हा लेख आंध्र प्रदेशातील गुंटूर येथील आर्ट ऑफ लिव्हिंग स्वयंसेवकांद्वारे चालवल्या जाणाऱ्या मोफत शाळेवरील मालिकेचा एक भाग आहे.
त्या थंडगार सकाळी एका लहानशा थंड बोटाने मला जागे केले, माझ्या उबदार स्वप्नातून बाहेर काढले. सकाळच्या सूर्याच्या पहिल्या पाहून डोळे उघडण्यासाठी मी धडपडत होतो. माझ्या पलंगावर उभा राहून आनंदाने हसणारा वेदांत होता. “उठा, ६ वाजलेत, सकाळच्या प्रार्थनेची वेळ झाली.”, तो म्हणतो आणि जसा आत येतो तसाच आनंदाने बाहेर निघून जातो.
डोंगराच्या पार्श्वभूमीवरील मी माझ्या खोलीतून उघड्या रिंगणात पाऊल ठेवताना, मी थक्क झालो, जिथे सुमारे ६० मुले आनंदाने त्यांचे सूर्यनमस्कार करत आहेत. त्यांच्या चिमुकल्या चेहऱ्यावरचे हास्य हे वास्तव खोटे ठरवत होते की ही मुले सोडून दिलेली, अनाथ मुले होती, त्यातील काहींना पोलिसांनी उचलून शाळेच्या ताब्यात होते. गुंटूर येथील आर्ट ऑफ लिव्हिंगची ही श्री श्री सेवा मंदिर शाळा होती.
आमचे प्रणेते, गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांचा असा विश्वास आहे की, जोपर्यंत चांगले आणि सर्वांगीण शिक्षण नसते तोपर्यंत ते अपूर्ण असते. येथे वर्ग केवळ बंद वर्गाच्या मर्यादेतच नाही तर निसर्गाच्या कुशीत, मोकळ्या मैदानातही चालवले जातात. शैक्षणिक भवितव्याची तयारी करण्याच्या उद्दिष्टावर मुले जितके लक्ष केंद्रित करतात तितकेच ते निसर्गातही असतात.
अशा प्रकारे संध्याकाळी विद्यार्थी सेंद्रिय शेती, स्वयंपाक, साफसफाई आणि पाळीव प्राण्यांची काळजी घेतात हे पाहणे पाहायला मिळाले तर नवल नाही. योग, ध्यान, जप, सकाळची प्रार्थना हा शाळेतील मुलांसाठी सकाळच्या दिनचर्येचा एक भाग आहे आणि गायींचे दूध काढणे सुद्धा!
वयाच्या आणि क्षमतेच्या आधारावर प्रत्येक नेमून दिलेल्या जबाबदाऱ्यांसह सात वर्षांच्या वयापासून या कामांमध्ये त्यांचा सहभाग सुरू होतो. दुस-या शब्दात सांगायचे तर, यात केवळ वाचन, लेखन आणि अंकगणित शिकवण्याऐवजी निसर्गात मिसळणे आणि त्याचा नैसर्गिक भाग बनणे समाविष्ट आहे.
याव्यतिरिक्त, नृत्य, संगीत, खेळ हे या शिक्षणाचा अविभाज्य भाग आहेत, विशेषत: उत्सवासाठी समर्पित शनिवार आणि रविवार. हा योगायोग नाही की जे विद्यार्थी माध्यमिक शाळेतून पदवीधर होतात आणि जिल्ह्यातील इतर शाळांमध्ये जातात ते त्यांच्या विशिष्ट गुणांची आणि तीक्ष्ण मनाची दखल घेण्याइतपत चमकतात, लहान मुलांच्या गटात नाही, तर हजारोंच्या संख्येत असलेल्या मोठ्या गटामध्ये.
सांगायची गोष्ट
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या श्री श्री ज्ञान मंदिर निवासी शाळेच्या प्रत्येक मुलाकडे आपली एक मार्मिक कथा होती.
उदाहरणार्थ, अनाथ वेदांत, एचआयव्ही बाधित पालकांचे मुल, त्याला आधी राहत असलेल्या अनाथाश्रमातील ज्येष्ठ मुलांनी सिगारेट, दारू आणि ड्रग्स आणण्यास भाग पाडले. शिवाय त्याची नशा करण्याची जबरदस्ती. त्यांनी त्याला सर्व प्रकारच्या वाहनांची चाके काढून टाकण्यासही त्याला शिकवले गेले, नंतर त्या चाकांची विक्री केली जायची.
