आंतरिक असमानातेमुळे काहीही घडणार नाही. उभे रहा, तुमचे अधिकार प्राप्त करण्यासाठी गरजेचे सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे.
नक्कीच समाजामध्ये बदल घडायलाच हवा. परंतु आत्मग्लानीमध्ये राहून तुम्ही हा बदल करू शकत नाही.”