क्रोध

आपल्या रागावर आपला ताबा असणे खूप महत्वाचे आहे. कसे ते शिका.

कोणालाही कधीच चिडलेले किंवा क्रोधित झालेले आवडत नाही. जर इतरांच्या चुका बघून आपल्याला त्यांच्याबद्दल करुणा वाटत नसेल तर आपल्याला त्यांचा आणि नंतर आपला स्वत:चाच राग (क्रोध) येणे अगदी सहाजिक आहे. आपल्या स्वत:बद्दल, आपल्या मनाबद्दल, आपल्या चेतनेबद्दल आणि आपल्या स्वभावातील विकृतीचे मूळ याबद्दल थोडेसे ज्ञान असणे याबाबत उपयोगी ठरेल. आपल्या श्वासामध्ये आपल्याला शिकण्यासाठी एक मोठा धडा आहे, जो आपण विसरलो आहोत. श्वासाच्या प्रक्रिया आणि ध्यान मनाला शांत करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. मग आपण आपला क्रोध कमी करू शकतो आणि आपण आपल हास्य अगदी सहज करू शकतो!

रागाविषयी चकित करणारी काही गुपिते

icon

न्याय्य (योग्य) असण्याची भावना

रागाचे मूळ हे आपणच योग्य किंवा बरोबर असण्याच्या भावनेमध्ये आहे. तुम्ही चुकीचे आहात असे तुम्हांला वाटत असेल तर तुम्हाला रागच येणार नाही. आणि जेव्हा दोन व्यक्तींना एकमेकांचा राग येतो तेव्हा त्या दोघांनाही आपलेच बरोबर आहे असे वाटते. जेव्हा तुम्ही त्यांच्याशी वैयक्तिक किंवा वेगवेगळे बोलाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ते त्यांच्या पद्धतीने बरोबरच आहेत. म्हणजेच न्याय्य असणे हे तुमच्या समजून घेण्यावर अवलंबून आहे.

icon

परिपूर्णता

चौथे कारण म्हणजे तुम्हांला परिपूर्णता किंवा सर्वोत्कृष्टतेची इच्छा असते. त्यामुळे तुम्हाला अपूर्ण गोष्टींबद्दल राग येतो. तुम्हांला सर्वांना तुमच्या परिपूर्णतेच्या संकल्पनेत बसवायचे असते, परंतु असे होत नाही. त्यामुळे नक्कीच तुमच्या आतील क्रोधाला खतपाणी मिळते.

icon

थकवा

तिसरे कारण म्हणजे थकवा. तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकलेले असाल आणि हा ताण गेला नसेल; तर तुम्हाला राग येतो.

icon

तीव्र इच्छा

दुसरे कारण म्हणजे तुमची एखादी खोल, तीव्र इच्छा पूर्ण न झाल्यामुळे येणारी निराशा. निराशेमुळे क्रोध उत्पन्न होतो.

योग आणि ध्यान शिबिरे

आपल्या रागाची किंमत वाढवा, आणि आपले स्मितहास्य मोफत वाटा!

“राग / क्रोध तुमच्या मूळ स्वभावाचे विकृत रुप आहे आणि त्यामुळे तुम्ही पूर्णपणे तळपू शकत नाही. तुम्ही स्वतःला शंभरदा ह्या गोष्टीची आठवण करु देता की मला रागवायचे नाही आहे. परंतु जेव्हा या भावना येतात तेव्हा तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. त्या झंझावात आल्या सारख्या येतात.”

~ गुरुदेव श्री श्री रविशंकर.

रागापासून सुटका होण्यासाठी काही युक्त्या

exercises

व्यायाम

ज्या व्यक्ती फारशी शारीरिक हालचाल करत नाहीत, त्यांना जास्त राग येतो. सर्व रजस शरीरात अडकून पडलेला असतो. त्या व्यक्ती बुद्धीत अडकलेल्या असतात. तुम्ही दूरवर पायी चालले पाहिजे. ट्रेडमिलवर धावा आणि व्यायाम करा. या सर्वांसाठी “योग” उत्तम पर्याय आहे. सूर्यनमस्कार घाला. त्यामुळे तुम्ही इतके थकून जाल की तुमच्याकडे रागावण्यासाठी ऊर्जा शिल्लक उरणार नाही !

Meditation_Mind and Breath- A Deep Connection

प्राणायाम आणि ध्यान

दीर्घ श्वास घ्या आणि शांत रहा. प्राणायाम आणि ध्यानाचा नियमित सराव तुम्हांला रागावर ताबा मिळवण्यासाठी ताकद देतो.

Children and teens - Happy girl smiling with open arms looking at the sky

तुमचा दृष्टीकोन विशाल ठेवा

हे जग परिपूर्ण असू शकत नाही त्यामुळे तुमची दृष्टी विशाल करा. अपरिपक्वतेसाठी काही जागा ठेवा. ‘माझेच बरोबर आहे’ यावर अडून राहू नका. दुसऱ्यांची मते देखील विचारात घ्या. तुम्हांला जसे हवे तसे तुम्ही इतरांना बनवू शकत नाही. अप्रिय गोष्टी होणारच आहेत. जेव्हा असे घडेल तेव्हा पुढे जाण्याची ताकद आणि धैर्य तुमच्याकडे असायला हवे.

