sahaj samadhi dhyana yoga

सहज समाधी ध्यान योग

मनःशांती वाढवा • आरोग्य सुधारा • मनाची सुस्पष्टता वाढवा • अंतर्ज्ञान विकसित करा

रोज २ तास याप्रमाणे ३ दिवस

*तुमचे योगदान, तुम्हाला आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सामाजिक योजणांसाठी लाभदायक आहे.

नोंदणी करा

मला या शिबीरातून काय मिळेल?

icon

अधिक मन:शांति

सहज समाधी ध्यानयोग तुमच्या मेंदूच्या लहरींना शांत अल्फा लहरींच्या  (मेंदूची गहन विश्रांतीची स्थिती)  अवस्थेत आणतो, ज्यामुळे तुमची मज्जासंस्था शांत होते, शरीर आणि मनाला गहिरी विश्रांती आणि आराम मिळतो.

icon

मनाची अधिक सुस्पष्टता

ध्यान विचारांचा सततचा ओघ शांत करते, त्यामुळे मनाची सुस्पष्टता आणि सजगता वाढते. सहज समाधी केल्याने  तुमचा एकाग्रतेचा कालावधी वाढल्याचे दिसून येईल. तसेच आत्म-जागरूकता आणि उत्तम निर्णय घेण्याची क्षमता  अनुभवता येईल.

icon

उत्तम शारीरिक स्वास्थ्य

आपली मज्जासंस्था म्हणजे आपल्या शरीरासाठी ऊर्जा निर्मितीचे केंद्र आहे. शांत आणि तजेलदार अशी मज्जासंस्था शरीराच्या हृदय व रक्तवाहिन्यांचे कार्य, पचन संस्था आणि श्वसन प्रणालीचे कार्य सुधारते.

icon

अंतर्ज्ञानाचे कौशल्य विकसित करा

सहज समाधी ध्यान योग तुमच्या मनातील सततची बडबड शांत करून, तुमचा  आंतरिक आवाज ओळखण्यास आणि तुमची निर्णय शक्ति बळकट करण्यासाठी तुमचे अंतर्ज्ञान सक्षम करण्यास मदत करते.

हे नेमके कसे होते ?

ध्यान ही विश्राम करण्याची कला आहे, काहीही न करण्याची कला आहे, परंतु बऱ्याच लोकांसाठी, काहीही न करणे सोपे नाहिये. ध्यानासाठी अनेक पद्धती आहेत परंतु सहज समाधीमध्ये, आपण गहिऱ्या विश्रांतीच्या स्थितीत पोहोचण्यासाठी भारीत केलेले सूक्ष्म ध्वनी (मंत्र) वापरतो. या शिबिरात तुम्हाला तुमचा वैयक्तिक मंत्र दिला जाईल आणि ध्यानासाठी त्याचा वापर कसा करायचा हे शिकवले जाईल. मंत्र हे तुम्हाला चेतनेच्या सखोल पातळीवर नेण्याचे वाहन बनते. जसजसे तुम्ही तुमच्यात खोलवर जाता, तसतसे तुमच्यात आनंद, स्पष्टता, शांतता, अंतर्ज्ञान आणि सर्जनशीलता प्रकट होते आणि शेवटी तुम्ही कोण आहात याची तुम्हाला जाणीव होते.

कोर्समध्ये काय समाविष्ट आहे?

  • तुमच्या वैयक्तिक मंत्रावर आधारित ध्यान प्रक्रिया
  • ध्यानाची प्रमुख तत्वे
  • कोणकोणते घटक मनाला अस्वस्थ करतात ते ओळखणे आणि त्यावर उपाय करणे
  • विविध खाद्यपदार्थांचा तुमच्या मनावर आणि विचारांवर कसा परिणाम होतो

संस्थापक

गुरुदेव श्री श्री रवि शंकर

गुरुदेव श्री श्री रविशंकर हे जागतिक मानवतावादी, अध्यात्मिक नेते आणि शांतीदूत आहेत. तणाव मुक्त, हिंसा मुक्त समाजाच्या निर्मितीसाठी अभूतपूर्व अशा जागतिक चळवळीचे नेतृत्व ते करतात.

आणखी जाणून घ्या

मला नोंदणी करायची आहे पण...

सहज समाधी शिकण्यासाठी मला आधी ध्यान साधना करत असण्याची गरज आहे का?

अजिबात नाही. तुम्ही यापूर्वी कधीही ध्यान केले नसले तरीही तुम्ही सहज समाधी ध्यानयोग शिकून त्याचे फायदे मिळवू शकता.

सहज समाधी ध्यानयोग , मार्गदर्शित ध्यानापेक्षा कसा वेगळा आहे?

मार्गदर्शित ध्यान करताना, आपल्याला तोंडी सांगितलेल्या सूचना आणि संगीत हे ध्यान करण्यास चांगले वातावरण निर्माण करते. ते तुम्हाला सुखदायक आणि शांत वातावरण निर्माण करून विश्राम आणि आराम करण्यास मदत करतात. दुसरीकडे, सहज समाधी ध्यान योग ही एक मंत्र-आधारित ध्यान प्रक्रिया आहे. मंत्र हा एक भारित केलेला, सूक्ष्म ध्वनी आहे जो तुम्हाला चेतनेच्या सखोल अवस्थेत घेऊन जातो. निर्देशित ध्यानांसाठी, चांगले मार्गदर्शन आवश्यक आहे, परंतु एकदा तुम्ही सहज समाधी ध्यान शिकलात की, मग तुम्ही या प्रक्रियेने स्वतःहुन ध्यान करू शकता. त्यासाठी तुमचा फक्त दररोज २० मिनिटांचा वेळ आणि तुम्ही आरामात बसू शकाल असा एक शांत कोपरा हवा आहे. नियमित सरावाने, तुम्हाला अधिक शांती जाणवेल आणि तुमच्या शारीरिक आरोग्य आणि मानसिक शांतता आणि बौद्धिक कुशाग्रता यातील सुधारणा तसेच तुमची वाढलेली सजगता आणि तीक्ष्ण अंतर्ज्ञानी कौशल्ये लक्षात येतील.

मी प्रभावीपणे ध्यान करू शकत नाही. जेव्हा मी ध्यान करायला बसतो तेव्हा मला झोप येते.

तुम्ही ध्यान करु लागता तेव्हा सुरुवातीला झोप येणे अगदी स्वाभाविक आहे. हे फक्त आपल्या संस्थेला अधिक विश्रांतीची आवश्यकता असल्याचे सूचित करत असते. तुम्ही ध्यान करणे थांबवू नका ! जसजसे तुम्ही दररोज सहज ध्यान करत जाल , तसतसे तुम्हाला जाणवेल की २० मिनिटांचा सहज समाधी ध्यानयोग काही तासांच्या झोपेइतकाच उत्साहवर्धक आहे!

सहज समाधी ध्यान योगासाठी काही विशेष बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे का?

शक्यतो रिकाम्या पोटी ध्यान करणे श्रेयस्कर आहे. जेवणापूर्वी किंवा जेवल्यानंतर ९० मिनिटांनंतर सहज समाधी ध्यान योग करण्यासाठी योग्य वेळ आहे. त्या शिवाय तुम्हाला दररोज २० मिनिटे बसण्यासाठी फक्त एक आरामदायी जागा हवी आहे.