२००५ साली झालेल्या काश्मीर भूकंपामध्ये ज्या बालकांनी आपले पालक आणि घरदार देखील गमावले होते त्यांच्यासाठी इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्यॅलुज (IAHV) च्या स्वयंसेवकांनी आपली घरे आणि हृदये दोन्ही देऊ केले. IAHV ही आर्ट ऑफ लिव्हिंगची सहसंस्था आहे जिची स्थापना गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी २००० साली केली आहे.
ऑक्टोंबर २००५ मध्ये समस्त काश्मीर भूकंपाने पूर्ण हादरून गेला ज्यामुळे निव्वळ ४८ तासामध्ये ३३ लाख माणसे बेघर झाली. IAHV च्या स्वयंसेवकांनी उरी, बारामुल्ला, श्रीनगर, कमालकोट, तंगधार आणि कुपवाडा येथे मदत कार्य सुरु केले.
असुरक्षित मुलांसाठी सुरक्षित आश्रयस्थानांचे निर्माण
दररोज सकाळी मला स्पोटकाच्या आवाजाने जाग येत असे, माझे संपूर्ण शरीर वेदनाग्रस्त रहायच, आणि प्रत्येक रात्री ह्या आवाजांना मी घाबरत असे आणि तेव्हा भूकंपात मरण पावलेल्या माझ्या आईची आठवण येत असे. आता मला खूप आराम वाटत आहे आणि मला आवाजाची भीती वाटत नाही.
आर्ट एक्सेल च्या विद्यार्थ्याद्वारे सामायिक केले आहे
अनेक मुलांनी आपले पालक गमावले होते आणि बेघर झाले होते. त्यांना त्वरित आसरा हवा होता आणि इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्यॅलुज (IAHV) चे स्वयंसेवक लगेच त्यांच्या बचावासाठी पुढे झाले. आमच्या स्वयंसेवकांनी घर भाड्याने घेऊन जीवनावश्यक वस्तू त्यामध्ये जमा केल्या, उबदार बिछाने, स्वयंपाक घरातील गरजेच्या वस्तू आणि स्वयंपाकाचा गॅस (जो हिवाळ्यात दुर्मिळ असतो). आणि हे सर्व आठवड्याभराच्या आत!
लगेचच १५० काश्मिरी मुले या IAHV या बाल कल्याण केंद्रात (चाईल्ड केअर सेंटर), श्रीनगर मध्ये आली. दिलराज बेदी, IAHV स्वयंसेवक मुले या सेंटरमध्ये दाखल झालेल्या दिवसाची आठवण सांगत होते. घाबरलेली, गारठलेली आणि भुकेली – एकमेकाला चिकटून बसलेली – पुढे काय होईल या काळजीत. दिलराजला त्या मुलांची कणव आली. “बोलण्यासारखे काहीही नव्हते – ते घरी आहात, ही खात्रीच फक्त मी देऊ शकत होते.” जानेवारीच्या मध्यापर्यंत आणखी १०० मुलांना आमच्या सेंटर मध्ये घ्यावे लागले, त्यांच्यासाठी आणखी एक आश्रयस्थान भाड्याने घ्यावे लागले.
यातनादाई दु:ख आणि आघात यावर श्वसन प्रक्रियेद्वारे मात
वर्षानुवर्षे सातत्याने होत असणारा हिंसाचार, नुकताच घडलेल्या भूकंपाच्या स्मृती, गरिबी आणि कौटुंबिक ताण तणाव इत्यादीच्या भीती मुळे ही मुले मनोविकृत बनली होती. या आघाताचा परिणाम कमी होण्यासाठी या मुलांना आर्ट एक्सेल (सध्या मेधा आणि उत्कर्ष योग म्हणतात) प्रोग्रॅम मधून त्यांच्या श्वासाला एक साधन म्हणून वापरून या तणाव आणि भीतीवर मात करणे शिकवले. गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी ८ ते १३ वयोगटातील मुलांसाठी आपले मन आणि भावना यांना हाताळण्यासारखी कौशल्ये शिकवण्यासाठी हा प्रोग्रॅम बनवला आहे.
मुलांसाठी शिक्षणाची सुरवात आमच्या वचनबद्ध, प्रेरणादाई आणि ऊर्जावान स्वयंसेवकांच्या चमुद्वारे आमच्या आर्ट एक्सेल प्रोग्रॅम (मेधा आणि उत्कर्ष योग) मधील एक प्रभावी श्वसन प्रक्रियेने होतो. ही प्रक्रिया आपण आपल्या घरी आरामात शिका.