व्यक्ती आणि परिस्थिती यांचा आहे तसा स्वीकार करा.

healthy food habits to maintain wellness

तुमच्या अन्नाकडे लक्ष द्या.

जर तुम्ही पित्त प्रकृतीचे असाल तर तुम्ही क्रोधप्रवण आहात. सकाळच्या वेळी तुम्ही काहीतरी खाण्याची दक्षता घ्या. सूर्योदयापासून दोन तासांच्या आत काहीतरी खा. जर तुम्ही खाल्ले नाही तर पिताचा प्रकोप होऊ शकतो. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींसाठी सकाळचा नाश्ता आवश्यक आहे. टोबॅस्को सॉस, हॉट चिली सॉस सारखे पदार्थ जास्त खाऊ नका. जास्तवेळ उपाशी राहू नका; वेळेवर अन्न खा. अयोग्य अन्न तुमच्या आतील अग्नी जास्त भडकवू शकते. तुमचे पित्त अनियंत्रित झाले तर ती धोक्याची घंटा समजा!

जेव्हा तुमचे पित्त नियंत्रणात असते तेव्हा तुम्ही विनाकारण चिडत नाही.

दुसरे कोणी क्रोधित झाले असल्यास काय करावे?

जेव्हा दुसरे कोणी तुमच्यावर नाराज असते, त्याचवेळी तुम्ही देखील त्या व्यक्तीवर नाराज होवू नका. एखादी व्यक्ती ओरडत असेल तर त्यांना ओरडू द्या. हा त्यांचा वेळ आहे. त्यांना त्यांचा वेळ द्या. तुम्ही प्रेक्षक बना. त्या खेळात तुम्ही सामील होऊ नका. नंतर केव्हातरी तुम्ही क्रोधित होऊन आरडाओरडा करा ! तुमचा राग दाखवा ! कसं आहे, जेव्हा प्रत्येकजण खेळात भाग घेतो आणि कोणीही प्रेक्षक उरत नाही तेव्हा प्रश्न निर्माण होतो ! आळीपाळीने क्रोधित व्हा ! आनंद घ्या ! विनोद हा रागावरचा उतारा आहे. जेव्हा तुम्ही केंद्रित असता तेव्हा आपोआप विनोद येतोच.

तसेच जेव्हा एखाद्याला कारणाशिवाय राग येतो तेव्हा त्याचे पित्त वाढलेले आहे हे लक्षात घ्या. त्यांना शांत होण्यासाठी मदत करा. पित्त शांत करण्यासाठी त्यांना दूध, आईसक्रीम या सारखे पित्त कमी करणारे पदार्थ देणे आवश्यक आहे.

मला कधीच राग यायला नको का?

राग वाईट नाही. राग काही सेकंदासाठी टिकला तर ठीक आहे. जितका वेळ पाण्यावर ओढलेली रेषा टिकते, तितका वेळ राग राहायला हवा. कधीतरी राग आला तर स्वतःला दोष देऊ नका. आध्यात्मिक मार्गावर अतिशय हानिकारक ठरणारी एक गोष्ट म्हणजे स्वतःला दोष देणे. रागाचे प्रदर्शन करणे चुकीचे नाही; परंतु आपल्या रागाब‌द्दल अनभिज्ञ असल्यामुळे स्वत:लाच त्रास होतो. कधीकधी तुम्ही मुद्दाम राग दाखवू शकता. उदाहरणार्थ मुलाने काहीतरी हानी पोहोचवणारे केले तर आई त्याच्यावर चिडते, कडकपणे वागते किंवा ओरडते देखील!

क्रोधामुळे तुम्ही अशी आव्हाने स्वीकारता जी तुम्ही सामान्यतः स्वीकारली नसती. ही खूप मोठी आंतरिक प्रेरणा असते. परंतु कडवटपणा नसेल तरच ! जर रागामुळे तुमच्यात कडवटपणा निर्माण झाला तर तो तुम्हाला आतून खाऊन टाकतो. क्रोध हा असा अग्नि आहे जो तुम्हांला ऊब देऊ शकतो किंवा तुम्हाला जाळून देखील टाकू शकतो.

क्रोधित होण्याचे परिणाम पहा. रागाच्या भरात तुम्ही घेतलेले निर्णय किंवा बोललेले शब्द याबद्दल तुम्ही आनंदी आहात का ? नाही ! कारण तुम्ही तुमची सजगता गमावली आहे. परंतु तुम्ही पूर्णपणे सजग आहात आणि क्रोधित झाला आहात तर ठीक आहे.

क्रोध तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही अशा स्थितीपर्यंत येण्यासाठी तुम्हाला वेळ लागेल. क्रोध वेगवेगळ्या छटांमध्ये आणि तीव्रतेमध्ये येत राहील. तोवर तुमची साधना करत राहा. सुदर्शन क्रिया, प्राणायाम आणि ध्यानामुळे फायदा होईल.