“मी आयुष्यात याआधी कधीच इतका हलका आणि मोकळा श्वास घेतला नव्हता. आजच्या एवढे शांत आणि प्रसन्न मला कधीच वाटले नव्हते”. एक युवा कैदी, तिहार जेल, दिल्ली.
आर्ट ऑफ लिविंग च्या “युथ एम्पॉवरमेंट अँड स्किल्स ” (YES!+) या कार्यशाळेने तिहार जेल नंबर ५ मधील दोनशे युवा कैद्यांमध्ये लक्षणीय बदल घडवून आणला. त्यांमध्ये एक १६ ते २५ वयोगटातील मुलांचा ग्रुप होता, जो कोणाचेही न ऐकण्यासाठी, उद्धट वागण्यासाठी प्रसिद्ध होता. YES!+ शिक्षक रोहित रंजन मान्य करतात की ‘सुरवातीला मुलांचे लक्ष वेधणे खूप आव्हानात्मक होते, पण त्यांनी सुदर्शन क्रिया केल्यावर त्यांच्याशी संवाद साधणे खूप सोपे झाले.’
ही कार्यशाळा एकूण पाच दिवस होती आणि बारा शिक्षकांनी पार पाडली. युवा सुरवातीला थोडेसे निरुत्साही होते पण नंतर हळूहळू त्यांनी कार्यशाळेचा आनंद लुटला. तिसऱ्या दिवसा नंतर विलक्षण बदल घडायला सुरवात होते. ते स्वतःच कार्यशाळेत स्वयंसेवक म्हणून मदत करायला तयार होतात. त्यांची स्वीकार करण्याची क्षमता वाढली आणि शेवटच्या दिवशी ते आपले अनुभव सगळ्यांना सांगू लागले. सईद (नाव बदललेले) या २२ वर्षांच्या युवकाने धूम्रपान आणि गुन्हेगारी सोडण्याची प्रतिज्ञा केली.
त्यांचे एकेक अनुभव ऐकताना अक्षरशः रडू येते
करण निझावान, YES!+ शिक्षक सांगतात, ” सुरवातीला त्यांच्याकडून काही करुन घेणे खूप अवघड होते, पण जशी वेळ पुढे सरकत गेली आणि त्यांनी सुदर्शन क्रिया केली, त्यांच्यात लक्षणीय बदल घडून आला. त्यांचे एक एक अनुभव ऐकून रडू येते.”
जेलच्या पदाधिकाऱ्यांनी पण मान्य केले की या कार्यशाळे नंतर युवकांमध्ये खूप सकारात्मक बदल घडून आला. एस. सी. भारद्वाज, अधिक्षक, जेल नंबर ५, म्हणाले, “कार्यशाळेचे व्यवस्थापन आणि नियोजन अतिशय उत्तम होते, त्यामुळे त्याचा पुरेपूर फायदा युवा कैद्यांना झाला”. ते पुढे म्हणाले, “प्राणायाम व सुदर्शन क्रियेमुळे युवा कैद्यांना त्यांच्या नकारात्मक भावनांतून मुक्त होण्यास आणि आयुष्याकडे एका नवीन दृष्टीने बघण्यास खूप मदत झाली. त्यांना स्वतःमधील लपलेली कौशल्ये आजमावण्यास प्रोत्साहन मिळाले.
आम्ही तिहार जेल मधे १९९९ पासून शिकवतोय
“द आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेने तिहार जेलमध्ये 1999 मध्ये कैद्यांसाठी कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली”. आतापर्यंत ४८,००० पेक्षा जास्त तिहार जेल मधील कैद्यांना या कार्यशाळेचा फायदा झालाय. जेलमधील कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या स्वरूपामुळे होणाऱ्या त्रासातून आणि मानसिक ताण – तणावातून मुक्त करण्यासाठी खास कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित होत असते. ही कार्यशाळा वर्षातून दोनदा होते. आतापर्यंत १३० कर्मचाऱ्यांनी ” आर्ट ऑफ लिव्हिंग हॅपिनेस कोर्स ” केला आहे.