भारतात तिहार हे दक्षिण आशियातील सर्वात मोठे तुरुंग आहे ह्यामध्ये प्रिझन प्रोग्रॅम १९९९ मध्ये सुरु करण्यात आला. यापूर्वी भारतातील एक लाख वीस हजार पेक्षा जास्त कैद्यांनी त्यात भाग घेतला होता. व त्यात नेत्रदीपक यश आले होते. एकट्या तिहार तुरुंगातच अंदाजे ५८,००० कैद्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. जेल कर्मचाऱ्यांचे कामाचे स्वरुप व त्यातील ताण तणाव पहाता त्यांचे साठी विशेष कार्यक्रम राबविण्यात आले होते.
तिहार जेल परिसरात एकूण ९ तुरुंग आहेत. ह्यांचे वर्गीकरण क्षेत्रा नुसार किंवा कोर्टा नुसार केलेले आहे. जेल क्रमांक १, ३ व ५ हे जुन्या तुरुंगचा भाग आहेत. तुरुंग क्रमांक ५ हा १८ ते २१ वयोगटातील तरुणांचा आणि तुरुंग क्रमांक ६ हा स्त्रियांकरीता आहे. दर महिन्याला २ कार्यक्रम राबविले जातात आणि साप्ताहिक फॉलोअप आठवड्याच्या शेवटी होतात. दर वर्षी तुरुंग कर्मचाऱ्यांकरिता २ कार्यक्रम घेतले जातात व त्यात जवळजवळ १३० कर्मचाऱ्यांनी हॅपिनेस प्रोग्रॅम मध्ये भाग घेतला आहे.
“मला पूर्णपणे बदललेल्या व्यक्तीसारखे जीवन जगायचे आहे. पत्नी व दोन मुलांनाही मी चांगले शिक्षण देऊ इच्छितो.”
– अल्ताफ हुसेन, आठ दिवसांचे आपले प्रिझन प्रोग्रॅम चे शिबीर केल्या नंतर म्हणतात
दहशतवादी कैदी, भयानक गुन्हेगार, डाकू, खुनी अशा कैद्यांबाबत हा प्रिझन प्रोग्रॅम परिणामकारक पणे यशस्वी ठरला आहे. मानसिक रित्या असंतुलित, व अत्यंत आक्रमक अशा कैद्यांवर ह्या कार्यक्रमाचा सकारात्मक प्रभाव झालेला आहे. ह्या कार्यक्रमाने गुन्हेगारीकडे वळलेल्या लोकांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचे प्रयत्नांत जोम आणला व त्या लोकांना समाजोपयोगी नागरिक बनण्यास प्रेरणा मिळाली आहे.
आमच्या सतत तब्बल दोन दशकांच्या कामामुळे तुरुंग अधिकाऱ्यांवरही चांगलाच प्रभाव पडला आहे. ह्याचा पुरावा म्हणजे जेल अधिकाऱ्यांनी तुरुंग क्रमांक १, ४ व ५ ह्या वॉर्डांना आर्ट ऑफ लिव्हिंग वॉर्ड असे खास नाव दिले आहे. ह्या वॉर्डात कैदी विना अडथळा सुदर्शन क्रिया करू शकतात.
“माझ्या मते आर्ट ऑफ लिव्हिंग प्रोग्रॅम नियमित अभ्यास करण्यास सोपा आणि परिणामकारक आहे. कैदी व जेल अधिकाऱ्यांना ह्या कार्यक्रमा पासून शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक व सामाजिक स्तरावर फायदा झालेला आहे.”
– डी आर कार्तिकेयन पूर्व महासंचालक, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग
आता पर्यंतचा प्रवास
- १९९९ पासून ५८,००० पेक्षा जास्त कैद्यांना प्रिजन स्मार्ट या कार्यक्रमाचा लाभ मिळालेला आहे
- जेल अधिकाऱ्यांसाठी वर्षाला दोन कार्यक्रम घेतले जातात व ह्यातून जवळजवळ १३० जणांनी परिचयात्मक कार्यक्रम केलेला आहे.
- ३० सदस्यांचा गट सध्या कार्यक्रम राबविण्यासाठी तुरुंग अधिकाऱ्यांबरोबर काम करीत आहे.
- १२० जणांनी प्रशिक्षक बनण्यासाठी वाय.एल.टी.पी. (युवक नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रम) केला आहे.
