बिहार मधील सेनारी हे गाव नक्षलवाद्यांकडून वारंवार होणाऱ्या हत्याकांडांसाठी कुप्रसिद्ध आहे. (रणवीर सेना,भारतीय कम्युनिस्ट पक्ष एम एल, पीपल्स वॉर ग्रुप व माला या सेनारी मध्ये सक्रिय असलेल्या काही नक्षलवादी संघटना आहेत) ज्यामुळे गावकरी दहशतीत आहेत.
आर्ट ऑफ लिव्हिंग च्या शिक्षिका श्रीमती इंदू सिन्हा यांनी या क्षेत्रात प्रवेश करून अहिंसेची बीजे पेरण्यासाठी धैर्य एकवटले.
जेथे प्रेमाची सुरुवात होते, तेथे हिंसा संपते!
गुरुदेव श्री श्री रवि शंकर
ऑगस्ट २००० मध्ये श्रीमती सिन्हा यांनी बिहारच्या एका स्थानिक वृत्तपत्रात सेनारी गावात झालेल्या हत्याकांडाची बातमी वाचली, ज्यात नक्षलवाद्यांनी सुमारे ६७ जणांचा शिरच्छेद केला होता. बिहारच्या खेड्यापाड्यांमध्ये अशा धक्कादायक बातम्या ऐकणे हे सामान्य होते आणि लोकांनी ही नेहमीचीच बाब म्हणून स्वीकारले होते. लोक त्यांच्या लहानपणापासूनच हिंसाचार आणि हत्याकांडाबाबत ऐकत व वाचत होते. गावातील या हत्याकांडाची माहिती मिळाल्यावर श्रीमती सिन्हा खूप हळहळल्या आणि त्यांनी याबद्दल काहीतरी करायलाच हवे असे ठरवले.
याची सुरुवात कशी झाली
गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्याशी दिल्लीत झालेल्या भेटीत त्यांनी बिहारच्या या गावांमध्ये मानवी मूल्यांच्या ऱ्हासाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. गुरुदेवांनी तिला सेनारी गावात शाळा सुरू करण्यासाठी प्रोत्साहित केले. परिस्थिती बदलण्याचे ध्येय घेऊन त्या गावाकडे निघाल्या. अशा बदनाम गावात प्रवेश करणे सोपे नव्हते.
तीन तासांचा आव्हानात्मक संघर्ष करून त्या गावात पोहोचल्या. अपेक्षेप्रमाणे या हत्याकांडाने माध्यमांचे बरेच लक्ष वेधले होते आणि सामाजिक संस्थांनी देखील तेथील परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी पाठविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कुणालाही यश आले नव्हते. श्रीमती सिन्हा यांच्यापुढे पहिले आणि महत्त्वाचे काम म्हणजे मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांना पटवणे.
मुलांना शाळेत पाठवणे हे त्यांच्या खिजगणतीतही नव्हते. श्रीमती सिन्हा यांनी प्रत्येक मुलाची वैयक्तिक जबाबदारी घेण्यास सुरुवात केली आणि सेनारी या हिंसक गावात शाळा हळूहळू साकार झाली. गावात पुरुष फारसे दिसत नव्हते. त्यामुळे त्यांचे काम आणखीच कठीण झाले. गावातील काही पुरुषांना दहशतवादी गटांनी ठार मारले होते आणि जे पळून गेले होते, त्यांना तुरुंगाच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. घरी असलेल्या बायकांना पटवून सांगणे अवघड होते. मात्र आर्ट ऑफ लिव्हिंग आणि त्यांच्या शाळेच्या प्रकल्पामागील प्रामाणिकपणा व प्रेम त्यांच्या लक्षात आले व त्यांनी साथ देण्यास सुरुवात केली.
