Meditation session during happiness program

क्विट् टोबॅको प्रोग्रॅम (तंबाखू सोडा !)

तंबाखू सोडा • तुमचे आरोग्य सुधारवा • स्वच्छ रहा

श्वसनाची विशिष्ट क्रिया, परस्परातील संवाद प्रक्रिया व विशेषज्ञांचे मार्गदर्शन असलेली कार्यशाळा. मुख्य म्हणजे याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

नोंदणी करा

मला या शिबिरातून काय मिळेल?

icon

तंबाखूच्या कोणत्याही प्रकारापासून दूर रहायला शिका!

तुम्ही तंबाखूचे सेवन धूम्रपान करुन, बिडी ओढून करत असाल अथवा गुटखा, चुना तंबाखू, मावा, पान मसाला इत्यादी खाऊन करत असाल, किंवा तपकीर ओढत असाल तर असे सर्व प्रकारचे व्यसन नैसर्गिक पद्धतीने सोडू शकाल. व्यसन करण्याची तीव्र इच्छा यशस्वीपणे रोखू शकाल. परत सवय जडणे निश्चितपणे टाळू शकाल.

icon

ताण तणाव, चिंता, निद्रानाश यापासून मुक्तता

मानसिक ताणतणाव घालवण्यासाठी काहींना तंबाखूचे सेवन करावेसे वाटते व नंतर ते त्याच्या आहारी जातात. काही सिद्ध झालेल्या प्रक्रियाद्वारे तंबाखूच्या व्यसनाबद्दलची चिंता आणि निद्रानाश दूर करा.

icon

आरोग्य, रोगप्रतिकारक क्षमता व ऊर्जा वाढवा.

तंबाखूमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी होते. आम्ही शोधून काढलेल्या पद्धतीने हृदयविकाराचा धोका कमी होतो, आपली ऊर्जा वाढते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आरोग्य सुधारते.

icon

सुदर्शन क्रिया शिका : श्वसनावर आधारित जगातील सर्वात शक्तिशाली प्रक्रिया!

सुदर्शन क्रिया ही एक लयबद्ध श्वसनावर आधारित क्रिया आहे .तंबाखूचे सेवन करणाऱ्याला व त्याच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला आतून ताणतणाव निर्माण होत असतात .सुदर्शन क्रियेमुळे हे ताणतणाव कमी होतात .आपण तंबाखूच्या सेवनापासून व त्यावर अवलंबून रहाण्यापासून वाचतो. सुदर्शन क्रियेने तंबाखू सेवनावर नियंत्रण येते हे आता सिद्ध झाले आहे.

डॉ. राजेश

फुफ्फुसाचे आरोग्य आता महत्वाचे आहे.

डॉ. राजेश धोपेश्वरकर

हृदयरोगतज्ज्ञ, ई पी स्पेशलिस्ट, हार्ट रिदम आणि हार्ट फेल्युअर क्लिनिक, पुणे

मला हे शिबिर करायचे आहे पण...

ऑनलाईन कार्यशाळा अजून चालू आहे का?

हो, चालू आहे.

या कार्यशाळेचा कालावधी किती आहे? वेळा काय आहेत?

ही कार्यशाळा १५ तासांची आहे. (५ दिवस रोज ३ तास). तुम्ही कार्यशाळेची वेळ तुमच्या सोयीप्रमाणे शोधू शकता.

मला याची भीती वाटते की कुणी मला या कार्यशाळेत बघितलं तर त्यांना कळेल की मी तंबाखू सेवन करतो.

आमच्या गोपनीयता धोरणाने आम्ही सर्व विद्यार्थ्यांची माहिती गुपित ठेवतो. तसेच तुम्ही ऑनलाईन असल्याने आपल्या घरातच असाल, तुम्ही हेड फोन वापरू शकता.

मी एकाजागी खूप वेळ बसू शकत नाही. ध्यानासाठी बसायचा संयम माझ्याकडे नाही.

प्रत्येक गोष्ट पहिल्यांदा करताना असे होऊ शकते. पण एकदा सुदर्शन क्रिया आणि ध्यान केले की तुम्हाला खूप वेळ बसायला अजिबात त्रास होणार नाही याची प्रचिती येईल.

माझ्या मादक द्रव्य सेवनाबद्दल सविस्तरपणे दुसऱ्या व्यक्तीला सांगायला मला तितकेसे चांगले वाटत नाही.

काळजी करू नका. आम्ही वचन देतो आम्ही तुमच्या वयक्तिक जीवनात ढवळाढवळ करत नाही, तसेच तुमच्या सवयीचे सांत्वन किंवा विरोध करत नाही. तुम्हाला चांगले वाटणे हे आमच्यासाठी महत्वाचे आहे.

सुदर्शन क्रिया ही प्राणायाम पद्धत केल्याने माझ्या आरोग्यात सुधारणा होईल?

हो. अनेक अभ्यास आणि वैयक्तिक अनुभव असे आहेत की सुदर्शन क्रिया केल्याने अयोग्य आणि एकूणच जीवनशैलीत सुधारणा झाली आहे. मग ती व्यक्ती मादक द्रव्य घेणारी असो किंवा नसो. हे सिद्ध झाले आहे की सुदर्शन क्रिया केल्याने झोप चांगली लागते, ताण तणाव कमी होतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि असे बरेच फायदे आहेत. तुमच्या प्रशिक्षकास तुमच्या सध्याच्या आरोग्याच्या स्थिती विषयी सविस्तर माहिती द्या आणि आम्ही तुम्हाला वैयक्तिक आणि सटीक सल्ले देऊन तुमचा अनुभव उंचावू शकू.