- कैद्यांना उदरभरणाचे कौशल्य मिळावे ह्यासाठी विविध व्यावसायिक प्रशिक्षणाची व्यवस्था आहे.
स्रीजन प्रोजेक्ट (Social Rehabilitation of Inmates in Jail and Aiding the Needy)
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रशिक्षिका आणि प्रिझन प्रोग्रॅम संलग्नित असलेल्या श्रीमती वनिका गुप्ता ह्यांनी “स्रीजन” ची सुरुवात केली आहे. हा कार्यक्रम अशा साठी सुरु केला आहे की त्यांच्यातील सुप्त गुण आणि कौशल्यांचा उपयोग उत्पादनासाठी करता यावा. स्रीजन चा उद्देश केवळ कैद्यांचे सामाजिक पुनरुत्थान साधण्या साठीच नव्हे तर गरजूंना मदत देणे व त्यांचे कौशल्याचा उपयोग उत्पादनासाठी आणि तणाव कमी करण्यासाठीही करता येत आहे. कैद्यांना ह्यापासून कौशल्य आत्मसात करता येतात व त्यातून सन्मान पूर्वक जगण्यास मदत होते
स्रीजन काय निर्माण करते:– पेपर बॅग्ज, कार्यालयीन स्टेशनरी, लॅम्पशेडस, फोटोफ्रेम्स, बॉक्सेस इत्यादी. ह्या वस्तू मग कंपन्यांना पुरविल्या जातात, जसे की टाटा, एचसीएल, मेहरानगढ म्युझियम, उदयपूर राजस्थान. स्रीजन आपली उत्पादने ह्या कंपन्यांना ही पुरविते :– ईएक्सएल, बीपीओ, सीएस्सी, स्टेरिया, कोन्व्हरजिझ, अमेक्स, एकसेन्ट, पोलॅरिस, आयबीएम, टेक महिंद्रा पेरोत सिस्टिम, एस टी मिक्रोइलेकट्रोनिकस, जिइ मनी, व जिइ कॅपिटल इत्यादीं अशी काहींची नावे देता येतील. काही उत्पादने आर्ट ऑफ लिव्हिंगच्या डीव्हाईन सर्विसेसला व श्री श्री रूरल डेव्हलोपमेंट प्रोग्रॅम ला सुद्धा पुरविली जातात. ही उत्पादने ऑस्ट्रिया व सिंगापूर ला देखील निर्यात केली जातात.
कार्यशाळा
“जेल क्र. ३ व ४ मध्ये दोन कार्यशाळा घेतल्या जात आहेत. प्रत्येक सेल मधून २०-२५ तुरुंगवासी ह्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. ज्याना कैदेतून सोडून दिले आहे असे कैदीही अजूनही स्रीजन बरोबर आहेत व त्यांना त्यांचे कामाचे पेमेंट सुद्धा करण्यात येत आहे. आता पर्यंत १७५ कैद्यांनी ह्या प्रकल्पाचा लाभ घेतला आहे.
सुनील हुकिराम म्हणतो, “नैराश्यावस्थेत असताना माझी आर्ट ऑफ लिव्हिंगचे आनंद उत्सव ह्या कार्यक्रमाशी ओळख करून दिली गेली होती. ह्याने माझे डोळेच उघडले. मी जेल मधून सुटण्याचे विचारच सोडून दिले होते. येथून बाहेर पडायला वाटणारी भीतीही संपली होती! परंतु मी एका नव्याच विश्वात आल्यासारखे झाले. मला असे वाटू लागले की आता मला माझ्या प्रतिष्ठेवरील डाग नाहीसा करून जेल बाहेरचे जगात जाणे शक्य होईल. प्रार्थना व ध्यान या मुळे माझी आंतरिक शक्तीही वाढली व स्रीजन बरोबर जुळण्यास हिम्मत आली. स्रीजन, आर्ट ऑफ लिव्हिंग ने हॅन्डमेड पेपर तयार करण्याचा प्रोजेक्ट सुरु केला होता”.
आपण कसे योगदान देऊ शकता
प्रिझन स्मार्ट कार्यक्रम हा अतिशय परिणामकारक कार्यक्रम आहे, की ज्यात सहभागी लोकांची सुसंगत काळजी घेणे, लक्ष पुरविणे, व मार्गदर्शन हे सर्व केले जाते. आपले योग्य समर्थन मिळाल्यास सध्या देशात सुरु असलेले आपले कार्यक्रम छान यशस्वी करता येतील.