पुढची पायरी
शाळा व्यवस्थित रित्या सुरू झाल्यानंतर श्रीमती सिन्हा कारागृहाचा कार्यक्रम (प्रिझन प्रोग्रॅम) सुरू करण्याच्या उद्देशाने पाटणा येथे परतल्या. कैद्यांसाठी नक्कीच काहीतरी करणे आवश्यक होते. किंबहुना त्यांना असे वाटले की वेगवेगळ्या नक्षलवादी गटांच्या सदस्यांना भेटण्यासाठी कारागृह हे एकमेव ठिकाण आहे. त्यांना असे वाटले की कायद्याच्या नजरेखाली असताना त्या त्यांच्यामध्ये परिवर्तन घडवून आणू शकतील. त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ही एक नवीन सुरुवात असेल. त्यामुळे त्यांना बेऊर तुरुंगातील कैद्यांसाठी कारागृह कार्यक्रम आयोजित करण्याची प्रेरणा मिळाली.
अट्टल गुन्हेगार असलेल्या कारागृह परिसरात एखाद्या महिलेला प्रवेश देणे जिल्हा दंडाधिकारी यांना योग्य वाटत नव्हते. समस्या स्पष्टपणे दिसत असतानाही श्रीमती सिन्हा यांनी कडेकोट बंदोबस्तात तुरुंगातील कैद्यांसाठी कार्यक्रम सुरू केला. तुरुंग कार्यक्रम हा एक विशिष्ट प्रकारचा कार्यक्रम होता; प्रगतिशील व्यावहारिक आणि परिणाम देणारा कार्यक्रम, हिंसाचाराचे चक्र खंडित करण्यासाठी व जागतिक स्तरावरील गुन्हेगारीच्या वाढत्या स्तराला आळा घालण्यासाठी एक संवेदनशील, नाविन्यपूर्ण आणि प्रभावी उपाय प्रदान हा कार्यक्रम करतो. या कार्यक्रमामुळे त्यांना पुनर्वसित करण्याची आणि समाजात एकरूप होण्याची मोठी संधी मिळाली. गुरुदेवांनी दिलेल्या सुदर्शन क्रिया या श्वसन तंत्रामुळे मुख्यतः हे फायदे मिळतात. गुन्हेगारीचे प्राथमिक कारण असलेल्या तणावाचे सुदर्शन क्रियेमुळे समूळ उच्चाटन होते.
प्रेमाचा आणि विसरण्यास शिकवणारा मंत्र
बेउर तुरुंगातील कैदी हे कट्टर गुन्हेगार होते व ते २०० हून अधिक गुन्ह्यांसाठी तुरुंगवासात होते. श्रीमती सिन्हा यांनी तुरुंग अधिकाऱ्यांना एवढी कडेकोट सुरक्षा खरोखरच आवश्यक नाही असे सांगितले. खरे तर त्यांनी कैद्यांना तेच त्यांचे सुरक्षा कर्मचारी असल्याचे सांगितले. सर्व मानवांचा मूळ स्वभाव हा हिंसाचाराचा नसून प्रेमाचा आहे. वातावरण व आयुष्यात ज्या परिस्थितीतून जावे लागते, त्यामुळे माणूस बदलतो.
गुरुदेव म्हणतात प्रत्येक गुन्हेगाराच्या मागे एक बळी दडलेला असतो. प्रेम, करुणा, सामंजस्य आणि संयम यामुळे बदल घडणार नाही अशी कोणतीही गोष्ट नाही. श्रीमती सिन्हा यांनी कैद्यांना अतिशय संवेदनशीलतेने आणि सौम्यपणे समजावून सांगितले की द्वेष आणि हिंसा व्यर्थ आहे आणि कारागृहातही परिवर्तन शक्य आहे.
“एखाद्या व्यक्तीमधे काही खरोखर बदल करत असेल तर ते त्याचे वातावरण व त्याचे आयुष्यातील अनुभव. मी त्यांना समजावून सांगितले की द्वेष आणि हिंसा व्यर्थ आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्याची परिस्थिती बदलणे आणि शांतता प्रस्थापित करणे ही आहे.”
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्याची परिस्थिती बदलणे आणि हिंसेच्या जागी प्रेम आणि शांततेची भावना निर्माण करणे. भूतकाळात जे घडले ते विसरून जा व एकमेकांवर प्रेम करा!
असा बदल
कारागृहातील अंतर्गत हिंसाचार आणि तुरुंगातील कर्मचाऱ्यांनाच धोकादायक असलेल्या भयंकर कैद्यांमध्येही हे परिवर्तन दिसू लागले. ते लवकरच इंदूला दीदी (बहीण) म्हणून संबोधू लागले.