वेदांत हा अपवाद नाही. अशाच प्रकारच्या एचआयव्ही बाधित बेबंद कुटुंबातील, नक्षलवादी चकमकीत हरवलेले पालक, बालविवाहातून सुटलेले किंवा तीव्र गरिबीमुळे सोडून दिलेले अनेक आहेत.
पण, श्री श्री ज्ञान मंदिर वसतिगृहाच्या प्रेमळ बाहूंनी त्याला जवळ घ्यायच्या हा वेदांत होता. आज, तो त्याच्या भूतकाळ आठवूनही हसणारा एक पूर्णपणे वेगळा मुलगा आहे.
“थोड्या दिवसांपूर्वीच, तो गाडीचे एक टायर तोडायचे आहे म्हणाला. आम्ही त्याला परवानगी दिली. आणि ते त्याने तोडलेले शेवटचेच टायर होते. एकदा त्याने मधमाश्याच्या पोळ्याला दगड मारून त्रास दिला, मग त्यांनी त्याला निर्दयपणे डंख मारून हैराण केले. त्याच्या सुजलेल्या चेहऱ्याने तो वर आला आणि मला त्याला आणखी शिक्षा करू नका असे सांगितले कारण डंख मारणे ही पुरेशी शिक्षा होती”, मॅडम माँ हसत हसत सांगतात, “आम्हाला अजूनही त्याला आंघोळीला पाठवायला त्याचा धुळीने माखलेल्या त्या चेहऱ्याची आठवण करून द्यावी लागते.”
पण आता तुम्ही पाहत आहात तो एक संवेदनशील, विनोदी बालक आहे, जो परिपूर्ण जीवन जगण्यावर विश्वास ठेवतो, योग्य मार्गाने, जो शारीरिक किंवा भावनिकदृष्ट्या कुणालाही मदत करण्यासाठी प्रथम हात पुढे करेल.
जीवनाची पुनर्बांधणी
या मुलांनी केवळ त्यांचा भूतकाळ मागे टाकून त्यांचे जीवन यशस्वीपणे पुन्हा घडवले नाही, तर त्यांनी शाळेच्या आवाराबाहेरील कामे हाती घेणे देखील सुरू केले आहे. उदाहरणार्थ, गुंटूरमधील अनेक वर्षे जुन्या शिवमंदिराचा जीर्णोद्धार या बदल घडवून आणण्याची इच्छा असणाऱ्या लहान मुलांच्या मजबूत हातांनी केला.
“शाळेने मंदिराच्या जीर्णोद्धाराचा प्रकल्प हाती घेतला, तरीही हे स्वप्न साकार करण्यासाठी स्थानिक मदतीची गरज होती. या उपक्रमाचा भाग होण्यासाठी पालकांना पटवून देण्याचे काम मुलांवर सोडले होते. मंदिराचा जीर्णोद्धार गावातील प्राचीन संस्कृतीचा पराकाष्ठा करणारी एक शक्तिशाली चळवळ होती”, माँ सांगत होत्या.
या प्रचंड परिवर्तनाचे रहस्य काय आहे, बदल घडवण्याचा आग्रह?
ही सर्वसमावेशक शिक्षणाची पद्धत आहे जी अगदी दयनीयपणे सोडून दिलेल्यांना लक्ष्य करते; अनाथ तरुण जिथे या बदलाची अत्यंत गरज होती.
मॅडम माँ म्हणतात “शाळेत निर्माण केलेले हे वातावरण आहे जिथे त्यांना निसर्गाशी एकरूप होऊन वाढायला शिकवले जाते, निसर्गाचा आदर केला जातो. अध्यात्मिक आणि व्यावहारिक शिक्षण, सामाजिक मूल्ये आणि अभ्यासक्रमेतर गोष्टी सर्वांगीण वाढीस हातभार लावतात. आर्ट ऑफ लिव्हिंग जे कार्य करते त्यात मन, शरीर आणि आत्मा या तिन्हीचा विचार केला जातो आणि हेच समग्र शिक्षण आहे.”