आढावा
आमझोर या झारखंड मधील नक्षली भागातील एका छोट्याश्या खेड्यात पहाटेचे ५ वाजले आहेत. एक लहान मुलगी आणि तिचा भाऊ सकाळी उठतायत, अजून एका दिवसाची सुरवात करतायत. दात घासून, आपण शाळेत शिकलेले भजन गुणगुणत आंघोळ करतात. डोक्याला तेल लावतात. त्यांची आई खुशीने त्यांना शाळेत सोडते. एक पांढरा युनिफॉर्म आणि चांगले बूट जे वर्षभर टिकतील असे घालून ते दोघे शाळेत चाललेत. पाच किलोमीटर जंगलातील अंतर कापून ते रोज शाळेत जातात. ‘ श्री श्री ज्ञान मंदिर ‘ शाळा पातमाडा भागातील आडबाजूच्या ‘जाजरादिह’ नावाच्या आदिवासी खेड्यात सर्वांसाठी खुली आहे. या शाळेत एकूण ३ वर्ग आहेत. त्यातील एक वर्ग हा एका लांब अशा टीनच्या पत्र्याच्या खाली भरवला जातो ज्यात इयत्ता १ ते ५ ची मुले शिकतात. आणि बाकीचे दोन वर्ग एका मोठया चिंचेच्या झाडाखाली भरवला जातो. जेथे इयत्ता ६ आणि ७ म्हणजेच मोठी मुलं शिकतात. सगळी मुले प्रार्थनेसाठी सकाळी मधल्या एका मोकळ्या भागात एकत्र येतात आणि प्रार्थना म्हणतात – इतनी शक्ती हमे देना दाता, मन का विश्वास कमजोर हो ना… जशी घरातील बहीण भाऊ शाळेत जातात तसेच आसपासच्या खेड्यातून अनेक लहान मुलं चालत या शाळेत शिकायला येतात.
गिफ्ट अ स्माईल ‘एकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवा’ हा आमचा एक नावीन्यपूर्ण शाळेसाठी सेवा प्रकल्प आहे ज्याने या लहान मुलांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणलाय. या प्रकल्पात खेड्यापाड्यातील आदिवासी व आर्थिक मागास वर्गातील मुलांना आधुनिक आणि सर्वसमावेशक मोफत शिक्षण दिले जाते.
आमच्याबरोबर सहभागी व्हा
आम्ही मुलांमध्ये नक्की काय बदल घडवतो
शिल्पा, जी इयत्ता सातवी ची विद्यार्थिनी आहे, ती सांगते – ‘ मी जीवनात पहिल्यांदा अनुभवले की स्त्रिया या पुरुषांपेक्षा कमी नसतात उलट बरोबरीने असतात, संधी मिळाल्यास पुरुषांच्या बरोबरीने किँवा अधिक चांगली कामगिरी करू शकतात.
बाली किकसू म्हणते – ‘ माझी मोठी बहीण मेंढपाळ आहे. मी ही तेच काम केले असते. पण ‘ आर्ट ऑफ लिव्हिंग ‘ च्या स्वयंसेवकांनी माझ्या वडिलांना चांगले समजावून मला चाखदाहच्या शाळेत घालण्यास भाग पाडले.
या आदिवासी समाजाच्या प्रगतीमध्ये या शाळेने आणि शाळेच्या कार्याने खूप महत्वाची भूमिका बजावली आहे. आज या परिसरातील विद्यार्थ्यांची आणि पालकांची मानसिकता खूप सकारात्मक झाली आहे.
आमच्या सर्व शैक्षणिक गतिविधी या आमच्या वचनबद्ध स्वयंसेवकांद्वारे केल्या जातात ज्यांना सुदर्शन क्रिया करून खूप ऊर्जा आणि उत्साह मिळतो. तुम्ही पण तुमच्या घरी बसल्या बसल्या सुदर्शन क्रिया शिकू शकता.
नोंदणी करा
आमचा आत्तापर्यंतचा प्रवास कसा आहे
- भारत देशात बावीस राज्यांमध्ये मिळून तब्बल १०९८ पेक्षा जास्त शाळा काढल्या आहेत, ज्यांमध्ये ८२,००० पेक्षा जास्त मुले शिकत आहेत.
- ९५ % उपस्थिती दर – जो देशातील सरासरी पेक्षा जास्त आहे.
- आमच्या शाळेतील ९० % मुले शालेय शिक्षण पूर्ण करतात. तर देशाची सरासरी ३७ % आहे.
- १०० % विद्यार्थी १० वी ची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
- आमच्या शाळेत ५२ % मुले तर ४८ टक्के मुली शिकतात, जे देशाच्या सरासरी पेक्षा खूप चांगले आहे.
आम्ही कसे काम करतो
आमची शाळा मुलांचे सर्वांगीण संगोपन करते, शरीर – मन – आत्मा यासकट. मुलांना कौटुंबिक मूल्ये समजतात, सामाजिक चौकटीतून बाहेर पडून सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो. आमचे ध्येय मुलांना सर्वांगीण आणि मूल्याधारीत शिक्षण देणे हे आहे. जेणेकरून मुलांचे व्यक्तिमत्व जबाबदार आणि प्रबळ बनेल. या शाळांची काही ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे :
- शाळा राज्याने आखलेला अभ्यासक्रम घेते. त्यामुळे मुले त्या राज्यातील सर्वसामान्य शैक्षणिक अभ्यासक्रमाशी जोडली जातात.
- आमच्या शाळेतील बहुतेक मुले ही त्यांच्या कुटुंबातील शाळेत शिकणारी पहिलीच मुले असतात. जी त्यांच्या पुढच्या पिढीत शिक्षणाचे बीज रुजवतात.
- क्रीडा व अभ्यासेतर उपक्रम देखील या शाळांमध्ये घेतले जातात ज्याने मुलांचा सर्वांगीण विकास होतो.
- मुलांच्या दैनंदिन कार्यक्रमात योग, प्राणायाम व श्वसनतंत्रे सुद्धा घेतली जातात.
- मोठया मुलांसाठी जे कलेचे वर्ग घेतले जातात त्यातून त्यांच्यात व्यावहारिक आणि सृजनात्मक गुण निर्माण होतात जे त्यांना पुढील आयुष्यात खूप उपयोगी पडतात.
- आमच्या शाळा सर्व समाजाला एकत्र करून अनेक उपक्रम राबवतात जसे की आरोग्य तपासणी , झाडे लावणे, प्रौढ शिक्षण इत्यादी.
आमच्या एका शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी करवीर म्हणतात ” शाळेचा प्रत्येक दिवस अदभुत आणि चमत्कारीक असतो. मुलांना शाळेत यायला खूप आवडते, कधीकधी आम्हालाच त्यांना शाळा सुटल्यावर घरी परत जाण्यासाठी जबरदस्ती करावी लागते.”
तुम्ही यात कसा सहभाग घेऊ शकता
नवीन नवीन ठिकाणी जाऊन तिथे बदल घडवून आणणे हे आमचे सततचे ध्येय आहे. तुम्ही या शाळांसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांसाठी व दैनंदिन खर्चासाठी देणगी देऊन या उपक्रमात सहभागी होऊ शकता.
आमच्याबरोबर सहभागी व्हा !