४५०० प्रवेशिकांमधून आपला सौर कंदील प्रकल्प निवडल्याप्रित्यर्थ ‘अपना घर’ मधील विद्यार्थी हिलाल अहमद भट आणि इशफाक धारे आपला आनंद व्यक्त करत होते, “ही आमच्यासाठी खूप मोठी आणि अभिमानास्पद कामगिरी होती.” त्यांना मुख्य शिक्षण अधिकारी यांच्या हस्ते शिष्यवृत्ती आणि रोख पारितोषिक मिळाले.
आघात मुक्ती ते शिक्षण आणि आरोग्य
कालांतराने हे पहिले घर १५० मुलांसाठी दिवसाचे मनोरंजन आणि शैक्षणिक केंद्र बनले , कारण या घरातील मुलांना अन्य रहिवासी जागेत नेण्यात आले. या मनोरंजन केंद्रामध्ये वर्ग आणि २० संगणकांनी युक्त संगणक प्रयोगशाळा बनवली. येथील दूरदर्शन संचाने मुलांचे करमणूक करण्यासोबत त्यांना त्यांच्या काश्मिरी मातृभाषेच्या संपर्कात ठेवले. अशारितीने पहिली शाळा छोट्या क्रीडांगणासह भाड्याच्या घरात सुरु झाली.
आमचे स्थानिक स्वयंसेवक या मुलांना फक्त आरामदाई निवास, गरम कपडे, सकस जेवण, शिक्षण आणि मनोरंजनाची सुविधाच पुरवत नव्हते तर या मुलांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी केंद्रांमधून उपलब्ध उत्तम आरोग्य सुविधा सातत्याने मिळण्याची खात्री करत होते. आम्ही आमच्या या मुलांसाठी दररोज तीन तास शिकवणी मिळण्यासाठी स्थानिक शिक्षकांची नेमणूक केली. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या तणावमुक्त शिक्षणासाठी तज्ञ अशा प्रशिक्षकांनी स्थानिक शिक्षकांना प्रशिक्षण दिले. मुलांच्या विनंतीनुसार या मुलांसाठी दररोज इंग्रजीची शिकवणी देखील सुरु केली.
फेब्रुवारी २००६ शेवटापर्यंत उर्वरित १२० गरजवंत मुले बाकी होती. त्यांच्यासाठी भाड्याच्या जागेतील हे हिवाळी निवासी मुले आणि मुलींसाठी वेगळ्या वसतीगृहांसह बाल संगोपन केंद्र (चाईल्ड केअर सेन्टर्स) बनले व भाड्याच्या जागेत शाळा सुरू झाली.
काझीखंड, बुलवामा, बांदीपूरा आणि ऊरी येथील मुली आणि बारामुल्ला, अनंतनाग आणि मनसबल येथील मुले अशी ७० मुले या शाळेत शिकत होते. या मुलींना शिवणकला प्रशिक्षण मोफत दिले गेले. याची सामाजिक उतराई कार्यक्रम म्हणून यातील काही मुलींनी प्रभावित भागातील महिलांना मोफत शिवण काम शिकवले.
स्थानिक सरकारच्या मदतीने अपना घर शाळेची उभारणी
अपना घरचा आणखी एक विद्यार्थी उमर गुड्डू याने श्रीनगर येथील फुटबॉल मॅचमध्ये पदक मिळवले.
त्याने आनंदाने हे पदक IAHV ला समर्पित केले.
हा प्रकल्प, हि शाळा सातत्याने सुरु राहण्याची निकड समजल्याने आम्ही हा प्रकल्प जम्मू आणि काश्मीर सरकारच्या शिक्षण विभागाला सहयोगी बनवले. अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये नुकसान झालेल्या आणि वापरात नसलेली इमारत सरकारने प्रायोजित करून त्यांचे नुतनीकरण पक्क्या शाळेमध्ये केले. ही शाळा म्हणजे ‘अपना घर’. गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी में २००७ मध्ये नवीन शाळेचे उद्घाटन केले. सरकारने मुख्याध्यापिका आणि आठ शिक्षकांच्या पगाराची तरतूद केली तर शाळेच्या देखभालीसाठी उर्वरित शिक्षकांचा पगार आणि इतर खर्च IAHV ने मिळालेल्या उदार देणग्यांमधून केला.
प्रकल्पाचा सार
आमचा प्रकल्प नोव्हेंबर २०११ मध्ये पूर्ण झाला. गेल्या सहा वर्षांपासून ज्या मुलांनी या शाळेचा आसरा घेतला होता त्या सर्वच्या सर्व मुलांचे त्यांच्या कुटुंबांमध्ये आणि शाळेमध्ये यशस्वीपणे पुनर्वसन झाले.