कैदी कृतज्ञतेने भरले होते. कारागृह अधीक्षक श्री सुरेंद्र गुप्ता यांनी कैद्यांच्या, वागणुकीत झालेल्या बदलांचे निरीक्षण केले. कैद्यांपैकी सर्वात भयंकर चार कैद्यांमध्ये दृश्यमान बदल पाहून त्यांना आश्चर्य वाटले. सुधारणावादी पोलीस अधिकारी सुश्री किरण बेदी यांनी एकदा सांगितले होते, ”कारागृहातील कैदी त्यांच्या कुटुंबापासून दूर असल्याने तणावात असतात आणि त्यांच्या कुटुंबाची चिंता त्यांना नेहमीच सतावत असते.” गुन्हेगारांवर कारवाई करताना पोलिसांवरही प्रचंड ताण असतो. आर्ट ऑफ लिविंग कार्यक्रम या दोन्ही विभागांसाठी विशेष महत्त्वाचा आहे. ज्यांनी लोकांच्या मनात दहशत निर्माण केली त्यांच्यासाठी आणि तुरुंगातील सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी देखील! जे सतत चिंतेचे कारण बनले होते तेच पुरुष निरुपद्रवी आणि आज्ञाधारक बनले. त्यांचे घातक स्वरूप सौम्य अभिव्यक्तीत बदलले.
रामचंद्र सिंग हा ५५ वर्षे वयाचा माणूस चार वर्षे तुरुंगात होता. तो हिंसा निर्माण करण्याऱ्या प्रवृत्तीचा होता. तो कलह निर्माण करणारा अत्यंत धोकादायक माणूस समजला जात असे. त्याने आता कोणत्याही गुन्हेगारी कृत्यात कधीही सहभागी होणार नाही अशी शपथ घेतली आहे. तो म्हणाला.”पूर्वी मी जे काही केले ते चुकीचेच होते.”
हरी बदन सिंग, हा आणखी एक भयंकर गुन्हेगार आता त्याच्या रागावर नियंत्रण ठेवू शकतो आणि त्याला पूर्ण मनःशांती मिळते. त्याच्यात अचानक सर्वांबद्दल प्रेम आणि आपुलकीची भावना निर्माण झाली.
या कार्यक्रमातील सहभागामुळे त्त्यांच्यात निरोगीपणाची भावना निर्माण झाली आणि बरेच सहभागी त्यांच्या शारीरिक व्याधींपासून बरे झाले.
संख्या वाढली
हा कार्यक्रम १३ जानेवारी रोजी संपला, परंतु भारतीय परंपरेनुसार घरातील मुलगी त्या विशिष्ट दिवशी घर सोडत नाही असे सांगून कैद्यांनी इंदूला त्या दिवशी जाऊ दिले नाही. भारावून गेलेल्या इंदूनेही त्यांची इच्छा मान्य केली आणि दुसऱ्या दिवशी संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर ती निघाली.
इंदूला तुरुंगाच्या दारात घेऊन जाताना प्रेम आणि कृतज्ञतेच्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी भयंकर दिसणारा अट्टल गुन्हेगारांचा समुद्र आता शांत झाला होता. या वर्तणुकीतील आणि वृत्तीतील बदलाचे निरीक्षण करताना मुख्य व्यवस्थापक श्री गणेश प्रसाद तुरुंग अधीक्षक श्री सुरेंद्र कुमार गुप्ता यांच्याकडे वळले आणि म्हणाले.”हे सर्व तर आता संत झाले आहेत.”
तेव्हापासून बिहारच्या सर्व मध्यवर्ती आणि जिल्हा कारागृहांमध्ये कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत आणि त्याचे परिणाम क्रांतिकारक आहेत. पाटणा, आरा, गया आणि मुजफ्फरपुर मध्ये ४००० पेक्षा जास्त कैद्यांनी, एकट्या बेउर तुरुंगात २५०० पेक्षा अधिक कैद्यांनी तुरुंग कार्यक्रमाचा अनुभव घेतला आहे ‘एकेकाळचा तुरुंग, आता आश्रम झालाय !!’ असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.